पोलीस अधिक्षक नांदेड, निलाभ रोहन यांचे नागरिकांना आवाहन.
#NandedNews #FinanceCompany
आकर्षक ऑफर दिसली म्हणून लगेच क्लिक करू नका! मोठ्या Discount आणि स्वस्त खरेदीच्या नावाखाली Fake Links द्वारे फसवणूक होऊ शकते. अधिकृत Website/App वरूनच खरेदी करा आणि OTP, UPI PIN किंवा Bank Details कधीही शेअर करू नका. Cyber Helpline: 1930 #cybercrime #diwalifraud
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नांदेड पोलिसांची कठोर कारवाई!
गंभीर व वारंवार गुन्हे करणाऱ्या 03 सराईत गुन्हेगारांना MPDA अंतर्गत 01 वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले. सन 2026 मधील ही 31 वी स्थानबद्धतेची कारवाई.
#Nanded #Nandedpolice
अवैध व्यवसायांविरुद्ध नांदेड पोलिसांची विशेष ‘मास रेड’ मोहीम! एका दिवसात 24 गुन्हे दाखल, 25 आरोपींवर कारवाई आणि ₹42,900/- चा मुद्देमाल जप्त. मटका, जुगार, दारूबंदी व इतर बेकायदेशीर व्यवसायांविरुद्ध कारवाई सुरूच!
#NandedNews #NandedPolice #Raid
होळी सराफा परिसरातील अवैध वेश्या व्यवसाय
अनैतिक मानवी व्यापाराविरोधात नांदेड पोलिसांचा छापा! होळी सराफा परिसरात अवैध वेश्या व्यवसायावर AHTU व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई. एका पीडित महिलेची सुटका; महिलेसह 02 आरोपी ताब्यात.
#humantrafficking #nandedpolice #crimepolice
अवैध जुगाराविरुद्ध नांदेड पोलिसांची कारवाई तमलूर येथे ‘तिरट’ जुगार अड्ड्यावर छापा टाकून 08 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. ₹1.86 लाखांचा मुद्देमाल जप्त. अवैध जुगार व बेकायदेशीर व्यवसायांविरुद्ध कारवाई सुरूच!
#NandedPolice #PoliceAction #GamblingRaid #CrimeFreeNanded
Documents पाठवा म्हणताच सावधान! Job, Loan, KYC किंवा Reward च्या नावाखाली Aadhaar, PAN व Banking Details मागणाऱ्यांपासून सतर्क रहा. कोणतीही कागदपत्रे शेअर करण्यापूर्वी संबंधित व्यक्ती/संस्थेची खात्री करा. फसवणूक झाल्यास तात्काळ 📞 1930 वर संपर्क करा.
#CyberCrime #CyberFraud
अनैतिक देहव्यवसायावर नांदेड पोलिसांचा छापा!
सिडको परिसरातील कारवाईत 1 अल्पवयीन मुलीसह 2 पीडित महिलांची सुटका; 2 आरोपी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल.
#NandedPolice #PoliceAction #Nanded #MaharashtraPolice
लोकसहभागातून सुरक्षिततेकडे आणखी एक पाऊल!
बिलोलीतील ‘छोटा हनुमान मंदिर’ परिसरात नागरिक व भाविकांच्या सहकार्याने आधुनिक CCTV कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले. गुन्हे प्रतिबंध व तपासासाठी पोलिसांचा ‘तिसरा डोळा’ अधिक सक्षम!
#NandedPolice #CCTV #PublicSafety #Biloli #Maharashtra
मित्राचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपीस जन्मठेप!
पैसे मागण्याच्या वादातून मित्राचा चाकूने खून केल्याप्रकरणी मुखेड अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीस जन्मठेप व ₹10,000 दंडाची शिक्षा सुनावली.
गंभीर गुन्ह्यांविरुद्ध नांदेड पोलिसांची कठोर कारवाई!
#NandedPolice #CourtVerdict #Justice
अर्धापूर हद्दीतील अनोळखी खुनाचा गुन्हा उघड!
मयताची ओळख पटवून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने 04 आरोपींना अटक केली.
#NandedPolice #CrimeDetection #PoliceAction #Nanded #MaharashtraPolice
अट्टल घरफोडी व चेन स्नॅचिंग करणारे 02 आरोपी गजाआड!
नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई — 07 गुन्हे उघडकीस; सोन्या-चांदीचे दागिने व मोटारसायकलसह ₹8.24 लाखांचा मुद्देमाल जप्त.
#NandedPolice #PoliceAction #CrimeDetection #Nanded #MaharashtraPolice
सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणाऱ्यांवर नांदेड पोलिसांची कारवाई
#nandedpolice #safenanded #policeaction #lawandorder #zerotolerance
विश्वास, आपुलकी आणि सहकार्याची नाळ अधिक दृढ करणारी ती — सुहासिनी…
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव सज्ज, सेवेसाठी सदैव तत्पर! 💙
#NandedPolice #MaharashtraPolice #WomenInPolice #PoliceService #नांदेडपोलीस
एकच Password सर्वत्र? धोका मोठा!
प्रत्येक Account साठी वेगळा Strong Password वापरा आणि MFA / 2-Step Verification सुरू करा. Password, OTP किंवा Verification Code कोणाशीही शेअर करू नका.
सायबर फसवणूक झाल्यास 📞 1930 किंवा 112
#NandedPolice #CyberSafety #CyberAwareness
आदमपूर येथे ‘तिरट’ जुगार अड्ड्यावर नांदेड पोलिसांचा छापा!
रामतीर्थ पोलिसांची 23 जुगाऱ्यांवर कारवाई; ₹8.76 लाखांचा मुद्देमाल जप्त. 21 मोबाईल, 9 मोटारसायकली, रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त.
#NandedPolice #PoliceAction #Nanded #MaharashtraPolice
सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्यांवर नांदेड पोलीस चार्ली यांची कडक कारवाई!
#nanded #news #nandednews #crimenews #safenanded
गोवंशाची अवैध व क्रूर वाहतूक करणाऱ्यांवर नांदेड पोलिसांची कारवाई!
नायगाव पोलिसांनी वाहनातून दाटीवाटीने व निर्दयतेने वाहतूक करण्यात येणाऱ्या 05 गोवंश जनावरांची सुटका केली.
#NandedPolice #PoliceAction #Nanded #MaharashtraPolice #CrimePrevention #AnimalProtection #नांदेडपोलीस
















