नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाचे अधिकृत ट्विटर हँडल, मा. व. ज. सं., महाराष्ट्र शासन.

Nanded, India
Joined July 2015
District Information Office, Nanded retweeted
औरंगाबाद पदवीधर निवडणुकीसाठी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील वरिष्ठ सनदी अधिकारी सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांच्या भूमिकेत निवडणूक निरीक्षक माधवी खोडे चावरे व विभागीय आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनात मतमोजणी केंद्रावर कार्यरत @CEO_Maharashtra
3
4
511
District Information Office, Nanded retweeted
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीला प्रारंभ! 🗳️ सकाळी ७.२५ वाजता स्ट्राँग रूम उघडली; ८ वाजता मतमोजणी सुरू #पदवीधरमतदारसंघ #मतमोजणी२०२६ #AurangabadGraduatesConstituency #ElectionCounting #ChhatrapatiSambhajinagar
1
2
155
District Information Office, Nanded retweeted
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीला प्रारंभ! निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत,निवडणूक निरीक्षक माधवी खोडे-चावरे, निवडणूक लढविणारे उमेदवार व अधिकृत प्रतिनिधींच्या उपस्थितीत सकाळी ७.२५ वाजता स्ट्राँग रूम उघडण्यात आली. #पदवीधरमतदारसंघ @MahaDGIPR
2
6
420
District Information Office, Nanded retweeted
३०४ तालुक्यांतील प्रत्येक गावात किमान १०० जलशोषक खड्डे #दुष्काळ #जलसंधारण #MahaDGIPR
4
1
6
1,729
District Information Office, Nanded retweeted
हर घर संत रविदास विचार–विकसित महाराष्ट्र अभियान #विकसितमहाराष्ट्र #वृक्षारोपण #MahaDGIPR
5
2
1,510
District Information Office, Nanded retweeted
बालवयातच रुजणार महात्मा जोतीराव फुले यांचे प्रेरणादायी विचार! #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
1
2
233
District Information Office, Nanded retweeted
विशेष पोलीस महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र, यांचे नागरिकांना आवाहन. #Nanded #News #Finance
4
14
931
District Information Office, Nanded retweeted
पोलीस अधिक्षक नांदेड, निलाभ रोहन यांचे नागरिकांना आवाहन. #NandedNews #FinanceCompany
5
6
38
3,527
District Information Office, Nanded retweeted
शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांचा लाभ समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे. प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता राखून योजनांची अंमलबजावणी अधिक परिणामकारक करण्यावर भर द्यावा, असे प्रतिपादन इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण विभागाचे मंत्री तथा ‘वनार्टी’चे अध्यक्ष अतुल सावे यांनी राज्यस्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी केले. पुणे यशदा येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त इतर मागास बहुजन कल्याण विभाग आणि स्व. वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी), नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबिरास भटके-विमुक्त विकास परिषदेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष उद्धवराव काळे, इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे सचिव आप्पासो धुळाज, ‘वनार्टी’चे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे, राज्यस्तरीय अशासकीय सदस्य राजेंद्र दोनाडकर, डॉ. संजय पुरी, नरेश पोटे, शरद माकर यांची प्रमुख उपस्थिती होती. शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे. प्रशासकीय नियम व कार्यपद्धतींचे पालन करताना क्षेत्रीय स्तरावरील कामकाज अधिक सक्षम आणि परिणामकारक करण्यावर भर दिला पाहिजे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून विभागाच्या योजनांची अंमलबजावणी अधिक सुसूत्रपणे करण्यास मदत होईल, असे मंत्री श्री. सावे यांनी यावेळी सांगितले. इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अशासकीय सदस्य, विभागाचे क्षेत्रीय अधिकारी आणि महसूल विभागाचे क्षेत्रीय अधिकारी यांचे २४ व २५ ऑक्टोबरदरम्यान हे दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजे उमाजी नाईक आणि वसंतराव नाईक यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. @save_atul
1
3
14
3,535
District Information Office, Nanded retweeted
विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी बजावला मतदानाचा हक्क !औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी आज छत्रपती संभाजीनगर प्रियदर्शनी इंदिरानगर येथील मतदान केंद्र क्रमांक १०९ वर मतदानाचा हक्क बजावला @MahaDGIPR
1
3
193
District Information Office, Nanded retweeted
विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी बजावला मतदानाचा हक्क ! 🗳️ ०५ - औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी छत्रपती संभाजीनगर येथील मनपा शाळा, प्रियदर्शनी इंदिरानगर येथील मतदान केंद्र क्र.१०९ वर मतदानाचा हक्क बजावला
1
3
357
महाज्योतीच्या माध्यमातून शिक्षण, कौशल्य विकास आणि संशोधनाला मिळतेय नवी दिशा ! महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. अधिक माहितीसाठी QR कोड स्कॅन करा. #महात्माफुले200 #महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष #महाज्योती #महाराष्ट्रशासन
2
2
301
District Information Office, Nanded retweeted
#औरंगाबाद पदवीधर निवडणूक: सकाळी १० वाजेपर्यंत ६.५२ टक्के मतदानपहिल्या दोन तासांत आठही जिल्ह्यांतील ८४२ मतदान केंद्रांवर एकूण २१ हजार २९३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.जालना जिल्ह्यात सर्वाधिक ८.१८ टक्के, तर बीडमध्ये ८.१५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. @MahaDGIPR @CMOMaharashtra
1
1
3
157
District Information Office, Nanded retweeted
मतदार यादीत नाव नोंदणी १७, १८, २४ आणि २५ ऑक्टोबर रोजी विशेष शिबिरे #मतदारयादी #मतदारनोंदणी #MahaDGIPR
13
42
3,618
District Information Office, Nanded retweeted
आदिवासी कला-संस्कृतीचा जागतिक स्तरावर गौरव ‘शबरी नॅचरल्स’च्या पॅकेजिंगला जपानचा प्रतिष्ठेचा ‘गुड डिझाईन अवॉर्ड’ #आदिवासी #TribalEmpowerment #MahaDGIPR
5
10
1,958
District Information Office, Nanded retweeted
दुष्काळाच्या झळांनी होरपळणारा शेतकरी, महागाईमुळे आर्थिक ओढाताण सहन करणारा सर्वसामान्य नागरिक आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना होणारी दमछाक, अशा परिस्थितीत जनतेवर भाडेवाढीचा अतिरिक्त भार कशासाठी, असा सवाल उपस्थित करत परिवहन मंत्री तथा #एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिवाळीच्या गर्दीच्या हंगामासाठी एसटीची प्रस्तावित १५ टक्के हंगामी भाडेवाढ नामंजूर केली. दरवर्षी दिवाळीच्या गर्दीच्या काळात एसटीच्या प्रवासी भाड्यात हंगामी वाढ केली जाते. यंदाही १ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत प्रवासी भाड्यात सरसकट १५ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव एसटी प्रशासनाने मंत्री सरनाईक यांच्याकडे सादर केला होता. मात्र, आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या जनतेवर आणखी भार टाकणे योग्य नसल्याची भूमिका घेत त्यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. एसटीच्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी पर्यायी मार्ग शोधू; मात्र अडचणीत असलेल्या जनतेला दिलासा देण्याचे कर्तव्य विसरणार नाही,’ या भूमिकेतून मंत्री सरनाईक यांनी प्रस्तावित भाडेवाढीला नकार देत सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला. #दुष्काळ #Famerwelfare @PratapSarnaik @msrtcofficial
3
9
1
15
2,462
District Information Office, Nanded retweeted
#क्रीडा विभागामार्फत राज्यातील उत्कृष्ट क्रीडापटू तसेच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यामध्ये क्रीडा क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तींसाठी जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, महिला क्रीडा मार्गदर्शकांसाठी जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार, खेळाडू, दिव्यांग खेळाडू तसेच साहसी उपक्रमांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांसाठीच्या पुरस्कारांचा समावेश आहे. सन २०२४-२५ व सन २०२५-२६ या वर्षांसाठीच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी पात्र खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, दिव्यांग खेळाडू तसेच साहसी उपक्रमांत सहभागी झालेल्या खेळाडू व व्यक्तींनी १५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज क्रीडा विभागाच्या "sports.maharashtra.gov.in" या अधिकृत संकेतस्थळावर १५ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. #राज्यक्रीडापुरस्कार
1
7
6
2,248
District Information Office, Nanded retweeted
राज्य शासनाच्या सेवा नागरिकांना अखंडपणे डिजिटल माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभाग आणि #महाआयटी यांनी समन्वयाने काम करावे. ‘महाडीबीटी 2.0’, ‘मैत्री 2.0’ आणि ‘आपले सरकार 2.0’ या प्लॅटफॉर्मवरील सेवांचे २६ जानेवारी रोजी लोकार्पण करण्याच्या दृष्टीने सर्व प्रलंबित कामे ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत दिले. बैठकीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार, राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी डिजिटल सेवा वितरण अधिक सुलभ, प्रभावी आणि नागरिकाभिमुख करण्यावर भर दिला. बाह्य पोर्टल्सचे एकात्मीकरण ३० नोव्हेंबरपर्यंत, तर वापरकर्ता चाचण्या, क्षेत्रीय चाचण्या, अधिकारी प्रशिक्षण आणि नागरिक जागृतीची कामे १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तपासलेल्या १,२२२ सेवांपैकी ७२३ सेवांचे तर्कसंगतीकरण करण्यात आले असून, विविध महामंडळांच्या १३० योजना महाडीबीटी 2.0 वर आणण्यात येणार आहेत. तसेच, वसतिगृहांसाठी ‘महाहोस्टेल’ प्लॅटफॉर्म आणि शासकीय कंत्राटांसाठी ‘एक कंत्राटदार–एक ओळख क्रमांक’ ही व्यवस्था विकसित करण्यात येणार आहे. राज्यातील सक्रिय सेवा केंद्रांपैकी १२ हजार ८२४ केंद्रांची पडताळणी पूर्ण झाली आहे. गुणवत्ता आणि नागरिकांचा अभिप्राय यांसारख्या निकषांवर केंद्रांचे वर्गीकरण करण्यात येत असून, उत्कृष्ट ‘स्मार्ट’ सेवा केंद्रांचा २६ जानेवारी २०२७ रोजी गौरव करण्यात येणार आहे. डिजिटल सेवांचे यश केवळ तांत्रिक पूर्ततेत नसून नागरिकांना मिळणाऱ्या सुलभ सेवांमधून आणि त्यांच्या सकारात्मक अभिप्रायातून मोजले जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. @Dev_Fadnavis @SunetraA_Pawar @ShelarAshish #आपलेसरकार #महाडीबीटी
3
6
1
22
6,026
District Information Office, Nanded retweeted
#खरीपहंगाम २०२६-२७ मध्ये केंद्र शासनाच्या हमीभाव खरेदी योजनेअंतर्गत सोयाबीन, मूग, उडीद व तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि धान्य साठवणुकीचे काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले. यासाठी ९५० हून अधिक खरेदी केंद्रांची व्यवस्था करण्यात येणार असून, गोदामांच्या नियोजनातून १५.२८ लाख मेट्रिक टन साठवणूक क्षमता उपलब्ध होणार आहे. खरेदी केंद्रांवर बैठक व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, बारदाना, वाहतूक आणि गोदामांची सुविधा उपलब्ध करण्यासह क्यूआर कोड टॅगिंगची व्यवस्था करण्याचे निर्देशही मंत्री रावल यांनी दिले. यंदा सोयाबीनच्या हमीभावात ३८० रुपये, तुरीच्या हमीभावात ४५० रुपये आणि उडदाच्या हमीभावात ४०० रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार सोयाबीनचा हमीभाव ५,७०८ रुपये, तुरीचा ८,४५० रुपये आणि उडदाचा ८,२०० रुपये प्रति क्विंटल झाला आहे. हमीभाव योजनेची माहिती अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी व्यापक जनजागृती करण्यावरही बैठकीत भर देण्यात आला. बैठकीस प्रधान सचिव प्रवीण दराडे, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कौस्तुभ दिवेगावकर, मार्कफेडचे कार्यकारी संचालक अशोक करंजकर, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय कदम उपस्थित होते. @JaykumarRawal
2
6
14
3,051