उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री. योगी आदित्यनाथजी यांच्या पूजनीय मातोश्रींच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे.
त्यांच्या मातोश्रींच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो आणि या दुःखद प्रसंगी योगी आदित्यनाथजी व त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो.
॥ ॐ शांती ॥
1
71
Rajesh Kshirsagar retweeted
📍 #पंढरपूर |
पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात विहीर खणताना अचानक मातीचा ढिगारा कोसळून झालेल्या दुर्घटनेत चार मजुरांना आपला जीव गमावावा लागला होता. आज कार्तिकी एकादशीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पंढरपुरात आलो असता या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या आबासो घोडके, तानाजी घोडके, सिद्धेश्वर घाडगे आणि मंगेश मोरे या चार मजुरांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
तसेच यावेळी शिवसेनेच्या वतीने त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आणि त्यांच्या कुटुंबातील मुला मुलींचा शैक्षणिक जबाबदारी #शिवसेना पक्षाच्या वतीने घेण्यात येईल असे त्यांना आश्वस्त केले. तसेच त्यांना लवकरच शासकीय मदत देखील देण्यात येईल अशीही ग्वाही दिली.
यावेळी सोलापूरचे जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयन, आमदार अभिजित पाटील, आमदार राजू खरे, माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे, पंढरपूरच्या नगराध्यक्ष डॉ.प्रणिता भालके, सोलापूर जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख महेश नाना साठे, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, चरणदास चवरे, शिवाजी सावंत तसेच शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
#Pandharpur #Shivsena #EknathShinde #Maharaahtra
@Shivsenaofc
दिवाळीच्या स्नेहपर्वात पत्रकार बांधवांसोबत स्नेहभेट आणि फराळाचा आनंद! 🪔
आज सर्व पत्रकार बांधवांना फराळासाठी आमंत्रित करून त्यांच्यासमवेत दिवाळीचा आनंद साजरा केला. यावेळी विविध विषयांवर मनमोकळ्या गप्पा आणि सकारात्मक चर्चा झाली. – at Kolhapur, India
1
53
भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, विश्वास, जिव्हाळा आणि आपुलकी अधिक दृढ करणारा सण म्हणजे भाऊबीज! ❤️
बहिणीच्या मायेचा ओलावा आणि भावाच्या संरक्षणाची साथ आयुष्यभर अशीच कायम राहो. प्रत्येक भाऊ-बहिणीच्या नात्यात प्रेम, आनंद आणि विश्वासाची वीण अधिक घट्ट होत राहो, हीच सदिच्छा! – at Kolhapur, India
1
1
57
🪔✨ नव्या वर्षाची नवी उमेद, नवी स्वप्ने आणि आनंदाची नवी पहाट...!
दीपावली पाडव्याच्या मंगलमय पर्वानिमित्त सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
🌺 दीपावली पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺
#दीपावलीपाडवा #पाडवा #दिवाळी #दिवाळीशुभेच्छा #शुभदीपावली #RajeshKshirsagar – at Kolhapur, India
163
केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री तथा खासदार मुरलीधर मोहोळ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. @mohol_murlidhar – at Gandhinagar, India
35
🪔 धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔
धन, आरोग्य, सुख, समृद्धी आणि आनंदाचा मंगलमय संगम असलेल्या धनत्रयोदशीच्या पावन पर्वानिमित्त सर्व नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा!
#धनत्रयोदशी #धनत्रयोदशीच्या_शुभेच्छा #दीपावली #दिवाळीच्या_शुभेच्छा #RajeshKshirsagar – at Kolhapur, India
45
दिवाळीनिमित्त कोल्हापूर येथील शिवाजी चौक तरुण मंडळ आणि २१ फूट महागणपती ट्रस्ट (रजि) यांच्यावतीने बालकल्याण संकुलातील ३०० ते ३५० लहान मुला-मुलींना नवीन कपड्यांचे वाटप करण्याचा सामाजिक उपक्रम माझ्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
1
24
🚩 श्रद्धास्थानाचा विकास, परिसराच्या सेवेसाठी आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल! 🚩
माझ्या विशेष प्रयत्नातून प्रभाग क्रमांक २ अंतर्गत जाधववाडी येथील श्री दत्त मंदिर इमारत दुरुस्ती व नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आला. – at Kolhapur, India
22
Rajesh Kshirsagar retweeted
📍 #नाशिक |
नाशिक येथील रामतीर्थ आणि त्र्यंबकेश्वर येथील पवित्र कुशावर्त तीर्थावर देशाच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त ध्वजारोहण, ध्वजपूजन सोहळा अत्यंत धार्मिक आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. यानंतर राष्ट्रपती महोदयांच्या उपस्थितीत पवित्र रामकुंडावर गोदा आरती संपन्न झाली.
सिंहस्थ महाकुंभ हा केवळ धार्मिक उत्सव नाही, तर आपल्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेची प्राणशक्ती आणि सामाजिक ऐक्याची अखंड ताकद आहे. या महाकुंभाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या आणि हिंदू संस्कृतीच्या समृद्ध सांस्कृतिक विविधतेचे दर्शन संपूर्ण जगाला घडणार असून, जागतिक पटलावर आपल्या संस्कृतीचा ठसा उमटवणारे असल्याचे मत याप्रसंगी व्यक्त केले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण होणे हा सिंहस्थ महाकुंभाच्या इतिहासातील सुवर्णक्षण असून एका तपस्वी मातृशक्तीच्या हस्ते या पवित्र धर्मध्वजाचे ध्वजारोहण होणे, हा ऐतिहासिक योग आहे. हा केवळ ध्वजारोहणाचा सोहळा नसून सनातन परंपरेतील आदिशक्तीचा आणि भारताच्या संपूर्ण नारीशक्तीचा सर्वोच्च सन्मान आहे.
सिंहस्थ महाकुंभाच्या पर्वकाळात जगभरातून सुमारे १२ कोटी भाविक, साधू-संत आणि यात्रेकरू नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे दाखल होणार आहेत. एवढ्या मोठ्या जनसागराच्या स्वागतासाठी आणि सेवेसाठी महाराष्ट्र शासन सज्ज झाले आहे. या परिसरात सुमारे ३५ हजार कोटी रुपयांची विकासकामे सुरू असून, ही कामे केवळ कुंभमेळ्यापुरती मर्यादित राहणार नाहीत. नाशिक आणि #त्र्यंबकेश्वर येथील नागरिकांच्या भविष्यातील विकासाचा भक्कम पाया त्यातून घातला जाईल असे यावेळी बोलताना स्पष्ट केले.
यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, जगद्गुरू नरेंद्राचार्य, जगद्गुरू श्री वल्लभाचार्य वल्लभ रायजी महाराज, जगद्गुरू श्री निंबार्काचार्य श्री श्यामशरण देवाचार्यजी महाराज आदींसह देशभरातील संत, महंत आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
#PresidentOfIndia #DraupadiMurmu #Nashik #SimhasthaKumbhMela #NishikKumbhMela #Kumbh #EknathShinde #Maharashtra
@rashtrapatibhvn @Jishnu_Devvarma @Dev_Fadnavis @SunetraA_Pawar @girishdmahajan @dadajibhuse
आज कोल्हापूर येथे कोल्हापूर जिल्हा पोलीस दल वाहन अर्पण सोहळा आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री मा.ना.श्री. प्रकाश आबिटकर आणि माझ्या हस्ते उत्साहात संपन्न झाला.
@mieknathshinde @iprakashabitkar – at Gandhinagar, India
1
38
Rajesh Kshirsagar retweeted
हर हर महादेव! 🚩
'नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभमेळा २०२७' - धर्मध्वजारोहणाची पावन घटिका..!
#Maharashtra #KumbhMela #SimhasthaKumbhMela #NashikKumbhMela
विधानपरिषदेच्या माजी उपसभापती, शिवसेना नेत्या, आमदार डॉ. निलमताई गोऱ्हे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. @neelamgorhe – at Kolhapur, India
हार्दिक अभिनंदन शिवसेना मुख्य नेते आणी उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे साहेब..
सन्मान लोकांच्या नेतृत्वाचा..
@mieknathshinde
2
2
55
Replying to @Rajesh9099 @mieknathshinde
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्यनेते, मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांना ब्रिटनच्या ऐतिहासिक हाऊस ऑफ लॉर्ड्स येथे ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
24
















































