District Information Office, Latur (@Infolatur) header
District Information Office, Latur (@Infolatur) profile picture

Official Twitter Handle of District Information Office, Directorate General Of Information & Public Relations, Government of Maharashtra, #Latur

Latur
Joined July 2015
Photo by District Information Office, Latur (@Infolatur)Photo by District Information Office, Latur (@Infolatur)Photo by District Information Office, Latur (@Infolatur)Photo by District Information Office, Latur (@Infolatur)Photo by District Information Office, Latur (@Infolatur)Photo by District Information Office, Latur (@Infolatur)Photo by District Information Office, Latur (@Infolatur)Photo by District Information Office, Latur (@Infolatur)Photo by District Information Office, Latur (@Infolatur)Photo by District Information Office, Latur (@Infolatur)
District Information Office, Latur retweeted
📍 नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लोहारी सावंगा येथील शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या घरी आगमन झाले. कुटुंबातील सदस्यांशी त्यांनी आपुलकीने संवाद साधला.. @Dev_Fadnavis #लोहारीसावंगा #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali
21
4
128
6,558
District Information Office, Latur retweeted
📍 इटकी (ता. सांगोला, जि. सोलापूर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यानुसार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी इटकी येथील शेतकरी पोपट गोविंद सावंत यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांसमवेत #दिवाळी साजरी केली. यावेळी मंत्री भोसले यांनी सावंत कुटुंबीयांना दिवाळीचा फराळ व आहेर देत शुभेच्छा दिल्या. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता धैर्याने परिस्थितीचा सामना करावा, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सावंत यांच्या कुटुंबात तीन सदस्य असून त्यांच्या नावे १ हेक्टर २६ आर शेतजमीन आहे. या क्षेत्रात मका व बाजरी पिकांची लागवड करण्यात आली होती. पर्जन्यमानातील तुटवड्यामुळे मक्याचे ०.५० हेक्टर व बाजरीचे ०.५० हेक्टर असे एकूण १ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. बाधित क्षेत्राचा पंचनामा पूर्ण करण्यात आला असून शासन निर्णयानुसार त्यांच्या खात्यावर अग्रीम आर्थिक मदत जमा करण्यात आली आहे. यावेळी मंत्री भोसले यांनी सावंत कुटुंबीयांशी संवाद साधून शेतीची सद्यस्थिती, पिकांचे नुकसान तसेच शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या मदतीबाबत माहिती घेतली. @Dev_Fadnavis @Shivendraraje11 #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali
9
15
2,334
District Information Office, Latur retweeted
📍अहिल्यानगर कळसपिंपरी (ता. पाथर्डी )येथे जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार मोनिका राजळे यांनी दुष्काळग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. दुष्काळाच्या संकटात शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांनी स्वतःला एकटे समजू नये. राज्य शासन प्रत्येक संकटात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, दुष्काळ निवारणासाठी विविध उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. शेतकरी, पशुधन आणि ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. प्रशासनाने शासनाच्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करून दुष्काळाच्या संकटावर मात करण्यासाठी समन्वयाने काम करावे, असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी दुष्काळग्रस्त शेतकरी भीमसेन शंकर भवार यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस केली. कुटुंबीयांना दिवाळीचा फराळ आणि कपडे देत त्यांना दिलासा दिला. पालकमंत्री डॉ. विखे पाटील आणि आमदार मोनिका राजळे यांनी भवार कुटुंबीयांसोबत जेवण करून दिवाळीचा आनंद साजरा केला. गावातील इतर कुटुंबीयांनाही दिवाळीचा फराळ आणि फटाक्यांचे वाटप करण्यात आले. आगामी आठ ते नऊ महिन्यांतील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने आतापासूनच पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देशही मंत्री विखे पाटील यांनी दिले. पशुसंवर्धन आणि कृषी विभागाच्या संयुक्त पाहणीतून पशुधनाची संख्या तसेच उपलब्ध चाऱ्याचा आढावा घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे पशुधन सुरक्षित राहावे आणि चारा टंचाईचा प्रश्न निर्माण होऊ नये, या दृष्टीने प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. @Dev_Fadnavis @RVikhePatil #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali
1
8
72
4,930
District Information Office, Latur retweeted
📍नागपूर लोहारी सावंगा गावातील ग्रामपंचायत आवारातील सभामंडपात गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने आयोजित प्रार्थना सभेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामस्थांना अश्वस्त केले. राज्यात दुष्काळी परिस्थितीत राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. आर्थिक मदतीसह विविध योजनांचा आधार दुष्काळग्रस्तांना दिला जात आहे. शेतकरी संकटात असताना दिवाळीचे हे पर्व त्याला धीर देण्यात घालवावे, या उद्देशाने आम्ही गावात आलो आहोत. आगामी काळातही अनेक योजना लागू करण्यात येणार असून या अस्मानी संकटाचा सर्वांना एकजुटीने सामना करावा लागेल, त्यांनी सांगितले. हे वर्ष आव्हानांचे आहे. पावसाने शेवटपर्यंत दडी मारल्याने अतोनात नुकसान झाले आहे. राज्यात काही ठिकाणी चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या कठीण प्रसंगी राज्य सरकार भक्कमपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहे. लाखो शेतकऱ्यांना या कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र, दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांपुढे पुन्हा एकदा संकट उभे ठाकले आहे. त्यासाठी आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना थेट मदतीचा हात दिला आहे. शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करता यावी यासाठी सरकारने सुमारे दीड कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांची रक्कम जमा केली आहे. ही रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरूच आहे. शेतकऱ्यांचे विज बिल माफ करण्यात आले आहे. शिवाय वीज बिलाची थकबाकी देखील माफ करण्यात आली आहे. जलसंधारणाची कामे व्यापक प्रमाणात हाती घेतली जाणार आहेत. लोकांच्या आरोग्यासह विविध प्रश्न दूर करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनांमध्ये फार मोठी शक्ती आहे. संकटकाळात व्यक्ती कितीही खचली तरी राष्ट्रसंतांच्या विचारांनी त्याला उभारी मिळते. त्यांच्या ग्रामगीतेचा विचार गावांना सर्वच अंगांनी समृद्ध बनवतो. दुष्काळाच्या काळात आपण नेमके काय केले केले पाहिजे, यावर राष्ट्रसंतांनी मांडलेले विचार अत्यंत प्रेरक आणि दिशादर्शक आहेत. गुरुदेवांच्या या विचारांनी देखील आम्हा सर्वांना या संकटाचा सामना करण्याचे बळ मिळो - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सर्वश्री चरणसिंह ठाकूर, आशिष देशमुख, डॉ. राजीव पोतदार, माजी आमदार सुधाकर कोहळे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी आदी उपस्थित होते. @Dev_Fadnavis @cbawankule #लोहारीसावंगा #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali
9
1
9
681
District Information Office, Latur retweeted
📍 नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लोहारी सावंगा येथील शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या निवासस्थानी दिवाळीनिमित्त त्यांच्या कुटुंबियांसमवेत घरगुती भोजनाचा आनंद घेतला. सर्वांशी आपुलकीने संवाद साधला... @Dev_Fadnavis #लोहारीसावंगा #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali
17
4
46
3,402
⚖️ चेक बाऊन्स प्रकरणांसाठी लातूरमध्ये विशेष लोकअदालत ! #लातूर जिल्हा व सत्र न्यायालय तसेच सर्व तालुका न्यायालयांमध्ये परक्राम्य संलेख अधिनियम कलम १३८ (चेक बाऊन्स) प्रकरणांसाठी विशेष लोकअदालत आयोजित करण्यात येत आहे. #latur #legalservices #lokadalat #lawandjustice #legalawareness
🤖 Made with AI
1
334
District Information Office, Latur retweeted
8
13
1,235
District Information Office, Latur retweeted
On #PoliceCommemorationDay 2026, the nation honours the supreme sacrifice of our brave police personnel at the National Police Memorial, New Delhi. Watch the telecast as Union Home Minister Shri Amit Shah, Chief Guest, pays tribute to police martyrs!
1
17
20
2,853
District Information Office, Latur retweeted
Tomorrow, 31 October — India celebrates Rashtriya Ekta Diwas, the 151st birth anniversary of #SardarPatel, the Iron Man who unified 560+ princely states into one nation. Watch the grand National Unity Parade live from Ekta Nagar, Gujarat. National Unity Day 🇮🇳 #EktaDiwas
51
1
40
2,345
राज्यातील ३०४ दुष्काळी तालुक्यांमध्ये खरीप हंगामात ३३ टक्क्यांपेक्षा अधिक पीक नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रिम मदत थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. #दुष्काळ #MahaDGIPR
2
498
महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जन्म वर्ष कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येणारे उपक्रम #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
238
महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जन्म वर्षानिमित्त ‘मराठी भाषा दूत’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद. #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
251
महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जन्म वर्षानिमित्त पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत राबविण्यात येणारे उपक्रम. #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
1
225
महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जन्म वर्षानिमित्त अल्पसंख्याक विकास विभागाचे विविध उपक्रम #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
199
#छत्रपतीसंभाजीनगर ५-औरंगाबाद #पदवीधरमतदारसंघ मतमोजणी प्रक्रियेस सुरुवात, मतमोजणी केंद्रावर कडेकोट बंदोबस्त
3
8
677
#छत्रपतीसंभाजीनगर ५-औरंगाबाद #पदवीधरमतदारसंघ मतमोजणी प्रक्रियेस सुरुवात, मतमोजणी केंद्रावर कडेकोट बंदोबस्त @mahadgipr @dgipr_marathwada @collectoroffice_csn @zpcsnofficial @ceo_maharashtra @maharashtrasec
3
8
852
महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जन्म वर्ष : महसूल विभागामार्फत राबविण्यात येणारे उपक्रम #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
3
330
चारा पीक लागवडीच्या अंदाजपत्रकास मान्यता #चारा #दुष्काळ
1
226
अजूनही वेळ गेलेली नाही! 🗳️ आजच मतदार नोंदणी करा ! #eci
1
1
759
फक्त ४ महिन्यांत चारा लागवडीतून दीड लाखांपर्यंत उत्पन्न शक्य! 🌱 'व्हीबी-जी राम जी' अंतर्गत रब्बी हंगामात पाण्याची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे. 🗓️ ऑनलाईन अर्जाची अंतिम मुदत: १ नोव्हेंबर २०२६ 🌐 अर्जासाठी : लातूर जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर भेट द्या.
1
1
5
617