विवेकवादी विज्ञानवादी गांधीवादी पर्यावरणवादी समाजवादी पुरोगामी नास्तिक विचारवंत सिलेब्रिटी पत्रकार विधिज्ञ क्रांतिकारी प्राणीप्रेमी.. यापैकी काहीच नाही!

Joined October 2021
🇮🇳अभिमानास्पद! भारत आज जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मोबाईल फोन उत्पादक देश बनला आहे! देशांतर्गत मोबाईल फोनची मागणी पूर्ण करण्यात भारताचे देशांतर्गत उत्पादन आता 99.2% पर्यंत पोहोचले आहे. 2014 मध्ये ₹18900 कोटी असलेले मोबाईल फोन उत्पादनाचे मूल्य आज तब्बल ₹6.27 लाख कोटींवर पोहोचले आहे! अश्या जवळपास प्रत्येक निकषावर ह्या माणसाने गेल्या 12 वर्षात विक्रमी काम केलेले आहे. तरी फेक नरेटिव्ह पसरवत असतात, नकारत्मकता आणि निराशावाद पसरवतात, उठसुठ यांना शिव्या देतात आणि यांचे आई-बाप काढतात! तरी हा माणूस फक्त मिशन-मोड मध्ये काम करत आहे... हीच लोकं 'मेक-इन-इंडिया' आणि 'आत्मनिर्भर भारत' अभियानाची टिंगल-टवाळी आणि मीम बनवत होते. पण त्या काही पोकळ घोषणा नव्हत्या. आकडेवारी तपासून बघा वाटलं तर..😊 जय हिंद!🇮🇳
6
53
804
📍काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याने भरसभेत ठणकावून सांगितलेले 'मोदी कही नहीं जायेगा' हे वाक्य आणि त्यावर मल्लिकार्जुन खरगे यांची 'मोदी का बाप भी जायेगा' ही प्रतिक्रिया, पुढील अनेक वर्षे काँग्रेस पक्षाला त्रासदायक ठरणार आहे! आजवर जेंव्हा-जेंव्हा मोदींवर, त्यांच्या परिवारावर असे पर्सनल अटॅक झाले, तेंव्हा-तेंव्हा ते जनतेला अजिबात आवडले नाही. नरेंद्र मोदी यांच्याविषयी काँग्रेस नेत्यांनी केलेल्या वैयक्तिक स्वरूपाच्या वक्तव्यांचा इतिहास मोठा आहे. त्यातील काही उदाहरणे मी देतो : • 1 डिसेंबर 2007 : सोनिया गांधी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर 2002 च्या दंगलींच्या संदर्भात ‘मौत का सौदागर’ अशी टीका केली. निकाल : 23 डिसेंबर 2007 - भाजपला 182 पैकी 117 जागा, तर काँग्रेसला 59 जागा मिळाल्या. • 2 जानेवारी 2014 : मणिशंकर अय्यर यांनी नरेंद्र मोदी यांच्या चहा विकण्याच्या पार्श्वभूमीवर 'चायवाला' ही उपरोधिक टिप्पणी केली. मोदी 21व्या शतकात कधीही पंतप्रधान होणार नाहीत, असे सांगून त्यांना काँग्रेसच्या कार्यक्रमात चहा वाटण्यासाठी ठेवण्याची भाषा केली. निकाल - 16 मे 2014 : भाजपला लोकसभेत 282 जागा मिळाल्या. काँग्रेसला केवळ 44 जागा मिळाल्या. आजपर्यंत तोच चहावाला पंतप्रधान आहे! • 7 डिसेंबर 2017 : मणिशंकर अय्यर विधानसभा निवडणुकीच्या आधी मोदींना त्यांच्या ओबीसी बॅकग्राउंड वरून ‘नीच किस्म का आदमी’ म्हटले. निकाल : 18 डिसेंबर 2017 - भाजपला 99 जागा, तर काँग्रेसला 77 जागा मिळाल्या. भाजपची सत्ता कायम राहिली, पण गेल्या तीन दशकांपेक्षा जास्त काळात ही काँग्रेससाठी गुजरातमध्ये सत्ता मिळविण्यासाठी सगळ्यात चांगली संधी होती. • लोकसभा निवडणूक 2019 काळात राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्याविरोधात ‘चौकीदार चोर है’ ही घोषणा प्रचारात वारंवार वापरली. 22 एप्रिल 2019 रोजी राहुल गांधी यांनी खेद व्यक्त केला, पण तोपर्यंत उशीर झाला होता. निकाल : 23 मे 2019 - भाजपला 303 जागा मिळाल्या, तर काँग्रेसला 52 जागा मिळाल्या. • 25 ऑक्टोबर 2026 : पटणा येथील सभेत उपस्थित असलेल्या एका काँग्रेस समर्थकाने ‘मोदी कहीं नहीं जाएगा’ असे म्हटल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ‘मोदी का बाप भी जाएगा’ असे प्रत्युत्तर दिले. याचे परिणाम उत्तर प्रदेश, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गुजरात आणि गोवा या येत्या काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये दिसेलच.. _______ राजकारणात विरोधकांवर टीका करण्यासाठी अनेक मुद्दे असतात, पण जेव्हा टीका वैयक्तिक पातळीवर उतरते तेव्हा ती जनतेला पसंद पडत नाही. त्याचा फायदा अनेकदा त्याच संबंधित नेत्याला होतो ज्याच्याबद्दल अशी गरळओक झालेली असते. काँग्रेस पक्ष यातून शिकत नाही कारण अजूनही त्यांचा सात दशकांचा सत्तेचा माज पूर्णतः जिरलेला नाही. बाकी, निवडणुकीचे निकाल आल्यावर 'भाजप जिंकला' असं म्हणणं याला ओव्हर-सिम्प्लिफिकेशन म्हणता येईल, कारण त्यात 'विरोधक हरले' हा फॅक्टर पण महत्वाचा असतो. जनतेने असले थर्ड-क्लास पर्याय का निवडू नये, याची ठोस कारणे विरोधकांनीच जनतेला दिलेली असतात. असो. विरोधक स्वतःला सुधारत नाहीत याचे मी स्वागत करतो!! माझी काहीही तक्रार नाही..😊
3
33
1
149
2,718
• मल्लिकार्जुन : "मोदी का बाप भी जायेगा!" • नागार्जुन : “मोदीजी, आम्हाला तुम्हीच पंतप्रधान म्हणून पुन्हा हवे आहात!”💪
18
166
2,523
🔥48 सेकंदात संघाचा परिचय : "आरएसएस 55 हजार 683 ठिकाणी 88 हजार 949 दैनिक शाखा चालवते. त्यांच्याकडे 32606 साप्ताहिक बैठका होतात. त्यांच्या 13211 मासिक बैठका होतात. यावर्षी त्यांचे 62565 विजयादशमी कार्यक्रम झाले ज्यात 32 लाख हजार 141 गणवेशधारी स्वयंसेवक सहभागी झाले होते. संघाला 100 वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने यावर्षी त्यांच्या सयंसेवकांनी 10.4 कोटी घरांना भेटी दिल्या व संघाच्या कार्याचा परिचय करून दिला. यांच्या संघटनेत 27 लाख 8 हजार 186 तरुण स्वयंसेवक आहेत. त्यांच्याकडे 5 लाख 36 हजार 955 बाल स्वयंसेवक आहेत जे 13 वर्षांच्या आतील वयोगटातील आहेत!" डि.के.शिवकुमार विधानसभेत उभे राहून 'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे' म्हणत असतात. मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर सिद्धरमय्या काँग्रेस नेतृत्वाच्या कमी, पण संघाच्या जुन्या लोकांच्या संपर्कात जास्त आहेत. सोबतच्या व्हिडिओत दिलेली माहिती कोणी संघाचा पीआरओ देईल, त्याहून जास्त चांगल्या पद्धतीने प्रियांक मल्लिकार्जुन खरगे देत आहेत. देख रहा है न बिनोद??😬
5
122
3
478
14,482
📍कॉम्रेड एन.राम च्या 'द.हिंदू' या कम्युनिस्ट पार्टीच्या मुखपत्राने कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुपर-डुपर फ्लॉप झाल्यावर पुन्हा एकदा तोच जुना-पुराणा, भंगार 'चीन भारतात अमुक-तमुक किलोमीटर घुसला' असा फेक नरेटिव्ह सुरू केला आहे. यावर इकडच्या कोणत्या अर्धवट राजकीय पक्षाच्या दादा, साहेब, काका, ताई यांच्या पिल्लू, दादू, शोन्या, बाबू, कुचीपुचीने वायफळ ट्यांव-ट्यांव केली... तर त्यांना फक्त हा विडिओ दाखवा. हे भारतीय सैनिक आहेत. चीन बॉर्डरवर शेजवान चटणी लावलेल्या बांबूने मनचाव, मोमो, चावमीन, मनचुरीयन यांना कसे धुतात बघा.. सुधरा! उगीच देशाच्या सैन्याची बदनामी करू नका, कधी तरी पब्लिकच तुडवेल. जय हिंद!🇮🇳 जय हिंद की सेना!!🇮🇳
59
1
287
4,741
🔥फ्रान्स | 70000 पोलीस तैनात. शेकडो शस्त्रे जप्त. हजारो आंदोलकांना अटक. 'शाळा ठीक करा' आणि 'बेरोजगारी भत्ता द्या' आंदोलने देशभर पसरत असताना, फ्रान्सने आज मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दल तैनात केले. अवघ्या आठवडाभर आधी झालेल्या हिंसक आंदोलनात दुकानांची लूट करण्यात आली होती, महिलांची गैरवर्तन करण्यात आले, गाड्या जाळण्यात आल्या होत्या आणि ऐतिहासिक व सार्वजनिक इमारतींचे नुकसान करण्यात आले होते. जेव्हा दिल्लीत सुरक्षा दल तैनात करण्यात आले होते, तेव्हा 'अ‍ॅनारकी टुरिजम' करण्यासाठी आलेल्या डाव्या-लिबरल फ्रेंच माध्यमांनी, 'आंदोलन करण्याच्या अधिकाराचे दमन', 'लोकशाहीची हत्या' अशी टीका केली होती कारण त्यांना हवा असलेला 'मसाला' मिळाला नव्हता. आज तीच माध्यमे France 24, AFP, Le Monde, Brut, Le Figaro वगेरे पॅरिस मध्ये कॅमेरे उपसून 'अ‍ॅनारकी सहन केली जाऊ शकत नाही' म्हणत फोटो आणि विडिओ काढत आहेत. असो! चला एक बरं झालं, की अवघ्या 15 दिवसांतच यांची इच्छापूर्ती झाली. भरपूर 'मसाला' मिळाला यांना आता फोटो आणि विडिओ काढत बसायला...😬 📍दुसऱ्याच्या घराला आग लागली की क्रांती आणि स्वतःच्या घराला लागली की अराजकता… असली नीच विचारधारा असणाऱ्यांना यापुढे तरी सद्बुद्धी लाभो, हीच बाप्पाकडे प्रार्थना..🙏🏼
34
157
3,073
🔥 चार भागात ही पोस्ट आहे : मोदी सरकारने जून 2022 मध्ये भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलातील जवानांच्या भरतीसाठी अग्निपथ योजना जाहीर केली. या योजनेला विरोध होण्यामागे काही राजकीय कारणे होती! त्या टुल-किट मधील प्रमुख मुद्दे असे होते - • फक्त चार वर्षांची नोकरी! • 75% तरुणांना चार वर्षांनंतर बाहेर पडावे लागणार! 25% अग्निवीरांनाच नियमित सेवेत समाविष्ट केले जाणार. • लष्करी निवृत्तिवेतन मिळणार नाही. • चार वर्षांनंतर रोजगाराची हमी नाही! ____________ सरकारचे या योजनेबद्दल असे म्हणणे होते : • लष्कराचे सरासरी वय कमी करणे. • अधिक तरुण आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम मनुष्यबळ उपलब्ध करणे. • आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेणारे मनुष्यबळ वाढवणे • चार वर्षांच्या सेवेनंतर शिस्त, कौशल्य आणि अनुभवाचा नागरी जीवनात उपयोग होणे. ____________ यासाठी मोदी सरकारने ही योजना टुलकिटजीवींच्या विरोधाला दुर्लक्ष करून राबवलीच! पण त्या वेळी सरकारने स्पष्ट केले की.. • अग्निवीरांना चार वर्षांच्या सेवेनंतर अंदाजे ₹11.71 लाखांचा करमुक्त सेवा निधी मिळेल. • कौशल्य प्रमाणपत्रे, पुढील शिक्षणाच्या संधी आणि इतर क्षेत्रांत रोजगार मिळवण्यासाठी मदत उपलब्ध करून दिली जाईल. • प्रत्येक अग्निवीराला कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळण्याची हमी दिलेली नसली, तरी निमलष्करी दलांत आणि राज्यांच्या पोलीस दलांत त्यांना कायमस्वरूपी नोकऱ्या देण्याचा प्रयत्न राहील. _________ आता ही बातमी वाचा : • देशासाठी लढणाऱ्या अग्निवीरांना शासकीय नोकरीत आरक्षण देण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला. • नियमांमध्ये आवश्यक बदल करून महाराष्ट्रातील 282 नौदल अग्निवीरांना पोलीस भरती परीक्षा व ट्रेनिंग मध्ये सूट देऊन नियुक्ती करण्यास मंजुरी दिली. • केंद्र सरकारकडून महाराष्ट्राचे अधिवासी असलेल्या 150 खलाशी डेकसाइड आणि 132 खलाशी इंजिनसाइड अशा एकूण 282 अग्निवीरांना पोलीस शिपाई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. • या नियुक्तीचे आदेशही त्यांना प्रदान करण्यात आले आहेत. मॉरल ऑफ दि स्टोरी : • सरकारचा निर्णय योग्य होता आणि सरकारने दिलेली प्रत्येक कमिटमेंट सरकारने पूर्ण केली. • विरोधकांच्या कोणत्याही नरेटिव्हना बळी पडू नका. • विरोधक एक नंबरचे नालायक आहेत म्हणून निवडणुकीत हरतात आणि जिंकू शकत नाहीत म्हणून मग चांगलं काम करणाऱ्यांबद्दल खोटंनाटं पसरवतात. जय हिंद!🇮🇳
8
46
256
7,495
🇮🇳 अभिमानास्पद बातमी! • सरकारी कंपनी ऑइल इंडिया लिमिटेडने कृष्णा-गोदावरी खोऱ्यात नैसर्गिक वायूचा नवा शोध लावला आहे. • भारताच्या पूर्व किनारपट्टी जवळील, कृष्णा-गोदावरी खोऱ्यातील मत्स्यपुरी फॉर्मेशन क्षेत्रामधील गोदावरी-1 या विहिरीत 16 ऑक्टोबर 2026 रोजी चाचणी सुरू झाली होती. • या चाचणीदरम्यान प्रतिदिन 2 लाख स्टँडर्ड क्युबिक मीटर इतका नैसर्गिक वायुप्रवाह नोंदवण्यात आला. नैसर्गिक वायूचे देशांतर्गत साठे शोधणे आणि त्यांचा व्यावसायिक वापर वाढवणे हे भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी महत्त्वाचे असताना, देशाच्या नैसर्गिक संसाधनांचा शोध घेण्याच्या प्रयत्नांना आधी बंगाल, मग आसाम आणि आता आंध्रप्रदेशात मिळालेले हे यश निश्चितच उत्साहवर्धक आहे! 🔥 आसाम बंगाल आंध्र झाँकी है, निकोबार अभी बाकी हैं..🌷 कच्च्या तेलाची आयात कमी करून स्वावलंबन वाढवण्याच्या दिशेने सुरू असलेल्या मोदी सरकारच्या या ऊर्जाक्रांतीला भरभरून शुभेच्छा. जय हिंद!🇮🇳
4
30
1
191
2,822
🔥काँग्रेस पक्ष, डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क यांना सुतक! मुकेश अंबानी यांच्या जिओ प्लॅटफॉर्म्सचा 100 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक मूल्यांकन असलेल्या IPO क्लबमध्ये समावेश झाला आहे! या क्लबमध्ये मेटा, अलीबाबा आणि स्पेसएक्स यांचा समावेश आहे. जिओ प्लॅटफॉर्म्सच्या 30212 कोटी रुपयांच्या IPO साठी सुमारे 7 लाख कोटी रुपयांच्या बोली लागल्या असून, विक्रमी 1.34 कोटी अर्ज प्राप्त झाले आहेत! ही आकडेवारी म्हणजे भारताला 'डेड इकॉनॉमी' म्हणणाऱ्या जमातीला गुंतवणूकदारांनी दिलेली एक सणसणीत चपराक आहे. जिओ मुकेशभाई जियो! _________ 🔥भारताच्या व भारतीयांच्या आर्थिक सामर्थ्याची ही झलक आहे! गुंतवणूक ही नफा मिळवून देणारी तर असलीच पाहिजे, पण भारतीय कॉर्पोरेट्सच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे म्हणजे रोजगारनिर्मिती, गुंतवणूक आणि आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नाला बळ देणे... हेही भारतीय गुंतवणूकदार जाणून आहेत! जय हिंद, जय भारत!🇮🇳
61
320
6,232
🔥 घाटकोपरच्या स्मित मच्छार नंतर अलिबागचा देवदूत! 35000 फूट उंचीवर एक वेगळा थरार... डॉ. चंद्रशेखर साठ्ये पॅरीसहून एअर फ्रान्सच्या (AF218) विमानाने मुंबईला येत होते. परतीच्या प्रवासात असतांना उड्डाण केल्यानंतर सुमारे चार तासांनी विमानातील एका 75 वर्षीय वृध्दाची प्रकृती अचानक बिघडली (Epileptic Seizure). ते बेशुध्द होऊन आसनावर पडले. विमानातील कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली, त्यांनी विमानात कोणी डॉक्टर आहे का याचा शोध सुरू केला. डॉ. साठ्ये यांच्या शेजारी बसलेल्या प्रवाश्यांने ही बाब डॉक्टरांना सांगीतली. क्षणाचाही विलंब न करता डॉ. साठ्ये वृध्दाच्या मदतीसाठी धावले. प्रवाश्याची तपासणी केली. वृध्द प्रवासी बेशुध्दावस्थेत होता. कुठलाही प्रतिसाद देत नव्हता. डॉ. साठ्ये यांनी विमानातील कर्मचाऱ्यांना त्या प्रवाश्याला मोकळ्या जागेत नेऊन खाली झोपविण्यास सांगीतले. पुन्हा त्याची तपासणी केली तेल्हा त्यांची नाडी क्षीण होती. श्वास सुरू होता पण रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण 90 टक्के होते, जे कमी होते. रक्तदाब कमी होत चालला होता. परिस्थिती गंभीर होती. विमानात स्वयंचलित रक्तदाबमापक, पल्स ऑक्सिमीटर, स्टेथोस्कोप, ऑक्सिजन, हृदयाला विद्युत धक्का देणारे उपकरण आणि रक्तातील साखर तपासण्याचे यंत्र उपलब्ध होते. या साधनांचा उपयोग त्यांनी त्या प्रवाश्यावर उपचार सरू केले. त्यांना रिकव्हरी पोझिशनमध्ये आणले. ऑक्सिजन दिला आणि पाय उंचावले. थोड्याच वेळात उपचारांना तो प्रवासी सकारात्मक प्रसिसाद देऊ लागला. ऑक्सिजन दिल्यानंतर त्यांची ऑक्सिजन पातळी 99 टक्क्यांपर्यंत वाढली. खालावलेली रक्तदाब पातळी सुधारली, रक्तदाबाचे प्रमाण 140/80 पर्यंत वाढले. सुमारे दहा मिनिटांत त्यांना शुद्ध आली. ते प्रतिसाद देऊ लागले, नंतर आवाजाला प्रतिसाद देऊ लागले आणि अखेरीस बोलू लागले. साधारण तासाभराने त्या प्रवाश्याला पुन्हा एकदा त्रास होऊ लागला. त्याला आपस्माराचे झटके येऊ लागले. डॉ. साठ्ये यांनी पुन्हा एकदा त्याचा 'जॉ थ्रस्ट' करून श्वासोश्वासाचा मार्ग मोकळा करून दिला. डाव्या कुशीवर झोपवून त्याचा ऑक्सीजन पुरवठा सुरळीत केला. प्रवाश्याची प्रकृती पुन्हा काही काळ स्थीर झाली. त्यानंतर मुंबईत विमान पोहोचण्याच्या 45 मिनिटे आधी, मुंबईच्या दिशेने विमानाचा डिसेन्ट सुरू होऊन विमान लँडिंगची तयारी करत असताना पुन्हा एकदा वृध्द प्रवाश्याची प्रकृती खालावली! ऑक्सीजन लेव्हल खालावली. त्वचा निळसर पडू लागली. तेव्हा विमानातील वैद्यकीय कीट मध्ये उपलब्ध औषधांचा वापर करून वृध्दाचे प्राण वाचवले. या अत्यंत आणीबाणीच्या प्रसंगी, डॉ. साठे यांनी विमानातील मेडिकल किटमधून 'रेक्टल डायझेपाम' वापर करून रुग्णाचे प्राण वाचवले. एअर फ्रान्सच्या विमानातील कर्मचाऱ्यांकडे ऑक्सिजन ग्लुकोमीटर आणि डायझेपाम (Diazepam) सारखी आवश्यक औषधे व वैद्यकीय साधने उपलब्ध होती. मुंबई विमानतळावर उतरल्यावर त्या प्रवाश्याला विमानतळावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांतच्या स्वाधीन केले. वैद्यकीय कौशल्य, समयसुचकता आणि मर्यादीत वैद्यकीय संसाधनांचा अचूक वापर करून वृध्द प्रवाश्यांचे प्राण वाचविणाऱ्या डॉक्टर साठ्ये यांना माझे 100 सॅल्युट! ____________ • डॉ. साठ्ये हे अमेरीका दौऱ्यावर होते. न्यूयॉर्क वरून ते पॅरीसला पोहोचले होते. मात्र पॅरीस वरून मुंबईला येणारे कनेक्टीग फ्लाईट चुकल्याने, त्यांना एक दिवस पॅरीस मध्ये रहावे लागले. त्यामुळे दुसऱ्या दिवशी पॅरीस वरून मुंबईला येणाऱ्या विमानात त्यांना तिकीट देण्यात आले. आणि हा प्रसंग घडला. त्या वृध्द प्रवाश्याला तातडीने वैद्यकीय मदत मिळू शकली.. • डॉ. साठ्ये यांनी विमान प्रवासात केलेल्या या मदतीसाठी एअर फ्रान्सच्या कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांना 350 युरो मदत देऊ केली. मात्र डॉक्टर साठ्ये यांनी नम्रपणे ती नाकारली. याला म्हणतात सेवाभाव!!🙏🏼 सगळ्यात महत्वाचे : प्रवाश्याची प्रकृती स्थीर असून त्याला रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे!!😊
45
251
9
1,322
42,699
🚩 केरळममधील कन्नूर जिल्ह्यात 'कम्युनिस्टांचा बालेकिल्ला' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काथिरूरमधून विजयादशमीच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) पथसंचलन मार्गक्रमण करत आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, या परिसराची 'हिंसक डाव्या विचारसरणीचे प्रभावक्षेत्र' अशी ओळख आहे. एकाच रस्त्यावर 'लेफ्ट vs राईट' अश्या परस्परविरोधी राजकीय विचारसरणींचे दर्शन घडविणारा हा केवळ एक फोटो नाही, तर (संख्यने खूप कमी असूनही) आपल्या विचारांवर ठाम राहत, संयमाने आणि अथक समर्पणाने संघर्ष सुरू ठेवणाऱ्या त्या गावातील स्वयंसेवकांच्या जिद्दीचे दर्शन घडविणारा हा एक लक्षवेधी क्षण आहे. या स्वयंसेवकांना माझे 100 सॅल्युट! जय हिंद!🇮🇳
2
52
1
254
2,574
🔥युरोप जळत आहे! फ्रान्स, इटली, स्पेन, बेल्जियम आणि अल्बेनिया या देशांमध्ये सर्वत्र हिंसाचाराचा भडका उडाला आहे. आता इंग्लंडचा नंबर आहे. जॉर्ज सोरोसने भारतातही सत्तापालट घडवून आणण्यासाठी पैसा पाठवला. इथे रामलीला मैदानात भारताची वानरसेना श्रीलंकेच्या रावणसेनेची सत्ता उलथवून टाकण्याच्या तयारीत आहे..😂 काँग्रेस आणि CJP यांना वाटतंय की देशात क्रांती होणार! ही दरवर्षी अशीच होणार क्रांती भारतात, बाकी काही नाही.. बोला, इन्कलाब झिंदाबाद, जय हनुमान आणि जय जय श्रीराम!🚩
4
49
1
278
8,921
📍आधी प्रशांत भूषणने रेजिम-चेंजचे मनसुबे जाहीर करून सिजेपीच्या चेहऱ्यावरील मुखवटा फाडला! आता पन्नूने कॅनडामधून सिजेपीला एक्सपोज केले आहे. कोणी फॅक्ट-चेक करायच्या भानगडीत पडू नका, मीच करतो : हा व्हिडिओ 18 ऑक्टोबर 2026 रोजी कॅनडातील Edmonton येथे Sikhs for Justice (SFJ) या संघटनेच्या ‘KHALISTAN REFERENDUM’ कार्यक्रमात पन्नू याने केलेल्या भाषणाचा आहे. @grok कृपया fact-check करा.
7
114
2
335
6,194
🔥 धर्मार्थं क्रियते देहो, धर्मार्थं सुस्थिरा मही। देह हा धर्माच्या आचरणासाठी आहे आणि पृथ्वी ही धर्मामुळेच स्थिर व टिकून आहे. ______________ आज जगभर अराजकतेचे वारे वाहत आहेत. फ्रान्स, इटली, अल्बेनिया, बेल्जियम, स्पेन अशा अनेक युरोपीय देशांत सामाजिक अस्थिरता, हिंसा आणि अराजक पसरत आहे. लोकांमध्ये असंतोष निर्माण करण्यात आला आहे (अरुण जेटली यांच्या भाषेत : manufactured outrage), निवडणुकीत जिंकू न शकणाऱ्या लोकांनी आपली सत्ता यावी म्हणून शासनविरोधी आंदोलने पेटवली आहेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आलेल्या क्रॉस-बॉर्डर 'घुसखोरी'तून उभा करण्यात आलेला सांस्कृतिक संघर्ष - यांमुळे अनेक देश जळत आहेत. मात्र भारतात याच प्रकारच्या प्रयत्नांना यश मिळाले नाही. कारण भारत ही केवळ भूमी नाही, तर धर्माच्या मजबूत पायावर उभा असलेला देश आहे. येथे धर्म हा केवळ पूजा-अर्चना नाही तर जीवनमूल्ये, कर्तव्य आणि सामाजिक समतोल राखणारा आधारस्तंभ आहे. जागतिक लेव्हलचे रेजिम-चेंज षडयंत्र सुरू असताना भारतातील राष्ट्रनिष्ठ आणि धर्मनिष्ठ नेतृत्व मात्र शांतपणे आणि तेवढ्याच ठामपणे असले चाळे हाणून पाडत आहे ते काही उगीच नाही... दसरा हा सत्याच्या विजयाचा, अधर्माच्या नाशाचा आणि धर्माच्या पुनःस्थापनेचा उत्सव आहे. रामाच्या विजयात आपण पाहतो की, अधर्म कितीही बलाढ्य असला तरी शेवटी धर्माचाच विजय होतो. आजही जेव्हा बाहेरून किंवा आतून अराजकता आणण्याचे प्रयत्न होतात, तेव्हा भारतीय समाजातील याच धर्माधिष्ठित मूल्यांना ते सहजासहजी तोडू शकत नाहीत. एक-दोन चिरकूट आंदोलने नाही, तर हजारो वर्षांच्या परकीय आक्रमणांचा निष्कर्षही तेच सांगतो. तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! रावणवधाप्रमाणे अधर्माचा नाश होवो आणि धर्माचा विजय होवो. जय जय श्रीराम!🚩
3
21
130
1,573
लेफ्ट-लिबरल, सेक्युलर, विवेकवादी,, विज्ञानवादी, गांधीवादी, पर्यावरणवादी, मानवाधिकारवाले, समाजवादी, पुरोगामी, नास्तिक, विचारवंत, इंस्टा रिलस्टार, सोमी सिलेब्रिटी, युट्युब पत्रकार, थोर विधिज्ञ, क्रांतिकारी झुरळे टाईप लोकांना इतर वेळी ज्या तीन निकषांवर तुलना करायला आवडते त्यात फ्रान्स अजूनही भारताच्या खूप खूप पुढे आहे (वाटलं तर फॅक्ट-चेक करून बघा भक्तांनो)!! • हॅपीनेस इंडेक्स : फ्रान्स = 35 भारत = 116 • पासपोर्ट इंडेक्स : फ्रान्स = 2 भारत = 84 • मानवाधिकार इंडेक्स : फ्रान्स = 33 भारत = 110 ______________ भारताला या सर्व निर्देशकांमध्ये फ्रान्सएवढं प्रगत न केल्याबद्दल मोदी सरकारचा मनःपूर्वक निषेध, निंदा, कडी निंदा, कठोर निंदा, भर्त्सना, धिक्कार आणि हाय-हाय. अजून एक इंडेक्समध्ये तर भारत फ्रान्सच्या जवळपास पण नाही. • लोचे, लफडे, लूटमार, अराजकता इंडेक्स : फ्रान्स = 1 भारत = यादीतच नाही..😢 काय करत आहेत मोदी-शहा? हां??
4
38
175
3,130
🤡 दिल्ली पोलिसांच्या पेस्ट कंट्रोल नंतर झुरळे पूर्णच बावचळून गेलेत! आता दिपके म्हणतोय : "भाजपचे नेते ग्यानेश कुमार यांच्यामुळे हरले!"😬
3
25
143
1,790
📍पोस्ट नंतर वाचा, आधी विडिओ बघा. क्लिप बघून झाल्यावर विषय समजून घ्या.. एक लिबरल (उदारमतवाली) फ्रेंच महिला तिचा फॅमिली बिजनेस असलेल्या दुकानाची लूटमार करणाऱ्या आफ्रिकन मुस्लिम बेकायदेशीर घुसखोरांना समजावून सांगते की, ती त्यांच्या बाजूने आहे! त्यांना फ्रान्समध्ये येण्यासाठी तिने मतदान केले होते. पोलिसांचा निधी कमी करण्याच्या निर्णयालाही तिने पाठिंबा दिला होता. पण ते तिची थट्टा करतात, तिची खिल्ली उडवतात आणि दुकानातील सर्व माल लुटून नेतात. ही महिला फ्रेंच भाषेत बोलत आहे. दुकानाचे काचेचे दार फोडून लूटमार आणि तोडफोड करणाऱ्या, चेहऱ्यावर मुखवटे घातलेल्या लोकांच्या समूहाला ती वारंवार थांबवण्याचा आर्जव करताना म्हणत आहे... “पण तुम्ही हे असं का करत आहात?!” “थांबा!!” “हा निव्वळ दुष्टपणा आहे!” “हे आंदोलनाच्या उद्देशाशी संबंधित नाही!!” “हे सगळं करून काय उपयोग?!” “याचा काहीही उपयोग नाही… “हे सगळं करणं थांबवा!” आणि शेवटी.. “ए, मला हात लावू नकोस....” ती वारंवार त्यांना तोडफोड थांबवण्याची विनंती करत आहे. दुकानाची नासधूस करण्याचा आंदोलनाच्या मूळ उद्देशाशी काहीही संबंध नाही, असे ती सांगत आहे. दुकानाच्या आत एक कर्मचारी अडकलेला असून, ही कृत्ये निरर्थक आणि धोकादायक आहेत, याकडेही ती त्यांचे लक्ष वेधत आहे. शेवटचं वाक्य बघता, त्यांनी तिच्यावर बलात्कारही केला असण्याची शक्यता आहे, कारण लूटमार झाल्यावर लुटायला काही उरत नाही, तेंव्हा ते इज्जत लुटतात हा त्यांचा इतिहास आहे. ___________ आता प्रकरण एकदम थोडक्यात समजून घेऊया.. • आज आपण पाहतोय त्या फ्रेंच आराजकतेची सुरुवात कुठून झाली? उत्तर वाचून तुम्हाला धडकी भरेल : फ्रान्समध्ये याची सुरुवात ‘स्कूल ठीक करा अभियाना’पासून झाली. • त्याचे रूपांतर Gen Z आंदोलनात झाले. मग त्यात लवकरच कम्युनिस्ट गट सहभागी झाले. (जसे आपल्याकडे AISA ही 1990 मध्ये स्थापन झालेली कट्टर डाव्या विचारसरणीची विद्यार्थी संघटना CJP आंदोलनात व नंतर काँग्रेस आंदोलनात पण सामिल झाली. ती CPI(ML)L या राजकीय पक्षाची विद्यार्थी आघाडी म्हणून कार्य करते. 'नेहा बोरा' माहीत असेलच?? ती याच संघटनेची आहे. Rings a bell? सेम टू सेम टेम्प्लेट आहे की नाही?? फ्रेंच आंदोलनाची तिसरी स्टेप अशी होती - • तो पर्यंत केवळ रसद (आंदोलकांसाठी बिर्याणी व इतर गोष्टी) पुरविणारे मुस्लिमही मग या फ्रेंच आंदोलनात सहभागी झाले आणि त्यानंतर चर्च (प्रार्थनास्थळे नाही, फक्त चर्च) जाळणे, दुकानांची लूटमार करणे आणि फ्रेंच महिलांवर बलात्कार करणे अश्या बातम्या येत आहेत. ______________ • भारतामध्येही असाच कट रचण्यात आला होता, जो प्रशांत भूषण यांनी अनवधानाने (किंवा 'कंत्राटी हमझा' बनून) उघड केला. • दिल्लीमध्येही अशीच दृश्ये पाहायला मिळतील, अशी अपेक्षा France 24, AFP, Le Monde, Brut, Le Figaro या फ्रेंच मीडियाला... BBC, The Guardian या ब्रिटिश मीडियाला... Deutsche Welle (DW न्यूज) या जर्मन मीडियाला आणि WaPo, NYT, ABC, CNN, Fox News इत्यादी अमेरिकन मीडियाला होती. यांचे रिपोर्टर्स आंदोलन कव्हर करायला दिल्लीत हजर होते!! • मात्र, दिल्ली पोलिसांनी दाखवलेला संयम (ज्यावरून अमित शहा, मोदी सरकार आणि दिल्ली पोलिसांना शिव्या पण दिल्या गेल्या) आणि सरकारने पद्धतशीर आखलेली रणनीती - यामुळे अराजकतेचा प्लॅन फेल झाला आणि दिल्लीत उपस्थित आलेल्या इंटरनॅशनल मीडियाला अपेक्षित असलेले 'फुटेज' मिळाले नाही. दिल्लीतून जगभरात जे फोटो, विडिओ पाठवायची तयारी करत होते, त्यांच्याच देशांमधून (फ्रांस, ब्रिटन, इटली, बेलजीयम) फोटोज् आणि विडिओज् जगभरात आता जात आहेत.. _____________ मॉरल ऑफ दि स्टोरी : • 'मोदीशा' यांना नावे ठेवणे सोपे आहे, पण त्यांच्या नेतृत्वात भारताचा पराभव करणे मात्र अशक्य आहे. • फ्रांसमधील विडिओज् पाहून अजिबात हळहळू नका. दुखी होऊ नका. आज जे सुरू आहे, ते फ्रान्सची जनता डिझर्व करते. त्यांनी निवडून दिलेल्या नेत्यांनीच त्यांची माती केली आहे. देशात बेकायदेशीर पद्धतीने आलेले आणि राहणारे घुसखोर या नेत्यांनीच जनतेच्या उरावर घातले. • काँग्रेस आणि त्यांच्या इंडीआघाडीतील मित्रपक्षांचीही तशी मजबुरी असू शकते, पण भारताची अशी कोणतीही मजबुरी नाहीये. बाकी, हा विडिओ बघून वाईट वाटण्याचे काही कारण नाही. दुसऱ्यांनी चाटून-पुसून विषाची परीक्षा घेतली आणि ते मेले, तरी आम्ही पण स्वतः विषाची परीक्षा घेऊनच शिकणार - असं म्हणणारे महामूर्ख असतात! दुसऱ्यांच्या अनुभवातून शिकतात ते हुशार असतात. फ्रेंच लोकांच्या अनुभवातून भारतीयांनी शिकावे असं वाटत असेल, तर शेयर करा..❤️
13
225
12
598
36,276
📍या पोस्टमधील निष्कर्ष तुम्हाला आश्चर्यचकित करतील. थोडा वेळ काढून संपूर्ण माहिती वाचा. • युरी गोरोखोव्स्की सोव्हिएत लष्करी क्षेत्राशी संबंधित होते. त्यांच्या पत्नीचे नाव लिया होते. त्यांना तत्कालीन सोव्हिएत संघ आणि आत्ताच्या उझबेकिस्तान मधील ताश्कंद येथे एक मुलगा झाला. • यांच्या बाबतीत फक्त एकच गोष्ट सध्या लक्ष्यात ठेवा. युरीचा धर्म आणि लियाचा व्यवसाय आजपर्यंत ज्ञात नाही. • युरी गोरोखोव्स्की यांना विमानांची विशेष आवड होती आणि त्यांनी रशियन मिलिटरी कॉम्प्लेक्स मधील इल्यूशिन IL-76 या विमानाच्या निर्मितीशी संबंधित अतिशय गोपनीय काम केले होते. इल्यूशिन IL-76 असून त्याची निर्मिती ताश्कंद एव्हिएशन प्रॉडक्शन असोसिएशनमध्ये करण्यात आली होती. • युरी गोरोखोव्स्की यांनी लष्करी विमानांच्या डिझाइनशी संबंधित उच्चस्तरीय विभागांत काम केले आणि अनेक प्रकारच्या विमानांच्या निर्मितीत सहभाग घेतला. त्यामुळे त्यांना सोव्हिएत सरकारसोबत गोपनीयता करार आणि गुप्त माहितीच्या संरक्षणासंबंधी करार करावे लागले होते. अमेरिकेत लॉकहीड मार्टिनसारख्या कंपनीत लष्करी विमानांवर काम करणाऱ्या अभियंत्यांना जसे गोपनीयतेचे नियम पाळावे लागतात, त्याच्याशी याची तुलना करता येईल. • या पार्श्वभूमीवर युरी आणि त्यांच्या परिवाराचा संबंध रशियन लष्करी क्षेत्रातील उच्चभ्रू वर्तुळाशी होता हे स्पष्ट आहे. • 1990 च्या दशकात सोव्हिएत रशियाचे विघटन झाल्यावर गोरोखोव्स्की कुटुंब अचानक माल्टाला स्थलांतरित झाले. • माल्टामध्ये लिया गोरोखोव्स्की यांनी कंपनी स्थापन करताना त्यांनी इस्रायलचे राष्ट्रीयत्व निवडले होते. त्या अश्केनाझी ज्यू होत्या! माल्टानंतर, साधारण 1999 मध्ये गोरोखोव्स्की कुटुंब अमेरिकेत स्थायिक झाले आणि शांतपणे आपले आयुष्य जगू लागले. त्यांच्या मुलाने लॉस एंजेलिसमधील एका प्रतिष्ठित शाळेत माध्यमिक शिक्षण घेतले. त्यानंतर त्याला जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठात प्रवेश मिळाला आणि त्याने पदवी प्राप्त केली. महाविद्यालयीन काळात तो विद्यार्थी राजकारणात सक्रिय होता. हे सगळं होत असताना हा मुलगा रोमन कॅथलिक पद्धतीच्या संस्कारांमध्ये मोठा झाला. एका कॅथलिक गटाच्या माध्यमातून मग त्याने निवडणुकीत एका सिनेटरच्या प्रचाराचे काम केले. 2008 च्या सुमारास तो राजकीय क्षेत्रात सक्रिय काम सुरू केले. 2010 पर्यंत तो दोन बड्या लोकप्रतिनिधींचा प्रवक्ता म्हणून काम करत होता. 2012 मध्ये तो व्हर्जिनियातील रँडी फोर्ब्स याचा कम्युनिकेशन्स डायरेक्टर होता. 2013 मध्ये त्यांचा संबंध रँडल पॉल यांच्याशी आला. त्यांच्या सोबत काम करत त्याने आपले स्थान अधिक मजबूत केले. 2020 पर्यंत तो ट्रम्प व्हिक्टरी फायनान्स कमिटीचा 'चीफ ऑफ स्टाफ' झाला. त्याने डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर याच्या कंपन्यांसाठी सल्लागार म्हणूनही काम केले. तो ट्रम्प कुटुंबाचा 'खास' बनला. ट्रम्प यांच्या मालमत्ता, आर्थिक व्यवहार आणि रिसॉर्ट्सच्या व्यवस्थापनाची जबाबदारी त्याच्याकडे होती. फ्लोरिडातील ट्रम्प यांच्या मार-ए-लागो या भव्य बीच रिसॉर्टशी असलेल्या संबंधांमुळे त्याला ‘मेयर ऑफ मार-ए-लागो’ असे टोपणनाव मिळाले!! ______________ डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर याच तरुणाला व्हाइट हाऊसच्या प्रेसिडेन्शियल पर्सनल ऑफिसच्या संचालकपदाची जबाबदारी मिळाली. या पदावरून, ट्रम्प यांच्यासोबत कोणाला भेटण्याची संधी मिळावी आणि कोणाला मिळू नये, हे तो ठरवत होता. ट्रम्प यांच्याप्रती असलेल्या निष्ठेच्या आधारावर व्यक्तींची छाननी करण्याचे कामही त्यांच्या कार्यालयामार्फत होत असे. या पदावर असताना त्याचा प्रभाव इतका मोठा होता की, ट्रम्प यांच्या 2026 मधील विजयासाठी मोठ्या प्रमाणात देणगी देणाऱ्या एलॉन मस्क यांच्या शिफारशींनाही त्यांनी विरोध केला!! एलॉन मस्क यांनी शिफारस केलेली सगळी माणसे याने व्हाईट हाऊस मधून अक्षरशः हाकलून दिली. मस्क यांनी सुचवलेल्या उमेदवारांपैकी काहींना त्याने नाकारले आणि अखेरीस त्याच्या त्या निर्णयालाच ट्रम्प यांनी मान्यता दिली! त्यानंतर एलॉन मस्क याने त्याला 'स्नेक (साप)' म्हटले होते..😬 ट्रम्प कुटुंबाबाहेरील व्यक्तींमध्ये ट्रम्प यांचा सर्वाधिक विश्वास या तरुणावर आहे, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. _____________ मार्को रुबिओ यांचे ट्रम्प यांच्याशी पूर्वी मतभेद झाले होते. पण आज मार्को रुबिओ हे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री (Secretary of State) आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (National Security Adviser) अशी दोन्ही पदे सांभाळत आहेत. अमेरिकेच्या आधुनिक इतिहासात एकाच व्यक्तीकडे ही दोन्ही पदे असण्याचे उदाहरण अत्यंत दुर्मिळ आहे. यापूर्वी रिचर्ड निक्सन यांच्या अध्यक्षीय कार्यकाळात हेन्री किसिंजर यांनीही ही दोन्ही पदे सांभाळली होती.. (1/2)
15
66
1
331
46,186
(2/2) जेडी व्हान्स यांना पीटर थील यांचा पाठिंबा असल्याने ते ट्रम्प प्रशासनात आहेत. ट्रम्प यांच्या प्रशासनात त्यांची स्वतःची पसंती एकच होती, ती म्हणजे 'तो' तरुण! _____________ एलॉन मस्क यांनी हल्लीच मोदी सरकारवर टीका केली आणि अंबानी यांना भारताचे पंतप्रधान म्हटले. ही गोष्ट या तरुणाला आवडली नाही. त्याचा थेट परिणाम असा झाला की, याच ट्रम्प यांच्या विश्वासू सहकाऱ्याच्या सांगण्यावरून मार्को रुबिओ भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते मुंबई आणि गुजरातमधील जामनगरला भेट देणार आहेत. त्यात जामनगर येथे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाला भेटसुद्धा ते देणार आहेत. दररोज सुमारे 14 लाख बॅरल तेल शुद्ध करण्याची क्षमता असलेला हा जगातील एकाच ठिकाणी उभारलेला सर्वांत मोठा तेलशुद्धीकरण संकुल आहे. या दौऱ्यात रुबिओ रिलायन्सच्या प्रतिनिधींशी भेट घेणार आहेत आणि या ट्रम्प यांच्या विश्वासू तरुण सहकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हेही या भेटीदरम्यान उपस्थित राहणार आहेत. मस्क-अंबानी यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर पाहता, एलॉन मस्क यांच्या वैयक्तिक किंवा व्यावसायिक नाराजीशी ट्रम्प सरकारचा काहीही संबंध नाही किंवा मस्क यांच्या नाराजीला ट्रम्प सरकार 'ऍम्प्लिफाय' करत नाहीये हा क्लियर मेसेज दिला जात आहे. _____________ ज्या रशियन वंशाच्या आणि इस्रायली ज्यू आईच्या लेकाबद्दल आपण या पोस्टमध्ये बोलत आहोत त्याचे नाव आहे सर्जिओ युरी गोरोखोव्स्की, ज्याने आपले नाव जास्त अमेरिकन वाटावे म्हणून 'सर्जिओ गोर' एवढेच ठेवले! ट्रम्प यांनी त्याची भारतातील अत्यंत महत्त्वाच्या राजनैतिक पदासाठी त्याचसाठी निवड केली व यात इस्रायलकडून पण शिफारस झाल्याचे म्हटले जाते. मोदी सरकारने या नियुक्तीचे स्वागत केले. सर्जिओ गोर यांचा एवढा डिटेलमध्ये सांगितलेला बॅकग्राउंड समजून घेणे म्हणूनच आवश्यक आहे. ट्रम्प यांच्या सोशल मीडिया पोस्ट्स आणि इतर 'ऑप्टिक्स' वर जाऊ नका, 'टॅरिफ आणि ट्रेड' वरून बिघडलेले भारत-अमेरिका संबंध सर्जिओ गोर यांनी खूप कमी वेळात 'रिसेट' केलेत व अनेक गोष्टी त्यानंतर स्थिरस्थावर होत आहेत. त्यामुळे एलॉन मस्क 'काय बोलतो' त्याकडे नाही, सर्जिओ गोर 'काय करतो' याकडे लक्ष ठेवा. चांगभलं!
5
55
1
271
6,478
🔥कुछ तो बडा होने वाला है.. • भारतीय संसदेच्या 2026चे मान्सून अधिवेशन 13 ऑगस्ट रोजी लोकसभा आणि राज्यसभा दोन्हीत अनिश्चित काळासाठी स्थगित (adjourned sine die) झाले. • पण हे अधिवेशन अजूनही संपलेले नाही! फक्त स्थगित आहे. राष्ट्रपतींकडून अधिवेशन संपल्याचा (prorogation) आदेश अद्याप निघालेला नाही. • हे अंतर आता 64 दिवसांपेक्षा जास्त झाले असून, हा एक रेकॉर्ड आहे!! • अधिवेशन तांत्रिकदृष्ट्या 'संपुष्टात आलेले नसल्याने' सरकारला नवे अधिवेशन बोलावण्याची गरज नाही. पावसाळी अधिवेशन अजून संपलेले नसल्याने, तेच अधिवेशन पुन्हा सुरू करता येते. • अशा परिस्थितीत ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाळी अधिवेशन पुन्हा सुरू होणार आहे. यावेळी मुख्य अजेंडा आहे मतदारसंघ पुनर्रचना अर्थात Delimitation आणि महिला आरक्षण विधेयक. • सरकारला घटनादुरुस्तीसाठी आवश्यक असलेल्या दोन-तृतीयांश बहुमताचा जादूचा आकडा 360 मतांचा आहे. • गेल्या 7-8 आठवड्यात कॉक्रोचेसना मनसोक्त टाईमपास करू देण्यात आला, ज्यात मीडियाला व सोमी बिझी होते. या दरम्यान, एनडीएने 386 मतांची बेगमी केली आहे. • हे नवीन विशेष अधिवेशन (स्पेशल सेशन) नसून मान्सून अधिवेशनाचा दुसरा टप्पा असेल. Delimitation, महिला आरक्षणासोबत VBSA कायदा पण मंजूर करून सरकार UGC ला इतिहासजमा करण्याच्या मूड मध्ये आहे. सरकार बॅकफूटवर आहे, सरकार घाबरलेले आहे, सरकार गोंधळलेले आहे, सरकारला अमुक-तमुक इकोसिस्टिम आणि डिप-स्टेट वगेरे कडून धोका आहे हे सगळं चालू असताना... त्याच काळात, सरकार मात्र वेगवेगळ्या फ्रंटवर आपलं काम (यावर वेगळी पोस्ट करतोय), कायदे व घटना दुरुस्तीची तयारी, संसदेतील संख्याबळ जुळविणे आणि अनेक मोठे व ऐतिहासिक निर्णय घेण्याची तयारी करत होते. मोदी-शहा असल्या चिरकूट 'पेल्यातल्या वादळांना' भीक पण घालत नाहीत..😬 जय हिंद!🇮🇳
42
152
4
972
77,272