MKCL (@MKCLINDIA) header
MKCL (@MKCLINDIA) profile picture

MKCL is promoted by the Department of Higher and Technical Education, Government of Maharashtra, to create new paradigms in education and development.

ICC Tower, Shivajinagar, Pune
Joined June 2011
Photo by MKCL (@MKCLINDIA)Photo by MKCL (@MKCLINDIA)Photo by MKCL (@MKCLINDIA)Photo by MKCL (@MKCLINDIA)Photo by MKCL (@MKCLINDIA)Photo by MKCL (@MKCLINDIA)Photo by MKCL (@MKCLINDIA)Photo by MKCL (@MKCLINDIA)Photo by MKCL (@MKCLINDIA)Photo by MKCL (@MKCLINDIA)
Wishing a very Happy Birthday to Respected Vivek Sawant Sir, Chief Mentor of MKCL. Your visionary leadership, wisdom, and unwavering dedication continue to inspire us all every single day. Wishing you a year ahead filled with great health, happiness, and continued success!
2
5
272
महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (MKCL) च्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात ‘संगणकसाक्षरतेकडून सार्थकतेकडे’ आणि ‘जीवघेण्या शेतीकडून समृद्ध शेतीकडे’ या दोन महत्त्वपूर्ण पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. ‘संगणकसाक्षरतेकडून सार्थकतेकडे’ या पुस्तकातून गेल्या २५ वर्षांत MKCL सोबत जोडलेल्या हजारो अधिकृत शिक्षण केंद्रांच्या चालकांचा संघर्ष, अनुभव आणि यशस्वी वाटचाल अधोरेखित होते. तर डॉ. सतीश करंडे लिखित ‘जीवघेण्या शेतीकडून समृद्ध शेतीकडे’ हे पुस्तक सोलापूरमधील ‘एकात्मिक स्वावलंबी संजीवक शेती’ प्रकल्पातील तरुण शेतकऱ्यांच्या पाच वर्षांच्या प्रयोगांची, अनुभवांची आणि परिवर्तनाची कथा मांडते. ज्ञान, तंत्रज्ञान आणि शेतीतील नवे प्रयोग यांच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्राला अधिक सक्षम व समृद्ध करण्याचा मार्ग या दोन्ही पुस्तकांतून दिसतो. या पुस्तकांच्या लेखकांचे, MKCLच्या सर्व सहकाऱ्यांचे आणि या प्रवासात योगदान देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
1
12
1
148
12,467
1
5
22
1,470
'महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड' (MKCL) च्या रौप्य महोत्सवपूर्ती समारंभात उपस्थित तंत्रज्ञानप्रेमी समूहाशी संवाद साधला, आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्थेला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ---- डॉ. विजय भटकर, डॉ. अनिल काकोडकर, श्री. प्रतापराव पवार, श्री. राजेश टोपे, डॉ. चारुदत्त मायी, डॉ. राजाराम देशमुख, श्री. विवेक सावंत आणि ह्या क्षेत्रात MKCL चं काम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी कष्ट घेतले, आणि ह्या संस्थेचा नावलौकिक देशासह सबंध जगभर पोहोचण्याची मोलाची कामगिरी केली ते आपण सगळेजण बंधू-भगिनी... आपण इथे प्रत्यक्ष उपस्थित आहात पण अनेक लोक आभासी सभेत दुरून सहभागी झालेले आहेत. MKCL च्या परिवारात हजारो सदस्य आहेत, हितचिंतक आहेत त्या सगळ्यांना रौप्यमहोत्सवाच्या निमित्ताने अंतःकरणापासून शुभेच्छा देतो. सर्वसामान्य लोकांच्या जीवनातील डिजिटल निरक्षरता दूर करण्यासाठी MKCL ने गेली २५ वर्ष महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेरही फार मोठं काम केलं आहे. त्यामुळे साहजिकच MKCL चं संचालक मंडळ, सल्लागार मंडळ आणि त्यांचे सगळे सहकारी हे अभिनंदनाला पात्र आहेत. डिजिटल निरक्षरता दूर करण्याबरोबर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात AI विषमता दूर करण्याचं मिशन MKCL ने हाती घेतलंय ह्याचं ठिकठिकाणी कौतुक होतंय. आज हे सबंध उभं करण्यामध्ये राहुल चाकोरे असतील, विजय भटकर असतील, गेली अनेक वर्ष विवेक सावंत असतील आणि तात्यांचे सहकारी ह्याचं कटाक्षाने स्मरण ह्या रौप्य महोत्सवामध्ये आपल्या सगळ्यांना करावंच लागेल. संस्थेचा विस्तार हा महाराष्ट्रात बसून फारसा कळत नाही. मी एक दिवशी बिहारमध्ये होतो आणि बिहारमध्ये एका लहानशा गावामध्ये MKCL चा बोर्ड दिसला. मी माझी गाडी थांबवली आणि त्या कार्यालयात गेलो. बिहारमध्ये गेली अनेक वर्ष ह्या संस्थेचा विस्तार करण्याचं काम तिथली मंडळी करत होती. योगायोगाने माझा बिहार दौरा संपला आणि तेच केंद्र सरकारमध्ये होतो तर काही विशिष्ट कामासाठी पंतप्रधानांनी मला बोलवलं आणि मला सौदी अरेबिया एका कामासाठी जायला सांगितलं. गंमत अशी की, सौदीला विमानतळावर उतरून हॉटेलपर्यंत जाताना एकेठिकाणी MKCL चा बोर्ड दिसला. मोठी गमतीची गोष्ट होती, संस्थाचालकांचं जे contribution आहे आणि त्याचा लाभ सौदी अरेबियानेही कसा घेतला, ह्यासंबंधीची माहिती मोठ्या आस्थेने मला ऐकायला मिळाली. त्यामुळे साहजिकच ह्या संस्थेचं योगदान किती विस्तारित स्वरूपामध्ये पोहोचलेलं आहे ह्याचा अनुभव गेली २५ वर्ष आपण अनुभवतोय. हे काम गुणवत्ता वाढीसाठी आणि विषमता दूर करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. आपण आज ह्याठिकाणी MKCL आणि तंत्रज्ञानाच्या मार्फत भारतासारख्या शेतीप्रधान देशामध्ये सुद्धा काय उपयुक्तता त्याची आहे हे अनुभवत आहोत. आज AI हा शब्द अनेक ठिकाणी खेड्यापाड्यात सुद्धा परवलीचा शब्द झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मध्ये सुद्धा एक प्रकारचं औत्सुक्य आणि आस्था निर्माण झाली आहे. मगाशी श्रीयुत टोपेंनी देखील उल्लेख केला की, आज उसाची शेती असेल, फळफळावळीची शेती असेल, कडधान्याची शेती असेल ह्या सगळ्यात जे बदल होत आहेत त्यात AI आणि माहिती तंत्रज्ञान ह्याचं योगदान लक्षणीय आहे. एक साधी माहिती सांगतो, ज्याचा उल्लेख टोपेंनी केला. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही संस्था शेतकऱ्यांनी काढलेली संस्था आहे. मी त्याचा अध्यक्ष आहे, आज त्याठिकाणी ८० पेक्षा जास्त सायंटिस्ट काम करतात आणि शेतीमध्ये जे बदल होतात ते आम्हाला जाणवायला लागले आहेत. महाराष्ट्राची ४० टनाची उसाची सरासरी होती. पण ज्या शेतकऱ्यांनी AI तंत्रज्ञानाचा उपयोग केला त्या शेतकऱ्यांचं उत्पन्न आज ४० टनापासून साधारणतः ९०-११० टनापर्यंत गेलं. ज्या उसाला साधारणतः १०-१२ कांडी असतात, तिथं AI च्या मार्गदर्शनामुळे उसाची कांडी २८ पर्यंत गेली आणि प्रचंड उत्पादन वाढलं. असे अनेक बदल अनेक क्षेत्रात आज बघायला मिळतात. त्यामुळे साहजिकच ह्याच परिणाम म्हणजे महाराष्ट्राची आणि देशाची सुधारणा अनेक क्षेत्रात व्हावी त्यासंबंधीचा यशस्वी अनुभव आज आपल्याला त्याठिकाणी बघायला मिळतोय. आधीच्या सगळ्याच वक्त्यांनी MKCL जे काही contribution आहे त्याची माहिती आपल्यापुढे ठेवलीच आहे. सरकारमध्ये अनेक वर्ष आमच्यापैकी अनेक जणांनी काम केलं आणि साधारणतः यासारख्या संस्था सुरू करायच्या म्हटल्यानंतर पहिल्यांदा सरकारची गुंतवणूक हा अत्यंत महत्त्वाचा विषय असतो. कदाचित ही एकमेव संस्था अशी आहे की, ज्यात सरकारची गुंतवणूक नाही. त्यात एका ठराविक काळामध्ये स्वतःचं आर्थिक बळ वाढविण्यास ही संस्था यशस्वी झाली. उलट गरज पडली तर सरकारला दोन पैसे देण्याची ताकद असणारी महाराष्ट्राची एकमेव संस्था MKCL आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. मला आनंद आहे की, आज ह्या सगळ्या नेटवर्कच्या माध्यमातून २ कोटी जिज्ञासू स्वखर्चाने संगणक साक्षर झाले, एवढं काम मला कुठे बघायला मिळत नाही. गेल्या २५ वर्षांमध्ये जवळपास २५ हजारांपेक्षा जास्त तरुण-तरुणींना संगणक प्रशिक्षण देण्याचा हायटेक रोजगार त्यांच्या-त्यांच्या गावात देण्यास ही संस्था यशस्वी झाली आहे. त्यामुळे विविध क्षेत्रामधील ह्या संस्थेचं योगदान पाहून आपण सर्व अत्यंत आनंदाने ह्या रौप्य महोत्सवी सोहळ्यात सहभागी झालो आहोत. हे सगळं उभं राहिलं, ह्या उभारणीत लोकप्रतिनिधी म्हणून वळसे असतील किंवा अन्य सहकारी असतील पण खऱ्या अर्थाने डॉ. रामचंद्र टाकवळे, विवेक सावंत, डॉ. भटकर अशांची नावं कटाक्षाने घ्यावी लागतील ज्यांनी आयुष्यभर एक मिशन समजून ह्या संस्थेच्या उभारणीत योगदान दिलं, नवीन पिढीला प्रोत्साहित केलं, आत्मविश्वास वाढविला, त्याचा परिणाम आज महाराष्ट्रामध्ये कर्तृत्वसंपन्न असा एक नवीन वर्ग तयार होतोय त्याचं श्रेय ह्या सगळ्या मान्यवरांना आणि त्यांच्या हजारो तुमच्यासारख्या सहकाऱ्यांना द्यायला मला मनापासूनचा आनंद होतोय. हे काम तुम्ही चालू ठेवा, त्याची उपयुक्तता आहे आणि दिवसेंदिवस खेड्यापाड्यांतसुद्धा तुमच्या कार्याची नोंद साधा शेतकरीही घेतोय. ज्याचा उल्लेख टोपेंनी केला, त्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमार्फत आम्ही शेतीचं उत्पादन वाढायला ह्या सगळ्या तंत्राची मदत घेतली. मध्यंतरी, ऊसाची वाढ करण्यासाठी जे तंत्र विकसित केलं; ती खर्चिक बाब पाहून किती लोक येतात ह्याची आम्ही सहज माहिती घेतली तर अक्षरशः ३-४ दिवसातच १० हजार शेतकऱ्यांनी पैशांसह आमच्याकडे गुंतवणूक केली आणि काम करण्याची तयारी त्यांनी ह्याठिकाणी दाखवली. हे मी उदाहरण एवढ्यासाठीच देतोय कारण ही जी सुरुवात होते आहे, ती सबंध परिवर्तनाच्या दृष्टीने उपयुक्त आहे. त्यासाठी MKCL चं योगदानाला श्रेय देणं आवश्यक आहे. त्यामुळे अतिशय आनंदाने मी त्यांचं अभिनंदन करतो. प्रोत्साहित करतो. आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र !
1
12
1
148
13,524
आज दि ३० जुलै रोजी वर्षा बंगल्यावर मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ह्यांच्याबरोबर MKCL चे अध्यक्ष डॉ अनिल काकोडकर यांच्याशी MKCL संदर्भात सविस्तर चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या OSD श्रीमती प्रिया खान, समीर पांडे, MD MKCL आणि कोमल चौबळ CEO, MKCL हे उपस्थित होते.
3
85
It was a pleasure to meet and interact with the senior nuclear scientist and chairman of MKCL, Maharashtra Bhushan, Padma Vibhushan Dr. Anil Kakodkar ji, at my official residence in Mumbai. Dr. Kakodkar's lifelong dedication to science, innovation and nation-building continues to inspire generations. It was insightful to learn and exchange views on new developments in science and technology, drawing on his vast experience and vision. @anil_kakodkar @MKCLINDIA #Maharashtra #Mumbai
414
638
2
1,178
25,426
🏆 डिजिटल साक्षरतेमध्ये MS-CIT चा राष्ट्रीय स्तरावर गौरव! MKCL च्या MS-CIT कोर्सला प्रतिष्ठित 'स्कॉच अवॉर्ड' प्रदान. 📰 आजच्या 'पुण्य नगरी' (पुणे आवृत्ती, पान ०९) मध्ये प्रसिद्ध झालेली ही विशेष बातमी पहा.
104
'MS-CIT' ला मिळालेल्या राष्ट्रीय 'स्कॉच अवॉर्ड'ची मोठी दखल! 🏆 'मराठवाडा साथी' वृत्तपत्रात MKCL च्या या यशाची बातमी सविस्तर प्रसिद्ध झाली आहे. डिजिटल साक्षरतेच्या क्षेत्रातील या कामगिरीचे माध्यम क्षेत्रातूनही कौतुक होत आहे. 📰
1
88
महाराष्ट्राचा गौरव! 🌟 'अमरावती मंडल' वृत्तपत्रात (२४ जून २०२६) प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, MKCL च्या लोकप्रिय MS-CIT कोर्सला राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित 'स्कोच अवॉर्ड' (Skoch Award) मिळाला आहे. डिजिटल साक्षरतेच्या क्षेत्रातील या उल्लेखनीय कामगिरीबद्दल हार्दिक अभिनंदन! 🏆👏
1
120
दिव्य मराठी | अभिमानास्पद यश! एमएस-सीआयटी कोर्सला प्रतिष्ठित SKOCH पुरस्कार जाहीर! महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या डिजिटल साक्षरता उपक्रमाने देशस्तरावर मान मिळवला. डिजिटल शिक्षण, कौशल्य विकास आणि सामाजिक परिवर्तनातील योगदानाबद्दल हा मोठा गौरव! #MSCIT #SKOCHAward #DivyaMarathi
73
🏆 अभिमानाचा क्षण! डिजिटल परिवर्तन आणि नागरिक-केंद्रित उपक्रमांमधील उल्लेखनीय योगदानाबद्दल एमकेसीएलला प्रतिष्ठित SKOCH राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा सन्मान आमच्या कार्यसंघाच्या समर्पणाचा आणि ज्ञानाधारित, सक्षम समाज घडविण्याच्या वचनबद्धतेचा गौरव आहे. #MKCL
92
MS-CIT ला SKOCH Award प्राप्त! २५ वर्षांच्या एकत्रित मेहनतीचे सोनेरी फलित! केंद्रप्रमुख, प्रशिक्षक, MKCL टीम, विद्यार्थी-पालक आणि शासनाच्या विश्वासाने डिजिटल सक्षमीकरणाची ही ऐतिहासिक यात्रा शक्य झाली.आता AI युगाकडे मजबूत पाऊले! धन्यवाद !
1
1
137
🎉 MS-CIT ला SKOCH Award प्राप्त! 25 वर्षांच्या संयुक्त प्रयत्नांचे फलित—केंद्रप्रमुख, प्रशिक्षक, टीम MKCL, विद्यार्थी-पालक व शासनाच्या विश्वासामुळे डिजिटल सक्षमीकरणाचा प्रवास शक्य झाला. आता AI युगाकडे पुढे! धन्यवाद 🙏 #MKCL #MSCIT
1
1
4
140
The Chief Minister's vision for Maharashtra, Interview with Devendra Fadnavis on Majha Maharashtra, Majha Vision. Co-powered by MS-CIT !
राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं महाराष्ट्रासाठीचं व्हिजन, देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत पाहा माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन 30 एप्रिल रोजी दिवसभर एबीपी माझावर #MajhaVision #MajhaMaharashtraMajhaVision #ABPMajha #DevendraFadnavis (Devendra Fadnavis, Majha Maharashtra Majh Vision, ABP Majha)
55
दिग्गजांसोबत चर्चा उद्याच्या महाराष्ट्राची! पाहा माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन 30 एप्रिल रोजी दिवसभर एबीपी माझावर #MajhaVision #MajhaMaharashtraMajhaVision #ABPMajha #AtharvaSudame (Atharva Sudame, Majha Maharashtra Majha Vision, ABP Majha, Vinayak Mali, Shrutika Gavande)
1
392
राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचं महाराष्ट्रासाठीचं व्हिजन, एकनाथ शिंदे यांची मुलाखत पाहा माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन 30 एप्रिल रोजी दिवसभर एबीपी माझावर #MajhaVision #MajhaMaharashtraMajhaVision #ABPMajha #EknathShinde (Eknath Shinde, Majha Maharashtra Majh Vision, ABP Majha)
1
388
राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं महाराष्ट्रासाठीचं व्हिजन, देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत पाहा माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन 30 एप्रिल रोजी दिवसभर एबीपी माझावर #MajhaVision #MajhaMaharashtraMajhaVision #ABPMajha #DevendraFadnavis (Devendra Fadnavis, Majha Maharashtra Majh Vision, ABP Majha)
1
1
1
481
📰 MKCL आता ABP माझाच्या ‘माझा महाकट्टा’चा स्पॉन्सर! या सहकार्यामुळे MS-CIT महाराष्ट्रातील आणखी मोठ्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचणार असून डिजिटल सक्षमीकरणाच्या दिशेने ही महत्वपूर्ण पायरी ठरते. 🚀 #MKCL #MSCIT #ABPMajha #MajhaMahakatta
85
MS-CIT ची २५ वर्षे — आता महाराष्ट्र AI-Ready! 🤖✨ शिक्षण, कौशल्य आणि नवोन्मेषाचा अभिमान! #MSCIT #MKCL #AIReady
1
1
85
MS-CIT च्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त आदरणीय समीर पांडे सर, एम.डी., MKCL यांचा MS-CIT लर्नर्स, ALCs, नेटवर्क पार्टनर्स आणि MKCL परिवारातील सर्व सदस्यांना संदेश #mscit #mkcl #ai
1
181