MSRDCofficial (@MSRDC_official) header
MSRDCofficial (@MSRDC_official) profile picture

MSRDC Official | Road Infrastructure | Safety • Growth • Connectivity | Maharashtra

Mumbai
Joined January 2026
Photo by MSRDCofficial (@MSRDC_official)Photo by MSRDCofficial (@MSRDC_official)Photo by MSRDCofficial (@MSRDC_official)Photo by MSRDCofficial (@MSRDC_official)Photo by MSRDCofficial (@MSRDC_official)Photo by MSRDCofficial (@MSRDC_official)Photo by MSRDCofficial (@MSRDC_official)Photo by MSRDCofficial (@MSRDC_official)Photo by MSRDCofficial (@MSRDC_official)Photo by MSRDCofficial (@MSRDC_official)
⚠️ महत्त्वाची सूचना..! हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील भरवीर इंटरचेंज ते इगतपुरी इंटरचेंज दरम्यान २६ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात बंद राहणार आहे. या कालावधीत बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ तसेच इतर डोंगर उतारांवरून दरड किंवा दगड कोसळू नयेत, यासाठी जाळी बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. या कामाच्या सुरक्षिततेसाठी टप्प्याटप्प्याने वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. 🕒 वाहतूक बंद राहण्याची वेळ : • सकाळी १०:०० ते ११:०० वाजेपर्यंत • दुपारी १:०० ते २:०० वाजेपर्यंत • दुपारी ४:०० ते ५:०० वाजेपर्यंत वरील वेळेत मुंबई दिशेने जाणारी वाहतूक बंद राहील. प्रवाशांनी वरील कालावधी लक्षात घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे व सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) च्या वतीने करण्यात येत आहे. #MSRDC #MaharashtraSamruddhiMahamarg #TrafficUpdate #TrafficAdvisory #RoadSafety
1
3
469
शाश्वत विकासाच्या दिशेने MSRDC चे महत्त्वपूर्ण पाऊल! महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना चालना देतानाच पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) आणि महानिर्मिती यांच्यात ६.१७ कोटी मेट्रिक टन राखेच्या शाश्वत वापरासाठी सामंजस्य करार करण्यात आला. ऊर्जा राज्यमंत्री मा. मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या करारावर MSRDC चे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.अनिलकुमार बी. गायकवाड आणि महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.राधाकृष्णन बी. यांनी स्वाक्षऱ्या केल्या. या उपक्रमांतर्गत पूर्व महाराष्ट्रातील चार महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी राखेचा वापर प्रस्तावित आहे. ▪️ नागपूर–गोंदिया द्रुतगती मार्ग: २.०९ कोटी मेट्रिक टन ▪️ भंडारा–गडचिरोली द्रुतगती मार्ग: १.१४ कोटी मेट्रिक टन ▪️ नागपूर–चंद्रपूर द्रुतगती मार्ग: २.७९ कोटी मेट्रिक टन ▪️ नवेगाव मोरे–सुरजागड खनिज वाहतूक मार्ग: ०.१५ कोटी मेट्रिक टन जानेवारी २०२७ ते डिसेंबर २०२८ या कालावधीत राखेचा वापर प्रस्तावित असून, महानिर्मितीच्या कोराडी, खापरखेडा आणि चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्रांमधून राख उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. यावेळी महानिर्मितीचे संचालक (प्रकल्प) श्री.अभय हरणे, कार्यकारी संचालक (पर्यावरण) डॉ. नितीन वाघ आणि MSRDC चे मुख्य महाव्यवस्थापक (पर्यावरण) श्री.नरेंद्र टोके यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. ♻️ राखेचा पुनर्वापर, पर्यावरणीय जोखीम कमी करण्यास हातभार आणि पायाभूत सुविधांचा शाश्वत विकास—या उद्दिष्टांच्या दिशेने हा सामंजस्य करार महत्त्वपूर्ण ठरणार आहे. MSRDC — सक्षम पायाभूत सुविधा, शाश्वत विकास! #MSRDC #InfrastructureDevelopment #SustainableDevelopment #AshUtilisation #ExpresswayDevelopment
1
1
6
411
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर भरवीर इंटरचेंज ते इगतपुरी इंटरचेंज या मार्गावर वाहतूक तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहे. 📅 दिनांक : दि. १८, १९,२१,२२ व २३सप्टेंबर २०२६ या कालावधीत खालील वेळेत वाहतूक बंद राहील : 🔴 मुंबई दिशेने: दुपारी १२:०० ते १:०० 🔴 नागपूर दिशेने: दुपारी ३:०० ते ४:०० ⚠️ महत्त्वाची सूचना: ITMS अंतर्गत CCTV साठी गॅन्ट्री बसविण्याचे काम सुरू असल्याने वरील नमूद वेळेत वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. प्रवाशांनी व वाहनचालकांनी प्रवासाचे नियोजन करून सहकार्य करावे. प्रवासाचे नियोजन करूनच प्रवास करा. #MSRDC #MaharashtraSamruddhiMahamarg #SamruddhiMahamarg #TrafficUpdate #TrafficAdvisory [Igatpuri Bharvir Mumbai Nagpur RoadSafety ITMS CCTV MaharashtraGovernment]
2
4
373
शक्तीपीठ महामार्गाच्या संयुक्त जमीन मोजणी प्रक्रियेला गती देण्यासाठी पुण्यातील ‘यशदा’ येथे मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली. शक्तीपीठ महामार्गासाठी सुरू असलेल्या संयुक्त जमीन मोजणी व भूसंपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करणे, त्यांच्या शंका व गैरसमज दूर करणे आणि त्यांच्याशी सातत्यपूर्ण व पारदर्शक संवाद साधणे यावर कार्यशाळेत विशेष भर देण्यात आला. भूसंपादनाशी संबंधित नियमावली, प्रत्यक्ष अंमलबजावणीतील बाबी तसेच समृद्धी महामार्ग आणि पुणे रिंग रोड प्रकल्पातील अनुभवांच्या आधारे अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा प्रशासन, महसूल यंत्रणा आणि एमएसआरडीसी यांनी प्रभावी समन्वयातून संयुक्त जमीन मोजणीला गती देत भूसंपादन प्रक्रिया सुरळीतपणे पुढे नेण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड, पुणे विभागीय आयुक्त श्रीमती शीतल उगले, एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री. लक्ष्मीनारायण मिश्रा, सातारा जिल्हाधिकारी श्री. संतोष पाटील, कोल्हापूर जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, सांगली जिल्हाधिकारी डॉ. मैनक घोष, सोलापूर जिल्हाधिकारी श्री. कार्तिकेयन एस. आणि सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे, तसेच मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी श्री. हनुमंत अरगुंडे, विविध जिल्ह्यांतील प्रांताधिकारी, अधीक्षक भूमिअभिलेख आणि उपअधीक्षक भूमिअभिलेख उपस्थित होते. #MSRDC #ShaktipeethExpressway #Maharashtra #LandAcquisition #ShaktipeethMahamarg #InfrastructureDevelopment #MaharashtraInfrastructure
4
527
🚧 वाहतूक बंद नियोजन सूचना 🚧 हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर सिन्नर इंटरचेंज ते इगतपुरी इंटरचेंज दरम्यान ITMS अंतर्गत CCTV साठी गॅन्ट्री बसविण्याचे काम सुरू असल्याने, खालीलप्रमाणे टप्प्याटप्प्याने वाहतूक बंद ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 🔸 टप्पा १ | सिन्नर इंटरचेंज ते भरवीर इंटरचेंज 🗓️ दिनांक : ३१ ऑगस्ट | १ सप्टेंबर | २ सप्टेंबर 🚗 मुंबई दिशेने : दुपारी १२:०० ते ०१:०० 🚗 नागपूर दिशेने : दुपारी ३:०० ते ४:०० 🔸 टप्पा २ | भरवीर इंटरचेंज ते इगतपुरी इंटरचेंज 🗓️ दिनांक : ४ सप्टेंबर | ५ सप्टेंबर | ७ सप्टेंबर 🚗 मुंबई दिशेने : दुपारी १२:०० ते ०१:०० 🚗 नागपूर दिशेने : दुपारी ३:०० ते ४:०० ⚠️ प्रवाशांनी व वाहनचालकांनी वरील वेळेनुसार प्रवासाचे नियोजन करून सहकार्य करावे. #MSRDC #SamruddhiMahamarg #MaharashtraSamruddhiMahamarg #TrafficUpdate #ITMS
1
5
1,071
🚧 इगतपुरी बोगदा एक तासासाठी बंद 🚧 अग्निशमन प्रतिबंधक उपाययोजनेंच्या प्रात्यक्षिकासाठी मुंबई दिशेकडील इगतपुरी बोगदा वाहतुकीसाठी तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे. 📍 इगतपुरी बोगदा | नागपूर–मुंबई मार्गिका 📅 दिनांक : २७.०८.२०२६ ⏰ दुपारी १२.०० ते १.०० वाजेपर्यंत मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. ⚠️ नाशिक - इगतपुरीहून तसेच नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी इगतपुरीपासून जुना मुंबई–आग्रा महामार्गाने घाट मार्गाचा वापर करावा. नागपूर दिशेकडील इगतपुरी बोगदा वाहतुकीसाठी सुरू राहील. वाहतूक बदलाबद्दल सर्व वाहन चालकांनी सहकार्य करावे, ही विनंती. प्रवासाचे नियोजन करा • सुरक्षित प्रवास करा #MSRDC #SamruddhiMahamarg #IgatpuriTunnel #TrafficUpdate #RoadSafety
1
2
2
497
🚧 ROAD BLOCK ALERT 🚧 हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर गॅन्ट्री उभारणीच्या कामासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दिनांक २०.०८.२०२६ रोजी वाहतूक तात्पुरती बंद राहील. किमी ३९०+४४५ ते किमी ४४४+८४५ (बेंदेवाडी ते फातियाबाद) दरम्यान गॅन्ट्री उभारणीचे काम करण्यात येणार आहे. ⏰ दुपारी १२ वा. ते दुपारी ०१ वा. साखळी क्र.: ४०४+२०० 📍 नागपूर वाहिनी ⏰ दुपारी ०३ वा. ते दुपारी ०४ वा. साखळी क्र.: ४०३+७०० 📍 मुंबई वाहिनी साखळी क्र.: ४०४+२०० 📍 मुंबई वाहिनी वरील वाहिनीवर ४५ ते ६० मिनिटे वाहतूक बंद राहील. काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू करण्यात येईल. Hindu Hrudaysamrat Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi Mahamarg – Temporary traffic blockage in Chhatrapati Sambhajinagar on 20.08.2026 for gantry installation. Gantry installation work will be carried out between Km 390+445 and Km 444+845 (Bendewadi to Fatiyabad). ⏰ 12:00 PM to 1:00 PM Chain No.: 404+200 📍 Nagpur Corridor ⏰ 3:00 PM to 4:00 PM Chain No.: 403+700 📍 Mumbai Corridor Chain No.: 404+200 📍 Mumbai Corridor Traffic on the above corridors will remain closed for 45–60 minutes. Traffic will resume after completion of the work. Plan your journey ahead and drive safe! #SamruddhiMahamarg #MSRDC #RoadBlockAlert #TrafficUpdate #GantryInstallation
1
2
750
स्वातंत्र्याचा अभिमान, प्रगतीचा संकल्प! भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. राष्ट्रनिर्मितीच्या या प्रवासात सुरक्षित, सक्षम आणि आधुनिक पायाभूत सुविधा उभारून महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती देण्याचा MSRDC चा संकल्प कायम आहे. जय हिंद! 🇮🇳 #IndependenceDay #HarGharTiranga #MSRDC #Maharashtra #ViksitBharat #IndiaAt80
1
2
685
12 August 2026 | Preparedness Strengthened Through Successful Emergency Response Mock Drill MSRDC successfully conducted an emergency response mock drill on the Connecting Link today in accordance with the prescribed Standard Operating Procedure (SoP). The exercise was carried out to assess emergency preparedness, strengthen operational readiness, and ensure effective coordination among all concerned agencies. The mock drill was executed in a systematic and timely manner, with all emergency response protocols followed as per the established SoP. The exercise also evaluated traffic management arrangements and the efficiency of coordinated response mechanisms during emergency situations. MSRDC remains committed to maintaining the highest standards of safety, preparedness, and operational efficiency across its infrastructure projects through regular emergency response exercises and coordinated preparedness initiatives. ---------------------- १२ ऑगस्ट २०२६ | यशस्वी आपत्कालीन प्रतिसाद मॉक ड्रिलद्वारे सज्जतेला अधिक बळकटी एमएसआरडीसीतर्फे आज कनेक्टिंग लिंकवर निर्धारित मानक कार्यपद्धतीनुसार (SoP) आपत्कालीन प्रतिसाद मॉक ड्रिल यशस्वीरित्या पार पाडण्यात आली. या सरावाचा उद्देश आपत्कालीन परिस्थितीतील सज्जतेचे मूल्यमापन करणे, कार्यान्वयन क्षमतेला अधिक बळकटी देणे तसेच संबंधित सर्व यंत्रणांमधील समन्वय अधिक प्रभावी करणे हा होता. मॉक ड्रिलची अंमलबजावणी नियोजनबद्ध व वेळेवर करण्यात आली असून निर्धारित मानक कार्यपद्धतीतील सर्व आपत्कालीन प्रतिसाद प्रोटोकॉलचे पालन करण्यात आले. या सरावाद्वारे वाहतूक व्यवस्थापन व्यवस्था तसेच आपत्कालीन परिस्थितीतील समन्वित प्रतिसाद यंत्रणेची कार्यक्षमता देखील तपासण्यात आली. पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये सुरक्षितता, सज्जता आणि कार्यान्वयन कार्यक्षमता यांचे सर्वोच्च मानदंड कायम राखण्यासाठी एमएसआरडीसी नियमित आपत्कालीन प्रतिसाद सराव आणि समन्वित सज्जता उपक्रम राबविण्यास कटिबद्ध आहे. #MSRDC #ConnectingLink #EmergencyPreparedness #MockDrill #RoadSafety
2
8
1
18
2,929
🚧 यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील वाहतूक बदल 🚧 दिनांक १२.०८.२०२६ रोजी दुपारी १२.०० ते ३.०० या कालावधीत देखभाल, दुरुस्ती व मॉकड्रील साठी पुण्याकडून मुंबईकडे जाणारा कनेक्टिंग लिंक मार्ग तात्पुरता बंद राहील. सर्व वाहने जुन्या मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरील घाट मार्गातून मुंबईच्या दिशेने वळविण्यात येतील. कनेक्टिंग लिंकवरून मुंबईहून पुण्याकडे जाणारी मार्गिका वाहतुकीसाठी सुरू राहील, याची वाहनचालकांनी नोंद घ्यावी. वाहनचालकांना कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवल्यास त्वरित मदतीसाठी संपर्क साधावा: 📞 मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग नियंत्रण कक्ष: ९८२२४८१२२४ 📞 महामार्ग पोलिस विभाग: ९८३३४९८३३४ वाहतूक बदलाबद्दल सर्व वाहन चालकांनी सहकार्य करावे, ही विनंती. सुरक्षित प्रवास… आमची बांधिलकी! #MSRDC #YashwantraoChavanExpressway #MumbaiPuneExpressway #TrafficUpdate #TrafficDiversion [RoadSafety Maharashtra SafeTravel Expressway Infrastructure]
1
7
2
12
12,723
7th Aug | At approximately 1:20 AM, a tempo illegally entered the Mumbai–Pune Expressway Connecting Link from the Pune end towards Mumbai and was struck by a very high-speed vehicle from rear end. Tragically, one person lost their life at the scene, while two occupants of the car sustained injuries. MSRDC’s Emergency Response Patrol (ERP) teams responded immediately, carried out all necessary emergency response operations, cleared the accident site, and restored normal traffic movement at the earliest. MSRDC urges all commuters to strictly adhere to traffic regulations, obey prescribed speed limits, and drive responsibly. Road safety is a shared responsibility, and every precaution taken can help save lives. Drive safely. Obey speed limits. Save lives.
7
2
9
1,497
🚧 हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर Gantry उभारणीसाठी तात्पुरता वाहतूक बदल. 🗓️ दि. २८/०७/२०२६ 🕛 वेळ: दुपारी १२:०० ते १:०० 📍 साखळी क्र. ३२२.००० (मुंबई वाहिनी) 📍 साखळी क्र. ३५१.९०० (मुंबई वाहिनी) ⏱️ प्रत्येक ठिकाणी अंदाजे ४५ ते ६० मिनिटांसाठी वाहतूक पूर्णपणे थांबविण्यात येईल. काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात येईल. 📍 जिल्हा: बुलढाणा व जालना #MSRDC #SamruddhiMahamarg #RoadBlockAlert #TrafficAdvisory #ITS
1
1
1
754
हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर वर्धा जिल्ह्यातील साखळी क्रमांक ७९.६०० येथे अपघातग्रस्त टँकर सुरक्षितस्थळी नेण्यात आला आहे. समृद्धी मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. #MSRDC #SamruddhiMahamarg #MaharashtraSamruddhiMahamarg #TrafficUpdate #TrafficRestored
1
1
3
966
हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर वर्धा जिल्ह्यातील साखळी क्रमांक ७९.६०० येथे अपघातग्रस्त टँकर सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरू आहे. यास्तव, समृद्धी महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक अंदाजे तासाभरासाठी तात्पुरती थांबविण्यात आली आहे. नागरिकांनी सहकार्य करावे. #MSRDC #SamruddhiMahamarg #Maharashtra #TrafficUpdate #Wardha #RoadSafety #PublicNotice
1
5
5,374
हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर Gantry उभारणीसाठी तात्पुरता वाहतूक बदल. 🚧 दि. २०/०७/२०२६ रोजी वेळ: ०१:०० - ०२:०० (दुपारी) साखळी क्र. ३५१/ ९०० (LHS) नागपूर - मुंबई मार्गिकेवर ⏱️ अंदाजे ४५ ते ६० मिनिटे वाहतूक तात्पुरती थांबविण्यात येईल. @InfoJalna #MSRDC #SamruddhiMahamarg #RoadBlockAlert #TrafficAdvisory #ITS
1
3
3
1,366
महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग | संवाद यात्रा डीडी सह्याद्रीवर विशेष कार्यक्रम. महामार्गाविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी नक्की पाहा. 🔗youtube.com/live/iPn6ufKN9so… #MSRDC #ShaktipeethMahamarg #Maharashtra #Infrastructure #RoadDevelopment #DDSahyadri
3
1
2
1,110
विकासाच्या वाटेवर विश्वासाची ३० वर्षे! गेली तीन दशके महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) आधुनिक, सुरक्षित आणि दर्जेदार पायाभूत सुविधांच्या निर्मितीद्वारे राज्याच्या प्रगतीला गती देत आहे. दूरदृष्टी, नाविन्यपूर्ण अभियांत्रिकी आणि उत्कृष्ट अंमलबजावणीच्या बळावर महाराष्ट्राला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचा आमचा प्रवास अविरत सुरू आहे. ३० वर्षे राज्याच्या विकासाची... ३० वर्षे विश्वासाची... ३० वर्षे प्रगतीची! #MSRDC #FoundationDay #30YearsOfMSRDC #30YearsOfDevelopment #BuildingMaharashtra
2
3
19
2,269
📌Public Advisory The debris on the Pune–Mumbai carriageway near the connecting link has been cleared by MSRDC and the construction company at 22:10 hrs Vehicular movement has now been restored on two lanes after the stretch was inspected and declared safe by MSRDC, the Road Safety Engineer and the construction company. Water is still flowing across the remaining two lanes; therefore, only partial traffic movement has been permitted. Citizens are requested to drive cautiously, follow lane discipline, maintain a safe speed, and strictly adhere to the directions of Highway Police and traffic personnel. We appreciate your patience and cooperation. #connectinglink #mumbaipuneexpressway #msrdc
14
45
6
230
24,628
📌 नागरिकांना सूचना पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंक परिसरातील दरड व मातीचा मलबा आज रात्री १०:१० वाजता एमएसआरडीसी व बांधकाम कंपनीने पूर्णपणे हटविला आहे. एमएसआरडीसी, रोड सेफ्टी इंजिनिअर व बांधकाम कंपनी यांनी सदर मार्ग सुरक्षित असल्याचे सूचित केल्यानंतर पुणे–मुंबई मार्गावरील दोन लेन वाहतुकीसाठी सुरू करण्यात आल्या आहेत. उर्वरित दोन लेनवर अद्याप पाण्याचा प्रवाह सुरू असल्याने त्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी वाहन चालविताना सावधगिरी बाळगावी, लेन शिस्त पाळावी, नियंत्रित वेगाने वाहन चालवावे तसेच महामार्ग पोलीस व वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. आपल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद..! #connectinglink #mumbaipuneexpressway #msrdc
9
29
1
103
13,941
🚨 IMPORTANT UPDATE ✅ Traffic has resumed on the Pune–Mumbai Connecting Link Road. Vehicular movement has been restored after completion of extensive safety operations. Despite relentless monsoon conditions, including heavy rainfall, strong winds and low visibility, MSRDC teams worked continuously to ensure the route could be reopened safely. The following measures were undertaken: - 🚧 Debris was cleared from the affected stretch. - 🚜 The carriageway was thoroughly cleaned using specialised equipment. - 👷 Technical experts carried out detailed inspections of Tunnel 2 and the adjoining slope to ensure no loose material posed a risk. - ⚙️ Drone surveys were attempted; however, dense fog, heavy rain and strong winds restricted aerial operations. Traffic has been restored only after the required safety and technical assessments were completed. Commuters are requested to avoid non-essential travel during the ongoing heavy monsoon and to strictly follow traffic advisories issued by the authorities. MSRDC remains committed to ensuring safe and reliable travel for all road users. #Monsoon #Maharashtra #ConnectingLink #Lonavala @CMOMaharashtra
197
548
79
2,202
444,088