
Official X handle of Directorate General of Information and Public Relations (#DGIPR), #Government of #Maharashtra #महाराष्ट्र #शासन https://teapaw.org/t.co/vQ3dmidWWZ
Mumbai, India
Joined October 2014
- Tweets83.8K
- Following80
- Followers327K
- Likes120
Pinned Tweet
📍 सीएचएम महाविद्यालय कॅम्पस, #उल्हासनगर.
#थेटप्रसारण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते हैद्राबाद (सिंध) नॅशनल कॉलेजिएट बोर्डच्या नूतन महाविद्यालय इमारतीचे उद्घाटन.
#LIVE teapaw.org/i/broadcasts/2MEoPddER…
एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे उद्भवणारी #पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्यात जलसंधारणाची कामे वेगाने पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ३० जून २०२७ पर्यंत जास्तीत जास्त गावांमध्ये मृद व जलसंधारणाची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, मृद व जलसंधारण, कृषी, ग्रामविकास, महसूल आदी विभागांच्या समन्वयातून ही कामे राबविण्यात येणार असल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली.
राज्यात कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, साठवण तलाव, सिमेंट नाला बांध, पाझर तलाव तसेच गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार यांसारखी जलसंधारणाची कामे सुरू आहेत. ग्रामीण भागात शेतकऱ्यांशी थेट संपर्क असलेल्या कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहभागामुळे या कामांचा विस्तार आणि गती वाढणार आहे. हा निर्णय विभागांच्या कार्यक्षमतेवर अविश्वास नसून, सामूहिक जबाबदारीतून उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी घेतलेला आहे, असे मंत्री राठोड यांनी स्पष्ट केले.
जलसंधारणाच्या कामांमध्ये गुणवत्ता आणि पारदर्शकता राखण्यासाठी #जलदर्पण पोर्टल, एमएच-युआयडी (MH-UID) आणि जिओ-टॅगिंग यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना या प्रणालींच्या वापराबाबत तसेच कामांच्या तांत्रिक प्रक्रियेबाबत आवश्यक मार्गदर्शन आणि सहकार्य देण्यात येईल. पाणीटंचाई आणि दुष्काळाच्या संभाव्य संकटावर मात करून राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन मंत्री संजय राठोड यांनी केले.
@SanjayDRathods
#दुष्काळ
#एलनिनो
#उल्हासनगर येथे हैदराबाद (सिंध) नॅशनल कॉलेजिएट बोर्डाच्या चंदीबाई हिंमतमल मनसुखानी (सीएचएम) महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.
फाळणीनंतर प्रतिकूल परिस्थितीतही सिंधी समाजाने मेहनत, जिद्द आणि उद्यमशीलतेच्या जोरावर विविध क्षेत्रांत मिळवलेल्या यशाचा गौरव मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. शिक्षणाकडे केवळ व्यवसाय म्हणून नव्हे, तर समाजनिर्मितीचे माध्यम म्हणून पाहण्याची संस्थेची भूमिका महत्त्वपूर्ण आहे, असेही त्यांनी नमूद केले.
उल्हासनगरच्या पायाभूत विकासाला गती देण्यात येणार असून मेट्रो, काँक्रीट रस्ते, उड्डाणपूल आणि स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेची कामे हाती घेण्यात येत आहेत. शहराला नियोजनबद्ध स्वरूप देण्यासाठी अनधिकृत घरांचा प्रश्न मार्गी लावणे आणि क्लस्टर विकासाच्या माध्यमातून व्यापक आराखडा तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच सिंधी समाजातील नागरिकांना जमिनीचे मालकी हक्क देण्यासाठी आणि जमिनी फ्रीहोल्ड करण्याची प्रक्रिया लवकरच उल्हासनगरमध्ये सुरू करण्यात येणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
एचएसएनसी बोर्डाचे अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी यांनी संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला. शिक्षण आणि रोजगार यांमधील दरी कमी करण्यासाठी कौशल्याधारित प्रशिक्षणावर भर देण्यात येत असून, संस्थेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सीएचएम महाविद्यालयाची नूतन इमारत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याची आणि संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीची नवी पायाभरणी ठरेल, असेही यावेळी नमूद करण्यात आले.
यावेळी आमदार कुमार आयलानी, आमदार किसन कथोरे, आमदार सुलभाताई गायकवाड, एचएसएनसी बोर्डाचे अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी, जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, उल्हासनगर महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे, संस्थेचे विश्वस्त किशू मनसुखानी उपस्थित होते.
@Dev_Fadnavis
@kumarailanibjp
@KisanMla
@sulbhagaikwad7
@N_Hiranandani
#HSNC
राज्यसभा #खासदार रामराव सखाराम वडकुते यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक आणि बहुजन चळवळीची मोठी हानी झाली आहे. सामान्य कुटुंबातून संघर्ष आणि कर्तृत्वाच्या बळावर देशाच्या सर्वोच्च सभागृहापर्यंत पोहोचलेले नेतृत्व हरपले, अशा शब्दांत ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी श्रद्धांजली वाहिली.
खासदार रामराव वडकुते यांनी सहकार, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. विधान परिषद सदस्य आणि राज्यसभा खासदार म्हणून त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न मांडले. धनगर समाजासह बहुजन समाजाच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवला, तर मराठवाड्याच्या विकासासाठी शिक्षण, पाणी आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर विशेष भर दिला.
त्यांची पक्षनिष्ठा, जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध अनेकांसाठी प्रेरणादायी होते. त्यांच्या निधनाने हिंगोली, परभणीसह संपूर्ण मराठवाड्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. दिवंगत रामराव वडकुते यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबीयांसह कार्यकर्त्यांना दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, अशी प्रार्थना राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केली.
@MeghnaBordikar
‘सुदर्शन न्यूज’ या वृत्तवाहिनीवरील ‘बदलता महाराष्ट्र’ हा कार्यक्रम…
#साप्ताहिकमहाराष्ट्र
#MaharashtraThisWeek
#DGIPR
‘न्यूज नेशन’ या वृत्तवाहिनीवरील ‘अपना महाराष्ट्र’ कार्यक्रम…
#साप्ताहिकमहाराष्ट्र
#MaharashtraThisWeek
#DGIPR
‘एबीपी न्यूज’ या वृत्तवाहिनीवरील ‘महासप्ताह’ कार्यक्रम…
#साप्ताहिकमहाराष्ट्र
#MaharashtraThisWeek
#DGIPR
शांतता, सहकार्य आणि मानवतेची मूल्ये अधिक बळकट करणे गरजेचे आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी तसेच सुरक्षित भारताच्या निर्मितीसाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
गेट वे ऑफ इंडिया 26/11 पीस कॉन्सर्ट : ग्लोबल पीस ऑनर्स’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मंत्री पंकजा मुंडे, मंगलप्रभात लोढा, भारतरत्न सचिन तेंडुलकर, अंजली तेंडुलकर, जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, करण जोहर, अक्षय कुमार, बीएमसी आयुक्त अश्विनी भिडे, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, उद्योगपती अनंत अंबानी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
प्रगती आणि समृद्धी साध्य करण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग महत्वाचा आहे. शांतता व सुव्यवस्था राखणे ही शासनाची जबाबदारी असली, तरी समाजातील प्रत्येक घटकाची साथ आणि सहभाग लाभल्यास शांततेचे रूपांतर लोकचळवळीत होऊ शकते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
दिव्यज फाउंडेशनने शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, स्वच्छता आणि समाजकल्याण या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले आहे. गरजूंच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडविण्यासाठी फाउंडेशनकडून करण्यात येत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. निःस्वार्थ भावनेने समाजासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणारा हा उपक्रम शांतता आणि मानवतेचा संदेश देणारा आहे. अशा पुरस्कारांमुळे समाजातील सेवाकार्यासाठी प्रेरणा मिळते. पुरस्कारप्राप्त सर्व मान्यवरांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी अभिनंदन केले.
कायद्याचा धाक किंवा युद्धाच्या माध्यमातून शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही; शांततेसाठी सकारात्मक संवाद आणि परस्पर विश्वास आवश्यक आहे. ‘ग्लोबल पीस ऑनर्स’च्या माध्यमातून हाच विचार पुढे नेला जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम झाली असून, दहशतवाद आणि नक्षलवादाविरोधातील लढ्याला निर्णायक दिशा मिळाली आहे. सीमेवर लढणारे शूर जवान आणि अहोरात्र कार्यरत असलेल्या पोलीस व सुरक्षा यंत्रणांमुळे देशाच्या सुरक्षेशी कोणीही खेळू शकणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी शासनाच्या प्रयत्नांसोबतच समाजातील प्रत्येक घटकाचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. ‘ग्लोबल पीस ऑनर्स’सारखे उपक्रम समाजात एकोपा, बंधुभाव आणि सामंजस्याची भावना रुजविण्यासोबतच शांतता व सुरक्षिततेचा संदेश देतात. शहर शांत आणि सुरक्षित असेल, तर समाज आणि प्रत्येक कुटुंबात सुख-समाधान नांदेल, असे सांगून उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे अभिनंदन केले.
अमृता फडणवीस म्हणाल्या की, जग पूर्वीपेक्षा आता अधिक जोडले आहे पण एकमेकांची मनापासून काळजी घेणे शांतता जपणे महत्वाचे आहे. शांतता म्हणजे मानवतेची उपस्थिती आहे. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याची आठवण करून देताना पोलीस, कमांडो, अग्निशमन दलाचे जवान, डॉक्टर, परिचारिका आणि सामान्य नागरिकांनी इतरांचे प्राण वाचवण्यासाठी दाखविलेल्या धैर्याला त्यांनी अभिवादन केले.
या कार्यक्रमात शांती, मानवता, सामाजिक कार्य आणि देशसेवेसाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात अभिनेता टायगर श्रॉफ यांनी सादर केलेल्या श्रीगणेश वंदनेने झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आध्यात्मिक गुरू सद्गुरू जग्गी वासुदेव यांची मुलाखतकाराच्या भूमिकेतून मुलाखत घेतली. यावेळी जीवन जगण्याचा मार्ग दाखविणारे सद्गुरू यांचे विचार ईशा फाउंडेशनच्या माध्यमातून ४० भाषांमध्ये पोहोचविण्यात येत असल्याचा उल्लेख करण्यात आला. अभिनेता रणवीर सिंग यांनी भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची मुलाखत घेतली. यावेळी अभिनेता शाहरुख खान यांनी उपस्थितांना संबोधित केले. कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांचा व्हिडिओ संदेशही दाखविण्यात आला.
अमृता फडणवीस यांनी ‘ये मेरे वतन के लोगो’ आणि ‘ऐ वतन, मेरे आबाद रहे तू’ ही देशभक्तिपर गीते सादर केली. अभिनेता अक्षय कुमार यांनी ‘तेरी मिट्टी में मिल जावा’ आणि ‘सुनो गौर से दुनिया वालो’ या गीतांवर नृत्य सादर केले, तर गायक सुखविंदर सिंग यांनी ‘मेरे देश की धरती सोना उगले’, ‘चक दे इंडिया’ आणि कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी ‘जय हो’ हे गीत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
@Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @rahulnarwekar @Pankajamunde @MPLodha
#GlobalPeaceHonours2026
साम टीव्ही’ या वृत्तवाहिनीवरील ‘महाराष्ट्र देशा’ कार्यक्रम…
#साप्ताहिकमहाराष्ट्र
#MaharashtraThisWeek
#DGIPR
‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीवरील ‘महासप्ताह’ कार्यक्रम…
#साप्ताहिकमहाराष्ट्र #MaharashtraThisWeek #DGIPR
आंबे येथील विहीर दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ७ लाखांची आर्थिक मदत, तर विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्यांच्या वारसांना ८ लाखांच्या मदतीचे धनादेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
@mieknathshinde
#साेलापूर
केंद्र सरकारने सोयाबीन, सोयाबीन डीओसी आणि तेलबियांच्या चार प्रकारच्या पेंडींवर १ डिसेंबर २०२६ पासून साठा मर्यादा लागू करणारी अधिसूचना जारी केल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा आहे.
#FactCheck
#DGIPRFactCheck
व्हायरल राजपत्र अधिसूचना रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या मूळ अधिसूचनेतील तारीख व मजकूर बदलून तयार करण्यात आली आहे. मूळ अधिसूचना सीमा रस्ते संघटनेच्या बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांच्या उत्सर्जन निकषांशी संबंधित आहे. केंद्र शासनाने अशी कोणतीही साठा मर्यादा अधिसूचना जारी केलेली नाही.
#सोयाबीन
📍 गेट वे ऑफ इंडिया, कुलाबा, मुंबई
#थेटप्रसारण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘26/11 पीस कॉन्सर्ट : ग्लोबल पीस ऑनर्स’ कार्यक्रम
#LIVE teapaw.org/i/broadcasts/2kEqkRkey…
भटके-विमुक्त प्रवर्गातील नागरिकांना शासकीय प्रमाणपत्रे मिळवून देऊन त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विशेष अभियान आणि तृतीयपंथीयांसाठी राज्यातील एसटी बसस्थानकांवर स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारण्याचा निर्णय या उपक्रमांची केंद्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. या अभियानाच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांना शासकीय योजनांच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचे देशपातळीवरील कार्यशाळेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह इतर केंद्रीय मंत्री, राज्यांचे मंत्री यांनी विशेष कौतुक केले.
नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, नितीन नबीन यांच्या उपस्थितीत देशातील विविध राज्यांच्या सामाजिक न्याय आणि इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मंत्र्यांची 'समावेशी नीती संकल्प’ कार्यशाळा झाली. महाराष्ट्राच्या वतीने या उपक्रमांची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी माहिती दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या मार्गदर्शनात अभियानाच्या माध्यमातून राज्यातील विविध जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात सुमारे 76 हजार शासकीय कागदपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. भटके-विमुक्त समाजातील अनेक नागरिकांकडे आवश्यक कागदपत्रे नसल्यामुळे त्यांना शासकीय योजना आणि विविध सुविधांचा लाभ मिळविताना अडचणी येतात. ही बाब लक्षात घेऊन इतर मागास बहुजन कल्याण विभागाने महसूल व इतर विभागांच्या सहकार्याने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या माध्यमातून पात्र नागरिकांना आवश्यक प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यावर भर देण्यात येत आहे.
भटके-विमुक्त समाजातील नागरिकांना केवळ प्रमाणपत्रे उपलब्ध करून देणे एवढ्यापुरते या अभियानाचे स्वरूप मर्यादित नसून, त्यांना शिक्षण, रोजगार, सामाजिक सुरक्षा आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देत विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा या उपक्रमाचा व्यापक उद्देश आहे. पहिल्या टप्प्यातील कामाच्या अनुभवातून अभियानाची पुढील दिशा निश्चित करण्यास मदत होणार आहे. पुढच्या वर्षी 6 ते 8 जानेवारी दरम्यान पुन्हा हे अभियान राबविण्यात येणार आहे.
@madhurimisal
#जनगणना २०२७ च्या दुसऱ्या टप्प्यातील लोकसंख्या गणनेचे काम अचूक, पारदर्शक आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने या कामास सर्वोच्च प्राधान्य द्यावे. जनगणनेच्या माध्यमातून संकलित होणारी माहिती पुढील नियोजन आणि विविध विकासकामांसाठी महत्त्वपूर्ण असल्याने सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिले.
जनगणना २०२७ च्या दुसऱ्या टप्प्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी प्रधान जनगणना अधिकाऱ्यांची राज्यस्तरीय परिषद सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे आयोजित करण्यात आली.
संयुक्त सचिव (भारत सरकार) व मुख्य प्रधान जनगणना अधिकारी, महाराष्ट्र डॉ. निरुपमा जे. डांगे यांनी जनगणनेतील माहिती अचूकपणे संकलित करण्याचे महत्त्व विशद केले. जनगणनेतील त्रुटींचा परिणाम मतदारसंघ पुनर्रचना, वैधानिक आरक्षण तसेच आगामी दशकातील लोकसंख्याविषयक मूलभूत आकडेवारीवर होऊ शकतो. त्यामुळे राज्यभरात तैनात करण्यात येणाऱ्या सुमारे २.८४ लाख प्रगणक व पर्यवेक्षकांनी प्रत्येक व्यक्तीची नोंद होईल, याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांनी शहरी भागातील जनगणनेदरम्यान येणाऱ्या आव्हानांकडे लक्ष वेधले. महाराष्ट्राच्या लोकसंख्येतील सुमारे 50 टक्के लोकसंख्या शहरी भागात राहत असल्याने स्थलांतर, नागरिकांची सततची ये-जा, दाट वस्ती आणि शहरांचा विस्तार यांचा विचार करून नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. बंद किंवा रिकाम्या घरांसाठी आवश्यकतेनुसार पुन्हा भेटी देणे, प्रगणकांची नियुक्ती व प्रशिक्षण वेळेत पूर्ण करणे, तसेच त्यांना आवश्यक सुविधा आणि मानधन उपलब्ध करून देण्यावर त्यांनी भर दिला.
प्रधान सचिव व राज्य नोडल अधिकारी रणजित सिंग देओल यांनी जनगणना 2027 च्या दुसऱ्या टप्प्याच्या वेळापत्रकाची आणि राज्यातील तयारीची माहिती दिली. प्रगणक व पर्यवेक्षकांच्या नियुक्त्या, प्रशिक्षण आणि संबंधित प्रशासकीय प्रक्रिया निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांनी जिल्हास्तरीय प्रशिक्षणात सहभागी होऊन कामकाजाचा नियमित आढावा घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले.
जनगणना 2027 चे राज्यातील वेळापत्रक
महाराष्ट्रात 10 ते 24 जानेवारी 2027 या कालावधीत नागरिकांना ऑनलाइन स्वयं-गणना पोर्टलद्वारे स्वतःची माहिती नोंदवता येणार आहे. त्यानंतर २५ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत प्रगणक घरोघरी जाऊन लोकसंख्या गणना करतील. २८ फेब्रुवारीच्या मध्यरात्री बेघर लोकसंख्येची गणना करण्यात येईल, तर १ ते ५ मार्च २०२७ या कालावधीत पुनरावलोकन फेरी होणार आहे.
या टप्प्यात नागरिकांची लोकसंख्याशास्त्रीय, सामाजिक आणि आर्थिक माहिती संकलित करण्यासाठी 40 प्रश्नांची डिजिटल प्रश्नावली वापरण्यात येणार आहे. यामध्ये नाव, कुटुंबप्रमुखाशी असलेले नाते, लिंग, वय, वैवाहिक स्थिती, धर्म, जात, दिव्यांगत्व, मातृभाषा, शिक्षण, व्यवसाय, रोजगार आणि स्थलांतर यासंबंधी माहितीचा समावेश आहे.
परिषदेत जनगणना अधिनियम व नियम, पीई मोबाइल ॲप, एचएलबीसी आणि सीएमएमएस पोर्टल, गणना क्षेत्रांची निश्चिती, जनजागृती आणि देखरेख यासंबंधी तांत्रिक सत्रे घेण्यात आली. मास्टर ट्रेनर्स, जिल्हा व चार्ज अधिकारी आणि तांत्रिक सहाय्यकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून क्षेत्रीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण सुरू आहे. यानंतर प्रगणक आणि पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.
परिषदेस नवी दिल्ली येथील भारताचे महानिबंधक कार्यालयाचे उपमहानिबंधक (सी अँड टी) जसपाल सिंग, सर्व विभागीय आयुक्त, राज्यातील प्रधान जनगणना अधिकारी, जनगणना कार्य संचालनालय, मुंबई तसेच महाराष्ट्र शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#जनगणना२०२७
मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या तंत्रज्ञानसंवर्धित विविध प्रकल्पांचे कार्यान्वयन व लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आले.
याप्रसंगी कौशल्य, रोजगार, उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
पोलीस दलाच्या कामकाजात अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे निष्पक्षता, गतिमानता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व (Accountability) येण्यास मदत होणार आहे. स्मार्ट कार्ड, अँटी-नार्कोटिक्स व्हॅन' टॅब्लेट वितरण, मुंबई पोलीस एकात्मिक कार्यप्रणाली, सिटीझन ॲपच्या माध्यमातून पोलीस दलाची कार्यक्षमता वाढविणे, दैनंदिन कामकाज अधिक सुलभ करणे आणि नागरिकांना जलद व प्रभावी सेवा उपलब्ध करून देणे या उद्देशाने मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने विविध तंत्रज्ञानाधारित सुविधांची सुरुवात करण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिसांच्या कार्याचा गौरव केला.
'नशामुक्त भारत, नशामुक्त महाराष्ट्र' अभियानांतर्गत अमली पदार्थांविरोधातील कारवाईत गुणात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच एआयच्या मदतीने 'तपास सारथी' प्रणाली विकसित करण्यात येत आहे. एफआयआरपासून ते चार्जशीट आणि पुरावे व्यवस्थापनापर्यंतची संपूर्ण साखळी एआयच्या मदतीने एकाच दुव्यात आणली जात आहे. नवीन कायद्यांनुसार डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे ग्राह्य धरले जात असल्याने 'हॅश व्हॅल्यू'च्या आधारे ही संपूर्ण प्रक्रिया 'एंड-टू-एंड डिजिटल' करण्यावर भर देण्यात येत असून सीसीटीव्ही, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ड्रोन, डेटा डिक्रिप्शन, सोशल मीडिया विश्लेषण करून गुन्हे रोखण्यासाठी मुंबई पोलीस दलाची डिजिटल पोलिसिंगच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले आहे.
दरम्यान बेलचे मुख्य व्यवस्थापक राकेश कुमार, वरिष्ठ मुख्य व्यवस्थापक अनिता के. एस., किशोर कुमार नारु, कॅप्सूल टेक्नॉलॉजीचे कार्यकारी संचालक नितीन कामत आणि अर्जुन के. आर.; स्केयुटेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदित्य प्रभू आणि दीपाली केळकर; तसेच मिनीटेकचे उपाध्यक्ष प्रीतम करवीर व प्रकल्प प्रमुख मयुर कुलकर्णी यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
तसेच अँटी-नार्कोटिक्स सेलच्या (ANC) ताफ्यातील नवीन फॉरेन्सिक वाहनाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण केले.
लोकार्पण केलेल्या सेवा सुविधा
▶️डिजी आयडी स्मार्ट कार्ड : मुंबई पोलीसांची अधिकृत ओळख करुन देणारे स्मार्ट ओळखपत्र.
▶️टॅब्लेट वितरण : पोलीसांच्या विविध अधिकृत ॲप्लीकेशनचा वापर करण्यासाठी सर्व अंमलदार व अधिकारी यांना दैनंदिन कामकाज अधिक सुलभ, जलद आणि कार्यक्षम करण्यासाठी टॅब्लेटची सुविधा.
▶️Anti-Narcotics Investigation Van : अंमली पदार्थविरोधी कारवाई आणि तपास अधिक प्रभावी व गतिमान करण्यासाठी अत्याधुनिक तपास वाहन.
▶️मुंबई पोलीस एकात्मिक कार्यप्रणाली (MPIS) : पोलीस दलातील विविध कामकाज एकाच डिजिटल प्रणालीद्वारे अधिक सुलभ, समन्वयपूर्ण आणि गतिमान करण्यासाठी एकात्मिक कार्यप्रणाली.
▶️सिटीझन ॲप : नागरिकांना पोलीस विभागाच्या विविध सेवा व सुविधांचा डिजिटल माध्यमातून सहज लाभ घेता यावा यासाठी सिटीझन ॲपची सुविधा.
@Dev_Fadnavis
@MPLodha
@ShelarAshish
@CPMumbaiPolice
@MumbaiPolice
#SmartPolicing
📍पुणे
सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाचा २३ व्या #दीक्षान्त समारंभ उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सिम्बायोसिसचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. एस. बी. मुझुमदार, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रामकृष्णन रमण, वैद्यकीय व आरोग्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. राजीव येरवडेकर आदी उपस्थित होते.
शिक्षण हे केवळ पदवी मिळविण्याचे किंवा रोजगाराचे साधन नसून व्यक्तीचे चारित्र्य घडविणारे, नैतिक मुल्यांची जपणूक करणारे आणि समाजाप्रती जबाबदारीची जाणीव निर्माण करणारे प्रभावी माध्यम आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग केवळ वैयक्तिक प्रगतीसाठी न करता समाजाच्या कल्याणासाठी आणि राष्ट्र उभारणीसाठी करावा, असे आवाहन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी यावेळी केले.
व्यावसायिक यश महत्त्वाचे असले तरी चारित्र्य, प्रामाणिकपणा आणि नैतिक मूल्ये यांना तितकेच महत्त्व आहे. आयुष्यात कितीही मोठे यश मिळविले तरी आपल्या मूल्यांशी तडजोड करू नये. विद्यार्थ्यांनी आयुष्यभर शिकण्याची वृत्ती जोपासावी, आव्हानांना धैर्याने सामोरे जावे आणि प्रत्येक क्षेत्रात सर्वोत्तम योगदान देण्याचा प्रयत्न करावा, असे उपराष्ट्रपती म्हणाले.
समाजातील गरजू व्यक्तींना मदत करणे, इतरांच्या प्रगतीत हातभार लावणे आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजहितासाठी करणे यातच खरा आनंद आणि यश सामावलेले आहे. विद्यार्थ्यांनी जगात कुठेही गेले तरी भारतीय संस्कृती, परंपरा आणि मूल्यांचा अभिमान बाळगावा. आपल्या वर्तनातून आणि कार्यातून भारताची प्रतिमा उंचवावी, असे आवाहनही त्यांनी केले.
सिम्बायोसिसच्या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या ३२ हजार विद्यार्थ्यांपैकी १९ हजारांहून अधिक महिला असल्याचा उल्लेख करतांना शिक्षण क्षेत्रात महिलांचा वाढता सहभाग ही अभिमानास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल परिवर्तन, जैवतंत्रज्ञान आणि आधुनिक विज्ञानामुळे जगात वेगाने बदल घडत आहेत. या बदलांचा स्वीकार करताना तंत्रज्ञानासोबत मानवी मूल्ये, नैतिकता, करुणा आणि सामाजिक जबाबदारी जपणे आवश्यक आहे. भविष्यात केवळ तांत्रिक ज्ञान असणाऱ्यांचे नव्हे, तर ज्ञानासोबत विवेक, नवकल्पनांसोबत करुणा आणि महत्त्वाकांक्षेसोबत प्रामाणिकपणा जपणाऱ्यांचे जग असेल, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले.
@CPR_VP
@Jishnu_Devvarma
@ChDadaPatil
📍 सह्याद्री अतिथीगृह, मुंबई
#थेटप्रसारण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या नवीन तंत्रज्ञानयुक्त सुविधांचे लोकार्पण
#LIVE teapaw.org/i/broadcasts/2ybQbeBEm…























