
Journalist|Content developer,Writer|Translator, English-6 regional languages)|Voice-over |[email protected]|Here -Analytical tweets,news & My opinions
Mumbai
Joined March 2014
- Tweets13.4K
- Following1.5K
- Followers1.5K
- Likes1.7K
Pinned Tweet
When unity gets powerful logo 💐
#Health #journojobs
The health journalists in #Mumbai have formed- 'Association of Health Journalists (AHJ)'. And here is our LOGO, which represents the symbolic amalgamation of medicine & press freedom.
Thanks to the members who helped me to conceptualize & design the logo for AHJ. 🖌🎨
Stay tuned.
दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर उच्च न्यायालयाच्या आदेशांची खुलेआम पायमल्ली सुरुये. नियम धाब्यावर बसवून सुरू असलेली ही आतषबाजी नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक आहे. न्यायालयाच्या स्पष्ट निर्देशांनंतरही हे उल्लंघन होतेय. प्रशासनाने यावर तातडीने कठोर कारवाई करावी.
Blatant violation of High Court orders at Dadar's Chhatrapati Shivaji Maharaj Park. This reckless bursting of fireworks, defying all rules, is deeply disturbing and hazardous to public health. Ignoring clear judicial directives shows complete disregard for the law and citizens' right to clean air. Authorities must take strict, immediate action.
🎥 Video Credit: Disturbed Concerned Citizen.
दिवाळी विशेष -
जन्मतः अवघे ७०० ग्रॅम वजन... मुदतपूर्व जन्मलेल्या या चिमुकल्यासाठी जगण्याची लढाई जन्मापासूनच सुरू झाली. २ जून २०२६ रोजी जन्मलेल्या या बाळावर केईएम रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात सलग पाच महिने उपचार करण्यात आले. या काळात अनेक आव्हानांचा सामना करत डॉक्टर आणि परिचारिकांनी बाळाची विशेष काळजी घेतली. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून बाळाचे वजन आता ३.३ किलो झाले आहे. पाच महिन्यांच्या उपचारांनंतर बाळाला सुखरूप डिस्चार्ज देण्यात आला. चिमुकल्याला सुखरूप घरी पाठवण्याचं समाधान... पालिका रुग्णालयातील डॉक्टरांसाठी यापेक्षा मोठी दिवाळी भेट कोणती असेल!
Born prematurely on June 2, 2026, weighing just 700 grams, this little baby had a challenging journey from the very beginning. The newborn spent five months in the Neonatal Intensive Care Unit (NICU) at Mumbai's civic-run KEM Hospital, receiving specialised medical care and constant attention from a dedicated team of doctors and nurses. Overcoming several medical challenges, the baby gradually gained strength and reached a healthy weight of 3.3 kg. After five months of dedicated treatment and care, the little one has finally been discharged and is ready to go home. For the doctors and nursing staff, sending this tiny fighter home healthy and thriving is perhaps the most beautiful Diwali gift of all...
🛑सगळेच पत्रकार, राजकीय, नेते, पुढारी, सामाजिक कार्यकर्ते विकले जात नाहीत.. विकले गेले ते इथं दिसतं नाहीत..! असं व्हिडिओतील पत्रकार म्हणत आहेत...
या पत्रकाराने संबंधित टॉरंट कंपनीने जाहिरातीची ऑफर दिल्याचा आरोप केलाय.
आता टॉरंट कंपनीने आपली अधिकृत भूमिका जाहीर करावीच!
पुलस्पर्श होताच दुःखे पळाली,
नवा सूर, आनंदयात्रा मिळाली,
निराशेतून माणसे मुक्त झाली,
जगू लागली, हास्यगंगेत न्हाली.
#BREAKING | तुकाराम मुंढे यांचा दिवाळी धमाका! FDA ची राज्यभर विशेष मोहीम; ४३ अन्न व्यावसायिकांचे परवाने निलंबित. मिठाई, खवा-मावा, पनीर, फराळ, फरसाण आणि खाद्यतेल विक्रेत्यांसह ७३ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. अस्वच्छता, अपुऱ्या साठवणूक व्यवस्था आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्याने ही कारवाई करण्यात आली. तब्बल ₹६३.०९ लाख किमतीचा १७,८२४ किलो अन्नसाठा जप्त करण्यात आला असून, महामार्गावर दोन वाहनांतून वाहतूक होणारा ३,९३५ किलो खवा व मिठाईचाही समावेश आहे. तपासणीदरम्यान १० नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठवण्यात आले. ६ आणि ७ नोव्हेंबर रोजी बृहन्मुंबई, कोकण, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती विभागांत ही मोहीम राबवण्यात आली.
Video & Photo Credit: Food and Drug Administration (FDA)
केसांवर टक्कल घालवण्याचा दावा करणाऱ्या भगत नामक माणसाचा हा व्हिडिओ पाहा...
एफडीएने धाड टाकल्यावर इंस्टाग्रामवर रील पोस्ट केलाय.
एखाद्याचे दहा हजार रुपये वाचवले तर काही वाईट करतो का? असा प्रश्न विचारून पठ्ठ्या चांगलाच गुंगारा टाकतोय.
तुकाराम मुंडे यांची एंट्री म्हणजे विषयच संपला...
सर्वांनी अशा भूलथापांना बळी पडू नका.
सोबत प्रेस नोट जोडतेय.
व्हिडिओ श्रेय - भगत यांचे अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंट.
फोटो श्रेय - एफडीए प्रेस नोट, एफडीएने दिलेले फोटो
🚨 ब्रेकिंग न्यूज: सोशल मीडियाच्या माध्यमातून टक्कल गायब करण्याचा दावा करणाऱ्या ५० लाखांच्या 'फेक' हेअर ऑईलवर एफडीएचा छापा! ⚠️
सोशल मीडियावर टक्कल पडलेल्यांना काही दिवसांतच केस उगवून देण्याचे भ्रामक दावे करणाऱ्या 'व्ही. एस. हेअर ग्रोथ ऑईल'वर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) नाशिकमध्ये मोठी धडक कारवाई केली आहे. इन्स्टाग्राम आणि फेसबुकवरून आकर्षक जाहिराती करून विकल्या जाणाऱ्या या उत्पादनाचा तब्बल ₹ ५० लाख ३५ हजार किमतीचा बेकायदेशीर साठा जप्त करण्यात आला असून, या उत्पादनावर उत्पादकाचे नाव, पत्ता आणि अधिकृत परवाना क्रमांकच नमूद नसल्याचे समोर आले आहे.
⚠️ एफडीएचे आवाहन : फसव्या जाहिरातींपासून सावध राहा!
टक्कल घालवणे किंवा वजन कमी करण्याचे दावे करणाऱ्या सोशल मीडियावरील भ्रामक जाहिरातींना नागरिकांनी अजिबात बळी पडू नये. कोणतेही कॉस्मेटिक किंवा औषध खरेदी करताना त्यावर उत्पादकाचा पत्ता आणि परवाना क्रमांक असल्याची खात्री नक्की करा, अन्यथा आरोग्याशी खेळ होऊ शकतो. अशी कोणतीही संशयास्पद विक्री किंवा जाहिरात आढळल्यास तात्काळ FDA च्या १८००-२२२-३६५ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधा..
#FDA #NashikNews #HairGrowthOilFraud #ConsumerAwareness #TukaramMundhe
📷 अन्न व औषध प्रशासन
कर्जत तालुका पर्यावरण बचाव संघर्ष समिती, शेतकरी आणि स्थानिक नागरिकांनी टोरेंट कंपनीचे प्रस्तावित साईडोंगर-१ (3,000 MW) आणि साईडोंगर-२ प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे.
सर्व परवानग्या, करार आणि पर्यावरणीय अहवाल सार्वजनिक करावेत. प्रकल्प रद्द होईपर्यंत कामे आणि वृक्षतोड थांबवावी, अशी मागणी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदारांमार्फत निवेदन देण्यात आले. हे निवेदन कर्जत पूर्व येथील वनविभागाचे वनपरीक्षेत्रअधिकारी यांनाही दिले गेले.
#Karjat #SaveEnvironment
📸 Photo taken at the location.
अपडेट - भेट झाली
सिंहासाठी निवेदन दिले. आता सिंह कधी येणार याची आतुरता....
Photo taken from the spot
अपडेट - मुंबईच्या राणीबागेत जुनागढच्या साकरबाग प्राणिसंग्रहालयातून दोन नर आणि दोन मादी आशियाई सिंह आणण्याच्या प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळवण्यासाठी महापौर रितू तावडे आज गुजरात दौ-यावर आहेत. याकरिता त्या गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांची भेट घेण्यास प्रयत्नशील आहेत. ही भेट दुपारी साडेचार वाजता होणार होती. मात्र मुख्यमंत्री पटेल भेटले नाहीत. आता सायंकाळी सात वाजता पटेल महापौर रितू तावडे यांना भेटतील, अशी सूत्रांनी माहिती दिली.
प्रश्न फक्त एवढाच की, दोन राज्यांमधील प्राण्यांची देवाणघेवाणीचे काम पाहणा-या दिल्ली येथील केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणालाही महापौर भेट देणारेत का ?
दिया मिर्झा प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर महापौर रितू तावडे यांनी गुजरात गाठलंय!
मुंबईच्या राणीबागेत जुनागढच्या साकरबाग प्राणिसंग्रहालयातून दोन नर आणि दोन मादी आशियाई सिंह आणण्याच्या प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळवण्यासाठी महापौर आज गांधीनगरमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांची भेट घेणार आहेत.
भारतात एका राज्यातील प्राणिसंग्रहालयातून दुसऱ्या राज्यातील प्राणिसंग्रहालयात वन्यप्राण्यांची देवाणघेवाण करण्यासाठी नवी दिल्ली येथील केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरण (Central Zoo Authority – CZA) यांची मंजुरी महत्त्वाची असते.
ही बाब वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 आणि Recognition of Zoo Rules, 2009 अंतर्गत नियंत्रित केली जाते.
मग रितू तावडे यांच्या गुजरात दौऱ्याबाबत महत्त्वाचा प्रश्न :
CZA कडून अंतिम मंजुरी आवश्यक असताना गुजरातच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यामागे नेमका उद्देश काय?
Photo Taken at location of Byculla Zoo
राज्यात क्षयरोगाचे जलद आणि अचूक निदान करण्यासाठी ३०० अत्याधुनिक ‘ट्रूनॅट क्वात्रो’ यंत्रे बसविण्यात येणार आहेत. सुमारे ४१.९२ कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागांतील आरोग्य केंद्रांमध्येही आधुनिक निदान सुविधा उपलब्ध होणार आहेत.
या यंत्रांद्वारे अवघ्या एका तासात टीबी आणि रिफॅम्पिसिन-प्रतिरोधक टीबीचे निदान शक्य होईल. या प्रकल्पातून दरवर्षी ९.३६ लाख तपासण्या करण्याची क्षमता निर्माण होणार असून, लवकर निदानामुळे टीबीचा प्रसार रोखण्यासही मदत होईल.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @iprakashabitkar
BMC’s priorities are hard to understand. It removed Dia Mirza’s awareness video after political criticism, despite the campaign being based on Bombay High Court directions. The court has now asked BMC to repost it.
All a common Mumbaikar wants is clean air to breathe. Communal politics is not our priority. Good air and better civic governance are!
#BREAKING | दिया मिर्झाच्या फटाकेबंदीच्या आवाहनाच्या व्हिडीओवरून भाजप नेत्यांनी केलेल्या टीकेवर मुंबई उच्च न्यायालयाची नाराजी.
दिवाळीत सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडू नयेत, या उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी मुंबई महापालिकेने (BMC) बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाची मदत घेतली होती. मात्र, भाजप नेत्यांनी या व्हिडीओवर आक्षेप घेत टीका केल्यानंतर महापालिकेने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून हा व्हिडीओ हटवला होता.
या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने काही राजकीय नेत्यांनी केलेल्या शेरेबाजीबद्दल नाराजी व्यक्त केली. अशा टिप्पण्यांमुळे आपण व्यथित असल्याचे नमूद करताना भारत हा धर्मनिरपेक्ष देश असल्याची आठवणही न्यायालयाने करून दिली.
तसेच, हटवण्यात आलेला दिया मिर्झाचा जनजागृतीपर व्हिडीओ पुन्हा सोशल मीडियावर प्रसारित करण्याचे निर्देश मुंबई महापालिकेला दिले.
वायूप्रदूषणाच्या मुद्द्यावरून मुंबई महापालिकेच्या कारभारावर मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वीही वारंवार ताशेरे ओढले आहेत. आता दिया मिर्झाच्या जनजागृतीपर व्हिडीओवरून झालेल्या वादातही न्यायालयाने महापालिकेच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे वायूप्रदूषणाच्या मुद्द्यावरून महापालिका पुन्हा एकदा न्यायालयाच्या निशाण्यावर आली आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वाढत्या वायूप्रदूषणाबाबत जनजागृती करण्यासाठी मुंबई महापालिकेने अभिनेत्री दिया मिर्झाचा व्हिडिओ पोस्ट केला. मात्र, भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी आक्षेप घेताच हा व्हिडिओ हटवण्यात आला.
महापौर रितू तावडे यांनी पत्रकार परिषद घेत दिया मिर्झाला सरकारी मोहिमांमधून ब्लॅकलिस्ट करण्याची घोषणा केली.
दिया मिर्झाच्या कथित हिंदूविरोधी भूमिकेचा मुद्दा उपस्थित करताना महापौरांनी प्रशासनाची चूकही मान्य केली.
जनजागृती राहिली बाजूला! यंदाची सत्ताधारी मुंबई महापालिका रस्त्यांवरील खड्ड्यांपेक्षा आपापसातील कलहामुळेच जास्त चर्चेत आहे.
मुंबईकरांनो, उच्च न्यायालयाचा प्रदूषण नियंत्रणासाठी जनजागृती करण्याचा आदेश तुम्हाला पटतोय ना?
अपडेट :
टोरंट पॉवरच्या प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पासाठी होणाऱ्या वृक्षतोडीच्या विरोधात आज कर्जत तालुक्यात विविध ठिकाणी बंद पाळण्यात आला. स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमींच्या आंदोलनाला दुकानदारांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नेरळ, कशेळे आणि कडाव परिसरातील दुकाने बंद ठेवून व्यापाऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. पाहा, आज सकाळी कर्जत तालुक्यातील बंदचे दृश्य.
Shopkeepers in several parts of Karjat taluka observed a shutdown today to protest against tree felling for Torrent Power’s proposed hydropower project. Shops remained closed in Neral, Kashele and Kadav as local traders extended their support to the protest by villagers and environmental activists. Here are visuals from Karjat this morning.
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील साईडोंगर परिसरात टोरंट पॉवर कंपनीच्या प्रस्तावित ३ हजार मेगावॅट क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमी विरोध करत आहेत. आज कर्जत तालुका पर्यावरण बचाव संघर्ष समितीने कर्जत बंदची हाक दिली आहे.
Local villagers and environmental activists are opposing Torrent Power’s proposed 3,000 MW hydropower project in the Saidongar area of Karjat taluka, Raigad district. The Karjat Taluka Paryavaran Bachav Sangharsh Samiti has called for a shutdown (Karjat Bandh) today to protest against the project and raise concerns over its potential environmental impact.
Here is a ground-level view of the situation in Karjat.


















