राज | Raj (@MarathiPremi) header
राज | Raj (@MarathiPremi) profile picture

नास्तिक. मराठी शाळा. बेळगाव सीमाप्रश्न. प्रबोधनकार / तुकाराम. || जय भीम, जय शिवाजी, जय मराठी ||

संयुक्त महाराष्ट्र
Joined March 2019
Photo by राज | Raj (@MarathiPremi)Photo by राज | Raj (@MarathiPremi)Photo by राज | Raj (@MarathiPremi)Photo by राज | Raj (@MarathiPremi)Photo by राज | Raj (@MarathiPremi)Photo by राज | Raj (@MarathiPremi)Photo by राज | Raj (@MarathiPremi)Photo by राज | Raj (@MarathiPremi)Photo by राज | Raj (@MarathiPremi)Photo by राज | Raj (@MarathiPremi)
मुंबई सोडून उर्वरित महाराष्ट्रावर अणुबॉम्ब पडला तरी मुंबईतील मराठी माणूस उत्साहाने दिवाळी साजरी करेल. इतक्या भयानक पद्धतीने त्याची नाळ उर्वरित महाराष्ट्राशी तुटलेली आहे. "मराठी समाज" हा आपल्या विस्तारित कुटुंबाचा भाग आहे. ही साधी भावना सुद्धा आपल्याला रुजवता आली नाही.
1
7
157
मराठी माणसाने घराबाहेर पडून या बलिदानाला वंदन केले पाहिजे. येत्या २१ नोव्हेंबरला आम्ही संयुक्त महाराष्ट्र लढ्याशी संबंधित मुंबईतील १०-१२ ठिकाणी हुतात्म्यांना अभिवादन करायला जाणार आहोत. तुम्हीही यात सहभागी व्हा. (हुतात्मा चौक, मेट्रो सिनेमाचा चौक, ठाकुरद्वार नाका, राजभवन खेतवाडी सातवी गल्ली, शाहीर अमर शेख मार्ग सात रस्ता, गाडगे महाराज उद्यान सात रस्ता, वरळी आचार्य अत्रे चौक, परळ कामगार मैदान किंवा दळवी बिल्डिंग, पोर्तुगीज चर्च समोर प्रबोधनकार ठाकरे यांचा पुतळा, शिवाजी पार्क सेनापती बापट यांचा पुतळा, चैत्यभूमी, शिवाजी महाराजांचा पुतळा शिवाजी पार्क, संयुक्त महाराष्ट्र दालन शिवाजी पार्क) इतर शहरात / गावात राहत असाल तर तुमच्या शहराच्या / गावाच्या मुख्य ठिकाणी, महापुरुषांच्या स्मारकाजवळ किंवा स्थानिक चौकात जमा होऊन हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करा. जय मराठी, जय महाराष्ट्र! #महाराष्ट्रधर्म #मराठी #हुतात्मास्मारक #संयुक्तमहाराष्ट्र #जयमराठी #जयमहाराष्ट्र #Marathi #SanyuktMaharashtra #MaharashtraDharma #MarathiAbhyasKendra #मराठीअभ्यासकेंद्र #२१नोव्हेंबर
6
15
214
#२१नोव्हेंबर महाराष्ट्रवाद्यात हुरूप संचारला. लाठीहल्ला करून, अश्रुधूर सोडूनही मराठी लोक घाबरत नाहीत. उलट अधिकच त्वेषाने लढण्यास सज्ज होतात. २१ नोव्हेम्बर १९५५ हा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील महत्त्वाचा व अविस्मरणीय दिवस ठरला. संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी परिसर दणाणून जात होता. मुंबईला जणू युद्धभूमीचे स्वरूप प्राप्त झालं होतं. फ्लोरा फाऊंटनजवळ तर सशस्त्र पोलिसांची भिंतच उभी केली होती. पण लोकांचा निर्धार तसूभरही ढळला नाही. काहीही करून विधानसभा गाठायचीच असं त्यांनी मनोमन ठरवलं होतं. प्रेतांचा खच पडला तरी बेहत्तर ! जय मराठी, जय महाराष्ट्र #महाराष्ट्रधर्म #मराठी #महाराष्ट्र #मराठीअभ्यासकेंद्र #हुतात्मादिन #संयुक्तमहाराष्ट्र #MaharashtraDharma #MarathiAbhyasKendra #HutatmaDin #Hutatma #SanyuktMaharashtra
1
5
26
312
२१ नोव्हेंबर संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा हुतात्मा दिन... आहे ना लक्षात ?
16
78
587
येत्या २१ नोव्हेंबरला आम्ही संयुक्त महाराष्ट्र लढ्याशी संबंधित मुंबईतील १०-१२ ठिकाणी हुतात्म्यांना अभिवादन करायला जाणार आहोत. तुम्हीही यात सहभागी व्हा. २१ नोव्हेंबर १९५५ : संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील निर्णायक दिवस कोणत्याही परिस्थितीत विधानसभेत त्रिराज्य योजना संमत करू द्यायची नाही, हा मराठी लोकांचा वज्र निर्धार होता. १८ नोव्हेंबरला सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली हजारो लोकांचा मोर्चा फ्लोरा फाउंटनकडे निघाला. बंदी मोडून पुढे जाताना लाठीहल्ला, अश्रुधूर झाला, तरी लोक हटले नाहीत. विधानसभेचे कामकाज २१ पर्यंत तहकूब झाले. २१ नोव्हेंबरला संयुक्त महाराष्ट्र कृती समितीने पुकारलेल्या संपाला सुमारे चार लाख कामगारांनी साथ दिली. सकाळपासून ओव्हल मैदानावर झुंडीच्या झुंडी जमा होऊ लागल्या. पुन्हा सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली फ्लोरा फाऊंटनकडे निघालेला मोर्चा लाठी, अश्रुधूर आणि गोळीबाराला न‌ जुमानता पुढे जातच राहिला. त्यात १५ जण हुतात्मा झाले, तीनशेहून अधिक जखमी झाले, पण मराठी बाणा झुकला नाही. अखेर त्रिराज्य योजना बारगळली आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याने पेट घेतला. येत्या २१ नोव्हेंबरला आम्ही संयुक्त महाराष्ट्र लढ्याशी संबंधित मुंबईतील १०-१२ ठिकाणी हुतात्म्यांना अभिवादन करायला जाणार आहोत. तुम्हीही यात सहभागी व्हा. इतर शहरात राहत असाल तर तुमच्या शहराच्या मुख्य ठिकाणी, महापुरुषांच्या स्मारकाजवळ किंवा स्थानिक चौकात जमा होऊन हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करा. (हुतात्मा चौक, मेट्रो सिनेमाचा चौक, ठाकुरद्वार नाका, राजभवन खेतवाडी सातवी गल्ली, शाहीर अमर शेख मार्ग सात रस्ता, गाडगे महाराज उद्यान सात रस्ता, वरळी आचार्य अत्रे चौक, परळ कामगार मैदान किंवा दळवी बिल्डिंग, पोर्तुगीज चर्च समोर प्रबोधनकार ठाकरे यांचा पुतळा, शिवाजी पार्क सेनापती बापट यांचा पुतळा, चैत्यभूमी, शिवाजी महाराजांचा पुतळा शिवाजी पार्क, संयुक्त महाराष्ट्र दालन शिवाजी पार्क) मराठी माणसाने घराबाहेर पडून त्या बलिदानाला वंदन केले पाहिजे. हुतात्म्यांना विनम्र अभिवादन! जय मराठी, जय महाराष्ट्र! #महाराष्ट्रधर्म #मराठी #हुतात्मास्मारक #संयुक्तमहाराष्ट्र #जयमराठी #जयमहाराष्ट्र #Marathi #SanyuktMaharashtra #MaharashtraDharma #MarathiAbhyasKendra #मराठीअभ्यासकेंद्र
9
39
414
उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री महाराष्ट्राचं संकट सांगताना. अजूनही महाराष्ट्राला मराठी मुख्यमंत्री नाहीच.
महाराष्ट्र में भीषण सूखे के कारण किसानों पर संकट है। ऐसे समय में हम सभी मंत्रियों ने मिलकर इस बार दिवाली गाँवों में किसानों के बीच जाकर उनके साथ मनाने का निर्णय लिया है। किसानों के साथ संवाद कर एक प्रकार से उनका मनोबल बढ़ाने का प्रयास हम करेंगे। (नागपुर | 7-11-2026) #Maharashtra #Nagpur #DiwaliWithFarmers
1
27
249
2,110
राज | Raj retweeted
कर्जतच्या झाडांसाठी अहिल्यानगरच्या तरूणाचे नदीत जलआंदोलन #Karjat #KarjatProtest
2
39
177
1,935
मराठी भाषा, समाज आणि संस्कृती ह्यांसाठी विधायक चळवळ उभारू पाहणाऱ्या कार्यकर्त्यांचे संघटन : मराठी अभ्यास केंद्र ! #MarathiAbhyasKendra #MaharashtraDharma #Marathi #मराठीअभ्यासकेंद्र #महाराष्ट्रधर्म #मराठी #महाराष्ट्र
4
14
179
मातृभाषेतून शिकणं म्हणजे मुलांवर ताण न आणता त्यांचं नैसर्गिक शिक्षण होऊ देणं. तुम्हाला काय वाटतं ? #महाराष्ट्रधर्म #मराठी #मराठीशाळा #मराठीअभ्यासकेंद्र #MaharashtraDharma #Marathi #MarathiAbhyasKendra #चिन्मयीसुमीत #ChinmayeeSumeet
2
13
140
इंडी जर्नल वर @indieprathmesh सोबत ‘ठसन’च्या निमित्ताने चर्चा केली होती त्याचा संपूर्ण व्हिडीओ तुम्हाला खाली दिलेल्या युट्यूब लिंकवर बघायला मिळेल. नक्की बघा आणि प्रतिक्रिया कळवा. @indiejmag हे सध्या महत्वाचे रिपोर्ट बनवत आहेत. त्यांच रिपोर्ताज ही फॅालो करा.
#Thasan #Mumbai #Workers मुंबईचा स्वभाव, तिची भाषा, लोक, त्यांचा संघर्ष, या सगळ्याचं प्रतिबिंब उमटवणाऱ्या 'ठसन' या कादंबरीबद्दल ऐका, थेट लेखक अविनाश उषा वसंत @aviuv यांच्याकडून, इंडी जर्नलच्या या वेगळ्या प्रयोगात! youtu.be/huFECbvXphs
5
16
421
गुरुवार, दि. ०५ नोव्हेंबर २०२६ रोजी मराठी अभ्यास केंद्र आयोजित "वाचन कट्टा" उपक्रमास आता 'Gen-Alpha' कडूनही प्रतिसाद मिळत आहे! दोन-अडीच तास मोबाईल बाजूला ठेवून मराठी-पुस्तकांच्या विश्वात रमण्याचा आनंद उपस्थितांनी घेतला. वाचलेल्या पुस्तकांविषयी एकमेकांशी चर्चा केली आणि त्या निमित्ताने गप्पागोष्टीही रंगल्या. यामुळे उपस्थित वाचनप्रेमींना विविध विषयांवरील मराठी पुस्तकांची ओळखही झाली.  सहभागी झालेल्या मराठी-पुस्तकप्रेमींनी यावेळी मराठी अभ्यास केंद्राच्या इतर कामातही सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. वाचन करणारे लोकं कृती करण्याच्या बाबतीतही आघाडीवर असायला हवेत याबाबतही सर्वांनी आग्रह धरला. अविचारी लोक संघटित आहेत, पण विचारी लोकं संघटित व्हायला संकोच करतात ही खेदाची बाब.   वाचन संस्कृती जपण्यासाठी आणि विस्तारण्यासाठी अशा प्रकारचे वाचन कट्टे सोसायटीच्या आवारात, सार्वजनिक ठिकाणी आयोजित करण्याची तयारीही अनेकांनी दर्शवली. त्यावेळची काही क्षणचित्रे.  पुन्हा भेटू या, पुढील वाचन कट्ट्यात, गुरुवार, १२ नोव्हेंबर २०२६ रोजी. सहभागी व्हायचं असल्यास खाली दिलेल्या लिंकवर जाऊन गुगल अर्ज भरा आणि आपला सहभाग नोंदवा. 🔗 सहभाग नोंदणी अर्जाची लिंक: forms.gle/iYosqrgXDcRs12bd6 📌 महत्त्वाची सूचना: नोंदणी अर्ज भरल्याशिवाय वाचनकट्ट्यात सहभागी होता येणार नाही. प्रथम नोंदणी करणाऱ्या ३० जणांनाच सहभागी होता येईल. ३० जणांची नोंदणी पूर्ण होताच अर्जाची लिंक बंद केली जाईल, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. 🗓️ गुरुवार, १२ नोव्हेंबर २०२६ । संध्याकाळी ६:०० ते ८:३० स्थळ : खोली क्र. ४, पहिला मजला, श्री शिवाजी मंदिर, न. चिं. केळकर मार्ग, दादर (प.), मुंबई – ४०००२८. #मराठीअभ्यासकेंद्र #वाचनकट्टा #मराठीपुस्तके #वाचनसंस्कृती #पुस्तकप्रेमी #महाराष्ट्रधर्म #MarathiBooks #MarathiAbhyasKendra #VachanKatta #Marathi
5
55
634
पुन्हा एकदा पुस्तकांच्या विश्वात हरवून जाण्यासाठी, आपल्या मराठी अभ्यास केंद्राच्या कार्यालयात ‘वाचनकट्टा’ आयोजित करण्यात येत आहे! सहभागी व्हायचं असल्यास खाली दिलेल्या लिंकवर जाऊन गुगल अर्ज भरा आणि आपला सहभाग नोंदवा. 🔗 सहभाग नोंदणी अर्जाची लिंक: forms.gle/iYosqrgXDcRs12bd6 📌 महत्त्वाची सूचना: नोंदणी अर्ज भरल्याशिवाय वाचनकट्ट्यात सहभागी होता येणार नाही. प्रथम नोंदणी करणाऱ्या ३० जणांनाच सहभागी होता येईल. ३० जणांची नोंदणी पूर्ण होताच अर्जाची लिंक बंद केली जाईल, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. 🗓️ गुरुवार, ०५ नोव्हेंबर २०२६ । संध्याकाळी ६:०० ते ८:३० स्थळ : खोली क्र. ४, पहिला मजला, श्री शिवाजी मंदिर, न. चिं. केळकर मार्ग, दादर (प.), मुंबई – ४०००२८.
5
10
247
राज | Raj retweeted
टोरंट पॉवरने ईलेक्ट्रोल बॉण्ड घेऊन खालील राजकीय पक्षांना पक्ष निधी दिलाय. 👇 • भाजप - 76 कोटी रुपये • भारतीय काँग्रेस पार्टी - 17 कोटी रुपये • राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - 3.5 कोटी रुपये • शिवसेना - 3 कोटी रुपये • आम आदमी पार्टी - 7 कोटी रुपये टोरंट पॉवरचा एक प्रोजेक्ट टोरंटो फार्मसिटीक्युल डोनेशन नावाने आसामच्या सिलिगुडीमध्ये आहे. या कंपनीने सुद्धा ईलेक्ट्रोल बॉण्ड विकत घेऊन भाजपला 61 कोटी रुपये दिले. • सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा - 7 कोटी रुपये • काँग्रेस 5 कोटी रुपये • समाजवादी पक्ष 3 कोटी रुपये • आम आदमी पक्ष 1 कोटी रुपये • सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट 50 लाख रुपये. आतापर्यंत भाजप - 137 कोटी रुपये आणि काँग्रेस पक्षाला 22 कोटी रुपये मिळाले आहेत. हे सर्व डोनेशन 2022-24 साली देण्यात आले आहेत. टोरंट कंपनीचा आयपीएलशी संबंध आहे. अमित शाहच्या मुलाशीही याचा संबंध आहे. ज्यांनी टोरंटकडून निधी घेतला ते सर्व राजकीय पक्ष, त्यांचे नेते हे रायगडच्या कर्जतमध्ये शेतकऱ्यांना भेटले, त्यांनी सांगितले की आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत. माझा त्यांना सवाल आहे, हे राजकीय डोनेशन घेतल्यानंतर हे राजकीय पक्ष टोरंट ग्रुपसोबत उभे राहणार की सह्याद्री बचावासाठी लढणाऱ्या लोकांसोबत उभे राहणार? याचा खुलासा या पक्षांनी करावा! #टोरंट #कर्जत
37
355
19
1,271
60,302
सर्वांनी हा अंक आवर्जून विकत घ्यावा, त्यातील डॉ. दीपक पवार यांचा लेख "संयुक्त महाराष्ट्रचार दुसरा लढा" जरूर वाचावा आणि लेखाबद्दलचा आपला अभिप्राय नक्की कळवावा. जय मराठी, जय महाराष्ट्र!
2
16
60
740
महाराष्ट्रातील मराठी लोकांनी बेळगावातील लोकांकडून शिकण्याची गरज आहे. इतकी भयंकर दडपशाही असतानाही काळा दिन यशस्वी करून दाखवला.. #बेळगाव_महाराष्ट्राचे #BelgavBelongsToMaharashtra
5
27
2
95
2,460
प्रति,
मा. पोलीस अधीक्षक साहेब,
पालघर जिल्हा, पालघर. विषय : वाढवण बंदराच्या रस्त्याच्या कामासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर दगड वाहतुकीस व कामास विरोध करणाऱ्या स्थानिक नागरिकांना धमकावणे, शिवीगाळ व मारहाण करणे तसेच वाणगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तुषार पाचपुते यांच्याकडून नागरिकांना जलसमाधी आंदोलनासाठी पाण्यात जाण्यास प्रवृत्त केल्याच्या गंभीर प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याबाबत आणि सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करुन सुरू असलेले कामं बंद करणे बाबत… महोदय, वाढवण बंदराच्या रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्ताचा वापर करून दगडांची वाहतूक व इतर कामे केली जात होती. सदर दगड वाहतूक व रस्त्याचे काम हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून तसेच कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन करून केले जात असल्याचा स्थानिक नागरिकांचा गंभीर आक्षेप आहे. सदर कामासंदर्भात वाढवण व वरोर गावातील स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला जाब विचारण्याचा आणि कामाच्या कायदेशीर वैधतेबाबत प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला असता, नागरिकांना त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचे गंभीर स्वरूपाचे खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देण्यात आल्या. इतकेच नव्हे तर नागरिकांना शिवीगाळ करणे व मारहाण करण्याचेही गंभीर प्रकार घडल्याचे समोर आले आहे. लोकशाही व्यवस्थेमध्ये नागरिकांना प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न विचारण्याचा, अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याचा आणि न्यायालयाच्या आदेशाचे पालन होत आहे की नाही, याबाबत जाब विचारण्याचा घटनात्मक अधिकार आहे. मात्र, नागरिकांच्या या अधिकारांचा आदर करण्याऐवजी पोलीस संरक्षणाच्या आडून दडपशाही केली जात असेल, तर ही बाब अत्यंत गंभीर व लोकशाही मूल्यांना काळिमा फासणारी आहे. १. नागरिकांना जलसमाधी आंदोलन करण्याची वेळ येणे ही प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब आहे. प्रशासनाच्या दडपशाहीचा आणि स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष करण्याच्या भूमिकेचा निषेध म्हणून वाढवण व वरोर येथील संतप्त नागरिकांनी जलसमाधी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकशाही राज्यव्यवस्थेत आपल्या न्याय्य मागण्यांसाठी नागरिकांना स्वतःच्या जीवाची बाजी लावण्याची वेळ येणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. सदर जलसमाधी आंदोलन करणाऱ्या नागरिकांशी संवाद साधून, त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांना सुरक्षितपणे पाण्याबाहेर काढण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे. २. वाणगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तुषार पाचपुते यांची संतापजनक भूमिका. जलसमाधी आंदोलन करणाऱ्या नागरिकांशी चर्चा करून त्यांना समजावून सुरक्षितपणे पाण्याबाहेर काढण्याची मागणी पाण्याबाहेर उपस्थित असलेल्या नागरिकांकडून केली जात असताना, वाणगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री. तुषार पाचपुते हे पाण्याबाहेर असलेल्या इतर नागरिकांनाच पाण्यात जाण्यास प्रवृत्त करीत असल्याचा गंभीर प्रकार घडल्याचे निदर्शनास आले आहे. जर हा प्रकार प्रत्यक्षात घडला असेल, तर तो अत्यंत संतापजनक, बेजबाबदार आणि मानवी संवेदनशीलतेला काळिमा फासणारा आहे. नागरिकांचे प्राण वाचविण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांकडूनच नागरिकांना पाण्यात जाण्यास प्रवृत्त केले जात असेल, तर यापेक्षा गंभीर बाब कोणती असू शकते? सदर अधिकाऱ्यांच्या भूमिकेची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांना सदर प्रकरणाच्या हाताळणीपासून दूर ठेवण्याचा विचार करावा. ३. भविष्यात कोणतीही जीवितहानी झाल्यास प्रशासनाची जबाबदार. सदर परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण असून नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करून नागरिकांशी संवाद साधला नाही आणि त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला नाही, तर कोणतीही अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदर जलसमाधी आंदोलनादरम्यान किंवा त्यानंतर कोणत्याही नागरिकाचा मृत्यू झाल्यास अथवा कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झाल्यास त्यास जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर, पोलीस प्रशासन तसेच महाराष्ट्राचे फडणवीस सरकार हे जबाबदार असतील. नागरिकांच्या जीविताचे रक्षण करण्यात कसूर करणाऱ्या जबाबदार अधिकारी व संबंधित यंत्रणांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी. आमच्या प्रमुख मागण्या : 1. वाणगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री. तुषार पाचपुते यांनी नागरिकांना पाण्यात जाण्यास प्रवृत्त केल्याच्या गंभीर आरोपाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत निष्पक्ष चौकशी करावी. 2. स्थानिक नागरिकांना सरकारी कामात अडथळा आणल्याचे खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देणाऱ्या तसेच शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या संबंधित अधिकारी व व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी. 3. सर्वोच्च न्यायालयाच्या संबंधित आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत आहे की नाही, याची खातरजमा करून आदेशाचा अवमान करून सुरू असलेल्या कोणत्याही कामास व बेकायदेशीर दगड वाहतुकीस तातडीने प्रतिबंध करावा. 4. सदर घटनेच्या ठिकाणी उपलब्ध असलेले सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल व्हिडिओ, पोलीस बंदोबस्ताचे व्हिडिओ चित्रीकरण व इतर डिजिटल पुरावे सुरक्षित ठेवावेत. 5. नागरिकांवर दबाव आणण्यासाठी किंवा आंदोलन दडपण्यासाठी पोलिसी बळाचा गैरवापर करण्यात येऊ नये. नागरिकांना संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करावे. 6. सदर संपूर्ण घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून त्याचा अहवाल सार्वजनिक करावा. महोदय, आम्ही पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की, स्थानिक नागरिकांना विकासाच्या नावाखाली होणाऱ्या बेकायदेशीर कृत्यांविरोधात आवाज उठविण्याचा पूर्ण अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे, नागरिकांची नाही. प्रशासनानेच कायद्याचे उल्लंघन केले तर नागरिकांनी न्याय मागायचा कोणाकडे? नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी त्यांना धमकावणे, मारहाण करणे आणि खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकविण्याची भीती दाखविणे ही लोकशाही नसून दडपशाही आहे. जलसमाधी आंदोलन हा नागरिकांचा हौस किंवा मनोरंजनाचा विषय नसून प्रशासनाच्या असंवेदनशीलतेविरोधात निर्माण झालेला टोकाचा संताप आहे. त्यामुळे कोणताही अनुचित घटनेची संपूर्ण जबाबदारी जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्रातील फडणवीस सरकारची राहील, याची गंभीर नोंद घ्यावी. आपले, वाढवण - वरोर ग्रामस्थ आणि संपूर्ण वाढवण विरोधी भूमिपुत्र आणि भूमिकन्या.
38
148
1,932
प्रस्तावित वाढवण बंदर रद्द करा ह्यासाठी स्थानिक महिला जलसमाधी आंदोलन करत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. प्रस्तावित बंदर परिसरात हजारोंचा जनसमुदाय एकवटला असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
67
3
177
2,372
३० ॲाक्टोबरला वाढवण बंदराच्या विरोधात धरणे आंदोलन झाले होते. आमदार विनोद निकोलेंनी पुढाकार घेतला होता. त्याला हर्षवर्धन सकपाळ, अंबादास दानवे असे विरोधी पक्षांचे नेते तसेच मनसे राष्ट्रवादीचेही नेते हजर होते. आज प्रशासनाकडून परत काम चालू करण्यात आले तर स्थानिकांचा उद्रेक झाला.
44
1
111
1,262
राज | Raj retweeted
कर्जतमध्ये वृक्षतोड झाली तिथे आढळला उदमांजराचा मृतदेह #karjat #treecutting
12
127
2
346
13,166