My_MBMC (@My_MBMC) header
My_MBMC (@My_MBMC) profile picture

This is the official Twitter account of Mira Bhayandar Municipal Corporation (MBMC). Facebook Page : https://teapaw.org/t.co/AjpNbvtopF

Mira Bhaindar, Maharashtra
Joined June 2020
Photo by My_MBMC (@My_MBMC)Photo by My_MBMC (@My_MBMC)Photo by My_MBMC (@My_MBMC)Photo by My_MBMC (@My_MBMC)Photo by My_MBMC (@My_MBMC)Photo by My_MBMC (@My_MBMC)Photo by My_MBMC (@My_MBMC)Photo by My_MBMC (@My_MBMC)
मिरा भाईंदर महानगरपालिकेमार्फत स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत "स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी" स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद! चित्रकला स्पर्धा व पुनर्वापरातून सजावट स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना वाव देत स्वच्छता, पुनर्वापर आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संदेश दिला. #swachhdiwalishubhdiwali #swachhbharat #SwachhMiraBhayandar #SwachhMBMC #SwachhSurvekshan2025_26
1
268
आज बुधवार, दिनांक ०४ नोव्हेंबर २०२६ रोजी मा. आमदार श्री. नरेंद्र मेहता, मा. महापौर श्रीमती डिंपल मेहता, मा. आयुक्त राधाबिनोद अ. शर्मा (भा.प्र.से.) आणि मा. उपमहापौर श्री. ध्रुवकिशोर पाटील, यांच्या उपस्थितीत सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या विविध कामांची पाहणी करण्यात आली. यावेळी चेना एमबीआर, वसई खाडी, कावडास व सूर्यानगर येथील ४५ एमएलडी जलाशय, जलवाहिनी, मायक्रो टनलिंग आणि जलशुद्धीकरण केंद्राच्या कामांचा आढावा घेण्यात आला. कामे दर्जेदार पद्धतीने व नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व कंत्राटदारांना देण्यात आल्या. मिरा-भाईंदर शहराला पुरेसा, नियमित व अखंड पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रशासन सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कामांचा सातत्याने आढावा घेत आहे. #SuryaWaterProject #MBMC #MiraBhayandar #WaterSupply
3
5
769
आज बुधवार, दिनांक ०४ नोव्हेंबर २०२६ रोजी मा. आमदार श्री. नरेंद्र मेहता, मा. महापौर श्रीमती डिंपल विनोद मेहता, मा. महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद अ. शर्मा (भा.प्र.से.) आणि मा. उपमहापौर श्री. ध्रुवकिशोर पाटील यांनी मिरा-भाईंदर शहराला सूर्या प्रकल्पांतर्गत पाणीपुरवठा करण्यासाठी चेना येथील वर्सोवा परिसरात उभारण्यात येत असलेल्या जलकुंभाच्या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. मिरा-भाईंदरकरांना मुबलक आणि नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सूर्या प्रकल्पातील कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. यावेळी मा. स्थायी समिती सभापती श्री. हसमुख गहलोत, पाणीपुरवठा व मल:निसारण सभापती मोहन म्हात्रे, शहर अभियंता दिपक खांबित, सन्माननीय नगरसेवक तसेच सूर्या प्रकल्प व महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. #SuryaProject #MiraBhayandar #WaterSupply #DevelopmentWork #MBMC
1
1
201
भाजी धुतल्यानंतर उरलेले पाणी झाडांसाठी वापरा आणि भांडी धुताना नळ सतत सुरू ठेवण्याऐवजी आवश्यक तेवढेच पाणी वापरा. #MBMC #MiraBhayandar #SaveWater
1
1
382
झाडांना पाणी देताना ठिबक सिंचनाचा वापर करा आणि वॉशिंग मशीन गरजेनुसारच चालवा. दैनंदिन जीवनातील छोट्या सवयींमधून पाण्याची मोठी बचत शक्य आहे. चला, पाणी जपूया आणि जलसंवर्धनासाठी सामूहिक प्रयत्न करूया! #MiraBhayandar #SaveWater #MBMC
1
1
392
स्वच्छ भारत मिशन (नागरी) २.० अंतर्गत मिरा-भाईंदर महानगरपालिकेमार्फत महिला बचत गटांसाठी घनकचरा व्यवस्थापन व उपजीविका निर्मिती या विषयावर प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत निर्मिती, RRR (कमी वापर, पुनर्वापर व पुनर्चक्रण) केंद्राचे व्यवस्थापन, नारळाच्या कचऱ्यापासून कोकोपीट निर्मिती तसेच फुलांच्या कचऱ्यापासून अगरबत्ती निर्मिती याबाबत महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करत त्यातून उपयुक्त उत्पादने तयार करणे, पर्यावरण संवर्धनास हातभार लावणे आणि महिला बचत गटांसाठी उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. #MBMC #SwachhMiraBhayandar #SwachhBharat #SwachhSurveksha2025_26
3
370
पाण्याचा काटकसरीने वापर करा, एसीमधून जमा होणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर करा आणि सोसायटीतील पाणीवापराची नियमित नोंद ठेवा. योग्य नियोजनातून पाण्याची बचत साधा आणि जलसंवर्धनासाठी आपला सक्रिय सहभाग नोंदवा. #MiraBhayandar #SaveWater #ReuseWater #MBMC
4
5
595
फरशी स्वच्छ करताना मर्यादित पाण्याचा वापर करा. तसेच सोसायटीतील पाण्याच्या टाक्या, व्हॉल्व्ह आणि जोडण्यांची नियमित तपासणी करून गळती व पाण्याचा अपव्यय रोखा. #MiraBhayandar #SaveWater #WaterSaving #MBMC
1
2
426
गर्दीच्या ठिकाणी मोठे फटाके फोडू नका. ध्वनी व वायुप्रदूषण टाळा आणि लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व प्राण्यांची काळजी घ्या. #MBMC #MiraBhayandar #SafeDiwali #GreenDiwali
2
2
458
पाण्याच्या वापरात अचानक वाढ दिसल्यास किंवा गळती अथवा इतर बिघाड आढळल्यास त्वरित तपासणी करा. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी मीटरकडे लक्ष द्या आणि आवश्यक दुरुस्ती करून घ्या. #MBMC #MiraBhayandar #Savewater
3
594
आज शनिवार, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी मिरा भाईंदर महानगरपालिका मुख्य कार्यालयात भारताच्या माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मा. महापौर श्रीमती डिंपल विनोद मेहता यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. #indiragandhi #mbmc #mirabhayandar
1
363
आज शनिवार, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी मिरा भाईंदर महानगरपालिका मुख्य कार्यालयात भारताचे लोहपुरुष, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मा. महापौर श्रीमती डिंपल विनोद मेहता यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. #sardarvallabhbhaipatel #mbmc #mirabhayandar
1
417
भारतीय इतिहासातील लोहपुरुष, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
1
307
हॉटेल, दुकाने आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी स्वच्छतेसाठी आवश्यक तेवढ्याच पाण्याचा वापर करावा. पाण्याचा अपव्यय टाळून जलसंवर्धनासाठी सहकार्य करा. प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे, पाणी वाचवा, भविष्य वाचवा! #MBMC #MiraBhayandar #SaveWater
2
3
439
आज शुक्रवार, दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी मिरा भाईंदर महानगरपालिका मुख्य कार्यालयात मा. परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीमध्ये महानगरपालिका क्षेत्रातील सुरू असलेल्या विकासकामांचा सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. विविध विभागांमार्फत सुरू असलेल्या कामांची प्रगती, त्यासंदर्भातील प्रशासकीय बाबी तसेच विकासकामांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या समन्वयाबाबत चर्चा करण्यात आली. सदर बैठकीस मा. महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद अ. शर्मा (भा.प्र.से.), अतिरिक्त आयुक्त डॉ. सचिन बांगर, पोलीस उपायुक्त (भा.पो.से.) राहुल चव्हाण, उपायुक्त (मुख्यालय) प्रणाली घोंगे, शहर अभियंता दिपक खांबित, सहाय्यक संचालक नगररचना पुरुषोत्तम शिंदे, मुख्य लेखा परीक्षक सुधीर नाकाडी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिरीषकुमार धनवे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. #MBMC #MiraBhayandar #DevelopmentReviewMeeting #CityDevelopment #MiraBhayandarMunicipalCorporation
3
1
4
1,297
घरातील वॉशरूममध्ये ड्युअल फ्लश वापरा आणि गरजेपुरते पाणी वापरून पाणी बचतीसाठी योगदान द्या. #savewater #mbmc #mirabhayandar
2
3
477
पारंपरिक फटाक्यांच्या तुलनेत ग्रीन क्रॅकर्समुळे होणारे वायुप्रदूषण कमी असते. त्यामुळे फटाके फोडताना योग्य निवड करा, पर्यावरणाची काळजी घ्या आणि प्रदूषण कमी करण्यासाठी आपले योगदान द्या. #MBMC #MiraBhayandar #GreenCrackers #GreenDiwali #EcoFriendlyDiwali
1
3
387
वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर करून पाणी बचतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान द्या! #savewater #mbmc #mirabhayandar
2
550