Prabha Karape वडगावशेरी मतदार संघ - कार्यकर्त्या (@prabhakarape) header
Prabha Karape वडगावशेरी मतदार संघ - कार्यकर्त्या (@prabhakarape) profile picture

President{KRW}Police Mahila Dakshta Committee : झोन 4.. Pune | State President, AABVS | Member - PMC Mohala kamiti | Founder - Prabha karape Foundation

Kharadi, Pune, India
Joined May 2018
Photo by Prabha Karape वडगावशेरी मतदार संघ - कार्यकर्त्या (@prabhakarape)Photo by Prabha Karape वडगावशेरी मतदार संघ - कार्यकर्त्या (@prabhakarape)Photo by Prabha Karape वडगावशेरी मतदार संघ - कार्यकर्त्या (@prabhakarape)Photo by Prabha Karape वडगावशेरी मतदार संघ - कार्यकर्त्या (@prabhakarape)Photo by Prabha Karape वडगावशेरी मतदार संघ - कार्यकर्त्या (@prabhakarape)Photo by Prabha Karape वडगावशेरी मतदार संघ - कार्यकर्त्या (@prabhakarape)Photo by Prabha Karape वडगावशेरी मतदार संघ - कार्यकर्त्या (@prabhakarape)Photo by Prabha Karape वडगावशेरी मतदार संघ - कार्यकर्त्या (@prabhakarape)Photo by Prabha Karape वडगावशेरी मतदार संघ - कार्यकर्त्या (@prabhakarape)
जनहितार्थ | नागरिकांच्या समस्या मांडल्या, उपाययोजनांची मागणी केली! येरवडा क्षेत्रीय कार्यालयात आयोजित बैठकीमध्ये परिसरातील नागरिकांच्या विविध मूलभूत समस्या लेखी स्वरूपात तसेच प्रत्यक्ष चर्चेद्वारे प्रशासनासमोर मांडल्या. या बैठकीत मांडलेले अनेक प्रश्न वेगवेगळ्या विभागांच्या अखत्यारीत येत असले, तरी त्यांचा एकमेकांशी थेट संबंध आहे. त्यामुळे केवळ एका विभागाने कारवाई करून चालणार नाही, तर महापालिका प्रशासन, वाहतूक पोलीस विभाग आणि स्थानिक पोलीस प्रशासन या तिन्ही यंत्रणांमध्ये योग्य समन्वय असणे गरजेचे आहे. याच अनुषंगाने चंदननगर वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांकडेही संबंधित विषय मांडून तिन्ही विभागांपर्यंत नागरिकांच्या समस्या पोहोचविण्याची मागणी केली होती. बैठकीला वाहतूक विभागाचे अधिकारीही उपस्थित होते. बैठकीत प्रामुख्याने मांडलेले विषय : १. स्पीड ब्रेकर बसविणे : आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याच्या कामाला प्रतिसाद मिळाल्याबद्दल वाहतूक पोलीस आणि PMC प्रशासनाचे आभार. यासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. मात्र, अजूनही काही ठिकाणी स्पीड ब्रेकरची आवश्यकता आहे. २. वाहतूक सिग्नल आणि वाहतूक कोंडी : आवश्यक ठिकाणी वाहतूक सिग्नल बसविणे, तसेच वारंवार होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ठोस उपाययोजना करणे. ३. रिलायन्स ते खराडी रस्त्यावरील अतिक्रमण : रिलायन्सपासून खराडीच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावर, विशेषतः चुकभूल ढाबा परिसरातील अतिक्रमणांमुळे वाहनांना एकेरी रस्त्यावरून मार्ग काढणेही कठीण होते. त्यामुळे या ठिकाणचे अतिक्रमण हटविणे आवश्यक आहे. ४. कंपन्यांच्या वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी : युरो स्कूल, इराणी कॅफे, बार्कलेज कंपनी परिसर, तसेच कुमार प्राईम आणि गंगा कॉन्स्टेला सोसायटीमधील डीपी रोडवर कंपन्यांच्या वाहनांचे अनधिकृत किंवा अयोग्य पार्किंग होत असल्याने सामान्य नागरिकांच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. यावर योग्य उपाययोजना कराव्यात. ५. नागरिकांची सुरक्षितता : रस्ते, फुटपाथ, वाहतूक व्यवस्था आणि स्थानिक सुरक्षेशी संबंधित विविध प्रश्नांवर संबंधित विभागांनी एकत्रितपणे काम करावे. ६. बसथांब्यांवरील जाहिरातींबाबत : बसथांबे हे कोणत्याही व्यक्तीच्या, राजकीय पक्षाच्या किंवा संस्थेच्या प्रसिद्धीचे माध्यम बनू नयेत. बसथांब्यांवर शहर स्वच्छता, महिला सुरक्षा, लहान मुलांची सुरक्षितता, ज्येष्ठ नागरिकांचे संरक्षण आणि वाहतूक नियमांबाबत जनजागृती करणाऱ्या जाहिराती असाव्यात. वैयक्तिक प्रसिद्धीपेक्षा जनहिताला प्राधान्य मिळाले पाहिजे. बॅनर आणि जाहिराती लावून प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा प्रत्यक्ष जनतेची कामे करून दाखवावीत. आमची मागणी स्पष्ट आहे! आम्हाला केवळ जाहिराती, बॅनर आणि सुशोभीकरण नको आहे. आम्हाला हवे आहेत... नागरिकांसाठी सुरक्षित रस्ते. चालण्यासाठी अतिक्रमणमुक्त फुटपाथ. सुरळीत वाहतूक व्यवस्था. अनधिकृत पार्किंग आणि अतिक्रमणावर कारवाई. महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित परिसर. ही बैठक येरवडा क्षेत्रीय कार्यालयातील वरिष्ठ सहाय्यक अधिकारी, संबंधित विभागांचे अधिकारी आणि समिती सदस्य यांच्या उपस्थितीत पार पडली. प्रशासनाने मांडलेल्या समस्यांची गांभीर्याने दखल घेतली आहे. प्रशासनाच्या सकारात्मक निर्णयांचे स्वागत! पुणे महानगरपालिकेचे आयुक्त मा. नवल किशोर राम यांनी विविध प्रश्नांवर ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या पुढाकारामुळे प्रलंबित कामांना गती मिळण्यास मदत होत आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि आभार! भागातील स्थानिक प्रश्न असोत किंवा मुख्य खात्यांशी संबंधित मोठे प्रश्न असोत, ते प्रशासनाच्या विविध स्तरांवर सातत्याने मांडण्याचे आणि त्यांचा पाठपुरावा करण्याचे काम सुरूच राहणार आहे. कारण शहराचा विकास म्हणजे केवळ सुशोभीकरण नव्हे, तर नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुविधायुक्त जीवन देणे होय! जनहितार्थ | आवाज जनतेचा PMC कमिशनर नवल राम किशोर यांच्या जनहिताच्या प्रत्येक मोहिमेत आम्ही सहकार्य करू..एक जागरूक नागरिक.. आम्ही सोबत आहे.. त्या शिवाय शहर सुधारणार नाही.. #जनहितार्थ #आवाजजनतेचा #PrabhaKarpe #ResidentsWelfareKharadi #KRW #PuneMunicipalCorporation #PMC #PuneTrafficPolice #PuneCityPolice #Yerawada #Kharadi #ChandanNagar #TrafficManagement #RoadSafety #EncroachmentFreePune #CitizenSafety #PublicInterest
1
48
महापौर नी तरी नियमाचे पालन करावे शहर विद्रुपीकरण थांबवावे... यांना द्या पुरस्कार.. सुरवात इथूनच होऊ दे..@PMCPune
अनधिकृत बॅनर, फ्लेक्स आणि होर्डिंग्ज दिसले ? आता ऑनलाइन तक्रार करा ! पुणे शहर अनधिकृत जाहिरातमुक्त करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने नागरिकांसाठी विशेष ऑनलाइन तक्रार सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आपल्या परिसरात परवानगीशिवाय लावलेले होर्डिंग्ज, बॅनर, फ्लेक्स किंवा पोस्टर्स आढळल्यास आता घरबसल्या तक्रार नोंदवता येणार आहे. तक्रार नोंदविण्यासाठी भेट द्या : bhauflexkadha.pmc.gov.in #pmccare #UnauthorizedHoardings #IllegalBanners #IllegalHoardings #OnlineComplaint #CitizenParticipation #PublicAwareness #CleanPune #SmartPune #DigitalGovernance #CivicServices
95
# 📢 पुणे शहरातील अतिक्रमणविरोधी कारवाईचे स्वागत! मात्र, लोकप्रतिनिधींशी संबंधित अतिक्रमणांवरही कारवाई झालीच पाहिजे! **सामान्य नागरिकांच्या अतिक्रमणांवर कारवाई होत असेल, तर लोकप्रतिनिधींच्या जवळच्या व्यक्तींनी केलेल्या अतिक्रमणांचीही निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे! कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे.** मा. महापालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम यांना नम्र विनंती! सध्या पुणे शहरात महापालिका प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणविरोधी मोहीम राबवली जात आहे. शहरातील रस्ते, पदपथ, नाले आणि सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त करण्यासाठी आपण घेत असलेल्या भूमिकेचे आम्ही मनापासून स्वागत करतो आणि कौतुकही करतो. मात्र, या कारवाईमध्ये काही महत्त्वाचे प्रश्न प्रशासनासमोर उपस्थित करणे आवश्यक आहे. प्रभाग क्रमांक ३ मधील नगरसेविका यांचे पती श्री. प्रीतम खांडवे हे नगरसेवक नसतानाही नगरसेवकांच्या मासिक बैठकीमध्ये उपस्थित राहून विषय मांडत असल्याची बाब चर्चेत आहे. लोकप्रतिनिधींच्या अधिकृत बैठकीमध्ये पद नसताना अशा प्रकारे सहभाग घेण्याबाबतही प्रशासनाने नियमांच्या अनुषंगाने स्पष्टता द्यावी. मात्र, यापेक्षाही महत्त्वाचा दुसरा विषय म्हणजे त्यांच्या संबंधित जागांवरील अतिक्रमणांचा! आमचा निदर्शनास आलेल्या बाबींनुसार, त्यांच्या संबंधित परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याचे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाचे या विषयाकडे लक्ष कधी जाणार, हा आमचा प्रश्न आहे. **महापालिका आयुक्त महोदय, खालील बाबींची तातडीने चौकशी व्हावी :** 1. संबंधित जागांवर झालेल्या अतिक्रमणांची अधिकृत पाहणी झाली आहे का? 2. नाल्यांवर भराव टाकून किंवा नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह अडवून जागा तयार करण्यात आली आहे का? 3. कोणतीही अधिकृत निविदा (टेंडर) प्रक्रिया नसताना मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या भाजी मार्केटला परवानगी कोणी दिली? 4. जमिनीवर मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकून तयार केलेल्या जागेवर हे भाजी मार्केट कोणत्या नियमांनुसार सुरू आहे? 5. या ठिकाणी उभारण्यात आलेले कार्यालय आणि इतर बांधकामांना महापालिकेची अधिकृत परवानगी आहे का? 6. या सर्व जागांची मालकी, बांधकाम परवानगी, वापर आणि महापालिकेच्या नोंदींची तपासणी कधी होणार? आमची मागणी आहे की या सर्व बाबींची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी. संबंधित कागदपत्रांची तपासणी करून अनधिकृतता आढळल्यास नियमानुसार कठोर कारवाई करावी. तसेच भाजी मार्केटची निविदा आणि परवानगी प्रक्रिया वैध नसेल, तर ते बंद करण्यात यावे. **मा. आयुक्त महोदय, आपण पुणे शहरात अतिक्रमणमुक्तीची जी मोहीम राबवत आहात, ती केवळ सामान्य नागरिकांपुरती मर्यादित राहू नये. लोकप्रतिनिधी असोत किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती, कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही.** पण डोळ्याने गोष्टी दिसतात..त्या साठी PMC संबंधित अधिकारी डोळे बंद करून बसले का?आमची भूमिका जनहिताची आहे. सार्वजनिक जागा, नाले, रस्ते आणि महापालिकेच्या मालमत्तेचे संरक्षण झालेच पाहिजे. आपण या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून योग्य ती कारवाई केल्यास वडगाव शेरी मतदारसंघातील नागरिकांच्या वतीने आपल्या कामाचे आम्ही नक्कीच कौतुक करू. **कारण लोकप्रतिनिधी हे जनतेचे सेवक असतात, कायद्यापेक्षा मोठे नसतात!** **अतिक्रमण कोणाचेही असो, कारवाई झालीच पाहिजे. नियम सर्वांसाठी समान असलेच पाहिजेत!** नगर रोड, महालक्ष्मी लॉन परिसर.. खांदवे नगर.. धन्यवाद! . आयुक्त यांना विनंती – नगर रोड, महालक्ष्मी लॉन परिसर व खांदवे नगर येथील कथित अतिक्रमणांची प्रत्यक्ष पाहणी करून निष्पक्ष चौकशी व नियमानुसार कारवाई करावी. सामान्य नागरिकांप्रमाणेच लोकप्रतिनिधींशी संबंधित प्रकरणांतही समान न्याय मिळावा! अनाधिकृत भाजी मार्केट मोठ्या प्रमाणात चालू केलेला आहे... कोणतीही टेंडर नसताना.. मग नगरसेवक अशी काम करण्यासाठी परवानगी कोणी दिली.. प्रशासन डोळे बंद का? जनता प्रश्न प्रशासना आहेत.. #जनहितार्थ #अतिक्रमणमुक्तपुणे #समानन्याय #PMC #वडगावशेरी #आवाजजनतेचा @PMCPune @PuneCityPolice @PuneCollector @MahaDGIPR @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @InfoPune #PMC #PuneMunicipalCorporation #Pune #NagarRoad #KhadweNagar #MahalaxmiLawn #VadgaonSheri #EncroachmentFreePune #EqualJustice #जनहितार्थ #अतिक्रमणमुक्तपुणे #समानन्याय
2
5
39
2,314
📢 नगरसेवकांनी दिखावा बंद करावा; जनतेच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष काम करावे!.. मीटिंग, उद्घाटन, सत्कार, फोटो आणि मोठमोठ्या घोषणा करण्यापेक्षा जनतेच्या मूलभूत समस्या सोडवण्याला प्राधान्य द्या. सोसायट्यांचा डेटा गोळा करणे, सहकार दरबार घेणे आणि मार्गदर्शन करणे यापेक्षा नागरिकांना प्रत्यक्ष सुविधा मिळणे महत्त्वाचे आहे. खराडी व परिसरातील नागरिक आजही अनेक मूलभूत समस्यांना सामोरे जात आहेत. 🔹 सोसायटीचा कचरा उचलणे मोफत व नियमित करा. 🔹 टँकर बंद करून नियमित नळाद्वारे पाणी द्या. 🔹 रस्त्यांवरील खड्डे बुजवा आणि रस्ते दुरुस्त करा. 🔹 भाजी मार्केटमुळे होणारी रस्त्यांची कोंडी थांबवा. 🔹 फूड स्टॉल्स व अनधिकृत अतिक्रमणांवर निष्पक्ष कारवाई करा. 🔹 रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक जागा नागरिकांसाठी मोकळ्या करा. 🔹 विरोधात बोलणाऱ्या नागरिकांना किंवा सोसायट्यांना लक्ष्य न करता त्यांच्या प्रश्नांवर काम करा. 🔹 स्वतंत्र इमारतींना विनाकारण त्रास देणे बंद करा; नियम सर्वांसाठी समान असावेत. 🔹 मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांना त्यांच्या हक्काच्या मूलभूत सुविधा मिळाल्याच पाहिजेत. नगरसेवकांनी जनतेच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम करावे. नागरिकांना फोटो, प्रसिद्धी आणि दिखावा नको, तर पाणी, स्वच्छता, चांगले रस्ते आणि अतिक्रमणमुक्त परिसर हवा आहे. जनतेच्या मूलभूत सुविधा हा उपकार नसून नागरिकांचा हक्क आहे आणि त्या पुरवणे ही लोकप्रतिनिधी व प्रशासनाची जबाबदारी आहे... आणि सोसायटी मी 📢 जनहितार्थ | आवाज जनतेचा प्रश्न जनतेचे… जबाबदारी लोकप्रतिनिधींची… उत्तर प्रत्यक्ष कामातून मिळाले पाहिजे! #BJP #भारतीयजनतापक्ष #BJPMaharashtra #BJP_Pune #PuneMunicipalCorporation #PMC #पुणेमहानगरपालिका #पुणे #खराडी #वडगावशेरी #जनहितार्थ #आवाजजनतेचा #जनतेचेप्रश्न #नगरसेवकांनीकामकरावे #दिखावाबंदकरा #मूलभूतसुविधा #पाणीजनतेचाहक्क #अतिक्रमणमुक्तखराडी #खड्डेमुक्तरस्ते #कामबोललेपाहिजे #Accountability #PublicService #CivicIssues #CitizenRights #GroundWorkNotShow ✊📢BJP #भारतीयजनतापक्ष #BJPMaharashtra #BJP_Pune #PuneMunicipalCorporation #PMC #पुणेमहानगरपालिका #पुणे #खराडी #वडगावशेरी #जनहितार्थ #आवाजजनतेचा #जनतेचेप्रश्न #नगरसेवकांनीकामकरावे #दिखावाबंदकरा #मूलभूतसुविधा #पाणीजनतेचाहक्क #अतिक्रमणमुक्तखराडी #खड्डेमुक्तरस्ते #कामबोललेपाहिजे #Accountability #PublicService #CivicIssues #CitizenRights #GroundWorkNotShow ✊📢
2
6
19
668
खूप चागलं निर्णय घेतला आहे.. पण त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे..
अनधिकृत बॅनर, फ्लेक्स आणि होर्डिंग्ज दिसले ? आता ऑनलाइन तक्रार करा ! पुणे शहर अनधिकृत जाहिरातमुक्त करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने नागरिकांसाठी विशेष ऑनलाइन तक्रार सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आपल्या परिसरात परवानगीशिवाय लावलेले होर्डिंग्ज, बॅनर, फ्लेक्स किंवा पोस्टर्स आढळल्यास आता घरबसल्या तक्रार नोंदवता येणार आहे. तक्रार नोंदविण्यासाठी भेट द्या : bhauflexkadha.pmc.gov.in #pmccare #UnauthorizedHoardings #IllegalBanners #IllegalHoardings #OnlineComplaint #CitizenParticipation #PublicAwareness #CleanPune #SmartPune #DigitalGovernance #CivicServices
51
मान्य तुम्ही कारवाई केलात करतात पण त्या कारवाईमध्ये वेस्ट टायमिंग वेस्ट यंत्रणा कारण ज्यावेळी तुम्ही अतिक्रमण करता लगेच फ्रंट मार्जिनचे तर दुसरी दिवशी पुन्हा चालू होतं आणि वारंवार होतं याला कुठे आळा घालणार आहे तुम्ही तुम्ही कारवाई करता काय माता गेल्यावर्षी मोठ्या प्रमाणात बोराटे वस्तीला खराडीत मोठी कारवाई झाली होती आता त्या ठिकाणी येऊन पहा.. पुन्हा जशास तसे मग या कारवाईचा अर्थ काय या प्रश्नाचे उत्तर कोण देणार..
पुणेकरांसाठी आयुक्त @navalMH यांचा खास संदेश. मी तर हेच म्हणेन की हे आता थांबत नसतात. #pune #पुणे #punenews #punecity
1
1
83
Prabha Karape वडगावशेरी मतदार संघ - कार्यकर्त्या retweeted
मुख्यमंत्री दुसऱ्यांना अराजकवादी म्हणतात, पण स्वतः एका दूध संघाची निवडणूक हरल्यानंतर जनतेचा कौल स्वीकारण्याऐवजी सत्तेच्या जोरावर ‘होस्टाइल टेकओव्हर’ करण्याचा प्रयत्न करतात. जनतेचा कौल पायदळी तुडवून सत्ता बळकावण्याचा प्रयत्न करणारेच खरे अराजकवादी आहेत. गोकुळ दूध संघाला या असंवैधानिक आणि अराजक शक्तींच्या तावडीतून वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या कोल्हापूरकरांना सलाम!
203
3,206
37
13,847
151,533
खराडी मध्ये ब्लू बेरी society जवळ PMC दवाखाने बाहेर फटका स्टॉल बिना परवाना... प्रशासन करते काय? @PMCPune
2
311
🌳 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना एक प्रश्न! आईला मारायचं आणि मुलींना जन्म देऊन आईची भरपाई केली म्हणायचं, हा कुठला न्याय? त्याचप्रमाणे हजारो वर्षांची निसर्गसंपत्ती नष्ट करायची, जुनी झाडं कापायची आणि ९० हजार नवीन झाडं लावण्याचं आश्वासन द्यायचं! ५०-१०० वर्षांच्या झाडांची जागा नवीन रोपं घेऊ शकतात का? विकासाला विरोध नाही, पण विकासाच्या नावाखाली निसर्गाची कत्तल कशासाठी? झाडं लावणं म्हणजे पर्यावरण संवर्धन; पण अस्तित्वात असलेली झाडं वाचवणं ही खरी जबाबदारी! 🌳 विकास हवा, पण निसर्गाचा बळी देऊन नाही! ✍️ प्रभा करपे #DevendraFadnavis #CMOMaharashtra #MaharashtraGovernment #SaveTrees #StopTreeCutting #SaveEnvironment #TreeConservation #पर्यावरण_वाचवा #झाडांची_कत्तल_थांबवा #विकासाच्या_नावाखाली_विनाश_नको #जनहितार्थ #PrabhaKarpe @CleanKharadi @WelfareKrw40846 @WWFWagholi
50
Prabha Karape वडगावशेरी मतदार संघ - कार्यकर्त्या retweeted
धन्यवाद…! अखेर MPSC च्या विविध परीक्षांच्या पेपरफुटीसह आणि शिपाई ते अध्यक्ष यांची चौकशी करुन आयोगाच्या संपूर्ण शुद्धीकरणासाठी Commissions Of Enquiry Act-1952 अंतर्गत न्यायिक आयोग स्थापन झाला. आयोगाकडून औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेसह Group B, Group C तसंच इतर संशयित परीक्षांचीही चौकशी होणार आहे. आयोगाला असलेले अधिकार बघता खालपासून वरपर्यंत संपूर्ण शुद्धीकरण होईल तसंच ३१७ च्या पुढील कारवाईसाठी शिफारस होईलच, ही अपेक्षा! विद्यमान सदस्य अभय वाघ हे मोठे ‘खिलाडी’ असून त्यांना देखील भीमनवार यांच्याप्रमाणे रजेवर पाठवावे, अशी विद्यार्थ्यांची तीव्र भावना आहे. याबाबत सरकारने लक्ष घालावं, ही विनंती! Group B संदर्भात पुढच्या आठवड्यात न्यायिक आयोगाला भेटणार असून शक्य असतील तेवढे सर्व पुरावे आपल्याला द्यायचे आहेत, त्यामुळं विद्यार्थ्यांनी सर्व पुरावे विद्यार्थी प्रतिनिधी किंवा आमच्याकडे जमा करावेत, एकही दोषी सुटणार नाही याची आपण काळजी घेऊ! जब तक घर भेजेंगे नहीं... तब तक छोड़ेंगे नहीं...! #MPSC #MPSCPaperLeak #MPSCStudents #न्यायिक_आयोग #पेपरफुटी #विद्यार्थी_एकजूट
64
316
8
949
148,367
🎭 कलाकार गेला… पण माणुसकीचा एक मोठा वारसा मागे ठेवून गेला! नाना पाटेकर म्हणजे केवळ एक महान कलाकार नव्हते, तर संवेदनशील मनाचा, समाजासाठी झटणारा आणि माणुसकी जपणारा माणूस होते. त्यांच्या अभिनयाने अनेक पिढ्यांच्या मनावर राज्य केले, तर सामाजिक कार्यातून त्यांनी अनेकांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण केला. अशा व्यक्तीला निरोप देताना शब्द अपुरे पडतात… मन भरून येते. पडद्यावरचा त्यांचा आवाज कायमचा शांत झाला, पण त्यांच्या भूमिका, विचार आणि माणुसकीची शिकवण सदैव आपल्या स्मरणात राहील. 🙏💐 महान कलाकाराला आणि संवेदनशील माणसाला भावपूर्ण श्रद्धांजली! 🕉️ ॐ शांती. #नाना_पाटेकर #NanaPatekar #भावपूर्ण_श्रद्धांजली #श्रद्धांजली #ॐशांती #महान_कलाकार #माणुसकी #समाजसेवा #नाम_फाउंडेशन #NanaPatekarForever #Legend #RestInPeace
1
53
PMC अधिकारी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी आहेत, की बांधकाम पूर्ण होईपर्यंत झोप काढण्यासाठी? तीन वेळा नुसती टोची मारून जात होते.. आणि कंप्लेंट बंद होत होत्या.. अनधिकृत बांधकाम सुरू असताना स्वतःहून पाहणी करून तात्काळ कारवाई करणे ही संबंधित विभागाची जबाबदारी आहे. नागरिकांनी तक्रार केल्यानंतरच कारवाई होणार असेल, तर यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होते. तोडक कारवाई झाल्यानंतरही अशाच प्रकारच्या अनधिकृत इमारती उभ्या राहत असतील, तर केवळ बांधकाम पाडून प्रश्न सुटणार नाही. संबंधित बिल्डर/बांधकामधारकाविरुद्ध FIR दाखल झालीच पाहिजे, तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याचीही जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. अनधिकृत बांधकामाला संरक्षण कोणाचे? जबाबदारी कोणाची? आता केवळ कारवाई नको—बिल्डरविरुद्ध FIR दाखल करा! कमिशनर याचे धन्यवाद! त्यांना याची आम्ही पूर्ण कल्पना दिली होती.. — प्रभा करपे | जनहित @navalMH @navalMH @CPPuneCity@Wagholi @WelfareKrw40846 @CleanKharadi
1
66
बिल्डिंग बांधे पर्यंत PMC झोपली होती का? संबंधित अधिकारी आणि संबंधित व्यक्ती FIR दाखल झाले पाहिजे.. जेणे करून अशी काम पुन्हा होऊ नयेत.. आणि अशा बिल्डिंग खूप आहेत खराडीत.. आम्ही तक्रार केली म्हणून तुम्ही जागे झालात .. PMC Demolishes 21,000-Sq-Ft Illegal Building on Playground-Reserved Plot in Kharadi punekarnews.in/pmc-demolishe…
1
45
युवा नेतृत्व शिवाजी मोरे.. यांनी MPSC पेपर फुटी प्रकरणात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी उपोषण बसले आहेत.. त्याची मागणी MPSC इच्छा परीक्षेचे अध्यक्ष यांचा राजीनामा द्यावा.. आणि याच्या या मागणी साठी आणि त्यांना सपोट म्हणून आमचा पाठिंबा.. त्यांना पाठिंबा साठी आलेले अभिजित दिपके.. युवा पिढीचे नेतृत्व देशा साठी करत आहेत.. त्यांना देखील आमचा पाठिंबा.. चुकीचे आहे ते चुकीची म्हणण्याची ताकद या तरुणात आहेत.. उद्याचे भविष्य...@CJP_for_India
45
Prabha Karape वडगावशेरी मतदार संघ - कार्यकर्त्या retweeted
कहते हैं कि किसी परीक्षा में असफल होना मंजिल का अंत नहीं होता। शुभम सोनी की कहानी इसका एक उदाहरण है। शुभम को JEE, UPSC और RPSC जैसी प्रतियोगी परीक्षाओं में बार-बार असफलता का सामना करना पड़ा, लेकिन उन्होंने अपने करियर की दिशा में प्रयास जारी रखा। कई कोशिशों में सफलता नहीं मिलने के बावजूद शुभम ने अपनी स्किल्स और प्रोफेशनल करियर पर फोकस किया। आखिरकार उन्हें एक कंपनी से करीब ₹60 लाख सालाना पैकेज का ऑफर मिला। #ShubhamSoni #SuccessStory #JEE #UPSC #RPSC #JEEFailed #UPSCFailed #RPSCFailed #CareerSuccess #JobPackage #60LakhPackage #60LPA #CareerNews #MotivationalStory #InspiringStory #StudentSuccess #News18Rajasthan
27
15
1
148
29,450
अशा प्रकारच्या जाहिरातींसाठी आकाशचिन्हाची परवानगी नेमक्या कोणत्या नियम/निकषांच्या आधारे देण्यात आली आहे? संबंधित परवानगीची प्रत व अटी सार्वजनिक कराव्यात. तसेच, याच चौकातील इतर अनधिकृत बांबू होल्डिंग्सवरही समान निकषाने तात्काळ कारवाई करून ती हटवण्यात यावीत. नियम सर्वांसाठी समान असतील, तर कारवाईही सर्वांवर समान झाली पाहिजे. @PmcCare @PMCPune
1
46
🌺 Ganesh Chaturthi Wishes! 🙏 Let us celebrate Ganeshotsav traditionally, peacefully & responsibly, while preserving our culture and respecting others. 🔊 Let the voice of devotion be louder than loudspeakers. Follow sound rules, prescribed timings & avoid unnecessary noise pollution. Let us be considerate towards senior citizens, children, patients & animals. Tradition + Devotion + Discipline = Meaningful Ganeshotsav. 🌿🙏 Ganpati Bappa Morya! 🌺 #GaneshChaturthi #GanpatiBappaMorya #Ganeshotsav #TraditionalGaneshotsav #NoisePollution #ResponsibleCelebration #PublicWelfare #PrabhaKarpe
1
52
📢 जनहिताचा स्पष्ट प्रश्न — नियम सर्वांसाठी समान आहेत का? झोन-7 मधील खराडी व चंदननगर परिसरातील दहीहंडी कार्यक्रमांमध्ये महिला नृत्य/कलानृत्य कार्यक्रमास परवानगी, कारवाई आणि नियमांच्या समान अंमलबजावणीबाबत पोलीस प्रशासनाकडे काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. आमच्या माहितीनुसार, मंडळांना अशा कार्यक्रमासाठी परवानगी देण्यात आलेली नव्हती. तरीही काही ठिकाणी प्रत्यक्षात महिला नृत्य/कलानृत्य कार्यक्रम झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रशासनाने स्पष्ट करावे— 🔹 संबंधित मंडळांना अशा कार्यक्रमासाठी परवानगी देण्यात आली होती का? 🔹 परवानगी असल्यास तिची प्रत व त्यातील अटी व शर्ती काय होत्या? 🔹 परवानगी नसल्यास संबंधित मंडळांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली का? 🔹 कारवाई झाली असल्यास त्याचा अधिकृत तपशील काय? 🔹 कारवाई झाली नसल्यास त्यामागील कारण काय? विशेष म्हणजे, झोन-7 मध्ये मा. DCP साहेबांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत उत्सवातील कार्यक्रमांबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. त्या सूचनांची सर्व संबंधित पोलीस स्टेशनकडून समान पद्धतीने अंमलबजावणी झाली का, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. ⚖️ सर्वात महत्त्वाचा प्रश्न — नियम सर्वांसाठी समान आहेत का? एका ठिकाणी महिला नृत्य/कलानृत्य कार्यक्रम रोखण्यात आला, तर दुसऱ्या ठिकाणी त्याच स्वरूपाचा कार्यक्रम प्रत्यक्षात होऊ देण्यात आला, असे असल्यास दोन्ही ठिकाणी वेगवेगळे निकष का? नियम समान असतील, तर त्यांची अंमलबजावणीही सर्व मंडळांसाठी समान असली पाहिजे. हा कोणत्याही व्यक्ती किंवा मंडळाविरुद्धचा प्रश्न नसून, नियमांची पारदर्शकता, समानता आणि प्रशासनावरील नागरिकांचा विश्वास याबाबतचा जनहिताचा प्रश्न आहे. प्रशासनाने याबाबत स्पष्ट आणि अधिकृत माहिती जनतेसमोर मांडावी, ही अपेक्षा. 📢 आवाज जनतेचा… प्रश्न जनहिताचा…! @CPPuneCity @iWagholi @CleanKharadi @IndiansOnTheGo @MumbaiPolice @DGPMaharashtra
1
95