
Official Twitter Account of District Information Office, @MahaDGIPR, Government of Maharashtra, Chhatrapati Sambhaji Nagar
Chhatrapati Sambhaji Nagar, MH
Joined July 2016
- Tweets10.2K
- Following26
- Followers16.1K
- Likes165
संकटांना हरवून विश्वासाने पुढे जाऊया.........
#दिवाळी.... बळीराजाच्या दारी....
@InfoMarathwada
महात्मा जोतीराव फुले यांच्या परिवर्तनवादी विचारांचा जागर घडविणारी मंत्री छगन भुजबळ यांची विशेष मुलाखत ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमांतून प्रसारित होणार आहे.
#जयमहाराष्ट्र #दिलखुलास #महात्माफुले२०० #MahatmaPhule200
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR retweeted
📍 नागपूर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोहारी सावंगा (ता.नरखेड) येथे शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या निवासस्थानी त्यांनी मुक्काम केला होता. आज अरुणाबाई बालपांडे यांनी मुख्यमंत्री यांचे औक्षण केले.
#लोहारीसावंगा #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare
#DiwaliWithFarmers #Diwali
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR retweeted
📍 नागपूर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लोहारी सावंगा येथील शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या घरी आगमन झाले. कुटुंबातील सदस्यांशी त्यांनी आपुलकीने संवाद साधला..
@Dev_Fadnavis
#लोहारीसावंगा #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare
#DiwaliWithFarmers #Diwali
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR retweeted
📍 नागपूर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लोहारी सावंगा येथील शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या निवासस्थानी दिवाळीनिमित्त त्यांच्या कुटुंबियांसमवेत घरगुती भोजनाचा आनंद घेतला. सर्वांशी आपुलकीने संवाद साधला...
@Dev_Fadnavis
#लोहारीसावंगा #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare
#DiwaliWithFarmers #Diwali
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR retweeted
📍नागपूर
लोहारी सावंगा गावातील ग्रामपंचायत आवारातील सभामंडपात गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने आयोजित प्रार्थना सभेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामस्थांना अश्वस्त केले. राज्यात दुष्काळी परिस्थितीत राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. आर्थिक मदतीसह विविध योजनांचा आधार दुष्काळग्रस्तांना दिला जात आहे. शेतकरी संकटात असताना दिवाळीचे हे पर्व त्याला धीर देण्यात घालवावे, या उद्देशाने आम्ही गावात आलो आहोत. आगामी काळातही अनेक योजना लागू करण्यात येणार असून या अस्मानी संकटाचा सर्वांना एकजुटीने सामना करावा लागेल, त्यांनी सांगितले.
हे वर्ष आव्हानांचे आहे. पावसाने शेवटपर्यंत दडी मारल्याने अतोनात नुकसान झाले आहे. राज्यात काही ठिकाणी चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या कठीण प्रसंगी राज्य सरकार भक्कमपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहे. लाखो शेतकऱ्यांना या कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र, दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांपुढे पुन्हा एकदा संकट उभे ठाकले आहे. त्यासाठी आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना थेट मदतीचा हात दिला आहे. शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करता यावी यासाठी सरकारने सुमारे दीड कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांची रक्कम जमा केली आहे. ही रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरूच आहे. शेतकऱ्यांचे विज बिल माफ करण्यात आले आहे. शिवाय वीज बिलाची थकबाकी देखील माफ करण्यात आली आहे. जलसंधारणाची कामे व्यापक प्रमाणात हाती घेतली जाणार आहेत. लोकांच्या आरोग्यासह विविध प्रश्न दूर करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनांमध्ये फार मोठी शक्ती आहे. संकटकाळात व्यक्ती कितीही खचली तरी राष्ट्रसंतांच्या विचारांनी त्याला उभारी मिळते. त्यांच्या ग्रामगीतेचा विचार गावांना सर्वच अंगांनी समृद्ध बनवतो. दुष्काळाच्या काळात आपण नेमके काय केले केले पाहिजे, यावर राष्ट्रसंतांनी मांडलेले विचार अत्यंत प्रेरक आणि दिशादर्शक आहेत. गुरुदेवांच्या या विचारांनी देखील आम्हा सर्वांना या संकटाचा सामना करण्याचे बळ मिळो - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सर्वश्री चरणसिंह ठाकूर, आशिष देशमुख, डॉ. राजीव पोतदार, माजी आमदार सुधाकर कोहळे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी आदी उपस्थित होते.
@Dev_Fadnavis @cbawankule
#लोहारीसावंगा #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare
#DiwaliWithFarmers #Diwali
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR retweeted
📍नागपूर
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शक्य तिथे विंधन विहिरी घेण्यास परवानगी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. नागपूर जिल्ह्यातील लोहारी सावंगा या गावात शेतकऱ्याच्या घरी मुक्काम करून दिवाळी साजरी केली. शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या निवासस्थानी मुक्काम केला. शेतकऱ्यांसमोरील संकट आणि या संकटावर कशी मात करता येईल, या संदर्भात त्यांनी बालपांडे यांच्यासोबत संवाद साधला. चिंताग्रस्त शेतकऱ्यांना त्यांनी धीर दिला.
हवामान बदलामुळे काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली त्यानंतर पाऊसच पडला नाही आणि अद्यापही पाऊस नसल्यामुळे शेतातील पिकांची हानी झाली आहे. या दोन्ही प्रसंगांमध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना मदत दिली जात आहे. काटोल, नरखेड परिसरात संत्र्यासह मोसंबीचे मोठ्या प्रमाणात पीक होत आहे. परंतु, बांगलादेशने निर्बंध घातल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे. या संदर्भात मिहान येथे मोठा प्रकल्प सुरू होत असून या पिकांवर प्रक्रिया करण्यासाठी शेतकऱ्यांना संधी उपलब्ध होणार आहे .शेतकरी अडचणीत येणार नाही, त्याची खबरदारी घेण्यात येत आहे. रब्बीचे पीक वाचवण्यासाठी काय उपाययोजना करता येईल, या संदर्भातही शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. शेतीच्या संरक्षणासाठी कुंपण घालण्याची योजना राबविण्यात येत असून शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
शेतकऱ्यांच्या दुःखांमध्ये सहभाग घेऊन दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री आमच्या घरी आलेत सोबत मुक्काम केला तसेच आमच्या घरच्या चटणी भाकरीचा आस्वाद घेतला, याचा आम्हाला अभिमान वाटला, मुख्यमंत्र्यांनी आम्हाला जो धीर दिला त्यामुळे आम्हाला संकटावर मात करण्याची हिंमत मिळाली, अशी भावना रामभाऊ बालपांडे यांनी व्यक्त केली.
@Dev_Fadnavis
#लोहारीसावंगा #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare
#DiwaliWithFarmers #Diwali
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR retweeted
📍नागपूर
राज्यात दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना धीर देण्यासोबतच त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी त्यांच्यासोबत दिवाळी सण साजरा करण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली होती. त्यानुसार त्यांनी आज लोहारी सावंगा (ता.नरखेड, जि. नागपूर) येथे शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. शेतकऱ्यांनी संवाद साधतांना दुष्काळाच्या संकटातून बाहेर पडू, असा विश्वास व्यक्त केला. गावातच रामभाऊ बालपांडे या शेतकऱ्यांच्या घरी भरीत भाकरीचे जेवण करुन मुक्काम केला.
त्यांच्या आगमनानंतर महिलांनी पारंपरिक पद्धतीने त्यांचे स्वागत केले. त्यानंतर सामुदायिक प्रार्थनेत त्यांनी सहभाग घेतला. रामभाऊ बालपांडे या शेतकऱ्याच्या घरी जेवण करुन दिवाळी सणानिमित्त गावकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी, समस्या, दुःख जाणून घेतले. यावेळी शेतकऱ्यांनी मोकळेपणाने मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत आपल्या समस्या मांडल्या.
शेतकरी पुरुषोत्तम वघाळे यांनी खोरी प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लावल्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर यासाठी मान्यता देण्यात आली असून लवकरच काम सुरू होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. जगदीश देशमुख या शेतकऱ्याने ४३ वर्षांपूर्वी पायाभरणी झालेल्या पाझर तलावाची अडचण सोडवून तलाव पूर्ण करण्याची मागणी केल्यानंतर याबाबत आवश्यक कारवाई लवकरच करू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पाणी फाऊंडेशनचा युवा कार्यकर्ता जयंत चाफले यांनी जुन्या खोरी तलावाचे काम मार्गी लावल्याबद्दल आभार व्यक्त केले. राजेंद्र चाफले व तेजपाल चौधरी यांनी रोही, वाघ, रानडुकरांचा शेती पिकांना मोठा फटका बसत असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. दरम्यान दुष्काळी परिस्थितीमुळे मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष तालुका स्तरावर देखील कक्ष सुरू करण्यात येत मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
नागपूर जिल्ह्याच्या एका टोकावरील असलेल्या आमच्या गावास भेट दिल्याने दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्याचे बळ आणि आत्मविश्वास दिला, अशी भावना व्यक्त करत गावकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार राजू पोतदार, आमदार चरणसिंह ठाकूर, आमदार आशिष देशमुख, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, माजी आमदार सुधाकर कोहळे, सरपंच विपीन चाफले आदी उपस्थित होते.
@Dev_Fadnavis @cbawankule
#लोहारीसावंगा #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare
#DiwaliWithFarmers #Diwali
योगेश मते राहणार जयपूर ता. #छत्रपतीसंभाजीनगर, जिल्हा संभाजीनगर यांच्या शासकीय मदत मिळाल्या बद्दल बोलक्या प्रतिक्रिया.#शेतकरीमदत, #दुष्काळनिवारण .
श्री सुदाम भाऊराव उकिरडे राहणार करमाड ता संभाजीनगर जिल्हा संभाजीनगर यांची प्रतिक्रिया..... यावर्षीच्या दुष्काळी परिस्थिती पहाता शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि पाच हजाराची दिवाळी पूर्वी मदत जाहीर केली त्याबद्दल शासनाचे आभार मानले.#शेतकरीमदत, #दुष्काळनिवारण
योगेश मते राहणार जयपूर ता. छत्रपतीसंभाजीनगर, जिल्हा संभाजीनगर यांच्या शासकीय मदत मिळाल्या बद्दल बोलक्या प्रतिक्रिया.
महात्मा जोतीराव फुले यांचे #द्विशताब्धी वर्ष
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR retweeted
📍 नागपूर
लोहारी सावंगा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सामूहिक प्रार्थनास्थळी आगमन झाले. स्थानिक शेतकरी महिलांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व अन्य मान्यवर उपस्थित...
@Dev_Fadnavis @cbawankule
#लोहारीसावंगा #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare
#DiwaliWithFarmers #Diwali
DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR retweeted
📍 नागपूर
लोहारी सावंगा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. त्यानंतर भजनी मंडळासोबत सामूहिक प्रार्थनेत सहभाग घेतला.
@Dev_Fadnavis @cbawankule
#लोहारीसावंगा #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare
#DiwaliWithFarmers #Diwali
बळीराजाच्या आधारासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध..!
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना - 2026’ च्या चौथ्या टप्प्यातील लाभ वितरणाला सुरुवात. 4,86,757 पात्र शेतकऱ्यांना ₹4764.77 कोटींचा लाभ वितरित.
@Dev_Fadnavis
#DevendraFadnavis
#TeamDevendra
#Maharashtra



























