
एक अतिशय सामान्य #मिरजकर माणूस. तुमच्या माझ्या मनातले विचार मांडतो, जे #मनात_येईल_ते लिहितो. #आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂
एक अतिशय सामान्य मिरजकर
Joined May 2021
- Tweets35.1K
- Following2.1K
- Followers3.3K
- Likes31K
Pinned Tweet
दोन दिवसांपासून मी व्हेंटिलेटरवर आहे. ते लावलेलं आहे, म्हणूनच मी जिवंत आहे, नाहीतर खेळ खल्लास, असे शब्द अधेमध्ये सतत माझ्या कानावर येत आहेत. मला अॅडमिट केल्यापासून माझी बायको एकदाही हॉस्पिटलमध्ये आलेली नाही. माझा लहान मुलगा एमबीबीएस करतो आहे, तो सुद्धा अगदी हाकेच्या अंतरावर शिकत+
सुट्टीचा दिवस उजाडला की बाकीच्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येते. पण माझ्यासाठी मात्र सुट्टी हा शब्द हल्ली एक नवं समीकरण घेऊन येतो... सुट्टीचा दिवस म्हणजे मनाचे निव्वळ हाल..! आठवडाभर कामाच्या रहाटगाड्यात मी स्वतःला इतकं गुंतवून घेतो की, 👇👇
माणूस स्वतःशीच किती खोटं बोलतो, नाही का..? सगळं विसरलोय आता, असं छातीठोकपणे जगाला सांगताना आपण स्वतःचीच किती फसवणूक करत असतो. आठवणींचंही मोठं अजबच असतं. त्या एखाद्या जुन्या बंद खोलीतल्या अडगळीत पडलेल्या पेटीसारख्या असतात. वरवर पाहता त्यावर काळाची धूळ साचलेली दिसते, 👇👇
मित्रांनो... हा सारा काही as always फक्त #शब्दखेळ #विरंगुळा आहे. याचे त्याचे अनुभव गोळा करून शब्दांकन करून इथं मांडलं आहे, मांडायचा प्रयत्न केला आहे.! 🫂🙏
होय, मला याची पुरेपूर जाणीव आहे. आज या घडीला माझं जगणं जितकं एकाकी आहे, त्याहूनही अधिक एकाकी माझं म्हातारपण असणार आहे. माणूस येतो एकटा आणि जातो एकटा, पण या दोन टोकांमधला प्रवास माणसांनी गजबजलेला असावा. माझ्या बाबतीत मात्र या प्रवासाच्या वाटा 👇👇
सध्या एक अनाकलनीय अस्वस्थता मनाला घेरून राहते आहे. आजूबाजूला पाहिलं की चक्रावून जायला होतंय. अगदी जवळपास माझ्याच वयाची तीन वर्गमित्र गेल्या तीन महिन्यांत ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावली आहेत. कालपर्यंत जी हसती-खेळती, चालती-बोलती माणसं आपल्यात वावरत होती, 👇👇
जेव्हा खूप खूप त्रास होऊ लागतो ना, तेव्हा आपल्याला जाणीव होऊ लागते की आपलं नेमकं कधी अन् काय काय चुकलं आहे.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂
आई आज बोलली, खूप सहज बोलून गेली. कोणी आवडत असेल, कुठल्याही जातीची असली तरी चालेल, पण लेका, दुसरं लग्न करून घे रे..! तिचं हे सांगणं, तिची ही अगतिकता पाहून मला तिची कणव आली, पण सोबतच स्वतःच्या नशिबाची थट्टाही वाटली. ती बोलली ते अगदी योग्यच आहे, एका आईच्या मायेला धरूनच आहे. 👇👇
प्रेमाच्या अलीकडे राहून मैत्रीचा आव आणणं, हे या जगातील सर्वात कठीण काम आहे.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂
(सौजन्य :- शरदबुवा महाराज मिरजकर)
कुणाच्या आयुष्यात आपण किती महत्त्वाचे आहोत, हे कळण्यासाठी कधी कधी मुद्दाम शांत राहावं लागतं..!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂
(सौजन्य :- शरदबुवा महाराज मिरजकर)
खरं सांगायचं तर, कधी कधी ना समोरच्या व्यक्तीचे काहीच चुकत नसते. त्यांचा सल्ला, त्यांची काळजी आणि माझ्याविषयी वाटणारी ती तळमळ… हे सगळे अगदी शंभर टक्के खरे असते. एकदा वाईट अनुभव आला म्हणून दुसऱ्या वेळीही तसाच येईल असे नाही, हे त्यांचे तत्त्वज्ञानही चुकीचे नाही. 👇👇
माणूस म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येकाला कधी ना कधी एक ‘संसार’ नावाचं गाठोडं खांद्यावर घ्यावंच लागतं. काही लोक ते ओझं म्हणून वाहतात, तर काही जण त्यातल्या कापडाची नक्षी न्याहाळत आयुष्य काढतात. मी जसजसा कळत्या वयाचा झालो, 👇👇
आर्थिक प्रगती ही सोबतीला नैतिक अधःपतन ही घेऊन येत असते.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂
(सौजन्य :- शरदबुवा महाराज मिरजकर)
पंचकूलाच्या त्या शाळेतून आलेली ती बातमी आणि तो व्हिडिओ आज आपल्यापैकी सगळ्यांनीच पाहिला. तो केवळ धक्कादायक नाही, तर एका अत्यंत भयानक आणि विदारक वास्तवाची जाणीव करून देणारा आहे. या घटनेने संपूर्ण समाजाच्या काळजात चर्र झालं आहे, यात शंकाच नाही. आज सकाळी पाहिलेला तो व्हिडिओ 👇👇
बँक बॅलन्सच्या आकड्यांना जशी मर्यादा नसते, तशीच आज माझ्या पश्चात्तापालाही राहिलेली नाही. आयुष्याच्या प्रत्येक महत्त्वाच्या वळणावर मी निर्णय घेत गेलो, की निव्वळ चुका करत गेलो, हेच आता मला उमजेनासं झालंय. त्या प्रत्येक वळणावर मी स्वतःला खूप शहाणा समजत होतो. 👇👇
उदासवाणा माझा प्रत्येक दिवस
काही क्षणांसाठी खास होतो,
जेव्हा संध्याकाळी घरी आल्यावर
मला तुझा भास होतो..!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂





