चारा साक्षरता अभियान अंतर्गत
घरच्या घरी मुरघास तयार करण्याची पद्धत
निर्मिती: पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद नांदेड
देगलूर- येरगी येथे २ ऑक्टोबर रोजी आयोजित ग्रामसभा व रिफॉर्म तसेच स्वच्छ भारत दिवस साजरा झाला. यावेळी केंद्र सरकारचे सहसचिव पी. नरहरी यांनी सहभाग घेत ग्रामस्थांशी संवाद साधला. याप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक महेश पाटील उपस्थित होती.
सेवा संकल्प अभियानाला शेंबोलीत प्रतिसाद
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील व उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी यांनी शेंबोली, ता. मुदखेड येथे भेट देऊन विविध शासकीय सेवा, विकासकामे व लोककल्याणकारी उपक्रमांची पाहणी केली.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वैरण व्यवस्थापनावर भर!
मौजे सायाळ, ता. लोहा येथे आज वैरण विकास योजनेची मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक महेश पाटील यांनी पाहणी केली. चारा लागवड, मुरघास, नेपियर गवत व कडबाकुट्टीच्या माध्यमातून पशुधनासाठी वैरण व्यवस्थापन सक्षम करण्याचे निर्देश दिले.
सेवा संकल्प अभियानांतर्गत हाडोळी, ता. भोकर येथे आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण, जन्म-मृत्यू-विवाह प्रमाणपत्रांचे वितरण, घरकुल भेट, महिला बचत गटाला कर्जाचा धनादेश तसेच शाळा, अंगणवाडी व प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करण्यात आली.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त आज नांदेड येथे हुतात्मा स्मारकाच्या स्मृतीस्तंभास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक महेश पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.
१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता ही सेवा अभियानाचा आज नांदेड जिल्ह्यात पालकमंत्री मा. अतुल सावे यांच्या हस्ते जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला.

























