Pinned Tweet
प्रवास कुठंतरी पोहोचण्यासाठी नसावा ,
कोणत्याही ओझ्याविना असंच चालत राहावं..
चालणं म्हणजे पोहोचणं नव्हे..
पूर्णत्वाचा अट्टाहास सोडला की ,
आयुष्य अजून सुंदर दिसू लागतं
..एखाद्या रानफुलासारखं...🌸
3
1,109
मानवी मृत्यू ज्या काही कारणांमुळे होऊ शकतो ती सर्व कारणे पुण्यामध्ये उपलब्ध आहेत.
उत्तरप्रदेशपासून मराठवाड्यातील नावाजलेले गुंड, प्रदूषण, रोगराई, रस्ते अपघात, कोयता गँग, दूषित अन्न, डॉल्बी DJ, अवैध बांधकामे .. etc etc.
ज्याला पडळकर आवडत असेल त्या माणसाला विचारधारेशी देणे घेणे नसावे , पवारांच्या आंदोलनातूनच पुढे येऊन जर 'पवार घराण्यावर टीका करून रोजी रोटी चालवणारा पडळकर' याला आवडत असेल तर .. त्याची लायकी काय आहे सांगण्याची आवश्यकता नाही.
क्रांतिसिंग नाना पाटील नेहमी म्हणायचे....
पाण्यात बसलेल्या जनावराबद्दल काहीही अंदाज बांधता येत नसतो...
जनावर दुभते आहे...
जनावर गाभण आहे...
जनावर स्त्रीलिंगी आहे की पुल्लिंगी....
पाण्यात बसलेल्या जनावराबद्दल काहीही ठोस सांगता येत नसतं...
तद्वतच.... एका रात्रीत....काही दिवसांत....अचानक कोणी नेता म्हणून उदयास येत असेल तर थांबा पहा आणि मगच अंदाज बांधा....
अस्सल रांगडी ग्रामीण बोलीभाषेत जर कुणी आभाळ पेलत असेल तर लगेच त्याला नेता पुढारी समजू नका....
नेता किंवा नेतृत्व एका रात्रीत इन्स्टंट तयार होत नाही....त्यासाठी पहिली वैचारिक बैठक पक्की असावी लागते .... तीव्र संघर्ष...कष्ट करून...अगदी खडतर प्रवास करून तावून सुलाखून नेतृत्व तयार होतं....
जननायक राहुल गांधी यांच्या छात्रों की गूंज या आंदोलनानंतर त्यावरून प्रेरणा घेत पुण्यात..
आमदार रोहित पवार यांनी विद्यार्थी आंदोलन यशस्वी करून दाखवलं...
यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील विवेकानंद पाटील नावाचा तरुण....आणि त्याची भाषणे खूप गाजली..
अर्थात राजकारणाच्या बाराखडीतील अबकड माहिती नसलेला हा पाटील...चक्क कोल्हापूरच्या खासदार निवडणुकीची वल्गना करू लागला ..तेव्हाच मला याचे पाळण्यातील पाय दिसले...
त्याचे खालील वक्तव्य ऐकल्यावर मला...आमच्या सांगली जिल्ह्यातील स्वर्गीय काळू बाळू कवलापूरकर यांच्या तमाशाच्या वगातील एक प्रसंग आठवला...
बतावणीत सोंगाड्या त्या प्रसंगात त्याच्या सासूला उद्देशून म्हणतो....मामी तुम्ही लै चांगल्या .. फर त्या बायकुच्या आयचा टन्ना...
तुर्तास इतकंच...
जय हिंद जय महाराष्ट्र..
✍️ डॉ.अमन पटेल..
शिव शाहू फुले आंबेडकर गांधी नेहरू विचारधारेचा पाईक..
2
140
रोजगारहीन शिक्षणव्यवस्था आणि दिशाहीन तरुणाई हे आपल्या प्रशासकीय यंत्रणेचे सर्वात मोठे अपयश आहे.
शिक्षणाचे व्यावसायिकीकरण करणे आवश्यक आहे. शिक्षण व्यवस्थेने तरुणांमध्ये कौशल्ये विकसित करण्यावर भर दिला पाहिजे.
@MahaDGIPR
4
197
राजकारणात यश-अपयश येत असते, परंतु मुश्रीफ आणि महाडिकांनी चालवलेले राजकारण, जोर-जबरदस्तीने आणि दडपशाहीने जिंकण्याचा खोटा आव फार काळ टिकवता येणार नाही !
@satejp
सार्वजनिक वाचनालये एकेकाळी वैचारिक मशागतीची आणि साहित्याची आश्रयस्थाने होती. बालकवींच्या निसर्गकविता, ग्रेसांच्या गूढ ओळी आणि नेमाड्यांच्या कादंबऱ्या वाचणारे तरुण दुर्मिळ झाले. त्याऐवजी, टेबलांवर स्पर्धा परीक्षांच्या ‘शॉर्टकट’ नोट्स, ठोकळे आणि बाजारू गाईड्सचे ढिगारे दिसतात 👇
पुणे, नागपूर, कोल्हापूर, संभाजीनगर या शहरांमध्ये देशाची 'सिलिकॉन व्हॅली' बनण्याची क्षमता आहे. या शहरांकडे तरुण बुद्धिमत्ता आणि अफाट सामर्थ्य आहे. ही तरुण ऊर्जा तंत्रज्ञान, स्टार्टअप्स, संशोधन आणि जागतिक दर्जाचे कौशल्य मिळवण्याकडे वळवली असती, तर आज महाराष्ट्राचे चित्र वेगळे असते.
हरयाणातील व्हिडिओ पाहिल्यानंतर मन सुन्न होते. लहान मुलांमध्ये ही हिंसक आणि भयंकर मानसिकता एका रात्रीत तयार झालेली नाही ; ती आपल्या आजूबाजूला कुजत चाललेल्या सामाजिक व्यवस्थेचा परिणाम आहे.
पुढची पिढी हाताबाहेर जाण्याआधी लहान मुलांच्या मोबाईल वापरावर कायदेशीर नियंत्रण गरजेचे !
3
251
MPSC अभ्यासक्रम असा असावा जो विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी किडा न बनवता त्यांच्यात विश्लेषणात्मक आणि व्यावहारिक कौशल्ये रुजवेल , जेणेकरून एकूण विद्यार्थ्यांपैकी 99.99% विद्यार्थी - जे स्पर्धा परीक्षेत यशस्वी झाले नाहीत ते इतर कोणत्यातरी क्षेत्रांत सन्मानाने उभे राहू शकतील.
(1/n)
#MPSC करणाऱ्यांमध्ये बेरोजगारी एवढी वाढली आहे की,
परीक्षा पास होऊन अधिकारी होणे हे आता ध्येय राहिले नसून नेत्यांसोबत फोटो काढणे, social media influencer बनणे, स्वतः नापास होऊन दुसऱ्यांना मार्गदर्शन करणे, telegram चॅनेल काढणे, कोंदट अभ्यासिका चालवणे..
यामध्ये आता career दिसत आहे
Publicity मिळवणे अणि काम तडीस नेण्यासाठी प्रत्यक्ष काम करणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत ✅
#MPSC
MPSC परीक्षा आता केवळ प्रशासकीय अधिकारी निवडण्याची प्रक्रिया राहिलेली नाही. ती एका अशा दुष्टचक्रात रूपांतरित झाली आहे, जिथे लाखो बेरोजगार विद्यार्थी स्वतःचे भविष्य पणाला लावून अडकून पडले आहेत. हे चक्र केवळ अभ्यासापुरते मर्यादित नसून यात तरुणांच्या भावनांचा बाजार मांडला गेला आहे👇
सध्या भाजपला जर कुणी टक्कर देऊ शकणारा व्यक्ती असेल तर ती व्यक्ती म्हणजे मनोज जरांगे पाटील.
समविचारी लोकांनी जरांगे पाटील यांच्यासोबत येऊन नवीन आघाडी बनवावी आणि संपूर्ण राज्यात क्रांती घडवावी ✅
भाजप विकत घेऊ शकणार नाही अशा प्रामाणिक आणि सर्वधर्मीय लोकांनी एकत्र येणे गरजेचे !
ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती share मार्केटमध्ये पैसे घालवतो आणि Loss मधून बाहेर येण्यासाठी Training Class काढतो ; तसेच आहेत MPSC चे शिक्षक !
स्वतः नापास होऊन MPSC च्या विद्यार्थ्यांना खोटी स्वप्ने विकून त्यांना वर्षांनुवर्षे बेरोजगार ठेवण्यामध्ये हे शिक्षक जबाबदार आहेत.
#MPSC
राज्य सरकारमधील काही अधिकाऱ्यांनी आणि MPSC मधील अधिकाऱ्यांनी मिळून गेली कित्येक वर्षे विद्यार्थ्यांच्या तोंडाला काळे फासले याचा हिशेब नाही.
#mpsc
राजे वगैरे सर्व पदव्या स्वातंत्र्यानंतर बंद झाल्या. या लोकांना विनाकारण महत्व देणे चुकीचे.
बापजाद्यांच्या जमिनी आहेत तोवर त्या विकून निवडणुका जिंकतील.
स्वकर्तृत्व शून्य असेल तर परंपरागत गोष्टींना काही किंमत नाही.
हिंदू सणांचे विद्रुपीकरण केलेले आहे
दहीहंडी चा तर सार्वजनिक Dance bar केला आहे
एकनाथ शिंदे आणि इतर लोकांचे फोटो लावून हे लोकं बाया नाचवत आहेत stage वर 😁
नवीन नियमानुसार सरकारविरोध म्हणजेच हिंदुविरोध
विद्यानंद बापट आणि संतोष पंडित हिंदुविरोधी आहेत..
बाकी सर्व धर्मरक्षक !
मी गेली 3 वर्षे अनैतिक MPSC आयोग , नोकरभरती-विरोधी राज्य सरकार आणि Telegram वरील आभासी मनोरंजन या सर्वांच्या विरुद्ध का बोलत आहे.. हे MPSC विद्यार्थ्यांना आत्ता हळूहळू समजत आहे.
वरील सर्वांच्या चुकीमुळे काल्पनिक जगात रमलेल्या तरुण पिढीला वेळीच यातून बाहेर काढणे गरजेचे आहे.






