
Official Twitter Account of District Information Office, #BHANDARA, Directorate General of Information & Public Relations, Government of Maharashtra
BHANDARA, MAHARASHTRA
Joined July 2016
- Tweets18.9K
- Following100
- Followers8.1K
- Likes2.6K
DISTRICT INFORMATION OFFICE, BHANDARA retweeted
दुष्काळग्रस्त भागातील वैद्यकीय विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीसाठी उत्पन्न मर्यादेची अट शिथिल
#शिक्षण
#दुष्काळ
#वैद्यकीयशिक्षण
DISTRICT INFORMATION OFFICE, BHANDARA retweeted
📍पुणे
#पुणे ग्रँड टूर २०२७ ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा अधिक भव्य आणि यशस्वी करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. स्पर्धेच्या मार्गावरील रस्ते, वाहतूक व्यवस्थापन, रस्ते सुरक्षा, वैद्यकीय सुविधा आणि सुरक्षाव्यवस्थेची तयारी वेळेत पूर्ण करावी. जिल्ह्यातील अपघातप्रवण (ब्लॅक स्पॉट) ठिकाणांवर संबंधित यंत्रणांनी आवश्यक सुधारात्मक उपाययोजना गतीने पूर्ण कराव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज पुणे ग्रँड टूर २०२७ च्या नियोजन आढावा बैठकीत दिले.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या, पुणे ग्रँड टूर ही सायकल स्पर्धा स्वर्गीय अजित पवार यांच्या पुढाकाराने गेल्या वर्षी पुणे जिल्ह्यात सुरू झाली. लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि पुणेकरांनी दिलेल्या सहकार्यामुळे अल्पावधीतच या स्पर्धेला जागतिक स्तरावर ओळख मिळाली. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामुळे २०३२ मध्ये जागतिक सायकल फेडरेशनची चॅम्पियनशिप पुण्यात आयोजित करण्यास मान्यता मिळाली असून, हे सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांचे यश आहे.
२०२७ मधील स्पर्धेची व्याप्ती वाढली असून, यंदा २५ संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेसाठी अधिक अर्ज प्राप्त झाले असून मार्ग निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत आयोजनाची जबाबदारी अधिक वाढली आहे. सर्व विभागांनी मागील वर्षीप्रमाणे समन्वय आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या.
शासकीय विश्रामगृह येथे आयोजित या आढावा बैठकीला आमदार सुनील शेळके, आमदार चेतन तुपे, आमदार शंकर मांडेकर, आमदार बाबाजी काळे, आमदार हेमंत रासने, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, विभागीय आयुक्त शीतल तेली- उगले, शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, यांच्यासह पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीए तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
@SunetraA_Pawar
@PuneGrandTour
#पुणेग्रँडटूर
#PuneGrandTour2027
DISTRICT INFORMATION OFFICE, BHANDARA retweeted
📍परभणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज परभणीतील कल्याणनगर येथील गोविंद निवास येथे दिवंगत खासदार रामराव वडकुते यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. तसेच त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले आणि त्यांना धीर दिला.
खासदार रामराव वडकुते यांचे अचानक निधन होणे ही अत्यंत धक्कादायक आणि दुःखद घटना आहे. ते जनसामान्यांमध्ये राहणारे आणि सर्वसामान्य माणसांशी जिव्हाळ्याचे नाते जपणारे नेते होते. त्यांच्या निधनाने मराठवाड्यासह संपूर्ण धनगर समाजाचे मोठे नुकसान झाले असून, एक लोकाभिमुख आणि कर्तृत्ववान नेतृत्व आपण गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
दिवंगत खासदार रामराव वडकुते यांच्याविषयी भावना व्यक्त करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विधान परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी उत्तम काम केले. त्यांच्यावर सोपविण्यात आलेल्या प्रत्येक जबाबदारीला त्यांनी यशस्वीपणे न्याय दिला. विशेषतः धनगर समाजासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय होते. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांनी लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडली. खासदार म्हणूनही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता.
त्यांच्याबद्दल सर्वसामान्यांमध्ये मोठी आत्मीयता आणि विश्वास होता. असे लोकाभिमुख नेतृत्व अचानक हरपल्याने मराठवाड्यासह संपूर्ण धनगर समाजाची मोठी हानी झाली आहे. त्यांचे निधन ही आपल्या सर्वांसाठी कधीही न भरून येणारी पोकळी आहे, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी ऊर्जा राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार संजय जाधव, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार अमरनाथ राजूरकर, परभणी शहराचे महापौर सय्यद इकबाल, जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण, पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, अपर जिल्हाधिकारी शोभा जाधव, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले उपस्थित होते.
दिवंगत खासदार रामराव वडकुते यांचे रविवारी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्याने वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. उद्या सकाळी १०:३० वाजता हिंगोली येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
DISTRICT INFORMATION OFFICE, BHANDARA retweeted
राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए) आयोजित विविध राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांचे आयोजन अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि सुरळीत होण्यासाठी राज्य शासनाचा सहभाग वाढविण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उच्चस्तरीय कृतीदलाचे अध्यक्ष नंदन निलेकणी यांनी चर्चा केली. वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीस कृतीदलाचे सदस्य डॉ. एस. सोमनाथ, शंकर मरुवाडा, राष्ट्रीय भरती संस्थेच्या (एनआरए) संचालक श्रुती सिंघल आदी उपस्थित होते.
एनटीएमार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या मोठ्या प्रमाणावरील परीक्षांसाठी राज्यातील उपलब्ध पायाभूत सुविधांचा प्रभावी वापर करणे, प्रत्येक जिल्ह्यात आवश्यक परीक्षा केंद्रांची उपलब्धता, परीक्षा केंद्रांवरील मनुष्यबळाचे प्रशिक्षण तसेच परीक्षा आयोजनासाठी आवश्यक लॉजिस्टिक व्यवस्थापन या मुद्द्यांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांचे आयोजन करताना राज्य शासन आणि परीक्षा घेणाऱ्या केंद्रीय संस्थांमध्ये समन्वयाची प्रभावी यंत्रणा असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने परीक्षा केंद्रांची उपलब्धता, केंद्रांवरील सुविधा, प्रशिक्षित कर्मचारी आणि सुरक्षित परीक्षा वातावरण निर्माण करण्यासाठी राज्याची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे. उपलब्ध शासकीय यंत्रणा आणि पायाभूत सुविधांचा यासाठी उपयोग करण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला.
परीक्षा प्रक्रियेत ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी, इंग्रजी भाषेची अडचण असलेल्या तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी परीक्षा अधिक सुलभ व्हावी, यासाठी आवश्यक बदल करण्यावर भर देण्यात आला. परीक्षांमधील विश्वासार्हता कायम राखताना गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सुरक्षित आणि पारदर्शक यंत्रणा उभारण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली.
विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी परीक्षेच्या अधिक संधी उपलब्ध करून देणे, अभ्यासक्रमाच्या स्वरूपानुसार परीक्षा पद्धती निश्चित करणे आणि स्पर्धात्मक व प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देणे, या बाबींचाही आढावा घेण्यात आला.
@Dev_Fadnavis
#एनटीए
#NTA
DISTRICT INFORMATION OFFICE, BHANDARA retweeted
पवई तलावाच्या सौंदर्यात भर घालणारा अत्याधुनिक म्युझिकल फाउंटन मुंबईतील नवे पर्यटन आकर्षण म्हणून विकसित करण्यात आला आहे. मराठ्यांचा देदीप्यमान इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, महाराष्ट्राची संतपरंपरा, संस्कृती आणि मुंबईची गौरवशाली गाथा आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या शोमध्ये सादर केली जाणार आहे. या म्युझिकल फाउंटनमुळे मुंबईच्या पर्यटनाला नवी ओळख मिळेल. तसेच पवई तलावाच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले.
पवई तलाव येथील गणेश घाटावर उभारण्यात आलेल्या 'लाईट, साउंड आणि म्युझिकल फाउंटन शो'चे उद्घाटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार, म्हाडाच्या स्लम बोर्डाचे मुख्य अधिकारी सतीश भारतीय यांच्यासह म्हाडा आणि महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
या प्रकल्पांतर्गत जागतिक दर्जाचा मल्टिमीडिया लाईट अँड साउंड शो साकारण्यात आला आहे. यामध्ये संगीतमय कारंजे, वॉटर स्क्रीन आणि फायर जेट्स यांसारख्या आकर्षक सुविधांचा समावेश आहे. विशेष दृश्य परिणामांच्या माध्यमातून तीन वेगवेगळे चित्रपट सादर केले जाणार असून, इतिहास, संस्कृती आणि वारशाचे दर्शन प्रेक्षकांना घडणार आहे.
या फाउंटनचे आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तलावातील पाण्याचे एरेशन (हवामिश्रण) या प्रक्रियेमुळे दररोज सुमारे ३० लाख लिटर पाण्यात हवा मिसळण्यास मदत होणार असून, पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास हातभार लागू शकतो. याशिवाय बाष्पीभवनामुळे परिसरात थंडावा निर्माण होणे आणि स्थानिक तापमानात घट होणे असे संभाव्य पर्यावरणीय फायदेही अपेक्षित आहेत.
@MPLodha
DISTRICT INFORMATION OFFICE, BHANDARA retweeted
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये राबविण्यात येणारा अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम ‘संत रोहिदास अल्पमुदत रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम’ या नावाने ओळखला जाणार आहे. उद्योग क्षेत्रातील बदलत्या गरजा आणि रोजगाराच्या नव्या संधी लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमांच्या कार्यक्रमाचा विस्तार करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आला. तिसऱ्या टप्प्यात राज्यातील युवकांसाठी एकूण २६,५२० प्रशिक्षण प्रवेश क्षमता उपलब्ध करून देण्यात आली असून, आतापर्यंत १८,२६६ प्रशिक्षणार्थींनी प्रवेश घेतला आहे.
मंत्री लोढा म्हणाले की, बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात तरुणांकडे केवळ शैक्षणिक पदवी असणे पुरेसे नसून, उद्योगांच्या गरजांनुसार आधुनिक आणि रोजगारक्षम कौशल्ये असणे आवश्यक आहे. हीच गरज ओळखून महाराष्ट्र शासनाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला होता. पहिल्या टप्प्याला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन या कार्यक्रमाचा पुढील टप्प्यांमध्ये विस्तार करण्यात आला आहे.
पारंपरिक व्यावसायिक अभ्यासक्रमांसोबतच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रमांचा समावेश कार्यक्रमात करण्यात आला आहे. ड्रोन तंत्रज्ञान, इलेक्ट्रिक वाहने, सौर ऊर्जा, इंटरनेट ऑफ थिंग्ज, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा आणि सेमीकंडक्टर यांसारख्या क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण दिले जात आहे. यामुळे युवकांना उद्योगांच्या बदलत्या गरजांनुसार कौशल्य आत्मसात करण्याची संधी उपलब्ध होत आहे, असेही मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.
यावेळी ऑनलाईन पद्धतीने अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, आयुक्त डॉ.अमित सैनी, व्यवसाय व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी, ४०० आयटीआयचे प्राचार्य दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
@MPLodha
DISTRICT INFORMATION OFFICE, BHANDARA retweeted
विधानपरिषदेच्या माजी उपसभापती तथा आमदार डॉ. नीलम गोऱ्हे लिखित ‘विधानपरिषद कामकाज : माझा सहभाग’ या पुस्तकाच्या चौथ्या खंडाचे #प्रकाशन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते लोकभवन येथील परिषद सभागृहात झाले.
या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, गृह राज्यमंत्री योगेश कदम, आमदार प्रवीण दरेकर उपस्थित होते.
विधानपरिषदेत २५ वर्षांच्या कार्यकाळात डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महिला सक्षमीकरण, बालसंरक्षण आणि विविध सामाजिक प्रश्नांना सातत्याने वाचा फोडली. त्यांच्या संसदीय कार्याचा आणि सामाजिक योगदानाचा दस्तऐवज असलेला ‘विधानपरिषद कामकाज : माझा सहभाग’ या पुस्तकाचा चौथा खंड समाजासाठी उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.
या पुस्तकातून २०१४ ते २०२० या कालावधीतील सभागृहातील भाषणे, अर्थसंकल्पीय चर्चा, जनहिताचे प्रश्न आणि त्यांचा पाठपुरावा यांचा आढावा घेण्यात आला आहे. महिला व बालकांची सुरक्षितता, कुपोषण, आरोग्य, शिक्षण, शेतकरी, कामगार, दुष्काळ, पुनर्वसन आणि पर्यावरण यांसारख्या महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. महिला आणि बालकांवरील अन्यायाविरोधात आवाज उठवून पीडितांना मदत करण्यासाठी डॉ. गोऱ्हे यांनी केलेले कार्य सामाजिक प्रश्नांचा जिवंत दस्तऐवज असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गौरवोद्गार काढले.
विधानपरिषदेवर सलग पाच वेळा निवडून येणे आणि उपसभापती म्हणून सभागृहाचे कामकाज नियम व शिस्तीने हाताळणे ही डॉ. गोऱ्हे यांची उल्लेखनीय कामगिरी आहे. त्यांचा संसदीय अनुभव, अभ्यासपूर्ण मांडणी आणि लोकहिताच्या प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा नव्या लोकप्रतिनिधींसाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केला.
लोकप्रतिनिधींनी सभागृहात केलेले काम आणि जनहिताच्या प्रश्नांचा पाठपुरावा जनतेपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने पुस्तकाची निर्मिती केल्याचे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. या खंडात विधिमंडळातील कामकाज, प्रश्न, प्रस्ताव, विधेयके, समित्यांचे कार्य आणि विविध सामाजिक विषयांवरील योगदान संकलित करण्यात आले आहे. लोकप्रतिनिधी नेमके कोणते काम करतात, याची माहिती जनतेला मिळावी, हा पुस्तकामागील प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
@Jishnu_Devvarma
@rahulnarwekar
@mieknathshinde
@neelamgorhe
DISTRICT INFORMATION OFFICE, BHANDARA retweeted
आयुष्मान भारत–प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या एकत्रित अंमलबजावणीमुळे राज्यातील प्रत्येक कुटुंबाला प्रतिवर्ष पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार उपलब्ध झाले आहेत. जानेवारी ते नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ११ लाखांहून अधिक रुग्णांनी १७ लाखांहून अधिक उपचारांचा लाभ घेतला असून, त्यासाठी शासनाने २ हजार ८६९ कोटी ४५ लाख रुपये खर्च केले आहेत.
राज्यातील सर्व अधिवासी कुटुंबांना आरोग्य संरक्षण देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या योजनांमध्ये कर्करोग, हृदयरोग, मूत्रपिंड विकार, अवयव प्रत्यारोपण, अपघात आणि अन्य गंभीर आजारांसह २ हजार ३९९ उपचार व शस्त्रक्रिया पद्धतींचा समावेश आहे. राज्यातील पाच हजारांहून अधिक शासकीय व खासगी अंगीकृत रुग्णालयांमध्ये पात्र लाभार्थ्यांना मोफत उपचार मिळतात. तसेच ७० वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना ‘आयुष्मान वय वंदना’ योजनेंतर्गत अतिरिक्त पाच लाख रुपयांचे आरोग्य संरक्षण उपलब्ध आहे.
राज्यात आजअखेर ४ कोटी ४५ लाख आयुष्मान कार्डे आणि १२ लाख २० हजार ज्येष्ठ नागरिकांची वय वंदना कार्डे तयार करण्यात आली आहेत. लाभार्थ्यांनी अद्ययावत शिधापत्रिका, आधार क्रमांक आणि आधारशी संलग्न मोबाईल क्रमांकाच्या आधारे आशा कर्मचारी, आपले सरकार सेवा केंद्र, स्वस्त धान्य दुकाने किंवा आयुष्मान ॲपद्वारे कार्ड तयार करून घ्यावे. योजनांची माहिती व तक्रारींसाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या १५५३८८ किंवा १८००२३३२२००, तर आयुष्मान भारत योजनेच्या १४५५५ किंवा १८००१११५६५ या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधावा.
#PMJAY
#MJPJAY
DISTRICT INFORMATION OFFICE, BHANDARA retweeted
लोकभवन येथे आयोजित कार्यक्रमात राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते लोकभवनच्या इतिहास व वारशावर आधारित तीन कॉफी टेबल पुस्तके आणि मोरांच्या छायाचित्रांचा विशेष कॅटलॉग अशा चार प्रकाशनांचे अनावरण करण्यात आले. यावेळी या पुस्तकांच्या निर्मितीसाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
लोकभवनचा समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करून तो नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. आपल्या भूतकाळाची जाणीव ठेवून वर्तमानात जगणे आणि भविष्यातील पिढ्यांना इतिहासाची ओळख करून देणे महत्वाचे आहे. लोकभवनमधील ऐतिहासिक वस्तू, मेजवानीच्या परंपरा, पाककला आणि नैसर्गिक वैभव यांचे दस्तऐवजीकरण करणारी पुस्तके या दृष्टीने महत्वपूर्ण ठरतील, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.
राज्यपाल म्हणाले की, लोकभवनमधील ब्रिटिश कालीन ऐतिहासिक कटलरी, क्रॉकरी, पोर्सिलिन आणि चांदीची भांडी या केवळ वापराच्या वस्तू नसून इतिहासाच्या महत्वपूर्ण नोंदी आहेत. त्यातून तत्कालीन जीवनशैली, कलात्मकता आणि त्या काळातील परंपरांचे दर्शन घडते. या वस्तूंची निर्मिती अत्यंत मेहनतीने आणि कलात्मक पद्धतीने करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे जतन आणि दस्तऐवजीकरण करणे आवश्यक आहे. यापूर्वी तेलंगणाचे राज्यपाल असताना हैदराबाद येथील सालार जंग संग्रहालयाचे अध्यक्ष होतो. त्यावेळी आपण ऐतिहासिक वस्तूंचे महत्व जवळून अनुभवले असल्याचेही त्यांनी सांगितले.
लोकभवनमधील मोरांची छायाचित्रे हा देखील एक वैशिष्ट्यपूर्ण ठेवा आहे. मुंबईसारख्या महानगरात मलबार हिल परिसरात मुक्तपणे वावरणारे मोर पाहणे ही सर्वांकरिताच अनोखी बाब आहे. त्यामुळे या मोरांच्या छायाचित्रांचा संग्रह तयार करून त्याची नोंद पुस्तकाच्या माध्यमातून करण्यात आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष व पंतप्रधानांच्या मेजवानी संदर्भातील पुस्तकाविषयी राज्यपाल वर्मा म्हणाले की, विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मान्यवरांच्या भेटी, त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेले खाद्यपदार्थ आणि काळानुसार बदललेले मेन्यू यांची माहिती या पुस्तकात आहे. खाद्यसंस्कृतीचा संबंध केवळ पोट भरण्याशी नसून ती संबंधित देशाच्या संस्कृतीचा अनुभव देणारी असते. पाककला ही कौशल्य, सर्जनशीलता आणि कलात्मकतेची अभिव्यक्ती आहे. त्यामुळे पाककलेचे दस्तऐवजीकरणही महत्वाचे आहे.
महाराष्ट्रातील लुप्त होत चाललेल्या कलांचे जतन करण्यासाठी स्वतंत्र पुस्तक प्रकाशित करण्याचा मानसही राज्यपालांनी व्यक्त केला. वारली कलेला केवळ संग्रहालये आणि प्रदर्शनांपुरते मर्यादित न ठेवता दैनंदिन जीवनात स्थान मिळावे, यासाठी शाळांच्या वर्गखोल्या आणि अंगणवाड्यांमध्ये वारली चित्रकला साकारण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. मुंबईतील एका प्रसिद्ध शाळेच्या वारली पेंटिंगने वर्गखोल्या रंगविण्याच्या उपक्रमाची माहिती देताना राज्यपाल म्हणाले की, सुमारे ३० शाळांचे मुख्याध्यापक या शाळेला भेट देणार आहेत. वारली कलेच्या माध्यमातून बालगीते आणि पौराणिक कथाही साकारता येतील. यामुळे लहान वयातच मुलांना पारंपरिक कलेची ओळख होईल.
या कार्यक्रमात प्रकाशित करण्यात आलेल्या चारही पुस्तकांचा परिचय आणि माहिती लोकभवनचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांनी दिली.
राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभारप्रदर्शन केले. यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते पुस्तकांच्या निर्मितीसाठी योगदान देणाऱ्या सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास चिकित्सक समूहाचे सचिव गुरुनाथ पंडित, पाटकर-वर्दे महाविद्यालयाच्या हॉस्पिटॅलिटी अँड केटरिंग विभागाच्या विभागप्रमुख तथा मुख्य शिक्षण अधिकारी डॉ. माला खारकर, पाटकर महाविद्यालयाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. शेफ अमोल राऊळ, ॲटलस स्किलटेक विद्यापीठाच्या शिक्षणतज्ज्ञ व प्रमुख डॉ. इंदू शहानी, विद्यापीठाचे कुलगुरू सिद्धार्थ शहानी, कुलसचिव डॉ. पराग अमिन, प्रा. मानसी कक्कर, प्रा. कनुप्रिया शर्मा, शांतनू घुरियानी, चार्वी किंजर आणि काशिश शाह उपस्थित होते.
@Jishnu_Devvarma
@maha_governor
DISTRICT INFORMATION OFFICE, BHANDARA retweeted
#नवीदिल्ली येथे आयोजित #पुरस्कार वितरण समारंभात राज्याला कर्जवितरणात देशात प्रथम, तर डिजिटल व्यवहारांच्या अवलंबनात द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. केंद्रीय मंत्री मनोहर लाल आणि केंद्रीय राज्यमंत्री तोखन साहू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
#परभणी महानगरपालिकेने १ ते १० लाख लोकसंख्या गटात, #परळी नगरपरिषदेने १ लाखांपेक्षा कमी लोकसंख्या गटात कर्जवितरणात प्रथम क्रमांक, तर #छत्रपतीसंभाजीनगर महानगरपालिकेने १० लाखांहून अधिक लोकसंख्या गटात तृतीय क्रमांक मिळविला.
पथविक्रेत्यांना संस्थात्मक कर्जसुविधा उपलब्ध करून देणे, आर्थिक समावेशन आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्राला ‘पीएम स्वनिधी सन्मान पुरस्कार २०२६’ मध्ये पाच पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
पथविक्रेत्यांना तारणमुक्त कर्ज, डिजिटल व्यवहारांसाठी प्रोत्साहन, यूपीआयशी संलग्न रुपे क्रेडिट कार्ड, सामाजिक सुरक्षा योजनांशी जोडणी आणि कौशल्य प्रशिक्षण अशा माध्यमातून त्यांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण करण्यासाठी पीएम स्वनिधी योजना राबविण्यात येत आहे. योजनेची मुदत मार्च २०३० पर्यंत वाढविण्यात आली असून, राज्य शासन, नगरविकास विभाग, नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि बँकांच्या समन्वित प्रयत्नांमुळे महाराष्ट्राने ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली आहे.
DISTRICT INFORMATION OFFICE, BHANDARA retweeted
स्वदेशी शोध संस्थानच्या मुंबई चॅप्टरतर्फे विकसित करण्यात आलेल्या 'एमएसएस' ॲपचे लोकार्पण राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते लोकभवन येथे करण्यात आले.
माहिती हे सक्षमीकरणाचे प्रभावी साधन असून, केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्र हे आर्थिक विकास आणि रोजगारनिर्मितीचे महत्त्वाचे माध्यम आहे. या क्षेत्रातील उद्योजकांना विविध शासकीय योजना, सुविधा आणि संधींची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे स्वदेशी शोध संस्थानचे 'एमएसएस' ॲप उपयुक्त ठरेल. विशेषतः हे ॲप मराठी भाषेतही उपलब्ध असल्याने राज्यातील उद्योजकांना त्याचा लाभ घेणे अधिक सुलभ होईल, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.
#एमएसएमई क्षेत्र आर्थिक विकासाबरोबरच मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती करते. कोविडच्या काळात या क्षेत्राला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे या क्षेत्रातील उद्योजकांच्या पाठीशी उभे राहणे आणि त्यांना आवश्यक माहिती व सुविधा उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी आहे. केवळ नोकरी शोधणारे नव्हे, तर रोजगार निर्माण करणारे उद्योजक घडविण्यासाठी एमएसएमई क्षेत्राचा विस्तार होणे आवश्यक आहे, असे राज्यपालांनी सांगितले.
यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ.प्रशांत नारनवरे, स्वदेशी शोध संस्थानच्या मुंबई चॅप्टरच्या अध्यक्षा डॉ. आसावरी बापट, प्रमुख डॉ. आर. श्रीनिवासन अय्यंगार, ॲप विकास पथकाचे सदस्य, राजलक्ष्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, चेन्नईचे प्रतिनिधी, स्वदेशी शोध संस्थानचे सदस्य तसेच विविध शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
@Jishnu_Devvarma
@maha_governor
DISTRICT INFORMATION OFFICE, BHANDARA retweeted
लोकभवन मुंबई येथे मागील ७५ वर्षांत विविध देशांचे राष्ट्रप्रमुख, शासनप्रमुख आणि आंतरराष्ट्रीय मान्यवर यांनी दिलेल्या भेटींच्या दुर्मिळ छायाचित्रांचे ‘संस्थात्मक वारसा’ हे प्रदर्शन मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते करण्यात आले.
विकासाचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत, विशेषतः दुर्गम आणि आदिवासी भागांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. विकास हा सर्वसमावेशक असावा. पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि विकासाच्या योजनांची फळे २०४७ पर्यंत समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट असले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.
त्रिपुराचे उपमुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामांचा अनुभव सांगताना राज्यपाल म्हणाले की, ग्रामीण विकास आणि आदिवासी भागांचा विकास हा आपल्या कार्यकाळातील महत्वाचा प्राधान्यक्रम होता. ग्रामीण विकास विभागाला नोडल विभाग म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. आकांक्षित ब्लॉक घोषित करणाऱ्या देशातील पहिल्या राज्यांमध्ये त्रिपुराचा समावेश होता. २०१९ मध्ये राज्यातील १२ ब्लॉक आकांक्षित ब्लॉक म्हणून घोषित करण्यात आले. विकासाच्या विविध निर्देशांकांमध्ये मागे असलेल्या आदिवासी भागांना विकासाच्या एका विशिष्ट स्तरावर आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. हे तत्कालीन सरकारचे महत्वपूर्ण यश असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी प्रेस क्लबच्या कार्यकारिणी सदस्यांशी संवाद साधला. प्रेस क्लबचे अध्यक्ष सुरेंद्र गांगण आणि चेअरमन एस. बालाकृष्णन यांनी राज्यपालांचे स्वागत केले. यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे प्रेस क्लबचे कोषाध्यक्ष ओमप्रकाश तिवारी, जनरल सेक्रेटरी अनिल सिंग तसेच कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.
हे छायाचित्र प्रदर्शन २३ नोव्हेंबरपासून एक आठवडा सर्वांसाठी खुले राहणार आहे. त्यानंतर प्रदर्शनातील छायाचित्रे महाराष्ट्र लोकभवन येथे जतन करून ठेवण्यात येणार आहेत.
@Jishnu_Devvarma
@maha_governor
@mumbaipressclub
DISTRICT INFORMATION OFFICE, BHANDARA retweeted
मुंबई पुस्तक महोत्सव २४ ते २९ नोव्हेंबरदरम्यान
वाचनसंस्कृतीचा प्रसार, साहित्यिक विचारांची देवाणघेवाण आणि नव्या पिढीला पुस्तकविश्वाशी जोडण्यासाठी ‘मुंबई बुक फेस्टिव्हल २०२६’चे आयोजन २४ ते २९ नोव्हेंबरदरम्यान मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये करण्यात आले आहे.
📚 ६०० हून अधिक पुस्तकांचे स्टॉल
📖 २०० हून अधिक साहित्यिक सत्रे
🎭 ९५ हून अधिक सांस्कृतिक कार्यक्रम
🎨 २० हून अधिक बालउपक्रम
नॅशनल बुक ट्रस्ट, महाराष्ट्र शासन, मुंबई विद्यापीठ आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या सहभागातून हा साहित्य, कला आणि संस्कृतीचा भव्य उत्सव रंगणार आहे.
#MumbaiBookFestival
#LoveForBooks
#ReadingCulture
#BooksForLife
DISTRICT INFORMATION OFFICE, BHANDARA retweeted
मुंबई पुस्तक महोत्सवात मराठी साहित्याचा विशेष जागर!
मुंबई बुक फेस्टिव्हल २०२६ मध्ये मराठी साहित्यप्रेमींसाठी ‘लेखक मंच–२ (मराठी मंच)’ हे विशेष व्यासपीठ उभारण्यात आले आहे.
📚 मराठी लेखक मंचावर ५० सत्रांचे आयोजन
🖋️ मराठी साहित्य, भाषा आणि संस्कृतीवर चर्चा
💬 समकालीन सामाजिक विषयांवर विचारमंथन
🎤 लेखक, साहित्यिक आणि विचारवंतांशी संवाद
२४ ते २९ नोव्हेंबरदरम्यान मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये साहित्यप्रेमींना वैचारिक मेजवानी मिळणार आहे.
#MumbaiBookFestival
#LoveForBooks
#ReadingCulture
#BooksForLife
DISTRICT INFORMATION OFFICE, BHANDARA retweeted
मुंबई पुस्तक महोत्सवात बालकांसाठी विशेष उपक्रम!
मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासह त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई बुक फेस्टिव्हल २०२६ मध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
🎨 चित्रकला व सर्जनशील स्पर्धा
📖 वाचन आणि लेखन उपक्रम
🎭 कथाकथन
🧠 प्रश्नमंजुषा व अन्य मनोरंजक उपक्रम
२० हून अधिक बालउपक्रमांमधून मुलांना पुस्तकविश्वाशी जोडण्याची संधी! २४ ते २९ नोव्हेंबरदरम्यान मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये हा महोत्सव होणार आहे.
#MumbaiBookFestival
#LoveForBooks
#ReadingCulture
#BooksForLife
DISTRICT INFORMATION OFFICE, BHANDARA retweeted
मुंबई पुस्तक महोत्सव २४ ते २९ नोव्हेंबरदरम्यान
साहित्य, कला आणि संस्कृतीचा भव्य उत्सव
वाचनसंस्कृतीचा प्रसार आणि नव्या पिढीला पुस्तकविश्वाशी जोडण्यासाठी ‘मुंबई बुक फेस्टिव्हल २०२६’चे आयोजन २४ ते २९ नोव्हेंबरदरम्यान मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये करण्यात आले आहे. नॅशनल बुक ट्रस्ट, महाराष्ट्र शासन, मुंबई विद्यापीठ आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या सहभागातून हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
महोत्सवातील प्रमुख आकर्षणे :
•📚 ६०० हून अधिक पुस्तकांचे स्टॉल आणि २०० हून अधिक साहित्यिक सत्रे.
•🖋️ मराठी साहित्य, भाषा, संस्कृती आणि समकालीन विषयांवर मराठी लेखक मंचावर ५० सत्रांचे आयोजन.
•🎨 मुलांसाठी २० हून अधिक उपक्रम; कथाकथन, चित्रकला, लेखन, वाचन, प्रश्नमंजुषा आणि सर्जनशील स्पर्धांचा समावेश.
•🎭 ९५ हून अधिक सांस्कृतिक कार्यक्रम; गायिका वैशाली सामंत, गायक अवधूत गुप्ते यांच्यासह विविध कलाकारांचे कार्यक्रम.
•🇮🇳 ‘वंदे मातरम्’च्या १५० व्या वर्षानिमित्त, महात्मा जोतिराव फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त विशेष प्रदर्शने.
•
स्थळ : मुंबई विद्यापीठ, कलिना कॅम्पस, गेट क्रमांक २, मुंबई.
अधिक माहितीसाठी : mumbaibookfestival.com
साहित्य, ज्ञान, विचार आणि संस्कृती यांचा संगम घडविणारा हा महोत्सव पुस्तकप्रेमी, विद्यार्थी, लेखक आणि साहित्यरसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे.
#MumbaiBookFestival
#LoveForBooks
#ReadingCulture
#BooksForLife
DISTRICT INFORMATION OFFICE, BHANDARA retweeted
मुंबई पुस्तक महोत्सवात साहित्य, संगीत आणि संस्कृतीची मेजवानी!
मुंबई बुक फेस्टिव्हल २०२६ मध्ये साहित्यिक चर्चांसोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि विशेष प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे.
🎶 गायिका वैशाली सामंत, गायक अवधूत गुप्ते यांच्यासह विविध कलाकारांचे कार्यक्रम
🇮🇳 ‘वंदे मातरम्’च्या १५० व्या वर्षानिमित्त विशेष प्रदर्शन
🌸 महात्मा जोतिराव फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त विशेष प्रदर्शन
🗿 सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त विशेष प्रदर्शन
२४ ते २९ नोव्हेंबरदरम्यान मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये साहित्य, कला आणि संस्कृतीचा हा भव्य उत्सव अनुभवता येणार आहे.
#MumbaiBookFestival
#LoveForBooks
#ReadingCulture
#BooksForLife
DISTRICT INFORMATION OFFICE, BHANDARA retweeted
📍नवी दिल्ली
शासकीय कार्यालयांमध्ये संगणकावरून व्हॉट्सॲप वेबचा वापर करताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन केंद्रीय गृह मंत्रालयाने केले आहे. व्हॉट्सॲप वेबच्या लॉगिन सत्राचा गैरवापर करून वापरकर्त्यांच्या खात्यांमध्ये अनधिकृत प्रवेश मिळविण्याचा धोका भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राच्या (I4C) राष्ट्रीय #सायबर गुन्हे धोका विश्लेषण विभागाने अधोरेखित केला आहे. या पार्श्वभूमीवर #गृह मंत्रालयाने सायबर सुरक्षेबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे.
व्हॉट्सॲप वेबच्या लॉगिन सत्रावर सायबर गुन्हेगारांनी अनधिकृत ताबा मिळवल्यास संबंधित खात्यातील संदेश वाचणे, वापरकर्त्याच्या नावाने संदेश पाठविणे, संपर्क क्रमांक आणि ग्रुपमधील संभाषणांची माहिती मिळविणे शक्य होते. अशा प्रवेशाचा वापर करून शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची ओळख धारण करणे, आर्थिक फसवणूक करणे, फिशिंगद्वारे माहिती मिळविणे तसेच अन्य सायबर गुन्हे घडविण्याचा धोका आहे.
शासकीय कामकाजाशी संबंधित कागदपत्रे, प्रशासकीय माहिती, आर्थिक व्यवहारांचा तपशील, गोपनीय पत्रव्यवहार आणि अन्य संवेदनशील माहितीची देवाणघेवाण व्हॉट्सॲप वेबद्वारे करू नये, असा स्पष्ट सल्ला देण्यात आला आहे. कार्यालयीन संगणकावर व्हॉट्सॲप वेबचे लॉगिन कायमस्वरूपी सुरू ठेवू नये. प्रत्येक वापरानंतर खात्यातून लॉगआऊट करणे आवश्यक आहे. तसेच सार्वजनिक संगणक, सायबर कॅफे, हॉटेलमधील बिझनेस सेंटर किंवा अविश्वसनीय संगणकांवरून व्हॉट्सॲप वेब वापरणे टाळावे.
व्हॉट्सॲप खात्यावरून आपल्या नकळत संदेश पाठविले जाणे, संपर्क व्यक्तींकडून अनपेक्षित प्रतिसाद मिळणे किंवा खात्यात अन्य संशयास्पद हालचाली आढळणे, ही संभाव्य सायबर घुसखोरीची लक्षणे असू शकतात. त्यामुळे अशा बाबींकडे दुर्लक्ष न करता तातडीने आवश्यक खबरदारी घ्यावी. कार्यालयीन संगणकांची ऑपरेटिंग सिस्टिम, इंटरनेट ब्राउझर आणि सुरक्षा प्रणाली नियमितपणे अद्ययावत ठेवावी. अनोळखी फाइल्स, संशयास्पद डाउनलोड, क्रॅक सॉफ्टवेअर तसेच अविश्वसनीय स्रोतांमधून प्राप्त झालेल्या फाइल्स उघडू नयेत, असेही सूचित करण्यात आले आहे.
शासकीय माहितीची गोपनीयता, कार्यालयीन पत्रव्यवहाराची सुरक्षितता आणि डिजिटल यंत्रणांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सायबर सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे आणि डिजिटल संवाद साधताना विशेष दक्षता बाळगावी, असे आवाहन केंद्रीय गृह मंत्रालयाने केले आहे.
#सायबरसुरक्षा
#व्हॉट्सॲपवेब
#WhatsApp
DISTRICT INFORMATION OFFICE, BHANDARA retweeted
'स्क्रीन टाइम'मधून थोडे बाहेर पडूया, पुस्तकांच्या दुनियेत रमूया!
मुंबई पुस्तक महोत्सव
📚 २४–२९ नोव्हेंबर २०२६
📍 मुंबई विद्यापीठ, कलिना कॅम्पस (गेट-२)
🎟️ प्रवेश विनामूल्य
#MumbaiBookFestival
#ReadingCulture
#LoveForBooks
#ReadAndGrow
DISTRICT INFORMATION OFFICE, BHANDARA retweeted
📍ड्रॅगन पॅलेस कॅम्पस, कामठी, नागपूर
#थेटप्रसारण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय ड्रॅगन पॅलेसचा २७ वा वर्धापनदिन आणि ड्रॅगन पॅलेस महोत्सव
#LIVE teapaw.org/i/broadcasts/2evjlZMZP…











































