
भारतीय जनता पार्टी • #Political & #Social Activist • मराठा •
MUMBAI
Joined July 2011
- Tweets19.4K
- Following762
- Followers4K
- Likes12.2K
vikas pawar retweeted
संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी सर्वस्व अर्पण केलेल्या सर्व हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली!
#हुतात्मा_स्मृतीदिन #HutatmaSmrutiDin #संयुक्त_महाराष्ट्र_चळवळ #Maharashtra
vikas pawar retweeted
आजपासून सुरु होणाऱ्या तुळशी विवाह पर्वानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🌿🪔
#TulsiVivah #TulsiVivah2026 #KartikEkadashi
vikas pawar retweeted
जागतिक मत्स्यव्यवसाय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
सर्व कोळी बांधवांना, मच्छीमारांना आणि मत्स्यव्यवसायिकांना मनःपूर्वक शुभेच्छा !
महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या आणि लाखो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या प्रगतीसाठी आपण सर्वजण कटिबद्ध होऊया!
#WorldFisheriesDay #जागतिकमत्स्यव्यवसायदिन
vikas pawar retweeted
महाराष्ट्र सागरी मंडळाच्या संचालक मंडळाची ८९ वी बैठक आज बॅलार्ड इस्टेट, मुंबई येथे पार पडली.
या बैठकीत मुंबई महानगर प्रदेशात वॉटर मेट्रो सुरू करणे, दिघी, रायगड येथे पाईल जेट्टीचे बांधकाम करणे तसेच मासळी उतरवण्याच्या केंद्रावर मच्छीमारांना मूलभूत सोयी सुविधा पुरविणे, रेवस येथे रो-रो जेट्टीचे बांधकाम, अलिबाग येथील मानकुळे येथील धरमतर खाडीकिनारी शिपयार्ड प्रकल्प उभारण्याकरिता मे.शिपटेक मरीन सोल्युशन कंपनीच्या प्रस्तावास मान्यता देणेबाबत, पनवेल येथील खाडीमध्ये बहुउद्देशीय जेट्टी प्रकल्प उभारणेकरिता मे.फेमस ड्रेजिंग कॉर्पोरेशन यांना दिलेल्या इरादापत्रास मुदतवाढ देणेबाबत, NW 10,91 आणि 83 या राष्ट्रीय जलमार्गांवर VTMS केंद्र उभारण्यासाठी IWAI ला जागा उपलब्ध करून देण्याबाबत दिलेल्या परवानगीस कार्योत्तर मंजुरी प्रदान करणे, वर्सोवा ते मढ आणि गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा या जलमार्गांवर प्रवासी वाहतुकीसाठी MMB मार्फत रो पॅक्स बोट आणि स्पीड बोट खरेदी करणेबाबत, नाबार्ड अर्थसहाय्यित FIDF व RIDF योजनेअंतर्गत हाती घ्यावयाच्या मत्स्यबंदरांच्या कामाबाबत बैठकी सविस्तर चर्चा झाली.
राज्यातील सागरी वाहतूक, बंदरे आणि किनारी पायाभूत सुविधांच्या विकासाला अधिक गती देऊन महाराष्ट्राला देशातील अग्रगण्य सागरी राज्य बनविण्याच्या दिशेने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली.
बैठकीस बंदरे विभागाचे अपर मुख्य सचिव श्री.संजय सेठी, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.पी.प्रदीप, निमंत्रित सदस्य तसेच महाराष्ट्र सागरी मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mahamaritime1
vikas pawar retweeted
The 89th meeting of the Board of Directors of the Maharashtra Maritime Board (MMB) was held today at Ballard Estate, Mumbai.
The meeting held detailed discussions on several important initiatives, including:
Introducing a Water Metro service in the Mumbai Metropolitan Region (MMR).
Construction of a pile jetty at Dighi, Raigad, and provision of basic amenities for fishermen at fish landing centres.
Construction of a Ro-Ro jetty at Rewas.
Approval of the proposal submitted by M/s Shiptech Marine Solutions for developing a shipyard project along the Dharamtar Creek at Mankule, Alibaug.
Extension of the Letter of Intent issued to M/s Famous Dredging Corporation for developing a multipurpose jetty project in the creek at Panvel.
Ex-post facto approval for the permission granted to the Inland Waterways Authority of India (IWAI) to provide land for setting up Vessel Traffic Management System (VTMS) centres along National Waterways 10, 91 and 83.
Procurement of Ro-Pax boats and speedboats by the MMB to facilitate passenger transportation on the Versova–Madh and Gateway of India–Mandwa routes.
Development of fishing harbour infrastructure under the NABARD-funded Fisheries and Aquaculture Infrastructure Development Fund (FIDF) and Rural Infrastructure Development Fund (RIDF) schemes.
The meeting marked an important step towards accelerating the development of maritime transport, ports and coastal infrastructure in Maharashtra, with the vision of positioning the state as one of India's leading maritime states.
The meeting was attended by Mr Sanjay Sethi, Additional Chief Secretary, Ports Department; Mr P. Pradeep, Chief Executive Officer, Maharashtra Maritime Board; invited members; and representatives of the Maharashtra Maritime Board.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mahamaritime1
vikas pawar retweeted
राज्यातील बंदरे विभागाशी संबंधित सर्व स्टेकहोल्डर्ससोबत आज महाराष्ट्र सागरी मंडळाच्या (MMB) बॅलार्ड इस्टेट येथील कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीत राज्यातील बंदरांची कार्यक्षमता वाढवणे, पायाभूत सुविधांचा विकास, रस्ते व रेल्वे कनेक्टिव्हिटी, बंदरांशी संबंधित नियामक बाबी, सागरी सुरक्षा, सायबर सुरक्षा तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
बंदर संचालकांनी मांडलेल्या विविध समस्या व सूचनांची नोंद घेऊन त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याबाबत चर्चा केली. राज्यातील बंदरांच्या विकासासाठी शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही यावेळी दिली.
बैठकीस अपर मुख्य सचिव संजय सेठी, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी., पोर्ट ऑपरेटर्स व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
A crucial meeting was held today at the Maharashtra Maritime Board (MMB) office in Ballard Estate with all stakeholders associated with the Ports Department of the State.
The meeting involved detailed discussions on enhancing the operational efficiency of ports across the state, infrastructure development, road and rail connectivity, regulatory matters concerning ports, maritime safety, cybersecurity, and the adoption of modern technologies.
Various issues and suggestions raised by the Port Directors were taken into consideration, and discussions were held on taking positive decisions to address them. It was assured that the State Government would extend all necessary support for the development of ports across Maharashtra.
The meeting was attended by Additional Chief Secretary Sanjay Sethi, Chief Executive Officer of the Maharashtra Maritime Board, Pradeep P., port operators and other concerned officials.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mahamaritime1
vikas pawar retweeted
‘विकसित महाराष्ट्र २०४७’ या व्हिजन डॉक्युमेंटच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सन २०२९ पर्यंत बंदरे विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध विकासकामांचा क्षेत्रनिहाय कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे. यासंदर्भात आज MMBच्या मुंबई येथील कार्यालयात बैठक घेऊन सुरू असलेल्या कामांचा आणि नियोजित उपक्रमांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला.
राज्यातील बंदरे क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याच्या दृष्टीने बंदरे विभागाशी संबंधित आयटीआय कौशल्य विकास अभ्यासक्रम तसेच पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यासाठी निवडक आयटीआय संस्थांना प्रत्यक्ष भेटी देऊन आवश्यक पायाभूत सुविधा तातडीने विकसित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शिप बिल्डिंग, पोर्ट ऑपरेशन्स, लॉजिस्टिक्स, मरीन मेकॅनिक्स, कोस्टल मॅनेजमेंट आणि सागरी सुरक्षा अशा रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांवर विशेष भर देण्यात येणार आहे.
वाढवण बंदर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या मोठ्या संधी लक्षात घेता, उद्योगांच्या भविष्यातील गरजांनुसार कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रम विकसित करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. या माध्यमातून स्थानिक तरुणांना आवश्यक कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांच्यासाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर राहणार आहे.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mahamaritime1
vikas pawar retweeted
Mumbai Water Metro Moves a Step Closer to Reality!
A major step forward in Mumbai's journey towards faster, smoother and more convenient water-based transport.
TYPSA India Pvt. Ltd. – RINA Consulting SpA has been selected as the joint venture for the appointment of Project Management Consultant (PMC) for Phase 1 of the Mumbai Water Metro project.
At the 89th Board Meeting of the Maharashtra Maritime Board, approval was granted to submit a proposal to the State Government for administrative approval of the ₹31.98 crore consultancy fee.
This marks an important step towards accelerating the planning and implementation of Mumbai Water Metro, strengthening the city's public transport network under the vision of Hon'ble CM Shri @Dev_Fadnavis Ji.
@CMOMaharashtra @mahamaritime1
#WaterMetro #Mumbai
vikas pawar retweeted
मुंबईतील प्रवास अधिक सुलभ, जलद आणि आरामदायी करण्याच्या दृष्टीने मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (PMC) नियुक्त करण्याकरिता राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत TYPSA India Pvt. Ltd. – RINA Consulting SpA या संयुक्त उपक्रमाची यशस्वी निवड करण्यात आली आहे.
या संयुक्त उपक्रमास ₹३१.९८ कोटी सल्लागार शुल्कास प्रशासकीय मान्यता मिळविण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यास महाराष्ट्र सागरी मंडळाच्या संचालक मंडळाच्या आज मुंबई येथे पार पडलेल्या ८९ व्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
या निर्णयामुळे मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाच्या पुढील नियोजन व अंमलबजावणी प्रक्रियेला गती मिळण्यास मदत होणार आहे.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis
vikas pawar retweeted
जागतिक सागरी क्षेत्रात भारताची दमदार कामगिरी!
BIMCO-ICS सीफेरर वर्कफोर्स रिपोर्ट २०२६ नुसार, भारताने जगातील दुसऱ्या क्रमांकाचा खलाशी पुरवठादार देश म्हणून मानाचे स्थान प्राप्त केले आहे. जागतिक खलाशी मनुष्यबळामध्ये भारताचा वाटा १२.१६ टक्क्यांवर पोहोचला असून, जगभरातील प्रत्येक आठ खलाशांपैकी सुमारे एक खलाशी भारतीय आहे.
भारताची ही कामगिरी जागतिक सागरी क्षेत्रातील देशाचे वाढते महत्त्व, कुशल मनुष्यबळाची क्षमता आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील भक्कम स्थान अधोरेखित करणारी आहे.
@narendramodi @Dev_Fadnavis
@sarbanandsonwal
#MaritimeIndia #GlobalMaritime #IndiaRising
vikas pawar retweeted
भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. रविंद्रजी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथे भाजपा कोअर कमिटीची बैठक पार पडली.
पक्षाची आगामी राजकीय रणनीती, संघटनात्मक बळकटीकरण, पक्षविस्तार तसेच आगामी काळातील पक्षाची संघटनात्मक वाटचाल यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीस मंत्री श्री.चंद्रशेखर बावनकुळे जी, श्री.चंद्रकांतदादा पाटील, श्री.आशिष शेलार, श्री.गिरीष महाजन, श्री.जयकुमार गोरे, श्री.मंगलप्रभात लोढा जी, श्री.संजय सावकारे, श्री.आकाश फुंडकर, श्री.अशोक उइके, श्री.अतुल सावे, राज्यमंत्री पंकज भोयर, राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर, मुख्य प्रवक्ते नवनाथ बन, माध्यम प्रमुख गोविंद येत्येकर उपस्थित होते.
@BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @RaviDadaChavan #भाजपा #संघटनात्मक_बैठक #mumbai #Maharashtra
vikas pawar retweeted
मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis
vikas pawar retweeted
दुष्काळी परिस्थितीच्या संकटातून नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने सर्वसमावेशक भूमिका घेतली आहे. केवळ आर्थिक मदतीपुरते मर्यादित न राहता शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, पशुधन आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या हिताचा विचार करून राज्य सरकारने १२ महत्त्वपूर्ण उपाययोजना जाहीर केल्या आहेत. दुष्काळाच्या कठीण काळात या उपाययोजना निश्चितच सर्वसामान्यांना मोठा आधार देणाऱ्या ठरतील.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis
#महायुती_सरकार #शेतकरी #दुष्काळ #राज्य_सरकार #महाराष्ट्र
vikas pawar retweeted
Has Rahul Gandhi ji even bothered to pay a tribute to Hon late Balasaheb Thackeray on his death anniversary?
Speaks volumes about the regard he has for Balasaheb and his legacy. And yet, the Thackerays seem all too happy to dance to his tunes!
VAKARE!
vikas pawar retweeted
प्रखर हिंदुत्ववादी विचारांचे, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !
#BalasahebThackeray
vikas pawar retweeted
विश्व हिंदू परिषदेचे शिखरपुरुष, श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे नायक श्रद्धेय अशोक सिंघलजी यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
#AshokSinghalJi #VishwaHinduParishad
vikas pawar retweeted
नवी मुंबई ते सिंधुदुर्ग (चिपी) Fly91 विमानसेवेचा आज शुभारंभ करण्यात आला. यावेळचे काही क्षण.. ✈️
#Sindhudurg #ChipiAirport #Fly91 #KokanTourism
vikas pawar retweeted
दोन वर्षांच्या खंडानंतर चिपी विमानतळावरून नवी मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा आज पुन्हा सुरू झाली. फ्लाय ९१ विमानसेवेच्या शुभारंभप्रसंगी नवी मुंबई ते चिपी सिंधुदुर्ग असा प्रवास करून आनंद व्यक्त केला.
खासदार श्री. नारायणराव राणे साहेब यांनी पाहिलेले सिंधुदुर्गच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीम. सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या सहकार्यामुळे हा महत्त्वाचा टप्पा गाठता आला आहे. सिंधुदुर्ग विमानतळ आता पुन्हा कधीही बंद पडणार नाही, यासाठी शासन कटिबद्ध आहे.
हा विमानतळ केवळ प्रवासाचे साधन नसून सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाचे आणि स्थानिक तरुण-तरुणींच्या रोजगारनिर्मितीचे नवे दालन आहे. पर्यटन व्यवसाय, टुरिस्ट वाहतूक आणि विविध सेवा क्षेत्रांतील संधींचा लाभ जिल्ह्यातील स्थानिक तरुणांना मिळावा, यासाठी आमचा प्रयत्न राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्याला दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत राज्यातील पहिल्या तीन जिल्ह्यांमध्ये आणण्याचा आमचा संकल्प आहे!
यावेळी आमदार निलेशजी राणे, आमदार दीपक केसरकर जी, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा बासूर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, देवगड तालुकाध्यक्ष बंड्या नारकर, कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, दिलीप तळेकर, वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @MeNarayanRane @mieknathshinde @SunetraA_Pawar @meNeeleshNRane @dvkesarkar
#Sindhudurg #ChipiAirport #NaviMumbaiToSindhudurg #Fly91 #FlightServices #SindhudurgDevelopment #KonkanDevelopment #TourismDevelopment




































