सुधागड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मेळाव्याच्या निमित्ताने #आदिवासी बांधवांना गृहपयोगी वस्तूंचे वाटप करून त्यांच्या आनंदात सहभागी झालो.
आदिवासी बांधवांच्या कलागुणांना, कला-संस्कृतीला वाव मिळावा आणि त्यांना आपल्या हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी आदिवासी भवन उभारण्याकरिता सहकार्य करण्याचा मानस आहे.
आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण, रोजगार, सामाजिक सुविधा आणि सर्वांगीण प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यावर आवश्यक ते सहकार्य करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
सुधागड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी मिळवून देण्याकरिता शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करणार आहे. विकासाची फळे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावीत, हाच आपला ध्यास!
@mahancpspeaks
50
संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या त्याग, संघर्ष आणि बलिदानातून साकारलेल्या महाराष्ट्राचा अभिमान प्रत्येकाच्या मनात सदैव जिवंत आहे.
या वीर हुतात्म्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन!
#हुतात्मा_स्मृतिदिन #संयुक्तमहाराष्ट्र
4
81
शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला प्रगतीची संधी मिळावी, या उद्देशाने आयोजित कॅप्टन तेलंगे फाउंडेशनच्या ‘शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात’ उपस्थित राहिलो.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणारे, त्यांच्या स्वप्नांना बळ देणारे आणि शिक्षणाच्या प्रवासात हातभार लावणारे असे उपक्रम खऱ्या अर्थाने समाजाच्या भविष्याची गुंतवणूक आहेत.
या स्तुत्य उपक्रमासाठी कॅप्टन तेलंगे फाउंडेशनचे मनःपूर्वक अभिनंदन आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
2
64
मुरुड-जंजिरा नगरपरिषद हद्दीतील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी तसेच नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने बैठक आयोजित करण्यात आली.
मुरुड शहराचा सर्वांगीण विकास साधताना विकासकामांसोबतच नागरिकांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवणे गरजेचे आहे. यासाठी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या.
शहरातील विकासकामांसाठी आणि नागरिकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही यावेळी दिली.
#मुरुड
1
73
भारतीय राजकारणात महिला नेतृत्वाचा नवा अध्याय घडवणाऱ्या, देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि भारतरत्न इंदिरा गांधी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
त्यांचे कणखर नेतृत्व, निर्णयक्षमता आणि देशाप्रती असलेली निष्ठा भारतीय इतिहासात कायम स्मरणात राहील.
5
91
1857 च्या स्वातंत्र्यलढ्यात आपल्या शौर्याने, धैर्याने आणि अदम्य देशभक्तीने इतिहास घडवणाऱ्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
त्यांचे साहस, स्वाभिमान आणि मातृभूमीसाठी सर्वस्व अर्पण करण्याची प्रेरणा आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रप्रेमाची ज्योत प्रज्वलित करते.
राणी लक्ष्मीबाईंचा पराक्रम आणि त्याग सदैव प्रेरणादायी राहील.
1
50
मराठी संगीतविश्वातील अजरामर ठेवा असलेल्या सुधीर फडके अर्थात आपल्या लाडक्या ‘बाबूजी’ यांच्या प्रतिभेला अभिवादन करण्यासाठी गीतरामायणातील निवडक गाण्यांचा सुरेल संगीताविष्कार श्रीवर्धनमध्ये आयोजित करण्यात आला.
गीत, संगीत आणि भक्तिरसाचा सुंदर संगम असलेला हा कार्यक्रम रसिकांसाठी एक अविस्मरणीय सांगीतिक अनुभव ठरला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित या उपक्रमातून मराठी संगीताचा समृद्ध वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा एक सुंदर प्रयत्न आहे.
#गीतरामायण
59
आपल्या रोखठोक विचारांनी, प्रभावी वक्तृत्वाने आणि दमदार नेतृत्वाने महाराष्ट्राच्या राजकारणावर वेगळी छाप उमटवणारे हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण आदरांजली!
#balasahebthackeray
2
105
‘पंजाब केसरी’ लाला लजपतराय यांनी स्वातंत्र्यलढ्यात दाखवलेले अदम्य धैर्य, राष्ट्रनिष्ठा आणि बलिदान प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे.
या थोर स्वातंत्र्यसेनानींच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन!
1
64
आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी आणि जल, जंगल, जमिनीच्या संरक्षणासाठी ब्रिटिश सत्तेविरुद्ध निर्भीडपणे लढा देणारे महान क्रांतिकारक, जननायक भगवान बिरसा मुंडा यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी अभिवादन!
त्यांचे शौर्य, विचार आणि संघर्षाची प्रेरणा सदैव स्मरणात राहील.
#birsamunda
51
अन्यायाविरुद्ध लढण्याचे धैर्य, स्वातंत्र्याची जाज्वल्य प्रेरणा आणि क्रांतीची चेतना जागवणारे आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
त्यांचे शौर्य, त्याग आणि क्रांतिकारी विचार नव्या पिढीला सदैव प्रेरणा देत राहतील.
2
78
बालपण म्हणजे निरागस हास्य, निरागस स्वप्ने आणि अमर्याद शक्यतांचा सुंदर प्रवास!
प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावरील हास्य टिकावे, त्यांच्या स्वप्नांना बळ मिळावे आणि त्यांना उज्ज्वल भविष्य घडवण्याची संधी मिळावी, हीच बालदिनानिमित्त सदिच्छा.
बालकांचे लाडके चाचा नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
सर्व बालमित्रांना बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
#childrensday
53
महाराष्ट्राच्या सहकार चळवळीला नवी दिशा देणारे, शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी आयुष्यभर कार्यरत राहिलेले ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पद्मभूषण वसंतदादा पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
48
रायगडच्या निसर्गसौंदर्याचा आणि कोकणच्या किनारपट्टीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव!
#गुहागर आणि #लाडघर किनाऱ्यांना ‘फायनल ब्लू फ्लॅग’ पुरस्कार जाहीर होणे, ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब आहे. #श्रीवर्धन सह कोकणातील किनारपट्टीच्या स्वच्छतेला, पर्यावरण संवर्धनाला आणि पर्यटन विकासाला मिळालेली ही मोठी पावती आहे.
या मानांकनामुळे कोकणच्या पर्यटनाला जागतिक ओळख मिळेल आणि स्थानिक विकासालाही नवी चालना मिळेल. या यशाबद्दल सर्व संबंधितांचे मनःपूर्वक अभिनंदन!
2
77
काही नाती ही रक्ताची असली तरी शब्दांपलीकडची असतात… प्रेमाची, विश्वासाची आणि एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची!
आम्हां भाऊ-बहिणीचं हे सुंदर नातं आयुष्याच्या प्रत्येक वळणावर असंच बहरत राहो. आठवणींची शिदोरी आणि प्रेमाची साथ सदैव सोबत राहो!
भाऊबीजेच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
@iAditiTatkare
#भाऊबीज
62
भाऊ-बहिणीचं नातं म्हणजे प्रेम, विश्वास, माया आणि आयुष्यभराची हक्काची साथ!
या नात्यातील गोडवा, आपुलकी आणि जिव्हाळा सदैव असाच टिकून राहो. प्रत्येक भावाच्या आयुष्यात बहिणीच्या प्रेमाचा आणि प्रत्येक बहिणीच्या आयुष्यात भावाच्या आधाराचा आनंद नांदो.
सर्वांना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
#भाऊबीज
आनंदाचे क्षण, उत्साहाची उधळण आणि दीपोत्सवाचा मंगलमय सोहळा! बळीराजाच्या उदारतेचे स्मरण करून देणाऱ्या बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
नव्या वर्षाची सुरुवात प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समाधान, आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो. प्रत्येकाच्या घरात आनंदाचे दीप सदैव तेवत राहोत!
#पाडवा #दिवाळी #HappyDiwali
1
3
88
नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाच्या या मंगलमय दिनानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
दिव्यांच्या प्रकाशाने प्रत्येकाचे आयुष्य उजळो, माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने प्रत्येकाच्या घरात सुख, समृद्धी आणि समाधान नांदो. ही दीपावली आपल्या सर्वांसाठी आनंदाची, आरोग्यदायी आणि भरभराटीची ठरो!
शुभ दीपावली! 🪔✨
#diwali #diwali2026







































