#रक्तदान #मनसेमदतकार्य
श्री. विनोद यादव यांची १७ वर्षाच्या कु.अंकीता यादव या मुलीस थॅलेमिया हा आजार असून तिला A+ रक्ताची गरज होती. हे कळल्यावर मनसे प्रभाग क्र.३६ चे शाखा अध्यक्ष श्री. प्रशांत महाडिक यांनी त्या मुलीस रक्तदान दिले. @mnsadhikrut @RajThackeray – at Mumbai, India
मनसे प्रभाग क्र.३६ मालाड पूर्व, मुंबई retweeted
माझा यूट्यूबवरील पहिला व्लॉग...
खाली लिंक जोडत आहे, सर्वांनी आवर्जून जा आणि पटकन पहा आणि व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सांगा... #travel #Mahakumbh2025 #RamMandir
youtu.be/xIR1uZdoq80?si=WifY…
मनसे प्रभाग क्र.३६ मालाड पूर्व, मुंबई retweeted
नमस्कार 🙏
आज एक नवी सुरुवात करतोय. फिरायची आवड असल्यामुळे युट्युबवर स्वतःचं, आपलं हक्काचं ट्रॅव्हल चॅनल सुरू करतोय. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि शुभ आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या...🙏🙏🙏 #travel
#प्रवास #प्रवासwithइतिहास
My YouTube Channel link : youtube.com/@marathi_travel_…
मनसे प्रभाग क्र.३६ मालाड पूर्व, मुंबई retweeted
चला पुन्हा उभारी घेऊ!
एक वेळ शांत होणं आवडेल, पण राजसाहेबांची साथ सोडणं या देहाला मान्यच होत नाही.
येतील अजूनही लाख चढउतार, हा जन्म सत्तेच्या लालसेपोटी नाही.
येईल एक दिवस ‘राज ठाकरे’ याही माणसाचा, फितूर होणं कदाचित नियतीलाही मान्य नाही.
सदैव राजसाहेब!
मनसे प्रभाग क्र.३६ मालाड पूर्व, मुंबई retweeted
मी अनेक पराभव पाहिलेत.. पराभवाने खचलो नाही आणि विजयाने हुरळून गेलो नाही... खचलेल्यांचं नेतृत्व मला करायचं नाहीये...
या राज्यातील मराठी माणसासाठी, हिंदूंसाठी जे करायचं आहे ते मी करणार, ते आपलं स्वप्न आहे... वेळ लागेल पण करणार हे नक्की...
-- राजसाहेब ठाकरे
मनसे प्रभाग क्र.३६ मालाड पूर्व, मुंबई retweeted
इतिहास चाळून पहा,
एखाद्या अजरामर झालेल्या नेत्याची प्रतिष्ठा ही त्याने मांडलेल्या विचारातून मोजली जाते…
ना की निवडून आलेल्या आमदारांच्या संख्येवरून….
मनसे प्रभाग क्र.३६ मालाड पूर्व, मुंबई retweeted
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज्यातील सर्व प्रमुख पदाधिका-यांचा मेळावा डोम सभागृह, एन.एस.सी.आय. (सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम), लाला लजपतराय मार्ग, वरळी-मुंबई
मनसे प्रभाग क्र.३६ मालाड पूर्व, मुंबई retweeted
" जेंव्हा माध्यमं आमच्यावर आरोप करतात की आम्ही भूमिका बदलल्या, तेंव्हा मी माध्यमांना आणि इतर टीकाकारांना देशभरात, राज्यात, भाजप, काँग्रेस, शिवसेनेने किती भूमिका बदलल्या त्याचा संपूर्ण हिशोबच देतो. माझ्या पधाधिकाऱ्यानी लोकांसमोर हे मांडावं. मग लोकांना पण कळेल. आणि इतरांनी भूमिका बदलल्या त्या त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी... माझ्या पक्षाचं तसं नाही. जे चूक ते चूक आणि जे योग्य ते योग्य याला भूमिका बदलणं म्हणत नाही... "
राज ठाकरे ।
३०, जानेवारी २०२५, मुंबईतील राज्य पदाधिकारी मेळाव्यात बोलताना.
#पदाधिकारी_मेळावा
#RajThackeray
#MNSAdhikrut
मनसे प्रभाग क्र.३६ मालाड पूर्व, मुंबई retweeted
"मी अनेक पराभव पाहिलेत, विजयही पहिले पण पराभवाने कधीच खचलो नाही आणि विजयाने कधी हुरळून गेलो नाही. या राज्यातील #मराठी माणसासाठी, हिंदूंसाठी जे करायचं आहे ते मी करणार, ते आपलं स्वप्न आहे. वेळ लागेल पण करणार हे नक्की.."
- राजसाहेब ठाकरे आज पदाधिकारी मेळाव्यात बोलताना
मनसे प्रभाग क्र.३६ मालाड पूर्व, मुंबई retweeted
“माझ्या बरोबर राहणार असाल तर ठाम राहा !
या राज्यातील मराठी माणसासाठी, हिंदूंसाठी जे करायचं आहे ते आपण करणारच आहोत, ते आपलं स्वप्न आहे..!”
राज ठाकरे ।
३०, जानेवारी २०२५, मुंबईतील राज्य पदाधिकारी मेळाव्यात बोलताना.
#पदाधिकारी_मेळावा
#RajThackeray
#MNSAdhikrut
मनसे प्रभाग क्र.३६ मालाड पूर्व, मुंबई retweeted
"छावा सिनेमा प्रत्येकाने सिनेमागृहात जाऊन पहा. कारण छत्रपती शिवाजी महाराज ही आपली प्रेरणा आहे आणि छत्रपती संभाजी महाराज हे आपलं बलिदान आहे."
- राजसाहेब ठाकरे आज मुंबई पदाधिकारी मेळाव्यात बोलताना..
"श्री मोरया युवा प्रतिष्ठान" आयोजित "रक्तदान शिबिर" या कार्यक्रमात मनसे प्रभाग क्रमांक ३६ चे शाखा अध्यक्ष श्री. प्रशांत महाडिक यांनी उपस्थिती लावली आणि विशेष म्हणजे त्यांनी या वेळेला रक्तदानही केले. 🇮🇳🩸
7
मनसे प्रभाग क्र.३६ मालाड पूर्व, मुंबई retweeted
“मराठी म्हणल्यावर माझ्या डोळ्यासमोर येतं ते मऱ्हाठा साम्राज्य ज्यांनी हिंदवी प्रांतावर राज्य केलं होतं.... ते देखील सव्वाशे वर्ष. काय वैभवशाली राज्य होतं ते.... ”
- राजसाहेब ठाकरे
@mnsadhikrut
मनसे प्रभाग क्र.३६ मालाड पूर्व, मुंबई retweeted
भारतीय बुद्धिबळपटू डी गुकेश याने आज शब्दशः इतिहास घडवला आहे. वयाच्या अठराव्या वर्षी जगज्जेता डिंग लिरेनला हरवत गुकेश विश्वविजेता ठरला आहे. डी गुकेश याचं, त्याच्या कुटुंबीयांचं आणि त्याचे प्रशिक्षक यांचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मनःपूर्वक अभिनंदन. कला, विज्ञान आणि खेळ यांचा अद्वितीय संगम असलेला बुद्धिबळाचा हा खेळ भारतात, महाराष्ट्रात वृद्धिंगत होऊ दे आणि जगजेत्यांची एक मोठी परंपरा हिंदुस्थानात निर्माण होऊ दे हीच इच्छा.
#FIDEWorldChampionship2024
मनसे प्रभाग क्र.३६ मालाड पूर्व, मुंबई retweeted
पहिल्या पाचातले दोन ग्रँडमास्टर मराठी होते. महिलांमध्ये पहिली आंतरराष्ट्रीय मास्टर मराठी होती. हे चित्र पुढे का टिकल नाही?🤔
महाराष्ट्रात एरवी राजकीय कारणांसाठी कोट्यवधींची उलाढाल होते पण एखाद्या खेळाडूसाठी कोटभर द्यावे लागले, तरी चालढकल होते. मग कसे घडणार महाराष्ट्रात खेळाडू?🤦
मनसे प्रभाग क्र.३६ मालाड पूर्व, मुंबई retweeted
हि खऱ्या अर्थाने आमच्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांना श्राद्धांजली असेल...!
#Drbabasahebambedkar
#maharashtradharma #RajThackeray #MNSAdhikrut
मनसे प्रभाग क्र.३६ मालाड पूर्व, मुंबई retweeted
शिक्षण, संघटन, संघर्ष आणि धम्मचक्र प्रवर्तन यांच्या सहाय्याने हजारो वर्षे अस्पृश्यतेच्या व गुलामगिरीच्या खाईत लोटल्या गेलेल्या पीडितांचे पुनरुत्थान करणारे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विनम्र अभिवादन…
#MNSAdhikrut
मनसे प्रभाग क्र.३६ मालाड पूर्व, मुंबई retweeted
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं अप्रतिम वाक्य...
#Drbabasahebambedkar
#maharashtradharma #rajthackeray #mnsadhikrut
मनसे प्रभाग क्र.३६ मालाड पूर्व, मुंबई retweeted
अविरत ज्ञानसाधनेच्या जोरावर, हजारो वर्ष शोषण करणाऱ्या व्यवस्थेशी संघर्ष करत, गुलामगिरी आणि अस्पृश्यतेच्या खाईत लोटल्या गेलेल्या पीडितांचे पुनुरुत्थान करणारे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विनम्र अभिवादन.
सदैव 'राज'साहेबांसोबत.. 🚩❤️
@mnsadhikrut





























