District Information Office, Parbhani (@InfoParbhani) header
District Information Office, Parbhani (@InfoParbhani) profile picture

परभणी जिल्हा माहिती कार्यालयाचे अधिकृत ट्विटर हँडल, मा. व. ज. सं. महाराष्ट्र शासन

Parbhani,
Joined November 2015
Photo by District Information Office, Parbhani (@InfoParbhani)Photo by District Information Office, Parbhani (@InfoParbhani)Photo by District Information Office, Parbhani (@InfoParbhani)Photo by District Information Office, Parbhani (@InfoParbhani)Photo by District Information Office, Parbhani (@InfoParbhani)Photo by District Information Office, Parbhani (@InfoParbhani)Photo by District Information Office, Parbhani (@InfoParbhani)Photo by District Information Office, Parbhani (@InfoParbhani)Photo by District Information Office, Parbhani (@InfoParbhani)Photo by District Information Office, Parbhani (@InfoParbhani)
#परभणी जिल्ह्यात यंदा दु‌‌ष्काळाची स्थिती असून, राज्य शासन व जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. #दुष्काळी_उपाययोजना @MahaDGIPR @InfoMarathwada @MeghnaBordikar
1
91
#परभणी जलसंवर्धनाची धरूया कास... करुया दुष्काळावर मात ! @MahaDGIPR @InfoMarathwada @MeghnaBordikar
55
#परभणी दुष्काळात शेतक-यांना, पशुपालकांना आपल्या पशुंच्या आहाराची काळजी घेणे आवश्यक असून, चारा साक्षरतेसोबतच संवर्धन करणेही तितकेच महत्त्वपूर्ण आहे. #चाराजतन #चारासंवर्धन #दुष्काळ #उपाययोजना @MahaDGIPR @InfoMarathwada @MeghnaBordikar
2
98
#परभणी जल संवर्धन करणे काळाची गरज असून, त्यातूनच दुष्काळावर यशस्वीरित्या मात करता येणार आहे. एक थेंब पाणी बचतीचा, संदेश आहे सुरक्षित भविष्याचा ! #दुष्काळीउपाययोजना #जलसंवर्धन_जीवनसंवर्धन
55
District Information Office, Parbhani retweeted
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित #जयमहाराष्ट्र कार्यक्रमात रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांची विशेष मुलाखत मंगळवार, २४ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही हा कार्यक्रम उपलब्ध होणार आहे. या मुलाखतीचे निवेदन डॉ. मृण्मयी भजक यांनी केले आहे. @ibharatgogawale
3
1
1,795
महात्मा जोतीराव फुले यांचे शिष्य नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांच्या हक्कांसाठी संघटित चळवळ उभारली. कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळावी यासाठी त्यांनी केलेला संघर्ष महत्त्वपूर्ण ठरला. तसेच कामगार संघटन आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.
41
स्वकर्तृत्व, स्वावलंबन आणि समाजसेवेचा आदर्श म्हणजे #महात्माज्योतिरावफुले ! ते पुणे कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीचे कार्यकारी संचालक होते. बांधकाम,अन्य व्यापारी क्षेत्रांत कार्यरत या कंपनीला पुणे-नगर रस्त्यावरील येरवड्याचा(बंडगार्डन)पूल बांधण्याचे उपकंत्राट मिळाले होते.
76
#परभणी दुष्काळ निवारणाच्या उपायोजनांना सर्वोच्च प्राधान्य द्या -- पालक सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार - जलतारा शोषखड्डा करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करा - पिण्याचे पाणी आणि चाऱ्याचे योग्य नियोजन करा @MahaDGIPR @InfoMarathwada
1
106
केंद्रीय रेशीम मंडळाच्या सिल्क समग्र-२ योजनेंतर्गत लाभार्थी सक्षमीकरण निवासी प्रशिक्षणाचे #परभणी येथील @VNMKV येथे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचे उद्घाटन आज सोमवारी अतिरिक्त जिल्हाधिकारी शोभा जाधव यांच्या हस्ते झाले. प्रशिक्षणाला ८५ शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
1
143
उद्घाटनप्रसंगी विद्यापीठाचे संचालक (संशोधन) डॉ. भगवानराव असेवार, केंद्रीय रेशीम मंडळाचे शास्त्रज्ञ 'डी' अशोक जाधव, माजी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक (एलडीएम) सुनील हतेकर आदी उपस्थित होते. #दुष्काळीउपाययोजना
50
District Information Office, Parbhani retweeted
हृदयाचा प्रत्येक ठोका महत्त्वाचा! ❤️ छातीत अस्वस्थता, अचानक घाम, श्वासाचा त्रास जाणवला तर दुर्लक्ष करू नका. लगेच १०८ ला कॉल करा. जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात ईसीजी सुविधा उपलब्ध आहे. प्रत्येक हृदय - प्रत्येक गाव - प्रत्येक मिनिट महत्त्वाचा. माहितीसाठी : १०४ | आपत्कालीन : १०८ क्रमांक #स्टेमीमहाराष्ट्र #STEMIMaharashtra #HeartHealth #EveryHeartbeatMatters #RecognizeSymptomsSaveLife
9
8
3,896
District Information Office, Parbhani retweeted
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी विविध विकास कामांचा आढावा घेतला. #पिंपरी-चिंचवड शहराला सुंदर, नियोजनबद्ध आणि विकसित बनवण्याचे अजितदादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. शहरातील सर्व विकासकामे दर्जेदार आणि निर्धारित वेळेत पूर्ण करावीत, तसेच शहराच्या प्रत्येक प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी प्रशासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. #मोशी येथील कचरा दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कचरा व्यवस्थापनावर विशेष लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी दिले. मोशी येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे काम प्रलंबित न ठेवता तातडीने पूर्ण करावे तसेच प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून प्रगतीचा आढावा घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांची संभाव्य वाढ लक्षात घेऊन पाणीपुरवठा, निवारा, आरोग्य, स्वच्छता यांसह मूलभूत सुविधांचे आतापासूनच नियोजन करावे. पवना व इंद्रायणी नद्यांवरील अतिक्रमणे रोखून नदी पुनरुज्जीवनाच्या कामांना गती द्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. शहरात औद्योगिक गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण निर्माण करणे, कायदा व सुव्यवस्था राखणे आणि पायाभूत सुविधांची कामे गतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. नाशिक फाटा ते एलिव्हेटेड कॉरिडॉरचे काम पूर्णत्वाकडे असून, लवकरच त्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या शहराच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत स्वतंत्र बैठक घेण्यात येणार असल्याचेही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले. यावेळी महापौर रवि लांडगे, उपमहापौर श्रीम.शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे डॉ. राजेश देशमुख, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, प्रशांत शितोळे आदी उपस्थित होते. @SunetraA_Pawar
3
2
2,309
District Information Office, Parbhani retweeted
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित #जयमहाराष्ट्र कार्यक्रमात रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांची विशेष मुलाखत मंगळवार, २४ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही हा कार्यक्रम उपलब्ध होणार आहे. या मुलाखतीचे निवेदन डॉ. मृण्मयी भजक यांनी केले आहे. #दिलखुलास कार्यक्रमातून ही मुलाखत मंगळवार, दि. २४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून प्रसारित होणार आहे. तसेच ‘News On AIR’ या ॲपवरही ही मुलाखत ऐकता येणार आहे. @ibharatgogawale
6
1
3
1,989
District Information Office, Parbhani retweeted
📍पुणे #पुणे ग्रँड टूर २०२७ ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा अधिक भव्य आणि यशस्वी करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. स्पर्धेच्या मार्गावरील रस्ते, वाहतूक व्यवस्थापन, रस्ते सुरक्षा, वैद्यकीय सुविधा आणि सुरक्षाव्यवस्थेची तयारी वेळेत पूर्ण करावी. जिल्ह्यातील अपघातप्रवण (ब्लॅक स्पॉट) ठिकाणांवर संबंधित यंत्रणांनी आवश्यक सुधारात्मक उपाययोजना गतीने पूर्ण कराव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज पुणे ग्रँड टूर २०२७ च्या नियोजन आढावा बैठकीत दिले. उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या, पुणे ग्रँड टूर ही सायकल स्पर्धा स्वर्गीय अजित पवार यांच्या पुढाकाराने गेल्या वर्षी पुणे जिल्ह्यात सुरू झाली. लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि पुणेकरांनी दिलेल्या सहकार्यामुळे अल्पावधीतच या स्पर्धेला जागतिक स्तरावर ओळख मिळाली. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामुळे २०३२ मध्ये जागतिक सायकल फेडरेशनची चॅम्पियनशिप पुण्यात आयोजित करण्यास मान्यता मिळाली असून, हे सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांचे यश आहे. २०२७ मधील स्पर्धेची व्याप्ती वाढली असून, यंदा २५ संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेसाठी अधिक अर्ज प्राप्त झाले असून मार्ग निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत आयोजनाची जबाबदारी अधिक वाढली आहे. सर्व विभागांनी मागील वर्षीप्रमाणे समन्वय आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या. शासकीय विश्रामगृह येथे आयोजित या आढावा बैठकीला आमदार सुनील शेळके, आमदार चेतन तुपे, आमदार शंकर मांडेकर, आमदार बाबाजी काळे, आमदार हेमंत रासने, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, विभागीय आयुक्त शीतल तेली- उगले, शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, यांच्यासह पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीए तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. @SunetraA_Pawar @PuneGrandTour #पुणेग्रँडटूर #PuneGrandTour2027
3
4
2,378
District Information Office, Parbhani retweeted
📍परभणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज परभणीतील कल्याणनगर येथील गोविंद निवास येथे दिवंगत खासदार रामराव वडकुते यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. तसेच त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले आणि त्यांना धीर दिला. खासदार रामराव वडकुते यांचे अचानक निधन होणे ही अत्यंत धक्कादायक आणि दुःखद घटना आहे. ते जनसामान्यांमध्ये राहणारे आणि सर्वसामान्य माणसांशी जिव्हाळ्याचे नाते जपणारे नेते होते. त्यांच्या निधनाने मराठवाड्यासह संपूर्ण धनगर समाजाचे मोठे नुकसान झाले असून, एक लोकाभिमुख आणि कर्तृत्ववान नेतृत्व आपण गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दिवंगत खासदार रामराव वडकुते यांच्याविषयी भावना व्यक्त करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विधान परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी उत्तम काम केले. त्यांच्यावर सोपविण्यात आलेल्या प्रत्येक जबाबदारीला त्यांनी यशस्वीपणे न्याय दिला. विशेषतः धनगर समाजासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय होते. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांनी लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडली. खासदार म्हणूनही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. त्यांच्याबद्दल सर्वसामान्यांमध्ये मोठी आत्मीयता आणि विश्वास होता. असे लोकाभिमुख नेतृत्व अचानक हरपल्याने मराठवाड्यासह संपूर्ण धनगर समाजाची मोठी हानी झाली आहे. त्यांचे निधन ही आपल्या सर्वांसाठी कधीही न भरून येणारी पोकळी आहे, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. यावेळी ऊर्जा राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार संजय जाधव, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार अमरनाथ राजूरकर, परभणी शहराचे महापौर सय्यद इकबाल, जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण, पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, अपर जिल्हाधिकारी शोभा जाधव, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले उपस्थित होते. दिवंगत खासदार रामराव वडकुते यांचे रविवारी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्याने वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. उद्या सकाळी १०:३० वाजता हिंगोली येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
4
18
3,027
District Information Office, Parbhani retweeted
राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए) आयोजित विविध राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांचे आयोजन अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि सुरळीत होण्यासाठी राज्य शासनाचा सहभाग वाढविण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उच्चस्तरीय कृतीदलाचे अध्यक्ष नंदन निलेकणी यांनी चर्चा केली. वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीस कृतीदलाचे सदस्य डॉ. एस. सोमनाथ, शंकर मरुवाडा, राष्ट्रीय भरती संस्थेच्या (एनआरए) संचालक श्रुती सिंघल आदी उपस्थित होते. एनटीएमार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या मोठ्या प्रमाणावरील परीक्षांसाठी राज्यातील उपलब्ध पायाभूत सुविधांचा प्रभावी वापर करणे, प्रत्येक जिल्ह्यात आवश्यक परीक्षा केंद्रांची उपलब्धता, परीक्षा केंद्रांवरील मनुष्यबळाचे प्रशिक्षण तसेच परीक्षा आयोजनासाठी आवश्यक लॉजिस्टिक व्यवस्थापन या मुद्द्यांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांचे आयोजन करताना राज्य शासन आणि परीक्षा घेणाऱ्या केंद्रीय संस्थांमध्ये समन्वयाची प्रभावी यंत्रणा असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने परीक्षा केंद्रांची उपलब्धता, केंद्रांवरील सुविधा, प्रशिक्षित कर्मचारी आणि सुरक्षित परीक्षा वातावरण निर्माण करण्यासाठी राज्याची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे. उपलब्ध शासकीय यंत्रणा आणि पायाभूत सुविधांचा यासाठी उपयोग करण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला. परीक्षा प्रक्रियेत ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी, इंग्रजी भाषेची अडचण असलेल्या तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी परीक्षा अधिक सुलभ व्हावी, यासाठी आवश्यक बदल करण्यावर भर देण्यात आला. परीक्षांमधील विश्वासार्हता कायम राखताना गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सुरक्षित आणि पारदर्शक यंत्रणा उभारण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी परीक्षेच्या अधिक संधी उपलब्ध करून देणे, अभ्यासक्रमाच्या स्वरूपानुसार परीक्षा पद्धती निश्चित करणे आणि स्पर्धात्मक व प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देणे, या बाबींचाही आढावा घेण्यात आला. @Dev_Fadnavis #एनटीए #NTA
2
7
1
26
7,378
District Information Office, Parbhani retweeted
पवई तलावाच्या सौंदर्यात भर घालणारा अत्याधुनिक म्युझिकल फाउंटन मुंबईतील नवे पर्यटन आकर्षण म्हणून विकसित करण्यात आला आहे. मराठ्यांचा देदीप्यमान इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, महाराष्ट्राची संतपरंपरा, संस्कृती आणि मुंबईची गौरवशाली गाथा आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या शोमध्ये सादर केली जाणार आहे. या म्युझिकल फाउंटनमुळे मुंबईच्या पर्यटनाला नवी ओळख मिळेल. तसेच पवई तलावाच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले. पवई तलाव येथील गणेश घाटावर उभारण्यात आलेल्या 'लाईट, साउंड आणि म्युझिकल फाउंटन शो'चे उद्घाटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार, म्हाडाच्या स्लम बोर्डाचे मुख्य अधिकारी सतीश भारतीय यांच्यासह म्हाडा आणि महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. या प्रकल्पांतर्गत जागतिक दर्जाचा मल्टिमीडिया लाईट अँड साउंड शो साकारण्यात आला आहे. यामध्ये संगीतमय कारंजे, वॉटर स्क्रीन आणि फायर जेट्स यांसारख्या आकर्षक सुविधांचा समावेश आहे. विशेष दृश्य परिणामांच्या माध्यमातून तीन वेगवेगळे चित्रपट सादर केले जाणार असून, इतिहास, संस्कृती आणि वारशाचे दर्शन प्रेक्षकांना घडणार आहे. या फाउंटनचे आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तलावातील पाण्याचे एरेशन (हवामिश्रण) या प्रक्रियेमुळे दररोज सुमारे ३० लाख लिटर पाण्यात हवा मिसळण्यास मदत होणार असून, पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास हातभार लागू शकतो. याशिवाय बाष्पीभवनामुळे परिसरात थंडावा निर्माण होणे आणि स्थानिक तापमानात घट होणे असे संभाव्य पर्यावरणीय फायदेही अपेक्षित आहेत. @MPLodha
5
1,668