नागरिकांना लक्ष्मीपूजनानिमित्त हार्दिक शुभेच्छा
नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा:
fxurl.co/PMCCARE
#लक्ष्मीपूजन२०२६ #शुभदीपावली #दिवाळीच्या_हार्दिक_शुभेच्छा #शुभेच्छा #मंगलमय_दिवाळी #सुखसमृद्धी #धनधान्य #महालक्ष्मी #समृद्धी #आनंदोत्सव #पुणे #पुणेमहानगरपालिका
साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा:
fxurl.co/PMCCARE
#पुलदेशपांडे #जयंती #विनम्रअभिवादन #मराठीसाहित्य #महाराष्ट्राचेभूषण #मराठीसंस्कृती #साहित्यविश्व
३८ हजार २३३ पणत्यांच्या तेजाने शनिवारवाडा उजळला… पुण्याच्या नावावर जागतिक विक्रमाची ऐतिहासिक नोंद! 🚩
📍 शनिवारवाडा, पुणे 📅 शनिवार, दि. ७ नोव्हेंबर २०२६
‘सन्मान राष्ट्रगीताचा, अभिमान पुणेकरांचा!’ या संकल्पनेतून वन्दे मातरम् राष्ट्रगीताच्या सार्धशताब्दी वर्षानिमित्त पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित भव्य दीपप्रज्वलन सोहळ्यात तब्बल ३८ हजार २३३ पणत्या प्रज्वलित करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पुण्याची अधिकृत नोंद झाली. हा प्रत्येक पुणेकरासाठी अभिमानाचा ऐतिहासिक क्षण आहे!
यावेळी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलेल्या वीर जवानांच्या ५० वीरमाता व वीरपत्नींचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त करताना मन अभिमानाने भरून आले.
याप्रसंगी मा. सौ. माधुरी मिसाळ, मा. महापौर सौ. मंजुषा दीपक नागपुरे, उपमहापौर मा. श्री. परशुराम वाडेकर, मा. स्थायी समिती अध्यक्ष श्री. श्रीनाथ भिमाले, ब्रिगेडियर तरुणेश, कर्नल विकास सावळजे, कर्नल श्रीनिवास सातवळेकर, कर्नल राजेशकुमार जिंदाल, अतिरिक्त आयुक्त श्री. प्रजीत नायर, श्री. ओमप्रकाश दिवटे, मुख्य अभियंता सौ. शेकटकर, उपायुक्त श्री. टेंगळे, नगरसचिव श्रीमती योगिता भोसले, मुख्य अभियंता श्री. बिपीन शिंदे, सर्व सन्माननीय नगरसेवक-नगरसेविका, वरिष्ठ लष्करी अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकृत परीक्षक श्री. स्वप्नील डांगरीकर यांनी विक्रमाची घोषणा करून प्रमाणपत्र प्रदान केले.
हा विक्रम केवळ पणत्यांचा नाही, तर पुणेकरांच्या एकजुटीचा, राष्ट्रप्रेमाचा आणि भारतीय सैन्यदलाप्रती कृतज्ञतेचा आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झालेल्या सर्व पुणेकरांचे मनःपूर्वक आभार!
#PMCPune #GuinnessWorldRecord #VandeMataram150 #PunePride #WadaOfLights #IndianArmy
#पुणे #पुणेकरांचा_अभिमान #वन्देमातरम् #ऐतिहासिक_विश्वविक्रम
🪔 *पुण्यात साकारतोय ‘वन्दे मातरम्’चा अभिमानास्पद विश्वविक्रम!*
दीपांच्या प्रकाशातून साकारत असलेल्या या ऐतिहासिक सोहळ्याचे थेट प्रक्षेपण आणि क्षणचित्रे पाहण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत सोशल मीडिया पेजला भेट द्या.
या सोहळ्याचे साक्षीदार व्हा आणि ही अभिमानास्पद बातमी आपल्या मित्रपरिवारासह जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खालील लिंक WhatsApp, Facebook आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करा.
🔴 *थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी:*
facebook.com/share/v/1FdBU21…
चला, या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊया आणि ‘वन्दे मातरम्’चा अभिमान सर्वदूर पोहोचवूया!
सुरक्षित दिवाळीसाठी अग्निसुरक्षेचा संदेश!
दिवाळी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत फटाके फोडताना घ्यावयाची काळजी तसेच विद्युत रोषणाई करताना पाळावयाच्या अग्निसुरक्षा नियमांबाबत कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित एक मिनिटाची जनजागृतीपर चित्रफीत प्रसारित करण्यात आली आहे.
सणाचा आनंद साजरा करताना सुरक्षिततेला प्राधान्य द्या आणि अपघात टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्या.
सुरक्षित दिवाळी, आनंदी दिवाळी!
#PMCPune #PuneFire #SafeDiwali #FireSafety
दिवाळीचा आनंद, पर्यावरणाची साथ प्लास्टिकमुक्त सण साजरा करूया !
मातीच्या पणत्या, कागद-बांबूचे कंदील, कापडी पिशव्या आणि स्टील/काचेचे डबे वापरून भेटवस्तू व मिठाई द्या.
स्वच्छ पुणे, सुंदर पुणे!
नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा:
fxurl.co/PMCCARE
#PlasticFreeDiwali #EcoFriendlyDiwali #CleanPune #BeautifulPune #SwachhSurvekshan2025 #MajhiVasundhara #MissionLiFE
@SwachhMaha_22 @SwachhBharatGov @Majhivasundhar1 @SwachSurvekshan
स्वच्छ, निरोगी आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करूया!
चला, दिव्यांच्या प्रकाशाने आणि आनंदाच्या रंगांनी दिवाळी उजळवूया;प्रदूषणाने नाही!
स्वच्छ पुणे, निरोगी पुणे!
नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा:
fxurl.co/PMCCARE
#PollutionFreeDiwali #CleanPune #HealthyPune #SwachhSurvekshan2026 #MissionLiFE
@Majhivasundhar1 @SwachhMaha_22 @SwachSurvekshan @SwachhBharatGov
मुक्या जीवांना चिडवू नका!
फटाक्यांचा आवाज, धूर किंवा प्रकाश यामुळे आधीच घाबरलेल्या प्राण्यांना मुद्दाम चिडवणे किंवा त्यांच्या जवळ जाऊन त्रास देणे टाळा.त्यांना शांतपणे सुरक्षित ठिकाणी राहू द्या.
प्राण्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेऊया !
नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा:
fxurl.co/PMCCARE
#PMCCARE #AnimalWelfare #AnimalSafety #PetSafety #StrayAnimalCare
@MahaDGIPR @Dept_of_AHD
राष्ट्रीय बायसन दिन
अमेरिकेत दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या शनिवारी राष्ट्रीय बायसन दिन साजरा केला जातो. २०२६ मध्ये हा दिवस ७ नोव्हेंबर रोजी आहे. उत्तर अमेरिकेतील बायसन हा प्राणी अमेरिकेच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय वारशाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. ९ मे २०१६ रोजी अमेरिकेने बायसनला आपला राष्ट्रीय सस्तन प्राणी म्हणून अधिकृत मान्यता दिली. बायसनचे संवर्धन, त्यांचे नैसर्गिक अधिवास जतन करणे आणि या प्रजातीच्या पर्यावरणीय महत्त्वाविषयी जनजागृती करणे हा या दिवसाचा उद्देश आहे.
नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा:
fxurl.co/PMCCARE
#राष्ट्रीयबायसनदिन #बायसनदिन #बायसनसंवर्धन #वन्यजीवसंवर्धन #वन्यजीवसंरक्षण #जैवविविधता #पर्यावरणसंवर्धन #नैसर्गिकअधिवास #वन्यजीवजागृती #निसर्गसंरक्षण
@MoEFCC @majhivasundhara @MahaDGIPR
महाराष्ट्राच्या दुर्गवैभवाचा वारसा जपणारे ‘किल्ले स्पर्धा व प्रदर्शन’ पुणेकरांसाठी खुले!
पुणे महानगरपालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या पारंपरिक दिवाळी किल्ले स्पर्धा व प्रदर्शनाला यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास, महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचा समृद्ध वारसा आणि ऐतिहासिक वास्तूंची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
यंदाच्या प्रदर्शनात रायगड, राजगड, सुवर्णदुर्ग, सिंहगड, हरिश्चंद्रगड, सिंधुदुर्ग, जंजिरा यांसह महाराष्ट्रातील विविध ऐतिहासिक किल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत.
या किल्ले स्पर्धेचे परीक्षण इतिहास व भूगोल तज्ज्ञ श्री. जगजीवन काळे, श्री. संजय शिवराम साळुंके, श्री. महेश शिंदे, श्री. कैलास चौधरी, श्री. अमोल गोविंदलाल उपेचा, श्री. मयुरेश लढे आणि श्री. सुमित चव्हाण यांनी केले.
प्रदर्शनाची माहिती :
दिनांक : ५ ते १२ नोव्हेंबर २०२६
वेळ : सकाळी ८.३० ते रात्री ८.३०
स्थळ : छत्रपती संभाजी उद्यान, जंगली महाराज रोड, शिवाजीनगर, पुणे.
प्रदर्शन सर्व नागरिकांसाठी विनामूल्य खुले असून, पुणेकरांनी सहकुटुंब भेट देऊन या ऐतिहासिक वारशाचा आनंद घ्यावा, असे आवाहन पुणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा:
fxurl.co/PMCCARE
#Pune #PMC #PuneMunicipalCorporation #किल्लेप्रदर्शन #दिवाळी #महाराष्ट्राचाइतिहास
‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्या सार्धशताब्दी वर्षानिमित्त पुण्यात साकारतोय दीपोत्सवाचा एक ऐतिहासिक सोहळा!
हजारो दीपांच्या प्रकाशातून साकारले जाणार ‘वंदे मातरम्’ हे शब्दचित्र! या अनोख्या दीपोत्सवातून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
या ऐतिहासिक आणि अभिमानास्पद क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी पुणेकरांनी आपल्या कुटुंबीयांसह आणि मित्रपरिवारासह मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, ही विनंती!
दिनांक : शनिवार, ७ नोव्हेंबर २०२६
वेळ : सायंकाळी ६ वाजता
स्थळ : शनिवारवाडा परिसर, पुणे
पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत Facebook पेजवरून होणारे थेट प्रक्षेपण (Facebook Live) पहा आणि या भव्य दीपोत्सवाचे साक्षीदार व्हा!
#VandeMataram #वंदेमातरम् #Shanivarwada #Pune #GuinnessWorldRecord #Deepotsav #PMC #PuneMunicipalCorporation
पुणे ग्रँड सायकल टूर (PGCT) – पॅकेज क्र. ४ अंतर्गत रस्ते विकासकामांची पाहणी; कामे गुणवत्तापूर्ण व निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश!
पुणे ग्रँड सायकल टूर (PGCT) प्रकल्पाच्या पॅकेज क्र. ४ अंतर्गत सुरू असलेल्या रस्ते विकासकामांची मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) श्री. ओमप्रकाश दिवटे यांनी प्रत्यक्ष स्थळपाहणी केली.
या पाहणीदरम्यान फातिमानगर जंक्शन येथील रस्त्याच्या पृष्ठभागाची दुरुस्ती व पातळी सुधारणे, बी. टी. कवडे रोडवरील पाणीपुरवठा व ड्रेनेज युटिलिटी ट्रेंचेसची सद्यस्थिती तपासणे, रेल्वे ब्रिज परिसरासह विविध ठिकाणची अपूर्ण पदपथांची कामे पूर्ण करणे तसेच मार्गावरील इतर युटिलिटी सेवांच्या कामांचा आढावा घेण्यात आला.
सर्व संबंधित विभाग, कंत्राटदार आणि सल्लागारांनी समन्वयाने काम करून प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड न करता सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
या पाहणीवेळी अधीक्षक अभियंता श्री. रोहिदास गव्हाणे, पुणे महानगरपालिकेचे अभियंता पथक, Pavetech Consultants चे प्रतिनिधी तसेच संबंधित कंत्राटदार उपस्थित होते.
नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा:
fxurl.co/PMCCARE
#Pune #PMC #PuneMunicipalCorporation #PGCT #RoadDevelopment #InfrastructureDevelopment
३६,००० दीपांच्या प्रकाशातून साकारेल ‘वन्दे मातरम्’चा अभिमानास्पद विश्वविक्रम!
‘वन्दे मातरम्’ गीताच्या सार्धशताब्दी महोत्सवानिमित्त पुणे महानगरपालिकेच्या वतीने शनिवारवाडा परिसरात ३६,००० दीप प्रज्वलित करून ‘वन्दे मातरम्’ हा शब्द साकारण्याचा भव्य उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
देशभक्तीची भावना आणि सामूहिक सहभागाचा अनोखा संगम असलेल्या या उपक्रमातून Guinness World Records मध्ये ऐतिहासिक नोंद करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
📅 शनिवार, ७ नोव्हेंबर २०२६
⏰ सायंकाळी ६ वाजता
📍 शनिवारवाडा परिसर, पुणे
नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा:
fxurl.co/PMCCARE
#VandeMataram #Shanivarwada #Pune #GuinnessWorldRecord #Deepotsav2026
@MDNagpure
वन्दे मातरम्’ गीताच्या सार्धशताब्दी महोत्सवानिमित्त पुणे शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवात आणखी एका मानाच्या क्षणाची भर पडणार आहे
शनिवार, दिनांक ७ नोव्हेंबर २०२६ रोजी शनिवारवाड्याच्या ऐतिहासिक प्रांगणात सुमारे ३६ हजार दीप प्रज्वलित करून ‘वंदे मातरम्’ ही अक्षररचना साकारण्यात येणार आहे. या भव्य दीपप्रज्वलनाच्या माध्यमातून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये पुणे शहराचे नाव नोंदवण्याचा विश्वविक्रम प्रयत्न करण्यात येणार आहे.
मा. सभागृह नेते श्री. गणेश बिडकर यांनी या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करत, आपण सर्वांनी या ऐतिहासिक दिवसाचे साक्षीदार होऊया, असे आवाहन केले आहे
नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा:
fxurl.co/PMCCARE
#VandeMataram #Shanivarwada #Pune #GuinnessWorldRecord #deepotsav
Marking 150 glorious years of our national song 'Vande Mataram', witness a breathtaking Deepotsav like never before. Thousands of diyas will light up to form the words 'Vande Mataram', aiming for a Guinness World Record!
Be a part of this historic and proud moment. Bring your friends and family!
📷 Date: Saturday, 7th November 2026
📷 Time: 6:00 PM
📷 Venue: Shanivarwada Premises, Pune
Let's make history together!
#VandeMataram #Shanivarwada #Pune #GuinnessWorldRecord #deepotsav
@MDNagpure
दिवाळीचा आनंद, प्राण्यांच्या सुरक्षिततेसह!
दिवाळीचा सण साजरा करताना मुक्या जीवांची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे.
नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा:
fxurl.co/PMCCARE
#PMCCARE #AnimalWelfare #AnimalSafety #PetSafety #StrayAnimalCare
@MahaDGIPR @Dept_of_AHD

























