KMC Kolhapur (@KolhapurKmc) header
KMC Kolhapur (@KolhapurKmc) profile picture

Govt Organization

Kolhapur, India
Joined September 2020
Photo by KMC Kolhapur (@KolhapurKmc)Photo by KMC Kolhapur (@KolhapurKmc)Photo by KMC Kolhapur (@KolhapurKmc)Photo by KMC Kolhapur (@KolhapurKmc)Photo by KMC Kolhapur (@KolhapurKmc)Photo by KMC Kolhapur (@KolhapurKmc)Photo by KMC Kolhapur (@KolhapurKmc)Photo by KMC Kolhapur (@KolhapurKmc)Photo by KMC Kolhapur (@KolhapurKmc)Photo by KMC Kolhapur (@KolhapurKmc)
कोल्हापूर महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीची सभा महापालिकेतील छत्रपती ताराराणी सभागृहात समितीच्या सभापती सौ. कौसर इस्माईल बागवान यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडली. शहरातील महिला व शालेय मुलींसाठी मूलभूत आणि स्वच्छ सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या सभेत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. शहरातील महिलांसाठी विविध ठिकाणी असलेल्या स्वच्छतागृहांची दुरुस्ती, तसेच महानगरपालिकेच्या विविध शाळांमधील मुलींच्या स्वच्छतागृहांची दुरुस्ती आणि शाळांची रंगरंगोटी करण्याच्या कामांना या सभेत सविस्तर चर्चेअंती मंजुरी देण्यात आली. महिला व मुलींचे आरोग्य व स्वच्छता राखणे आणि शैक्षणिक संस्थांमधील सोयी-सुविधांमध्ये सुधारणा करणे याला समितीने प्राधान्य दिले आहे. मंजूर झालेली सर्व कामे तातडीने हाती घेऊन ती दर्जेदार व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करावीत, अशा स्पष्ट सूचना सभापती सौ. कौसर बागवान यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या सभेस अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उपसभापती सौ. दिपा ठाणेकर, सहाय्यक आयुक्त उज्वला शिंदे, नगरसचिव दिवाकर कारंडे, समिती सदस्य सौ. निलिमा पाटील, सौ. प्राजक्ता जाधव, सौ. वंदना मोहिते, सौ. अरुणा गवळी, सौ. धनश्री कोरवी, सौ. अनुराधा मुळीक, सौ. जयश्री कांबळे व महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. #KMCKolhapur #WomenAndChildWelfare #CivicDevelopment #SchoolFacilities #KausarBagwan
2
87
जिल्ह्यातील अपुऱ्या पावसामुळे संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता कोल्हापूर महानगरपालिका आणि गार्डन्स क्लबने दरवर्षी होणारे तीन दिवसांचे पुष्पप्रदर्शन रद्द करण्याचा संवेदनशील निर्णय घेतला आहे. या प्रदर्शनाचा निधी आता मनपाच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर कोल्हापूरच्या जलव्यवस्थापनासाठी वापरला जाणार आहे. ​त्याऐवजी ५ डिसेंबर रोजी डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये एकदिवसीय विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. जपानमधील 'सकाटा' कंपनीचे योहेई हिसाशी, गेन्या टेकेडा आणि आकिरा निशिओ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, यावेळी 'रोजेट' वार्षिकाचे प्रकाशन व १५ इकेबाना पुष्परचनेचे सादरीकरण होणार आहे. या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. ​#KMCKolhapur #GardensClubKolhapur #WaterConservation #ClimateAction #Kolhapur
54
कोल्हापूर महानगरपालिकेच्या परवाना विभाग, घरफाळा विभागीय कार्यालय क्र. २ आणि उपद्रव शोध पथकाने आज छत्रपती शिवाजी रोड परिसरात थकबाकीदार व विनापरवाना व्यवसायांवर मोठी कारवाई केली. 'महाराष्ट्र गॅस एजन्सीज'चे विनापरवाना गोडावून सील केले. अशोका मिल मिळकत मालक होतवानी यांच्याकडून थकीत घरफाळ्यापोटी ₹२,००,०००/- वसूल केले. मणेर व वणकुंद्रे यांच्या मिळकतीस व्यवसाय परवाना घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून, सर्व व्यावसायिकांनी आपला थकीत कर वेळेत भरून आवश्यक परवाने घ्यावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. #KMCKolhapur #PropertyTax #StrictAction #TaxRecovery #Kolhapur
77
कोल्हापूर महानगरपालिका कर आकारणी व वसुली विभागामार्फत थकीत घरफाळा (मालमत्ता कर) वसुलीसाठी विशेष व तीव्र मोहीम हाती घेण्यात आली आहे. वारंवार नोटिसा देऊनही कर न भरणाऱ्या थकबाकीदारांच्या व्यावसायिक मिळकती सील करणे आणि निवासी मिळकतींच्या प्रॉपर्टी कार्डवर बोजा नोंदवण्याची कारवाई मा. आयुक्तांच्या आदेशानुसार सुरू करण्यात आली आहे. मागील सलग ४ वर्षे दंडामध्ये सवलत योजना देण्यात आली होती; मात्र यावर्षी प्रशासनामार्फत अशी कोणतीही सवलत योजना लागू केली जाणार नाही, याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. आपण भरलेला कर हा आपल्याच कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासकामांसाठी वापरला जातो. तरी सर्व थकबाकीदार मिळकतधारकांनी होणारी कटू कारवाई टाळण्यासाठी आपला थकीत घरफाळा तात्काळ भरून महानगरपालिकेस सहकार्य करावे, ही नम्र विनंती. — मा. सुधाकर म. चल्लावाड (कर निर्धारक व संग्राहक, कोल्हापूर महानगरपालिका) #KolhapurMahanagarpalika #KMCKolhapur #PropertyTax #TaxUpdate #Kolhapur
68
यंदा अल निनोच्या प्रभावामुळे केवळ ५२ ते ५५ टक्के पाऊस झाल्याने पाणीसाठ्याचा विचार करून खबरदारीचा उपाय म्हणून गार्डन क्लब ऑफ कोल्हापूर आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फुलं, झाडं व पानं प्रदर्शन यंदा एकदिवसीय स्वरूपात पार पडणार आहे. 🌿🌸 गार्डन क्लबच्या अध्यक्ष पल्लवी सोनके यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार या उपक्रमात: ✅ तीन जपानी तज्ज्ञांच्या माध्यमातून आधुनिक जपानी तंत्रज्ञानाचा लाभ ✅ फुलांच्या विविध नव्या जातींचा समावेश ✅ छत्रपती ताराराणी यांच्या ऐतिहासिक वारसा व जयंतीच्या निमित्ताने पुरस्कारांमध्ये ताराराणींची पुस्तिका, मेमोरिओ किंवा छायाचित्राचा विशेष समावेश कोल्हापूरच्या हरित वारसा आणि नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती देणाऱ्या महापौर मा. सौ. रूपाराणी संग्रामसिंह निकम यांचा हा विशेष संदेश आवश्य पाहा! #KMCKolhapur #Kolhapur #GreenKolhapur #FlowerShow #WaterConservation
95
कोल्हापूर शहरातील प्रमुख रस्ते अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी आणि वाहतुकीस होणारा अडथळा दूर करण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण निर्मूलन मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या आदेशानुसार आणि उपआयुक्त किरणकुमार धनवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलन पथक व उपद्रव शोध पथकाने (NDS) आज राजारामपुरी मेनरोड आणि उद्यमनगर परिसरात धडक कारवाई केली. येथील दुकानांबाहेर आणि फुटपाथवर बेकायदेशीररीत्या लावलेले ९ बोर्ड, ११ स्टँड बोर्ड, ४ बॉक्स बोर्ड आणि १ हातगाडी पथकाने जप्त केली. येथील मुख्य रस्त्यावर वाहतुकीस अडथळा ठरणारे कपड्यांचे गाठोडे व ढीग जप्त करण्यात आले. शहरातील अनधिकृत व्यवसाय आणि अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असून, जप्त केलेले सर्व साहित्य संबंधित व्यावसायिकांना परत दिले जाणार नसून ते कायमस्वरूपी जप्त करण्यात आले आहे. अतिक्रमण विभागाचे प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपिक सजन नागलोत आणि उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी ही मोहीम यशस्वीरीत्या पार पाडली. शहरातील अनधिकृत फेरीवाले, व्यावसायिक तसेच रस्त्यांवर उभारलेले अनधिकृत शेड्स, मंडप आणि इतर अतिक्रमणांविरोधातील कारवाई यापुढे अधिक तीव्र करण्यात येणार आहे. संबंधितांनी आपापली अतिक्रमणे तातडीने स्वतःहून हटवावीत; अन्यथा महापालिकेच्या कारवाईत जप्त केलेले साहित्य परत दिले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा अतिक्रमण विभागाने दिला आहे! #KMCKolhapur #AntiEncroachment #Rajarampuri #Udyamnagar #TrafficFreeKolhapur
1
102
कोल्हापूर शहरात थकीत घरफाळा वसुलीसाठी आणि विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या आस्थापनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने कठोर कारवाई सुरूच आहे. आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या निर्देशानुसार परवाना विभाग, घरफाळा विभागीय कार्यालय क्र. २ (छत्रपती शिवाजी मार्केट) आणि उपद्रव शोध पथकाच्या (NDS) संयुक्त पथकाने आज छत्रपती शिवाजी रोड परिसरात विशेष मोहीम राबविली. छत्रपती शिवाजी रोड परिसरातील 'महाराष्ट्र गॅस एजन्सीज' या मिळकतीमध्ये सुरू असणारे विनापरवाना गोडाऊन प्रशासनाकडून सीलबंद करण्यात आले आहे. 'अशोका मिल'चे मिळकत मालक होतवानी यांच्या वापरातील मिळकतीच्या घरफाळा थकबाकीपोटी संबंधितांकडून जागेवरच २,००,०००/- रुपयांचा कर भरणा करून घेण्यात आला. या परिसरातील वाणिज्य वापरात विनापरवाना व्यवसाय करणारे व्यावसायिक मणेर व वणकुंद्रे यांच्या मिळकतीची पाहणी करून त्यांना रीतसर व्यवसाय परवाना घेण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. उपआयुक्त किरणकुमार धनवाडे, सहायक आयुक्त स्वाती दुधाणे आणि कर निर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अशोक यादव, उपद्रव शोध पथकाचे अशोक साठे, विनोद रुईकर, भोलानाथ पाटणकर तसेच घरफाळा व विभागीय कार्यालय क्र. २ मधील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई पार पाडली. शहरातील सर्व मिळकतधारक व व्यावसायिकांनी आपल्याकडील थकीत घरफाळा व इतर करांची रक्कम तातडीने भरून, आवश्यक व्यवसाय परवाने व भाडेकराराची पूर्तता करून महापालिका प्रशासनास सहकार्य करावे आणि सीलबंद कारवाई टाळावी! #KMCKolhapur #PropertyTax #TaxRecovery #CommercialSeal #Kolhapur
1
1
119
कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या सभापतीपदी सौ. शिला सोनुले यांचा कार्यालयीन प्रवेश सोहळा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते तसेच महापौर सौ. रूपाराणी निकम आणि उपमहापौर अक्षय जरग यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. शहरातील प्राथमिक शाळांच्या भौतिक सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विविध योजनांअंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली. तसेच शाळांचा पायाभूत विकास आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे स्पष्ट केले. सभापती सौ. शिला सोनुले यांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आगामी काळात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला असून, सुमारे २७८ प्राथमिक शाळांचे प्रशासन सांभाळणाऱ्या या समितीला राज्यात अग्रेसर बनविण्याचा निर्धार बोलून दाखवला. या सोहळ्याला स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ.कौसर बागवान, परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव, सभागृहनेता मुरलीधर जाधव, गटनेते शारंगधर देशमुख, आदिल फरास, प्रभाग समिती सभापती संजय मोहिते, अनुराधा खेडकर, वैभव कुंभार, पाणीपुरवठा विशेष समिती सभापती सौ.संगिता सावंत, आरोग्य विशेष समिती सभापती सौ.सुरेखा ओटवकर, क्रीडा समिती सभापती विजयसिंह खाडे-पाटील, उपआयुक्त किरणकुमार धनवाडे, पाणीपुरवठा विशेष समितीच्या उपसभापती दिपा काटकर, महिला व बालकल्याण समिती उपसभापती दिपा ठाणेकर, प्राथमिक शिक्षण समितीच्या उपसभापती पुजा पोवार, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, स्वरुप कदम, नगरसेविका सौ. पल्लवी देसाई, सौ.माधुरी व्हटकर, सौ.जयश्री चव्हाण, डॉ. सुषमा जरग, सौ. स्वाती कांबळे, विनायक कारंडे, प्रशासनाधिकारी जयश्री जाधव, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी रसुल पाटील, विजय माळी, बाळासाहेब कांबळे, अजय गोसावी, संजय शिंदे, जगदिश ठोंबरे, जयश्री हंकारे, आसमा मुलाणी, राजाराम शिंदे आणि शांताराम सुतार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. #KMCKolhapur #PrimaryEducation #EducationCommittee #QualityEducation #SchoolDevelopment #Kolhapur
60
कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या सभापतीपदी सौ. शिला सोनुले यांनी कार्यालयीन प्रवेश केला. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, महापौर सौ. रुपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग आणि गटनेते शारंगधर देशमुख यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. शहरातील सुमारे २७८ प्राथमिक शाळांच्या भौतिक सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आमदार क्षीरसागर यांनी सांगितले, तर शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचा मानस सभापती सौ. सोनुले यांनी व्यक्त केला. #PrimaryEducation #KMCKolhapur #RajeshKshirsagar #EducationFirst #Kolhapur
62
कोल्हापूर महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाला गती देण्यासाठी आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी आज सर्व खातेप्रमुखांची सविस्तर आढावा बैठक घेतली. या बैठकीत रस्त्यांची कामे, घरफाळा व पाणीपट्टी वसुली, अमृत योजना, फेरीवाला नियोजन, पदभरती आणि अनधिकृत बांधकामांबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण व कठोर निर्देश देण्यात आले. शहरातील रस्त्यांची कामे करण्यास टाळाटाळ करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी. नोव्हेंबरअखेर ज्या ठेकेदारांनी कामे सुरू केलेली नसतील, त्यांना तात्काळ ब्लॅकलिस्ट करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. विशेष कॅम्प आयोजित करून बांधकाम परवानग्या व गुंठेवारी प्रकरणे नियमित करावीत आणि ३१ मार्च २०२७ पर्यंत १५० कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करावे. तसेच बंदिस्त पार्किंगचा गैरवापर व अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करावी. अमृत योजनेच्या कामांना गती देऊन नवीन पाईपलाईन कार्यान्वित झालेल्या ठिकाणी जुन्या लाईन बंद कराव्यात. संभाव्य दुष्काळाचा विचार करता शहरातील जुन्या विहिरींचे पुनरुज्जीवन करण्यासाठी डीपीडीसीमध्ये प्रस्ताव सादर करावा. इस्टेट विभागाने सर्व पात्र फेरीवाल्यांना QR कोड देण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. हातगाड्यांच्या दर्शनी भागात (गाडी बंद असतानाही दिसेल असा) QR कोड लावणे बंधनकारक असून, कोड नसलेल्यांवर कारवाईचे नियोजन करावे. मनपा कर्मचाऱ्यांचे एनपीएस, पदोन्नती, लाड-पागे समिती नियुक्ती व पदभरतीची कामे तातडीने मार्गी लावावीत. पदभरतीसाठी टीसीएस (TCS) कंपनीची वर्कऑर्डर प्रक्रिया पूर्ण करून पुढील ३ महिन्यांत नियुक्त्या पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. नव्या व वाढीव बांधकाम झालेल्या मालमत्तांना नियमानुसार दंडासह घरफाळा आकारणी करून प्रत्येक महिन्याला वसुलीत वाढ नोंदवण्याचे आदेश दिले. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, सर्व उप-आयुक्त, सहाय्यक आयुक्त, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता जयेश जाधव यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. #KMCKolhapur #DrRajendraBharud #CivicAdministration #RoadDevelopment #StrictAction
61
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कुटुंब कल्याण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत दि. २१ नोव्हेंबर ते दि. ४ डिसेंबर २०२६ या कालावधीत जागतिक पुरुष नसबंदी पंधरवडा राबविण्यात येत आहे. कुटुंब नियोजनात पुरुषांचा सक्रिय सहभाग वाढविणे आणि पुरुष नसबंदीबाबतचे गैरसमज दूर करणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. आशा स्वयंसेविका, ए.एन.एम., आरोग्य सेवक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत पात्र लाभार्थ्यांशी संपर्क साधून समुपदेशन, जनजागृती व माहिती प्रसार केला जाणार आहे. या कालावधीत पात्र लाभार्थ्यांची वैद्यकीय तपासणी व समुपदेशन करून आरोग्य संस्था तसेच नियोजित शिबिरांद्वारे पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेची सुरक्षित सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. पुरुष नसबंदी ही कमी वेळेत होणारी सुरक्षित, प्रभावी व कायमस्वरूपी पद्धत असून, याचा शारीरिक क्षमतेवर किंवा वैवाहिक जीवनावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. कोणतीही शंका असल्यास जवळच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा आयुष्मान आरोग्य मंदिराशी संपर्क साधून योग्य मार्गदर्शन घ्यावे. कुटुंब नियोजनाची जबाबदारी केवळ महिलांवर न ठेवता पुरुषांनीही पुढाकार घ्यावा. सर्व पात्र पुरुषांनी या मोहिमेत स्वेच्छेने सहभागी होऊन कुटुंबाच्या सुदृढ व आनंदी भविष्यासाठी आपले योगदान द्यावे! #WorldVasectomyFortnight #KMCKolhapur #FamilyPlanning #HealthAwareness #kolhapur
50
पाच वर्षांखालील बालकांमधील न्यूमोनियाचा आजार आणि त्यामुळे होणारे संभाव्य बालमृत्यू रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ‘सांस’ (Social Awareness and Action to Neutralise Pneumonia Successfully - SAANS) ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम दि. १२ नोव्हेंबर २०२६ ते दि. २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. मनपा कार्यक्षेत्रातील सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे, आयुष्मान आरोग्य मंदिरे, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि ए.एन.एम. (ANM) कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी भेटी देऊन बालकांची आरोग्य तपासणी व पालकांचे समुपदेशन केले जाणार आहे. लहान बालकांमध्ये सर्दी, खोकला, ताप, जलद श्वासोच्छ्वास होणे, श्वास घेताना छातीचा भाग आत ओढला जाणे आणि दूध पिण्यास त्रास होणे यांसारखी लक्षणे आढळून आल्यास कोणताही विलंब न करता तात्काळ जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेशी संपर्क साधावा. या अभियानांतर्गत बालकांचे योग्य पोषण, वेळेवर लसीकरण, वैयक्तिक स्वच्छता आणि आजाराचे लवकर निदान करून त्वरित उपचार घेण्याबाबत पालकांना मार्गदर्शन केले जात आहे. ​सर्व पालकांना प्रशासनाचे कोल्हापूर शहरातील सर्व पालकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा. आपल्या बालकांमध्ये वरीलपैकी कोणतीही लक्षणे दिसताच घरगुती उपचारांवर अवलंबून न राहता त्वरित महापालिकेच्या जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन मोफत व अचूक वैद्यकीय उपचार घ्यावेत! ​#SAANSCampaign #KMCKolhapur #PneumoniaAwareness #PublicHealth #DrRajendraBharud
3
102
शहराच्या दैनंदिन कार्यप्रणालीमध्ये अनेक कर्मचारी आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडत असतात. त्यांच्या नियमित कामकाजातून शहराची व्यवस्था सुरळीत राहण्यास हातभार लागतो. कोल्हापूरच्या विकासप्रक्रियेचा आणि नागरी व्यवस्थेचा अविभाज्य भाग असणारे हेच आहेत आपल्या शहराचे 'Unsung Heroes'! #KMCKolhapur #Kolhapur #UnsungHeroes #KolhapurCity #KolhapurMunicipalCorporation
1
4
172
मूळ ऐतिहासिक वास्तूला कोणताही धक्का न लावता, दगडी बांधकाम आणि कलाकुसर जशास तशी जपत कोल्हापूर महानगरपालिकेने केलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ व लेखक डॉ. नंदू मुलमुले यांनी मनःपूर्वक कौतुक केले! 🎭 डॉ. पी. एम. चौगुले लिखित 'औषधांच्या पलीकडं' या पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त या सुसज्ज आणि ऐतिहासिक वास्तूत रसिक श्रोत्यांशी संवाद साधताना एक वेगळाच आनंद मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कोल्हापूरचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत! #KolhapurMunicipalCorporation #KMCKolhapur #KeshavraoBhosaleNatyagruha #Kolhapur #CulturalHeritage
1
2
146
नूतनीकरणानंतर संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात राज्य नाट्य स्पर्धेनिमित्त 'नागमंडळ' या नाटकाचा प्रयोग सादर करणारे कलाकार श्री. प्रीतेश पटेल यांनी नाट्यगृहाच्या उत्कृष्ट व्यवस्थापनाबद्दल मनमोकळी दाद दिली! 🎭✨ वास्तूचा ऐतिहासिक वारसा जपतानाच, कलाकारांसाठी तत्पर सुविधा, स्वच्छता आणि शिस्तबद्ध व्यवस्थापन देण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका सदैव कटिबद्ध आहे. कलाकारांची हीच सकारात्मक पावती आमच्यासाठी प्रेरणादायी आहे! 👏🙌 #KolhapurMunicipalCorporation #KMCKolhapur #KeshavraoBhosaleNatyagruha #Kolhapur #MarathiTheatre #RajyaNatyaSpardha #कोल्हापूरमहानगरपालिका #केशवरावभोसलेनाट्यगृह #राज्यनाट्यस्पर्धा
49
नूतनीकरणानंतर संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात राज्य नाट्य स्पर्धेनिमित्त 'नागमंडळ' या नाटकाचा प्रयोग सादर करणारे कलाकार श्री. प्रीतेश पटेल यांनी नाट्यगृहाच्या उत्कृष्ट व्यवस्थापनाबद्दल मनमोकळी दाद दिली! 🎭✨ वास्तूचा ऐतिहासिक वारसा जपतानाच, कलाकारांसाठी तत्पर सुविधा, स्वच्छता आणि शिस्तबद्ध व्यवस्थापन देण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका सदैव कटिबद्ध आहे. कलाकारांची हीच सकारात्मक पावती आमच्यासाठी प्रेरणादायी आहे! 👏🙌 #KolhapurMunicipalCorporation #KMCKolhapur #KeshavraoBhosaleNatyagruha #Kolhapur #MarathiTheatre #RajyaNatyaSpardha #कोल्हापूरमहानगरपालिका #केशवरावभोसलेनाट्यगृह #राज्यनाट्यस्पर्धा
1
3
191
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने राज्यभरातील २४ केंद्रांवर ६५ वी राज्य हौशी नाट्य स्पर्धा मोठ्या उत्साहात सुरू आहे. कोल्हापूर केंद्रावर संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या स्पर्धेला रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त आणि 'हाऊसफुल्ल' प्रतिसाद मिळत आहे. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी कोल्हापूर महानगरपालिका आणि स्थानिक प्रशासनाने मोलाचे सहकार्य केले असून, नाट्यगृहाचे सध्याचे व्यवस्थापन अत्यंत उत्तम आहे. कलाकारांचा उत्साह वाढवण्यासाठी कोल्हापूरकर रसिकांनी पुढील सर्व नाटकांनाही आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे. #RajyaNatyaSpardha #Kolhapur #KeshavraoBhosaleNatyagruha #MarathiTheatre #Kolhapur
73
कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ५ अंतर्गत सरलष्कर पार्क परिसरात सुरू असलेल्या बांधकामाच्या बेसमेंटमधील साचलेले पाणी मोटार पंपाद्वारे मुख्य रस्त्यावरील गटर व ड्रेनेज लाईनमध्ये मोठ्या प्रमाणात सोडले जात होते. यामुळे ड्रेनेज लाईन ओव्हरफ्लो होऊन हे पाणी रस्त्यावरून थेट स्थानिक नागरिकांच्या घरांमध्ये शिरत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. विरोधी पक्षनेते राजेश लाटकर व नगरसेविका सौ. स्वाती येवलुजे यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी नागरिकांनी रस्ता खराब होत असल्याबाबत आणि घरांमध्ये पाणी शिरून होणाऱ्या त्रासाबद्दल तक्रारी मांडल्या. या प्रकरणाची तात्काळ दखल घेत उपआयुक्त परितोष कंकाळ व सहायक आयुक्त डॉ. विजय पाटील यांच्या सूचनेनुसार संबंधितांवर दंडात्मक कारवाईचे आदेश देण्यात आले. त्यानुसार महापालिकेच्या विभागीय कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता उमेश बागुल, आरोग्य निरीक्षक प्रकाश लोंढे व उपद्रव शोध पथकाने (NDS) घटनास्थळी धडक कारवाई करत वरद डेव्हलपर्सचे संजय चव्हाण यांच्यावर १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. या कारवाईत एनडीएस पथकाचे रघुनाथ चव्हाण, राजेश पाटील, पांडुरंग घाडगे, अमोल हिंजनाळे, रतिलाल शिंदे, सुरेश चौगुले व अमर सूर्यवंशी यांनी सहभाग घेतला. कोणत्याही बांधकाम साईटवरील पाणी किंवा राडारोडा सार्वजनिक गटर, ड्रेनेज लाईन अथवा रस्त्यावर सोडून नागरिकांना त्रास देणाऱ्यांविरोधात महानगरपालिकेचा असाच कठोर बडगा कायम राहील. सर्व व्यावसायिकांनी नियमांचे काटेकोर पालन करून शहर स्वच्छ व सुरक्षित ठेवण्यास सहकार्य करावे! #KMCKolhapur #CivicAction #Penalty #DrainageIssue #Kolhapur
2
180
एनसीसी दिनाचे औचित्य साधून प्लास्टिकमुक्त परिसर आणि स्वच्छतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेचे यशवंतराव चव्हाण के.एम.सी. कॉलेज, जी.के.जी. कॉलेज आणि ५६ महाराष्ट्र बटालियन एनसीसी यांच्या संयुक्त विद्यमाने शाहू दयानंद हायस्कूल परिसरात 'प्लास्टिकमुक्त परिसर अभियान' अत्यंत उत्साहात राबविण्यात आले. या मोहिमेत यशवंतराव चव्हाण के.एम.सी. कॉलेज, जी.के.जी. कॉलेज, शाहू दयानंद हायस्कूल, इंदिरा गांधी स्कूल आणि जय हनुमान हायस्कूल (इस्पुर्ली) येथील एकूण २०० एनसीसी कॅडेट्स व ५ एनसीसी अधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. कॅडेट्सनी संपूर्ण मैदान व परिसराची सखोल स्वच्छता करून ठिकठिकाणी पडलेला प्लास्टिक कचरा संकलित केला व त्याची योग्य विल्हेवाट लावून परिसर संपूर्णपणे प्लास्टिकमुक्त केला. या उपक्रमास मनपा उपायुक्त किरणकुमार धनवाडे, ५६ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल निखिल सक्सेना, प्राचार्य पी. पी. नागावकर व प्राचार्य आर. बी. भुयेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तर कॅप्टन डॉ. अमित रेडेकर, लेफ्टनंट डॉ. डी. के. नरळे, ऑफिसर अजित कारंडे, ऑफिसर संग्राम सोनार व ऑफिसर राजाराम चौगुले यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले. 'स्वच्छ परिसर, सुंदर परिसर आणि प्लास्टिकमुक्त पर्यावरण' हा संदेश देत एनसीसी कॅडेट्सनी सामाजिक बांधिलकीचे उत्तम दर्शन घडविले. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण व पर्यावरण संवर्धनाची भावना रुजविणारा हा उपक्रम सर्व कोल्हापूरकरांसाठी प्रेरणादायी ठरला आहे! #NCCDay #KMCKolhapur #PlasticFreeKolhapur #SwachhKolhapur #Kolhapur
83