मा.पोलीस आयुक्त सो यांच्या आदेशान्वये आज दिनांक 08/08/2026 रोजी मालाड पोलीस ठाणे येथे 11:00 ते 12.45 च्या दरम्यान तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. तक्रार निवारण करिता 10 तक्रारदार उपस्थित होते, त्यांच्या तक्रारीचे निरासन करून समाधान करण्यात आले.
मालाड पोलीस ठाणे - Malad PS Mumbai retweeted
Thank you to @MumbaiPolice helping me to find my lost wallet.
Big thanks to Mr Pravin Damodar from @Malad_PS
मा.पोलीस आयुक्त सो यांच्या आदेशान्वये आज दिनांक 01/08/2026 रोजी मालाड पोलीस ठाणे येथे 11:00 ते 12.45 च्या दरम्यान तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. तक्रार निवारण करिता 12 तक्रारदार उपस्थित होते, त्यांच्या तक्रारीचे निरासन करून समाधान करण्यात आले.
महाराष्ट्र दिनाचा अभिमान -परंपरा, नेतृत्वगुण आणि संस्कार हा आपल्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा, कर्तव्यनिष्ठेचा दिवस याच दिवशी पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी एकत्र येऊन झेंडावंदनाचा कार्यक्रम साजरा केला कारण ही केवळ औपचारिकता नसून एकजुटीची जाणीव करून देणारी प्रेरणादायी घटना आहे.
"फासाचे ते दोरही ज्यांच्या साहसापुढे झुकले.
भारतीय क्रांतीचे महानायक भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या बलिदानाला शहीद दिनी मालाड पोलीस परिवारातर्फे कोटी कोटी प्रणाम! भारताच्या गौरवशाली इतिहासातील ही तीन नक्षत्रे सदैव चमकत राहतील.
#ShaheedDiwas2026 #BhagatSing #Sukhdev #Rajguru
सुरक्षित मालाड, आमचा निर्धार! 🚔
रस्त्यावर अनधिकृत गॅस वापरणे हा केवळ गुन्हा नसून तो सर्वसामान्यांच्या जिवाशी खेळ आहे. अशा बेकायदेशीर कृत्यांविरोधात मालाड पोलीस ठाण्यातर्फे विशेष मोहीम राबवून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
#SafetyFirst #PoliceAction #ZeroTolerance
मालाड पोलिसांचा स्तुत्य उपक्रम! 📱👮♂️
सन २०२४-२६ दरम्यान गहाळ झालेल्या तक्रारींपैकी ४८४ मोबाईल शोधण्यात यश. आज ४५ लाख रुपये किमतीचे १५९ मोबाईल मा. उपायुक्त श्री. संदीप जाधव यांच्या हस्ते मूळ मालकांना सन्मानपूर्वक परत करण्यात आले.
#MumbaiPolice #MaladPolice #ServiceToCitizens
"न भीतो मरणादपि..."
स्वराज्य व स्वाभिमानासाठी असीम छळ सोसूनही न झुकणारे अद्वितीय पराक्रमी,कवी,विद्वान संस्कृत पंडित, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनी त्यांच्या पावन स्मृतीस मालाड पोलीस ठाण्यातर्फे कोटी कोटी प्रणाम!
#स्वराज्यरक्षक #छत्रपती_संभाजी_महाराज
मालाड पोलिसांची मोठी कारवाई! 🚨
लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने शेअर ब्रोकरला ५ कोटींची खंडणी मागणाऱ्या कैलास अग्रवालला हरियाणातून अटक. स्वतःच्या काकांनाच धमकावणाऱ्या पुतण्याचा तांत्रिक तपासाद्वारे पर्दाफाश! ⛓️ 🚔
अभिनंदन टीम मालाड! 👏
#MaladPolice #MumbaiPolice #CrimeUpdate #Action
"शिक्षण हाच माणसाचा खरा अलंकार आहे"
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस मालाड पोलीस स्टेशन तर्फे कोटी कोटी प्रणाम महिलांचा सन्मान आणि सुरक्षा हीच त्यांना खरी श्रद्धांजली!
#SavitribaiPhule #Malad #MumbaiPolice #WomenEmpowerment #PoliceWelfare
स्त्री शक्तीचा सन्मान! 🚩
जागतिक महिला दिनानिमित्त मालाड पोलीस ठाण्याचे व.पो.नि. दुष्यंत चव्हाण यांच्या हस्ते महिलांचा गौरव व विशेष मार्गदर्शन सोहळा संपन्न. 💐
महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 👮♂️✨
#WomensDay #MaladPolice #MumbaiCity #WomensSafety #8March @MumbaiPolice
होळीच्या रंगात न्हाऊन निघूया, पण सुरक्षेचे भानही राखूया! 🌈
मालाडकरहो, यंदाची होळी 'हॅप्पी' आणि 'सेफ' साजरी करूया. कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्या आणि आनंदाने सण साजरा करा. कोणत्याही मदतीसाठी आम्ही सज्ज आहोत! 🚔
📍 मालाड पोलीस ठाणे नेहमी तुमच्या सेवेसाठी.
खांद्यावर नवी जबाबदारी, मनात सेवेची जिद्द! 🌟
मालाड पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदारांना बढती मिळाल्यानिमित्त मा. व.पो.नि. दुष्यंत चव्हाण साहेबांनी त्यांचे अभिनंदन केले. नवी पदवी, नवीन कर्तव्य! सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. 🤝🚔
#MumbaiPolice #MaladPolice #Promotion
मालाड रेल्वे स्टेशन परिसरातील अनधिकृत हॉकर्स आणि फेरीवाल्यांवर मालाड पोलीस व मनपाची धडक कारवाई. रस्ते आणि पदपथ हे नागरिकांच्या हक्काचे आहेत, ते मोकळे ठेवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. 👮♂️ संयुक्त मोहिमेचा धडाका सुरूच राहणार!
#LawAndOrder #MaladUpdate #StreetCleanliness
जनतेच्या आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही! ❌
मालाड (प.) येथील राजनपाडा परिसरात फळांना उंदीर मारण्याचे 'RETOL' हे विषारी औषध लावणाऱ्या दोन फळविक्रेत्यांवर मालाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. खरेदी करताना सावध राहा.
#CrimeNews #Mumbai #SafetyFirst #MaladPolice
मालाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मार्वे रोड ते ऑर्लेम चर्च दरम्यान आज २६ अनधिकृत स्टॉल्स आणि टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली. व.पो.नि.दुष्यंत चव्हाण आणि मनपा (BMC) टीमच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम यशस्वीपणे राबवण्यात आली.
नागरिकांच्या सुलभ प्रवासासाठी मालाड पोलीस कटिबद्ध! 👮♂️🤝🏢
🚨 Public Awareness by Malad Police 🛡️
Senior Citizens, STAY ALERT! 🏦
Never trust or take help from strangers inside banks. Only approach bank staff for any assistance. Don't let fraudsters win! 🔒
#MaladPolice #SeniorCitizenSafety #SafeBanking #MumbaiPolice
भिक्षेकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी आज पुन्हा एकदा विशेष मोहीम राबवण्यात आली. प्रशासन त्यांचं काम करतंय, आता जबाबदारी आपली आहे! आपण भीक देणं थांबवलं, तरच मालाड खऱ्या अर्थाने 'भिकारीमुक्त' होईल. चला, या बदलाचा भाग होऊया!🤝
#MaladPolice #MumbaiPolice #SocialChange #AlertMumbaikar
राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून मालाड पोलीस ठाणे येथे स्वच्छता मोहीम संपन्न. केवळ गुन्हेगारीमुक्तच नव्हे, तर 'कचरामुक्त' परिसर करण्यासाठी मालाड पोलिसांचे एक पाऊल! 👮♂️🧹
#MaharashtraPolice #MumbaiPolice #SwachhHoli #GadgeBaba #Malad
मालाड पोलीस ठाण्यात शिवजन्मोत्सवाचा जल्लोष! 🚩🚔
पारंपरिक पाळणा, शिववंदना आणि सामाजिक बांधिलकी जपत भव्य 'रक्तदान शिबिर' संपन्न. 🩸✨ ढोल-ताशांच्या गजरात आणि शिवगर्जनांच्या जयघोषात कर्तव्याचा व भक्तीचा अनोखा संगम! 🙏🥁
#ShivJayanti #MumbaiPolice #Malad #शिवजयंती२०२६ 🚩








































