MIRA BHAYANDAR VASAI VIRAR POLICE retweeted
विभिन्नतेतही एकता जपणाऱ्या सर्व भारतीयांना राष्ट्रीय एकता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त मनःपूर्वक अभिवादन!
#राष्ट्रीय_एकता_दिवस
🚨 गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-४ची मोठी कारवाई
पाशमैलाराम, पटनचेरू, जि. संगारेड्डी, तेलंगणा येथे एमडी (मेफेड्रॉन) तयार करण्यासाठी लागणाऱ्या नियंत्रित रसायनाची अवैध निर्मिती करणारा कारखाना उध्वस्त करण्यात आला.
🔹 44.699 किलो 2-BROMO-4METHYLPROPIOPHENONE
🔹 अंदाजे ₹27.06 लाखांचा मुद्देमाल जप्त
🔹 इतर रसायने व लॅब साहित्य हस्तगत
🔹 या प्रकरणात आतापर्यंत 25 आरोपींना अटक
🔹 महाराष्ट्रासह गुजरात, उत्तर प्रदेश व तेलंगणा येथे कारवाई
अंमली पदार्थांच्या निर्मिती, पुरवठा व तस्करीची साखळी मोडून काढण्यासाठी पोलीसांकडून सातत्याने प्रभावी कारवाई सुरू आहे.
अंमली पदार्थमुक्त समाजासाठी कटिबद्ध! 🚔
#CrimeBranch #PoliceAction
#NDPS #DrugFreeIndia #DrugFreeSociety #AntiDrug #Mephadron #MDDrugs #MaharashtraPolice #CrimeNews
On 21 October, we pay our heartfelt tribute to the brave police personnel who made the supreme sacrifice in the service of our nation.
Their courage, dedication and selfless service will forever inspire us. We salute their sacrifice and honour their memory with deepest respect. 🙏
Salute to our martyrs. Their sacrifice will never be forgotten.
⸻
२१ ऑक्टोबर — पोलीस हुतात्मा दिन.
देशाच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व पोलीस हुतात्म्यांना विनम्र अभिवादन!
त्यांचे शौर्य, त्याग आणि कर्तव्यनिष्ठा सदैव प्रेरणा देत राहतील. त्यांच्या सर्वोच्च बलिदानाला भावपूर्ण श्रद्धांजली!
हुतात्म्यांचे बलिदान सदैव स्मरणात राहील. 🇮🇳
#पोलीसहुतात्मादिन #हुतात्मादिन #२१ऑक्टोबर #महाराष्ट्रपोलीस #MBVVPolice #विनम्रअभिवादन
🚨 घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस; आरोपी अटक!
विरार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची उल्लेखनीय कामगिरी.
दि. ३०/०९/२०२६ ते ०१/१०/२०२६ दरम्यान विरार येथे घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करण्यात आली.
🔸 गुन्हा रजि. नं. ५९५/२०२६
🔸 भा.न्या.सं. २०२३ कलम ३३१(३), ३३१(४), ३०५(अ)
🔸 चोरीस गेलेले १००% सोन्याचे दागिने हस्तगत
🔸 कौशल्यपूर्ण तपास व गुप्त माहितीच्या आधारे गुन्ह्याची उकल
गुन्हेगारांवर कायद्याचा वचक — नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस सदैव तत्पर! 👮♂️
#VirarPolice #VasaiVirarPolice #MaharashtraPolice #CrimeDetection #HouseBreaking #LawAndOrder
Celebrating the victory of truth over falsehood, justice over injustice, and good over evil.
May this Dussehra bring peace, courage, and positivity to every life. Wishing everyone a safe and joyous Dussehra! 🏹🔥
Shubh Dasara!
#ShubhDasara #HappyDussehra #MaharashtraPolice #MBVVPolice #VictoryOfGoodOverEvil
असत्यावर सत्याचा, अन्यायावर न्यायाचा आणि अधर्मावर धर्माचा विजय होवो!
हा दसरा सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी आणि सकारात्मकता घेऊन येवो. सर्वांना सुरक्षित आणि आनंदमय दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🚩
शुभ दसरा!
#ShubhDasara #HappyDussehra #MaharashtraPolice #MBVVPolice #VictoryOfGoodOverEvil
🌺✨ भक्तीचा उत्सव… सुरक्षिततेची जबाबदारी! ✨🌺
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचमार्फत सर्व नागरिक, भाविक आणि नवरात्रोत्सव मंडळांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🪔
आई जगदंबेच्या भक्तीचा आणि विजयादशमीच्या उत्साहाचा हा सण आनंदात, उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करूया.
🚦 नागरिक व नवरात्रोत्सव मंडळांसाठी मी.भा.व.वि. आयुक्तालायमार्फत आवाहन
📍 दि. २० ऑक्टोबर रोजी दुपारी ३ नंतर शक्यतो वाहतूक नियंत्रण असलेल्या मार्गांवरून प्रवास टाळा.
🔄 प्रवास आवश्यक असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करा.
🚧 बॅरिकेड्स, दिशादर्शक फलक व वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करा.
🚗 विसर्जन मिरवणुकीदरम्यान रस्त्यावर वाहने पार्क करू नका.
⚠️ वाहतूक कोंडीच्या वेळी घाई, धोकादायक ओव्हरटेकिंग किंवा विरुद्ध दिशेने वाहन चालवणे टाळा.
🤝 मिरवणुकीतील सर्व मंडळे व नागरिकांनी पोलीस आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करा.
❌ बॅरिकेड्स हटवू नका किंवा वाहतूक नियंत्रण असलेल्या मार्गावर प्रवेश करण्याचा प्रयत्न करू नका.
🔊 ध्वनीवर्धक वापराबाबत महत्त्वाचे आवाहन
*दसरा (विजयादशमी) उत्सवाच्या दिवशी रात्री १०.०० वाजेपर्यंतच वाद्य व ध्वनीवर्धक वाजविण्यास परवानगी आहे.*
⏰ रात्री १०.०० नंतर वाद्य व ध्वनीवर्धकांचा वापर पूर्णतः बंद ठेवावा.
उत्सवाचा आनंद घेताना ध्वनीची मर्यादा पाळा आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयास सहकार्य करा.
🚑 अत्यावश्यक सेवांना सूट
पोलीस, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडॉर, ऑक्सिजन गॅस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना हे निर्बंध लागू राहणार नाहीत.
🌟 मंडळांचा उत्साह + नागरिकांची शिस्त + पोलिसांचे सहकार्य = सुरक्षित आणि सुरळीत उत्सव!
🙏 आपले सहकार्य, आपली जबाबदारी — सुरक्षित उत्सवाची हमी!
🪔 विजयादशमीच्या मंगलमय शुभेच्छा!
सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि विजय लाभो! 🙏
#Navratri2026 #Dussehra2026 #MiraBhayandarVasaiVirar
#MiraBhayandarPolice #SafeFestival #SafeNavratri #TrafficAdvisory
🚨 घरफोडी चोरी करणारे २ आरोपी जेरबंद; चोरीस गेलेले संपूर्ण सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत! 👮♂️
आचोळे पोलिसांची गुन्हेगारीविरोधातील प्रभावी कारवाई! 🚔
आचोळे पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने चोरी करणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे प्रकटीकरण शाखेने जेरबंद करून गुन्ह्याची यशस्वी उकल केली आहे.
📄 गु.र.नं.: 507/2026
⚖️ कलम: भा.न्या. संहिता 2023 चे कलम 305, 331(3), 331(4)
फिर्यादी कुटुंबीयांसह प्रार्थनेसाठी बाहेर गेले असताना अज्ञात चोरट्याने घराच्या मागील बाजूस असलेला लोखंडी दरवाजा उचकटून घरात प्रवेश केला. बेडरूममधील लोखंडी कपाटातून सोन्या-चांदीचे दागिने चोरी करण्यात आले.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपींचा शोध घेऊन कातकरी पाडा, विरार पूर्व परिसरातून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. कौशल्यपूर्ण व सखोल तपासादरम्यान आरोपींकडून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
🔴 चोरीस गेलेली मालमत्ता
💰 एकूण किंमत – ₹2,28,000/-
➡️ सोन्या-चांदीचे विविध दागिने.
🟢 हस्तगत मालमत्ता
✅ चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे संपूर्ण दागिने
💰 एकूण किंमत – ₹2,28,000/-
अशाप्रकारे चोरीस गेलेल्या 100% मुद्देमालाची हस्तगत करून गुन्ह्याची यशस्वी उकल करण्यात आली आहे.
#MaharashtraPolice #AcholePoliceStation #CrimeDetection #HouseBreaking #HouseBurglary #PoliceAtWork #CrimeControl
🚨 आचोळे पोलीस ठाण्याची कौतुकास्पद कामगिरी! 👮♂️
दिनांक 17/10/2026 रोजी तक्रारदार महिला गाळानगर ते नालासोपारा रेल्वे स्टेशन असा रिक्षाने प्रवास करीत असताना त्यांच्या मांडीवर ठेवलेली पर्स रिक्षातून पडून गहाळ झाली.
पर्समध्ये तब्बल ₹43,93,000/- किंमतीचे सोन्याचे दागिने होते. नालासोपारा रेल्वे स्टेशन येथे पर्स गहाळ झाल्याचे लक्षात येताच तक्रारदारांनी तात्काळ आचोळे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
तक्रारीची तात्काळ दखल घेत गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने गाळानगर रिक्षा स्टँड ते नालासोपारा रेल्वे स्टेशन परिसरात कौशल्यपूर्ण तपास सुरू केला. दाट लोकवस्ती व गर्दीचे ठिकाण असूनही अवघ्या तीन तासांच्या अथक प्रयत्नांत गहाळ पर्स व त्यातील संपूर्ण सोन्याचे दागिने शोधून हस्तगत करण्यात आले.
🔹 गहाळ माल:
एकूण 20 प्रकारचे सोन्याचे दागिने, ज्यामध्ये —
* सोन्याचे हार/गंठण
* नेकलेस
* मनीमंगळसूत्र व मंगळसूत्र
* विविध सोन्याच्या चैन
* गणपती पेंडल असलेली चैन
* मोहनमाळ
* लॉकेट असलेली चैन
* 10 सोन्याच्या अंगठ्या
* कर्णफुले व वेल
* नाकातील 3 नथ
* कानातील टॉप्स
आदी दागिन्यांचा समावेश होता.
💰 गहाळ मालाची एकूण किंमत: ₹43,93,000/-
🔹 हस्तगत माल:
✅ गहाळ झालेली पर्स
✅ पर्समधील संपूर्ण सोन्याचे 20 प्रकारचे दागिने
✅ एकूण किंमत ₹43,93,000/-
हस्तगत केलेला संपूर्ण माल तक्रारदार महिलेला सुरक्षितपणे परत करण्यात आला. गहाळ झालेले मौल्यवान दागिने परत मिळाल्याने तक्रारदारांनी समाधान व्यक्त करून आचोळे पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले.
नागरिकांची सुरक्षितता आणि त्यांच्या मालमत्तेचे संरक्षण यासाठी आचोळे पोलीस सदैव तत्पर! 🚔🇮🇳
#MaharashtraPolice #PoliceAtWork #RecoveredProperty #CitizenFirst #Nalasopara #AcholePoliceStation #LawAndOrder
✨ वर्दीच्या जबाबदारीसोबत कर्तृत्वाची नवी ओळख! ✨
नवरंग २०२६ मध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयातील या कर्तृत्ववान महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीला मानाचा मुजरा—
👮♀️ P.I. Meghna Burande — गुन्हे उकल आणि तपासातील उल्लेखनीय कामगिरी.
⚖️ A.P.I. Rekha Patil — प्रभावी तपास व न्यायालयीन पाठपुराव्यात उल्लेखनीय योगदान.
⚖️ P.S.I. Ranjana Shirgare — संवेदनशील गुन्ह्याच्या तपासातून आरोपीला न्यायालयीन शिक्षेपर्यंत पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका.
⚖️ P.S.I. Sneha Solanke — अल्पवयीन पीडितेवरील अत्याचाराच्या प्रकरणात प्रभावी तपास व न्यायालयीन पाठपुरावा.
🏊♀️🚴♀️🏃♀️ H.C. Reshma Kute — Ironman Vietnamसारख्या कठीण स्पर्धेत यशस्वी सहभाग.
🏃♀️🏅 P.C. Rohini Patil — राष्ट्रीय क्रॉस-कंट्रीमध्ये महाराष्ट्रासाठी तृतीय क्रमांक आणि विविध धावण्याच्या स्पर्धांमध्ये सुवर्णपदकांची कमाई.
🏔️ P.C. Pallavi Narwade — गडकिल्ले व Tiger Hill सर करून गिर्यारोहणाच्या नव्या शिखरांकडे वाटचाल.
ही केवळ सात नावांची यादी नाही…
ही आहे कर्तव्यनिष्ठा, धाडस, जिद्द, क्रीडाप्रेम आणि सामाजिक न्यायासाठीच्या समर्पणाची प्रेरणादायी कहाणी! ❤️🔥
🚔 महाराष्ट्र पोलीस दलातील महिला शक्तीला मनःपूर्वक सलाम!
🌟 नवरंग २०२६ — कर्तृत्वाचा उत्सव! 🌟
#Navrang2026 #MaharashtraPolice #WomenInUniform #WomenPower #PoliceWomen #Inspiration
🚨 दुर्गामूर्ती विसर्जनासाठी वाहतूक नियोजन 🚨
🙏 दसरा व नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने दि. 20 ऑक्टोबर 2026 रोजी दुर्गामूर्ती विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाहतूक सुरळीत राहावी व अपघात टाळता यावेत, यासाठी मिरा-भाईंदर शहरात तात्पुरते वाहतूक बदल करण्यात आले आहेत.
🕒 अंमलबजावणी
📅 20 ऑक्टोबर 2026
⏰ दुपारी 3.00 वा. पासून विसर्जन समाप्त होईपर्यंत
🟠 भाईंदर पूर्व | विसर्जन मार्ग
गोल्डन नेस्ट → नवघर फाटक → घोडदेव नाका → बी.पी. रोड → भाईंदर पूर्व रेल्वे स्टेशन → जैसल पार्क चौपाटी
लहान वाहनांसाठी:
फाटक रोड चौक → केबिन रोड → भाईंदर पूर्व रेल्वे स्टेशन → जैसल पार्क चौपाटी
🔵 जैसल पार्क | परतीचा मार्ग
जैसल पार्क चौपाटी → कोळीवाडा → आर.एन.पी. पार्क → एस.व्ही. रोड → नवघर रोड → नवघर नाका → विमल डेअरी → इंद्रलोक नाका → गोल्डन नेस्ट
🟢 भाईंदर पश्चिम | विसर्जन मार्ग
नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान → भाईंदर पोलीस ठाणे → स्टेशन रोड → भाईंदर पश्चिम रेल्वे स्टेशन → खाडी (जेटी)
⚠️ महत्त्वाचे
विसर्जन मिरवणुकीच्या मार्गांवर आवश्यकतेनुसार एकदिशा वाहतूक व प्रवेशबंदी लागू राहील. नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा.
🚑 अत्यावश्यक सेवा वाहनांना सूट
पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडॉर, ऑक्सिजन गॅस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना हे निर्बंध लागू राहणार नाहीत.
🙏 नागरिकांनी सहकार्य करावे आणि सुरक्षित व सुरळीत दुर्गामूर्ती विसर्जनासाठी वाहतूक नियमांचे पालन करावे.
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय
सुरक्षितता प्रथम | वाहतूक शिस्त सर्वांची जबाबदारी
#MBVVPolice #TrafficUpdate #Navratri2026 #Dussehra2026 #DurgaVisarjan #TrafficPolice #SafeVisarjan
🚨 दुर्गामूर्ती विसर्जनासाठी वाहतूक नियोजन 🚨
🙏 दसरा व नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने दि. 20 ऑक्टोबर 2026 रोजी दुर्गामूर्ती विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाहतूक सुरळीत राहावी व अपघात टाळता यावेत, यासाठी मिरा-भाईंदर शहरात तात्पुरते वाहतूक बदल करण्यात आले आहेत.
🕒 अंमलबजावणी
📅 20 ऑक्टोबर 2026
⏰ दुपारी 3.00 वा. पासून विसर्जन समाप्त होईपर्यंत
🟠 भाईंदर पूर्व | विसर्जन मार्ग
गोल्डन नेस्ट → नवघर फाटक → घोडदेव नाका → बी.पी. रोड → भाईंदर पूर्व रेल्वे स्टेशन → जैसल पार्क चौपाटी
लहान वाहनांसाठी:
फाटक रोड चौक → केबिन रोड → भाईंदर पूर्व रेल्वे स्टेशन → जैसल पार्क चौपाटी
🔵 जैसल पार्क | परतीचा मार्ग
जैसल पार्क चौपाटी → कोळीवाडा → आर.एन.पी. पार्क → एस.व्ही. रोड → नवघर रोड → नवघर नाका → विमल डेअरी → इंद्रलोक नाका → गोल्डन नेस्ट
🟢 भाईंदर पश्चिम | विसर्जन मार्ग
नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान → भाईंदर पोलीस ठाणे → स्टेशन रोड → भाईंदर पश्चिम रेल्वे स्टेशन → खाडी (जेटी)
⚠️ महत्त्वाचे
विसर्जन मिरवणुकीच्या मार्गांवर आवश्यकतेनुसार एकदिशा वाहतूक व प्रवेशबंदी लागू राहील. नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा.
🚑 अत्यावश्यक सेवा वाहनांना सूट
पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडॉर, ऑक्सिजन गॅस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना हे निर्बंध लागू राहणार नाहीत.
🙏 नागरिकांनी सहकार्य करावे आणि सुरक्षित व सुरळीत दुर्गामूर्ती विसर्जनासाठी वाहतूक नियमांचे पालन करावे.
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय
सुरक्षितता प्रथम | वाहतूक शिस्त सर्वांची जबाबदारी
#MBVVPolice #TrafficUpdate #Navratri2026 #Dussehra2026 #DurgaVisarjan #TrafficPolice #SafeVisarjan
🚨 चोरीचे वाहन वापरून घरफोडी करणाऱ्या आरोपीस अटक!
विरार पूर्व येथे पार्क केलेली सुमारे ₹९०,००० किंमतीची मारुती सुझुकी ईको कार चोरीला गेल्याप्रकरणी गुन्हे शाखा कक्ष-३, विरार यांनी कौशल्यपूर्ण तपास करत आरोपीस अटक केली.
🔹 चोरीस गेलेले वाहन जप्त
🔹 आरोपीकडून ३ गुन्हे उघडकीस
🔹 आरोपीविरुद्ध यापूर्वी २ गुन्हे दाखल
गोपनीय माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे केलेल्या कारवाईत आरोपीस ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी विरार पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
👮♂️ गुन्हे शाखा कक्ष-३, विरार यांची उल्लेखनीय कामगिरी!
#Virar #VasaiVirar #CrimeBranch #Police #VehicleTheft #HouseBreaking #MaharashtraPolice
🚨 मोटारसायकल चोरीच्या सराईत आरोपीला अटक!
पेल्हार पोलीस ठाणे | गुन्हे प्रकटीकरण पथकाची उल्लेखनीय कामगिरी
वसई फाटा परिसरातून चोरी झालेल्या रॉयल एनफिल्ड हंटर 350 मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा कौशल्यपूर्ण तपास करून पोलिसांनी आरोपीला अटक केली.
🔍 तपासातील ठळक बाबी
▪️ घटनास्थळापासून मालेगावपर्यंतच्या CCTV फुटेजची तपासणी करून आरोपीचा माग काढला.
▪️ चोरीची रॉयल एनफिल्ड हंटर 350 व अन्य 2 सुझुकी बर्गमन मोटारसायकली हस्तगत.
▪️ आरोपीकडून आणखी 4 गुन्हे उघडकीस.
▪️ आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत.
#MBVVPolice #PelharPolice #VehicleTheft #CrimeDetection #PoliceAction #MaharashtraPolice
🏅 अभिमानास्पद कामगिरी! अभिनंदन! 🇮🇳
दिनांक 05 ते 10 ऑक्टोबर 2026 दरम्यान आयोजित 21 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा – 2026 मध्ये मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयात कार्यरत सहाय्यक पोलीस फौजदार श्री. संदीप राणे यांनी IT Professional Competition – Event 1 या स्पर्धेत कांस्यपदक प्राप्त केले.
या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन! 💐
त्यांच्या कर्तृत्वाचा पोलीस आयुक्तालयास अभिमान असून, आगामी काळातही त्यांनी अशीच उत्कृष्ट कामगिरी करून पोलीस दलाचा गौरव वाढवावा, यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
#MBVVPolice #MaharashtraPolice #PoliceDutyMeet2026 #ProudMoment
MIRA BHAYANDAR VASAI VIRAR POLICE retweeted
२१ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा-२०२६ चा समारोप उत्साहात संपन्न!
२१ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा-२०२६ चा समारोप समारंभ दिनांक १० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. २, पुणे येथील परेड ग्राऊंडवर माननीय पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, श्री. सदानंद दाते यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.
समारंभाच्या प्रारंभी बँड पथकाद्वारे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देण्यात आली. अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे, श्री. सुनील रामानंद यांनी पुष्पगुच्छ देऊन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. मेळाव्यात सहभागी झालेल्या २६ संघांनी शिस्तबद्ध संचलनाद्वारे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. तसेच, मेळावा व विविध स्पर्धांची माहिती सादर केली.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध स्पर्धांमधील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघांना फिरते चषक प्रदान करण्यात आले.
#महाराष्ट्र_राज्य_पोलीस_कर्तव्य_मेळावा_२०२६
🌺 मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सर्वाना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺
नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वात सर्व नागरिकांनी धार्मिक सलोखा, सामाजिक ऐक्य व बंधुभाव जपत हा उत्सव शांततेत, सुरक्षिततेत आणि उत्साहात साजरा करावा.
नागरिकांना आवाहन :
▪️ उत्सवाच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे.
▪️ सार्वजनिक शांततेचा भंग होईल असे कृत्य करू नये तसेच लागू असलेल्या नियमांचे व प्रशासकीय सूचनांचे पालन करावे.
▪️ ध्वनिक्षेपक, मिरवणुका, वाहतूक व सार्वजनिक ठिकाणांच्या वापरासंदर्भातील नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
▪️ कोणत्याही प्रकारच्या अफवा, अपप्रचार किंवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या संदेशांवर विश्वास ठेवू नये अथवा ते प्रसारित करू नयेत.
▪️ कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास कळवावे.
आपला उत्सव — आपली जबाबदारी!
सर्व नागरिकांच्या सक्रिय सहकार्याने नवरात्रोत्सव शांततेत व सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय कटिबद्ध आहे.
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय
सद्रक्षणाय खलनिग्रहणाय
#Navratri2026
#PeacefulNavratri
#SafeNavratri
#FestivalSafety
#LawAndOrder
#MBVVPolice
#MaharashtraPolice
🚨 अपहरण करून पिस्टलचा धाक दाखवत खंडणी उकळणाऱ्या आरोपींना 24 तासांत जेरबंद!
गुन्हे प्रकटीकरण कक्ष-3, विरार यांची उल्लेखनीय कामगिरी
बांधकाम व्यवसायिकास बांधकाम साईटवरील गाळा खरेदीचे आमिष दाखवून नालासोपारा पूर्व येथील हॉटेलमध्ये बोलावून घेतले. त्यानंतर क्रेटा कारमध्ये जबरदस्तीने बसवून पिस्टलचा धाक दाखवत अपहरण करण्यात आले.
जीवे ठार मारण्याची धमकी देत सुरक्षित सुटकेच्या बदल्यात ₹10 लाख रोख रक्कम व अंगावरील सोन्याचे दागिने खंडणी म्हणून घेण्यात आले.
पेल्हार पोलीस ठाणे गुन्हा क्र. 843/2026 अन्वये गुन्हा दाखल.
🔎 गुन्हे प्रकटीकरण कक्ष-3, विरार यांनी तात्काळ तपास सुरू करून गोपनीय माहिती व कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे 2 आरोपींना 24 तासांत ताब्यात घेतले.
💰 हस्तगत मुद्देमाल
• क्रेटा कार
• बनावट नंबर प्लेट
• ₹10,00,000 रोख रक्कम
• 71.04 ग्रॅम सोन्याचे दागिने
• एकूण किंमत : ₹40,75,000
गंभीर गुन्ह्याचा जलदगतीने छडा लावत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी MBVV पोलिसांची प्रभावी कारवाई.
#MBVVPolice #CrimeDetection #Virar #PelharPolice #CrimeBranch #PoliceAction #CrimeFreeMBVV
🚨 मटका व जुगार अड्ड्यावर धडक कारवाई
खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखेची कारवाई
उत्तन नाका, उत्तन गाव परिसरात बंद खोलीत मटका व पत्यांचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर खंडणी विरोधी पथकाने छापा टाकून कारवाई केली.
🔹 मटका जुगार — 13 इसम
🔹 पत्यांचा जुगार — 10 इसम
🔹 एकूण — 23 इसमांवर कारवाई
🔹 ₹4,28,730/- किंमतीचा मुद्देमाल जप्त
जप्त मुद्देमालामध्ये मोबाईल फोन व रोख रकमेचा समावेश आहे.
याप्रकरणी उत्तन सागरी पोलीस ठाणे गुरनं. 134/2026, महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 4(अ), 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुगार व अवैध धंद्यांविरोधात पोलिसांची कारवाई सातत्याने सुरू आहे.
#MBVVPolice #MaharashtraPolice #CrimeBranch #PoliceAction #AntiExtortionSquad #Uttan #IllegalGambling #PoliceUpdate
🚨 मानवी तस्करीविरोधात MBVV पोलिसांची कारवाई!
हिंदी मालिका, फोटोशूट व वेब सिरीजमध्ये काम करणाऱ्या महिलेला अनैतिक व्यवसायासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी मिरारोड येथे छापा टाकून एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली. या प्रकरणी महिलेस ताब्यात घेण्यात आले असून, मिरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
👮♀️ कारवाई: महिला अत्याचार प्रतिबंधक / विशेष बालकांचे संरक्षण व काळजी कक्ष
🤝 सुटका करण्यात आलेल्या महिलेला संरक्षणार्थ रेस्क्यू फाउंडेशन, कांदिवली येथे ठेवण्यात आले आहे.
मानवी तस्करीविरोधात कठोर कारवाई — महिलांच्या सुरक्षिततेसाठी MBVV पोलीस कटिबद्ध!
#MBVVPolice #WomenSafety #HumanTrafficking #AntiHumanTrafficking #MiraRoad







