Official Twitter Account of Pune Municipal Corporation | पुणे महानगरपालिकेचे अधिकृत ट्विटर खाते

Shivaji Nagar, Pune
Joined May 2015
इतिहासाचा वारसा जतन करूया, विश्वविक्रमात नाव कोरूया! ‘किल्लोत्सव २०२६’ अंतर्गत मिनिएचर किल्ला मेकिंगच्या विश्वविक्रम प्रयत्नात सहभागी होण्यासाठी आजच नोंदणी करा! 📅 दिनांक: १ नोव्हेंबर २०२६ 📍 स्थळ: सारसबाग, पुणे 🕝 प्रवेश: दुपारी २:०० वाजता ⏰ विश्वविक्रम प्रयत्न: सायंकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत नोंदणीसाठी QR कोड स्कॅन करा किंवा artwala.org ला भेट द्या. #GarjaMaharashtraMajha #killamaking #sarasbaug #puneevents2016 #worldrecordattempt #MaharashtraHeritage #ArtwalaFoundation #MinatureKilla #pmc
1
1
2
1,936
पुणे शहरात डेंग्यू व चिकुनगुनिया या आजारांचा धोका टाळण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य व कीटकजन्य आजार नियंत्रण विभागातर्फे नागरिकांना आवश्यक दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी परिसर स्वच्छ ठेवा आणि आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करा. सावधगिरी बाळगा, निरोगी राहा! #Dengue #Awareness #chikungunyavirus #disease #health #precautions
1
1
5
14,688
आंतरराष्ट्रीय गिबन दिन दरवर्षी २४ ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय गिबन दिन साजरा केला जातो. गिबन या लहान वानरांच्या संवर्धनाबाबत जागरूकता वाढवणे आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण करण्यासाठी लोकांना सहभागी करून घेणे हा या दिवसाचा उद्देश आहे. अधिवासाचा ऱ्हास आणि इतर मानवी हस्तक्षेपांमुळे अनेक गिबन प्रजाती धोक्यात आल्या आहेत. गिबनच्या अधिवासांचे संरक्षण, वनसंवर्धन आणि वन्यजीवांविषयी जनजागृती यामुळे त्यांच्या संवर्धनाला हातभार लागू शकतो. नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #GibbonDay #InternationalDay #MajhiVasundhara #SwachhSarvekshan #PMCCare @SwachhMaha_22 @SwachhBharatGov @majhivasundhara
1
2
1
2,430
जागतिक गोड्या पाण्यातील डॉल्फिन संवर्धन दिन दरवर्षी २४ ऑक्टोबर रोजी गोड्या पाण्यातील डॉल्फिनच्या संवर्धनासाठी जागरूकता निर्माण केली जाते. नद्या आणि गोड्या पाण्याच्या परिसंस्थेच्या आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. जलप्रदूषण, अधिवासाचा ऱ्हास, नदीप्रवाहातील बदल आणि मानवी हस्तक्षेप यामुळे गोड्या पाण्यातील डॉल्फिनसमोर विविध धोके निर्माण झाले आहेत. नद्या स्वच्छ व निरोगी ठेवणे आणि जलचर जैवविविधतेचे संरक्षण करणे ही या प्रजातींच्या संवर्धनासाठी आवश्यक पावले आहेत. #WorldFreshWaterDolphinDay #DolphinConservation #MajhiVasundhara #WaterPollution #PMCCare #PuneCity @SwachhMaha_22 @SwachhBharatGov @majhivasundhara
1
2
2
2,032
आंतरराष्ट्रीय हवामान कृती दिन दरवर्षी २४ ऑक्टोबर रोजी हवामान बदलाच्या समस्येबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय हवामान कृती दिन पाळला जातो. वाढते तापमान, बदलते पर्जन्यमान, हवामानाशी संबंधित घटना आणि जैवविविधतेवरील परिणाम यामुळे हवामान बदलाचे गांभीर्य वाढत आहे. कार्बन उत्सर्जन कमी करणे, ऊर्जा बचत, वृक्षसंवर्धन, शाश्वत वाहतूक आणि नैसर्गिक संसाधनांचा जबाबदारीने वापर यांसारख्या उपाययोजना महत्त्वाच्या आहेत. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी शासन, संस्था आणि नागरिकांनी एकत्रितपणे कृती करणे आवश्यक आहे. नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #InternationalClimateActionDay #ClimateAction #SustainableFuture #PMC #Pune @SwachhBharatGov @SwachSurvekshan @majhivasundhara
1
1
2
1,936
महापालिकेच्या इतिहासात प्रथमच महिला सेवकाची पेठ निरीक्षक म्हणून नियुक्ती! महिलांच्या कार्यक्षमतेवरील विश्वास, नेतृत्वगुणांना प्रोत्साहन आणि प्रशासकीय कामकाजातील महिला सहभागाला चालना देणारा हा निर्णय महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे. संधी समानतेची, विश्वास कर्तृत्वाचा, वाटचाल सक्षमीकरणाची! नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #WomenEmpowernment #WomenLeadership #TaxDepartment #PMCCare #PuneCity
1
2,483
चांदण्यांची रात्र... निसर्गाची साथ... आणि कोजागिरीचा आनंद! पुणे महानगरपालिकेची उद्याने राहणार रात्री १२ वाजेपर्यंत खुली नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #KojagiriPaurnima #PMCGarden #TimeUpdates #PMCCare #PuneCity
2
1,746
एक छोटी काळजी, डेंग्यूपासून मोठे संरक्षण! डेंग्यूपासून स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी घराच्या परिसरात पाणी साचू देऊ नका, डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घ्या आणि ताप, अंगदुखी किंवा इतर लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या. सुरक्षित राहा, स्वच्छता राखा आणि डेंग्यूमुक्त पुण्यासाठी आपले सहकार्य द्या. नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #PMCPune #DengueAwareness #FightDengue #StopMosquitoBreeding #SwachhPune #PublicHealth #MonsoonCare #MinistryOfHealth #MoHFW #HealthMinistry #MinistryOfHealthAndFamilyWelfare #NHM #NationalHealthMission #MaharashtraHealthDepartment #PublicHealthDepartmentMaharashtra #ArogyaVibhag #MaharashtraGovernment #DengueFreeIndia #DengueFreeMaharashtra #DengueFreePune @MoHFW_INDIA
1
1,724
हत्तीरोग निर्मूलनासाठी रात्रीची रक्त तपासणी मोहीम नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #HattiRog #हत्तीरोग #LymphaticFilariasis #PatientSafety #Treatment #PMCCare #PuneCity @MoHFW_INDIA
1
6,497
इतिहासाचा वारसा जतन करूया, विश्वविक्रमात नाव कोरूया! ‘किल्लोत्सव २०२६’ अंतर्गत मिनिएचर किल्ला मेकिंगच्या विश्वविक्रम प्रयत्नात सहभागी होण्यासाठी आजच नोंदणी करा! 📅 दिनांक: १ नोव्हेंबर २०२६ 📍 स्थळ: सारसबाग, पुणे 🕝 प्रवेश: दुपारी २:३० वाजता ⏰ विश्वविक्रम प्रयत्न: सायंकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत नोंदणीसाठी QR कोड स्कॅन करा किंवा artwala.org ला भेट द्या. #GarjaMaharashtraMajha #killamaking#sarasbaug #puneevents2016 #worldrecordattempt #MaharashtraHeritage #ArtwalaFoundation #MinatureKilla #pmc
5
1,967
A landmark milestone for PMC A competitive 7.3% loan interest rate has been secured from leading bank for GoI-Urban Challenge Fund key proposals covering water supply for 12 GBS affected merged villages, flood mitigation across the existing PMC area, and sewerage infrastructure in merged areas, with financing involving the World Bank Group and IFC. The World Bank Group appreciated PMC’s integrated approach to urban infrastructure and discussed opportunities for financing, technical assistance and institutional strengthening to advance sustainable urban development. #PMC #UrbanChallengeFund #SustainableUrbanDevelopment @navalMH @WorldBankGroup
7
2,538
जागतिक बँक समूहाच्या शिष्टमंडळाची पुणे महानगरपालिकेस भेट शहरातील पायाभूत सुविधांचा विकास, तांत्रिक सहकार्य आणि शाश्वत नागरी सेवांबाबत चर्चा जागतिक बँक समूहाच्या (World Bank Group) वरिष्ठ शिष्टमंडळाने आज पुणे महानगरपालिकेस भेट देऊन महापालिका आयुक्त मा. श्री. नवल किशोर राम यांच्यासह महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. या शिष्टमंडळाचे नेतृत्व जागतिक बँक समूहाच्या मा. रिजन प्रॅक्टिस डायरेक्टर (जल क्षेत्र) मा. श्रीमती मारा वॉर्विक यांनी केले. या बैठकीस मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त(ज) श्रीमती पवनीत कौर, मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त(वि) श्री. ओमप्रकाश दिवटे, मा. शहर अभियंता श्री. अनिरुद्ध पावसकर, मा. सह आयुक्त व मा. मुख्य लेखा व वित्त अधिकारी (CAFO) श्रीमती उल्का कळसकर, मा. मुख्य अभियंता (पाणीपुरवठा) श्री. नंदकिशोर जगताप, मा. मुख्य अभियंता (प्रकल्प) श्री. दिनकर गोजारे आणि मा. मुख्य अभियंता (पथ) श्री. राजेश बनकर उपस्थित होते. जागतिक बँक समूहाच्या शिष्टमंडळामध्ये आंतरराष्ट्रीय पुनर्बांधणी व विकास बँकेच्या (IBRD) मा. रिजन प्रॅक्टिस डायरेक्टर (जल क्षेत्र) श्रीमती मारा वॉर्विक, मा. प्रॅक्टिस डायरेक्टर (जल क्षेत्र) श्री. विल्यम रेक्स, आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळाचे (IFC) मा. व्यवस्थापक (भारत, भूतान व मालदीव – पायाभूत सुविधा) श्री. नुरु लामा, IBRD चे मा. वरिष्ठ जलतज्ज्ञ व MUWREP प्रकल्पाचे मा. पथकप्रमुख श्री. हर्ष गोयल, तसेच IFC चे प्रमुख गुंतवणूक अधिकारी व MUWREP प्रकल्पाचे मा. सह-पथकप्रमुख श्री. नीरज गुप्ता यांचा समावेश होता. पुणे महानगरपालिका क्षेत्रातील, तसेच महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील पाणीपुरवठा, मलनिस्सारण आणि पावसाळी पाणी निचरा या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी महापालिकेमार्फत एकात्मिक आणि सर्वसमावेशक पद्धतीने करण्यात येत असलेल्या कामकाजाचे शिष्टमंडळाने कौतुक केले. शहरातील नागरी पायाभूत सुविधांचा नियोजनबद्ध विकास आणि नागरिकांना अधिक चांगल्या नागरी सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या या दृष्टिकोनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. या बैठकीत पायाभूत सुविधा विकासासाठी संभाव्य वित्तपुरवठा, तांत्रिक सहकार्य, संस्थात्मक क्षमता बळकटीकरण आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम कार्यपद्धतींचा अवलंब यांसारख्या विषयांवर चर्चा करण्यात आली. पुणे शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन पाणीपुरवठा, मलनिस्सारण आणि पावसाळी पाणी निचरा यांसारख्या महत्त्वपूर्ण नागरी सेवांचे नियोजन व बळकटीकरण करण्यासाठी सहकार्याच्या विविध संधींचा आढावा घेण्यात आला. या भेटीमुळे पुणे महानगरपालिकेच्या नागरी पायाभूत सुविधा विकासाच्या प्रयत्नांना अधिक बळ मिळण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण चर्चा झाली. पुणे शहरातील नागरिकांना विश्वासार्ह, समानतेच्या तत्त्वावर आधारित आणि शाश्वत नागरी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने पुणे महानगरपालिका आणि जागतिक बँक समूह यांच्यातील सहकार्याची बांधिलकी या बैठकीत पुन्हा अधोरेखित करण्यात आली. नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #जागतिकबँकसमूह #पुणे #नागरीविकास #पायाभूतसुविधा #पाणीपुरवठा #PuneMunicipalCorporation #WorldBankGroup #Pune #UrbanDevelopment #InfrastructureDevelopment #SustainableUrbanDevelopment @WorldBankGroup @WorldBankIndia @CMOMaharashtra @MoHUA_India
18
4
7
22
4,980
नागरिकांच्या सेवेला प्राधान्य, तक्रार निवारणाला गती! पारदर्शक, कार्यक्षम आणि लोकाभिमुख सेवेसाठी पुणे महानगरपालिका कटिबद्ध! नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #pmc #pune #propertytax #services #Complaint #Management #citizens #pmccare
1
1
2,407
वेळीच दक्षता घ्या, डेंग्यूची साथ टाळा! घराच्या आवारातील भंगाराची विल्हेवाट लावा घराच्या आवारातील पाणी साचून राहणाऱ्या निरुपयोगी वस्तू उदा. फाटके / तुटके डबे, बाटल्या, प्लास्टिकची भांडी, नारळाच्या करवंट्या, टायर्स इत्यादींमध्ये पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी किंवा अशा निरुपयोगी वस्तू वेळच्या वेळी नष्ट कराव्यात. डासांची उत्पत्ती रोखा, डेंग्यूपासून स्वतःचे व आपल्या कुटुंबाचे संरक्षण करा! नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #PuneMunicipalCorporation #DenguePrevention #DengueAwareness #StopDengue #healthdepartmentpmc
4
4
6,032
कला शिक्षकांच्या मासिक सभेचे आयोजन पुणे महानगरपालिकेच्या कला क्रीडा शिक्षण विभागातर्फे गुरुवार, दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ रोजी वीर नेताजी पालकर महानगरपालिका शाळा, पुणे येथे कला शिक्षकांची मासिक सभा आयोजित करण्यात आली होती. सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत झालेल्या या सभेत प्रेम आणि आपुलकीच्या भावनेतून नेतृत्व करणे, स्वतःचे व इतरांचे नेतृत्व करताना धैर्याचे महत्त्व समजून घेणे, तसेच प्रख्यात चित्रकार पाब्लो पिकासो यांच्या कलाकृतींचा अभ्यास करणे या विषयांवर आधारित उपक्रम घेण्यात आले. शिक्षकांनी समूहाच्या सहकार्याने पिकासो यांच्या एका कलाकृतीची पुनर्निर्मिती करून सर्जनशीलता, सहकार्य आणि कलात्मक अभिव्यक्तीचा अनुभव घेतला. या सभेला मा. कला विभाग प्रमुख देवकर सर उपस्थित होते. त्यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. या मासिक सभेत एकूण १३ पैकी ११ कला शिक्षकांनी सहभाग नोंदवला. नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #पुणेमहानगरपालिका #PMC #कला_शिक्षण #कला_शिक्षक #मासिकसभा #कला_क्रीडा_शिक्षण_विभाग #सर्जनशीलता #कलात्मकअभिव्यक्ती #सहकार्य #नेतृत्वगुण #शिक्षकप्रशिक्षण #चित्रकला #PMCTeachers
1
1
1
1,551
स्वतःची पाण्याची बाटली जवळ बाळगा दररोज पुन्हा वापरता येणारी पाण्याची बाटली सोबत ठेवा. एकवेळ वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक बाटल्यांना (सिंगल यूज प्लास्टिक) कायमचा निरोप द्या. नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #saveenvironment #airpollution #ReducePollution #gogreen #walkforhealth #cycleforhealth #SustainableMobility #PublicAwareness #MOHUAIndia #moefccindia @SwachhMaha_22 @SwachhBharatGov @majhivasundhara
2
1
2,619