Pinned Tweet
आपण भरभरून मतदान करून भगव्याची शान राखली.. आता छत्रपती संभाजीनगर नावाला शोभेल असा विकास घडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत!
#भाजपाचे_छत्रपती_संभाजीनगर
मंत्रिमंडळ निर्णय : जनहितासाठी महत्त्वपूर्ण निर्णय!
जनतेच्या हिताला प्राधान्य देत, सकारात्मक बदल घडवून आणणारे महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले आहेत.
या जनहिताच्या निर्णयांसाठी मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री ना.सुनेत्राताई पवार यांचे मन:पूर्वक आभार व धन्यवाद!
#मंत्रिमंडळ_निर्णय #जनहित #MaharashtraGovernment #Governance
यंदाच्या दिवाळीत स्वदेशी वस्तू खरेदीला प्राधान्य द्या. आपल्या एका निर्णयातून स्थानिक व्यापाऱ्यांना आर्थिक बळ मिळेल आणि ‘आत्मनिर्भर भारत’चा संकल्प अधिक मजबूत होईल.
#VocalForLocal #SwadeshiDiwali #AatmanirbharBharat
दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून १% निधी राखीव ; १६ योजनांना मंत्रिमंडळाची मंजुरी!
राज्यातील दिव्यांग व्यक्तींचे पुनर्वसन, स्वावलंबन आणि सक्षमीकरण अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतील १ टक्का निधी राखीव ठेवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. सन २०२५-२६ पासून दरवर्षी उपलब्ध होणाऱ्या या निधीतून १६ प्रमुख योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे..
दिव्यांगांसाठी कोणत्या योजना राबविण्यात येणार?
१. ई-वाहन आणि ई-बाईक: रोजगार किंवा स्वरोजगारासाठी दिव्यांगांना कमाल ३ लाख रुपयांचे ई-वाहन किंवा १.५ लाख रुपयांची ई-बाईक देण्यात येणार आहे. यासाठी वय १८ ते ५० वर्षे, किमान ४० टक्के कायमस्वरूपी दिव्यांगत्व आणि वैध वाहन परवाना आवश्यक असून रोजगार व स्वरोजगारासाठी प्राधान्य दिले जाईल..
२. ई-व्हीलचेअर: हालचालींमध्ये अडचण असलेल्या पात्र दिव्यांगांना कमाल १ लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य..
३. डिजिटल उपकरणे: डिजिटल सक्षमतेसाठी टॅबलेट, टॉकिंग लॅपटॉप आणि स्क्रीन रीडर यांसारख्या उपकरणांसाठी कमाल ७५ हजार रुपये..
संपूर्ण माहिती वाचण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
facebook.com/share/p/1JuFbmH…
#दिव्यांग_सक्षमीकरण #स्वावलंबन #DisabilityEmpowerment #InclusiveDevelopment
अराजकवादी प्रवृत्ती आणि संविधानविरोधी कृतींवर मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे परखड भाष्य.. हा लेख आवर्जून वाचा!!
#लोकशाही #संविधान #SaveDemocracyRemoveAnarchy
कर्जत पंप स्टोरेज प्रकल्प : विकास आणि पर्यावरणाबाबत वस्तुस्थिती जाणून घ्या!
कर्जत तालुक्यातील सैदोंगर येथे प्रस्तावित पंप स्टोरेज प्रकल्प हा महाराष्ट्रासाठी ऊर्जा साठवणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या प्रकल्पासाठी टॉरेंट पॉवर कंपनीकडून गुंतवणूक केली जाणार असून, निर्माण होणारी वीज महाराष्ट्राला उपलब्ध होणार आहे..
नेमका हा प्रकल्प काय आहे?
पंप स्टोरेज प्रकल्पात अतिरिक्त वीज वापरून पाणी उंच जलाशयात साठवले जाते. विजेची मागणी वाढल्यावर हे पाणी खाली सोडून वीज निर्माण केली जाते. त्यामुळे सौर ऊर्जेसारख्या नवीकरणीय स्रोतांमधून मिळणाऱ्या विजेचा अधिक प्रभावी वापर करता येतो..
प्रकल्पाबाबत महत्त्वाचे मुद्दे :
- महाराष्ट्रासाठी ऊर्जा: प्रकल्पाची नियोजित क्षमता ३,००० मेगावॉट असून, राज्याच्या वीजपुरवठ्याला आणि वीजव्यवस्थेच्या स्थिरतेला मदत होणे अपेक्षित आहे..
- गुंतवणूक आणि रोजगार: प्रकल्प महाराष्ट्रात उभारला जात आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर आर्थिक आणि रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे..
- पर्यावरणीय मंजुरी: कंपनीच्या माहितीनुसार, पर्यावरणीय व वनविषयक मंजुरीसाठी सुमारे १८ महिन्यांची वैधानिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे..
- वनजमीन आणि वृक्षारोपण: प्रकल्पासाठी २३३ हेक्टर वनजमीन आवश्यक आहे. कंपनीने भरपाईच्या वनीकरणासाठी २५३ हेक्टर खासगी जमीन वन विभागाकडे दिल्याचे सांगितले आहे. कंपनीकडून ६० हजार, तर वन विभागाकडून ३० हजार झाडे लावण्याचे नियोजन आहे..
- अभयारण्यापासून अंतर: कंपनीच्या माहितीनुसार, प्रकल्प भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यापासून सुमारे १६ किमी आणि ज्योतिर्लिंग मंदिरापासून सुमारे २० किमी दूर आहे. प्रकल्पाचे घटक अभयारण्याच्या आणि पर्यावरण संवेदनशील क्षेत्राच्या बाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे..
- प्रदूषणात संभाव्य घट: कोळशावर आधारित वीजनिर्मितीची गरज कमी करण्यास मदत झाल्यास कार्बन उत्सर्जन, कोळशाचा वापर आणि औष्णिक प्रकल्पांसाठी लागणाऱ्या शीतकरणाच्या पाण्याची बचत होऊ शकते..
या प्रकल्पाबाबत पर्यावरणीय परिणाम आणि वृक्षतोडीच्या मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे विकासासोबतच वनसंपदा, जैवविविधता आणि स्थानिक नागरिकांच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी मंजुरीतील अटींची काटेकोर अंमलबजावणी व प्रभावी देखरेखही महत्त्वाची आहे..
#ऊर्जा_सुरक्षा #पर्यावरण_संवर्धन #EnergyStorage #SustainableDevelopment
जितना ज़्यादा कीचड़ उछालोगे, कमल उतना ही ज़्यादा खिलेगा!!
#ModiNahiJayega #LongLiveTheIndianRepublic
‘प्रौढ प्रताप पुरंदर’ महानाट्य नेत्रदीपक व भव्य उद्घाटन सोहळा..
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित, ‘देवेंद्र सेवा महोत्सव’ अंतर्गत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा आणि स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाचा भव्य आविष्कार असलेल्या ‘प्रौढ प्रताप पुरंदर’ या महानाट्याचा उद्घाटन सोहळा ना.शिवेंद्रराजे भोसले, मा.मुधोजी राजे भोसले आणि मा.प्रतापसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत, दुष्काळग्रस्त शेतकरी दांपत्याच्या हस्ते संपन्न झाला.
या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा गौरव करताना दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या सन्मानाला आणि मदतीला प्राधान्य देण्यात आले.
शेतकरी कुटुंबांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या जीवनात आधार निर्माण करण्याचा हा उपक्रम ‘देवेंद्र सेवा महोत्सवा’च्या सेवाभावी संकल्पनेचे प्रतीक आहे.
इतिहासाचा अभिमान, समाजाप्रती संवेदनशीलता आणि सेवेतून लोककल्याण साधण्याची भावना यांचा संगम अनुभवण्यासाठी सहकुटुंब या भव्य महानाट्याला अवश्य भेट द्या!
📍 स्थळ: जाबिंदा मैदान, बीड बायपास, छत्रपती संभाजीनगर
⏰ वेळ: दररोज सायंकाळी ६ वाजता
#DevendraSevaMahotsav #प्रौढप्रतापपुरंदर #छत्रपतीशिवाजीमहाराज #शेतकरीसन्मान #DevendraFadnavis #ChhatrapatiSambhajinagar #Maharashtra
सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.श्री.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कुटुंबीयांसमवेत स्वागत केले.
#शिवेंद्रसिंहराजे_भोसले #सदिच्छा_भेट #ChhatrapatiSambhajinagar
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.श्री.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत नगर नाका, छत्रपती संभाजीनगर येथे प्रस्तावित उड्डाणपुलाच्या अनुषंगाने पाहणी केली..
शेंद्रा ते वाळूज औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक अधिक सुरळीत व्हावी आणि कनेक्टिव्हिटी सुधारावी, या दृष्टीने प्रस्तावित उड्डाणपुलाच्या नियोजनाचा आढावा घेतला..
या प्रकल्पामुळे औद्योगिक वाहतूक अधिक सुरळीत होण्यास आणि प्रवासाचा वेळ कमी होण्यास मदत होईल.. शहराच्या व औद्योगिक क्षेत्राच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन आधुनिक पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहोत..
#वाहतूक #Infrastructure #Development #ChhatrapatiSambhajinagar
सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.श्री.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपल्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली..
कुटुंबीयांसमवेत त्यांचे स्वागत करून विविध विषयांवर औपचारिक, अनौपचारिक चर्चा केली..
#सदिच्छा_भेट #ShivendrasinhRajeBhosale
रामायणाचे रचनाकार महर्षी वाल्मिकी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांचे आदर्श जीवन रामायणातून सर्वांपर्यंत पोहोचविणाऱ्या महर्षी वाल्मिकी यांचे साहित्य सत्य व कर्तव्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देते.
#महर्षी_वाल्मिकी #जयंती #MaharshiValmiki #ValmikiJayanti
देवेंद्र सेवा महोत्सव अंतर्गत ‘शिवतेजाचा हुंकार, बळीराजाला मदतीचा आधार!’ या संकल्पनेतून शहरात प्रथमच हे महानाट्य सादर होणार आहे.. सर्वांनी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित रहावे!
प्रताप पुरंदर महानाट्य पत्रकार परिषद संपन्न..
#देवेंद्र_सेवा_महोत्सव #बळीराजा #DevendraSevaMahotsav #PratapPurandar
पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांचे उद्बोधक विचार, देशातील महत्त्वाच्या घडामोडी आणि विकासाचा दृष्टिकोन जाणून घेण्यासाठी..
‘मन की बात’ नक्की ऐका!
रविवार, दि. २५ ऑक्टोबर २०२६
वेळ : सकाळी ११ वा.
#मन_की_बात #जनसंवाद #MannKiBaat #PMModi
तीर्थक्षेत्र रांजणगाव येथे महागणपतीचे दर्शन घेऊन आरती केली..
राज्यातील शेतकऱ्यांना समृद्धी लाभावी, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली..
#रांजणगाव #महागणपती #ranjangaon
संपूर्ण महाराष्ट्रात विशेष मतदार नोंदणी शिबिरे!
लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक पात्र नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यासाठी मतदार यादीत आपले नाव योग्य तपशिलांसह नोंदलेले असणे आवश्यक आहे.. मतदार यादीतील नाव व तपशील तपासून घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात २४ व २५ ऑक्टोबर रोजी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे..
आपल्या नियुक्त मतदान केंद्रावर जाऊन मतदार यादीतील नाव, पत्ता आणि इतर तपशील तपासून घ्या. नाव वगळले असल्यास नोंदणीसाठी, तसेच तपशिलांमध्ये चूक असल्यास दुरुस्ती किंवा बदलासाठी आवश्यक अर्ज करता येईल..
वेळेत मतदार यादी तपासून आपला मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवा आणि लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी सजग नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडावी, ही विनंती..
#मतदार_नोंदणी #लोकशाही #VoterRegistration #ElectionCommission
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन करण्यात आले..
पुण्यातील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी येथे संपन्न झालेल्या या शिबिराचा उद्देश भटक्या जमाती आणि विमुक्त जातींमधील नागरिकांना १४ प्रकारची प्रमाणपत्रे, ६ शासकीय योजनांचे लाभ तसेच इतर विभागांच्या योजनांचा लाभ मिळवून देणे हा आहे.. शासन, प्रशासन आणि सामाजिक संघटनांमध्ये समन्वय साधून शासकीय सेवा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यावर यावेळी भर देण्यात आला..
‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियानात’ राज्यातील ३६ जिल्ह्यांमधील ९३६ वस्त्यांचा समावेश करण्यात आला.. एकूण ७६६ ठिकाणी आयोजित शिबिरांतून ७६ हजार १७५ लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रे आणि योजनांचे लाभ देण्यात आले.. यामध्ये ११ हजार २५८ जात प्रमाणपत्रे, ८ हजार २८७ आयुष्मान भारत कार्ड, ८ हजार २६६ शिधापत्रिका, ८ हजार २१२ उत्पन्नाचे दाखले आणि ६ हजार ३२६ आधार कार्ड वितरित करण्यात आले.. याशिवाय इतर आवश्यक प्रमाणपत्रे आणि योजनांचे लाभही देण्यात आले..
या मोहिमेद्वारे आतापर्यंत विमुक्त जाती आणि भटक्या जमातींमधील नागरिकांना एकूण ३ लाख २७ हजार ६७३ शासकीय प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहे.. नागरिकांना शासकीय कार्यालयांमध्ये जाण्याऐवजी शासनाने त्यांच्या वस्त्यांपर्यंत पोहोचून सेवा द्यावी, हा या अभियानामागील महत्त्वाचा विचार आहे..
यावेळी सचिव श्री.आप्पासाहेब धुळाज, भटके-विमुक्त विकास परिषदेचे अध्यक्ष श्री.उद्धवराव काळे, डॉ.संजय पुरी, श्री.शरद माकर यांच्यासह परिषदेचे १५० सदस्य तसेच महसूल विभाग आणि इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते..
#भटके_विमुक्त #शासकीय_योजना #TribalWelfare #GovernmentSchemes
रांजणगाव येथील महागणपतीचे दर्शन घेऊन आरती केली..
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!!
#रांजणगाव #MahaGanpati
आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताची ऐतिहासिक कामगिरी : ११४ पदकांसह नवा विक्रम!
२०२६ च्या आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताने ऐतिहासिक कामगिरी केली. जपानमधील आयची-नागोया येथे ही स्पर्धा झाली. भारतीय दिव्यांग खेळाडूंनी या स्पर्धेत एकूण ११४ पदके जिंकली. यात ३० सुवर्ण, ३५ रौप्य आणि ४९ कांस्य पदकांचा समावेश आहे. भारताने पदकतालिकेत चौथे स्थान मिळवले.
संपूर्ण माहिती वाचण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
facebook.com/share/p/1Bg3ZUY…
#आशियाई_पॅरा_गेम्स #दिव्यांग_खेळाडू #AsianParaGames #ParaSports #KheloIndia


































