Mpsc Objective (@Objective2027) header
Mpsc Objective (@Objective2027) profile picture
Joined September 2026
Photo by Mpsc Objective (@Objective2027)Photo by Mpsc Objective (@Objective2027)Photo by Mpsc Objective (@Objective2027)Photo by Mpsc Objective (@Objective2027)Photo by Mpsc Objective (@Objective2027)Photo by Mpsc Objective (@Objective2027)Photo by Mpsc Objective (@Objective2027)Photo by Mpsc Objective (@Objective2027)Photo by Mpsc Objective (@Objective2027)Photo by Mpsc Objective (@Objective2027)
कामाचा माणूस निखिल पाटील. आता निखिल पाटील सर, आमच्या फक्त Objective 2027 च्या मागणीचा पाठपुरावा करा, संपूर्ण महाराष्ट्राला तुमच्याकडून अपेक्षा आहेत. #objective2027 🔥
📍 मंत्रालयातील १३०० लिपकांसोबत भेट..!! आज मंत्रालयातील लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या मंत्रालयातील संपस्थळी भेट देऊन त्यांच्या विविध मागण्या आणि अडचणी जाणून घेतल्या. यामध्ये ‘क्लार्क’ ऐवजी ‘मंत्रालय सहाय्यक’ असे सन्मानजनक पदनाम देणे, तसेच सध्याच्या S-6 वेतनश्रेणीत सुधारणा करून S-10 वेतनश्रेणी लागू करणे,राहत्या शासकीय Quarters च्या समस्या अशा प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. या मागण्यांबाबत व्यावहारिक आणि सकारात्मक मध्यममार्ग काढता येऊ शकतो. कर्मचाऱ्यांच्या निस्पृह, प्रामाणिक भावना आणि त्यांच्या रास्त मागण्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कानावर घालून हा विषय लवकरात लवकर मार्गी लागावा आणि सर्व कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी निश्चितच पाठपुरावा करणार आहे. सर्व सन्माननीय कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना समजून घेणे, त्यांच्या अडचणी शासनापर्यंत पोहोचवणे आणि संवादातून मार्ग काढणे, हीच आपली भूमिका आहे. सर्व कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर सकारात्मक निर्णय मिळेल, अशी आशा व्यक्त करतो.! @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @GAD_Maharashtra #DevendraFadnavis #मंत्रालय #महाराष्ट्र #NikhilPatil #Cleark
1
20
28
526
महाराष्ट्र दौरा #OBJECTIVE2027 🔥
4
31
1
41
562
UPSC अभ्यास करणारे महाराष्ट्राचे सुपुत्र, जळगावचे श्री. भूषण ठाकरे सर यांच्या गेल्या १० वर्षांच्या अथक प्रयत्नांना अखेर यश आले आहे. नुकत्याच पार पडलेल्या 'कौन बनेगा करोडपती' (KBC) च्या १८ व्या पर्वाचे ते पहिले १ कोटी रुपये जिंकणारे स्पर्धक ठरले आहेत. त्यांच्या ७ कोटी रुपयांच्या प्रश्नाचे उत्तरही बरोबर आले होते, परंतु त्यांनी १ कोटी रुपयांवर खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. आज संपूर्ण देश त्यांच्या बुद्धिमत्तेचे कौतुक करत आहे. ​आम्हालासुद्धा एक स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी म्हणून याचा सार्थ अभिमान वाटतो की, आमच्यातीलच एका विद्यार्थ्याने आज केबीसी जिंकून महाराष्ट्राचे नाव देशभरात गाजवले आहे. भूषण सर हे खरे यूपीएससीचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत, याची देशाला जाणीव आहे. वस्तुनिष्ठ (Objective) पद्धतीने घेतली जाणारी 'कौन बनेगा करोडपती' ही स्पर्धादेखील बुद्धिमत्तेची कुवत असणाऱ्या लोकांचे प्रतीक मानली जाते. आता खोट्या कोचिंग माफियांना इथेही हेच म्हणायचे आहे का, की 'कौन बनेगा करोडपती' ही वस्तुनिष्ठ (MCQ) पद्धतीने होते म्हणजे ती केवळ घोकंपट्टीचीच परीक्षा आहे? आता तरी जरा सुधारा आणि सत्याची साथ द्या. तसेच, पत्रकार राहुल कुलकर्णी सरांनाही विनंती आहे की, त्यांनी वस्तुनिष्ठ (MCQ) पद्धतीने होणारी केबीसी स्पर्धा जिंकणाऱ्या 'महाराष्ट्राच्या भूषण'ची लवकरात लवकर मुलाखत घ्यावी.
3
23
60
2,860
वर्णनात्मक पद्धत म्हणजे नीतिमत्ता हे खोटा आहे ह्या IPS ने सिद्धकेले आहे आणि कोचिंग माफियाची रोजीरोटी चालवावी म्हणून मांडलेले खोटे वक्तव्य आहे. नीतिमत्ता ही व्यक्तीवर अवलंबून असते. १ लाख रुपये प्रतिमहिना पगार असणारा IPS अधिकारी मूळात २ कोटी रुपये आणतो कुठून ? पारदर्शकतेसाठी राज्यसेवा OBJECTIVE पॅटर्ननेच झाली पाहिजे आणि MPSC ही कोचिंग माफियाची गरीबी हटाव योजना नाही, ही विद्यार्थ्यांना निवडण्याची संस्था आहे.
9
45
64
1,713
Objective2027 🔥
परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणा, सुरक्षितता आणि पारदर्शकता यासाठी मी सातत्याने मागण्या करत आलेलो आहे. त्याच अनुषंगाने आज मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय कृती दलाचे अध्यक्ष नंदन निलेकणी व वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. लवकरच विद्यार्थी हिताच्या मागण्यांना मूर्त स्वरूप मिळेल आणि व्ही. राधा समितीच्या अहवालातून आवश्यक सुधारणांची स्पष्टता होईल, असा विश्वास आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून सातत्याने सकारात्मक निर्णय घेणारे Visionary मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे मनःपूर्वक आभार.! @Dev_Fadnavis @NandanNilekani
9
31
2
60
4,406
🔥
राजकीय आंदोलनांच्या गदारोळातही विद्यार्थ्यांच्या भविष्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवर माझा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरूच होता...! आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काही राजकीय नेत्यांनी राजस्थानच्या धर्तीवर ₹१०० चे कार्ड घेऊन परीक्षा देण्यासंदर्भात विविध मागण्या मांडल्या होत्या. मात्र, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने आर्थिक दिलासा मिळावा, यासाठी राजस्थानच्या धर्तीवर ₹१०० च्या कार्डऐवजी सर्व MPSC परीक्षांचे अर्ज पूर्णपणे ₹० (निःशुल्क) भरता यावेत, अशी आग्रही मागणी मी यापूर्वीही केली होती. परवासुद्धा माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब आणि श्रीमती व्ही. राधा जी यांच्याकडे ही मागणी पुन्हा मांडली. मात्र, ही सुविधा सुरू करताना तिचा लाभ केवळ प्रामाणिकपणे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या आणि परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाच मिळावा, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याची मागणी मी केली आहे. त्याचबरोबर परीक्षेची विश्वासार्हता आणि पारदर्शकता टिकवण्यासाठी आणखी दोन महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. १. प्रश्नपत्रिका छपाईपासून ते परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचेपर्यंतची संपूर्ण यंत्रणा अत्याधुनिक आणि सुरक्षित करण्यात यावी. २. परीक्षेच्या दिवशी प्रत्येक परीक्षा केंद्राच्या तपासणीसाठी (Inspection) स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी, जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही. या सर्व महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयांवर शासनाकडून निश्चितच योग्य आणि विद्यार्थीहिताचा निर्णय घेतला जाईल, असा मला विश्वास आहे. माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना एवढेच सांगायचे आहे की, राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि हा तुमचा निखिल पाटील तुमचा सहकारी म्हणून कायम तुमच्यासोबत उभा राहील. तुम्ही बिनघोर राहा, कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नका आणि फक्त आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या प्रश्नांसाठी आवाज उठवण्याची आणि त्यांचा सातत्याने पाठपुरावा करण्याची जबाबदारी माझी आहे! @Dev_Fadnavis @mpsc_office @CMOMaharashtra
4
18
44
4,450
काही लोक तर्क मांडतात की कोणत्याच राज्यात ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न नाही, तर आपल्याच राज्यात का हवा? तर त्यांना हेही सांगू इच्छितो की, कोणत्याच राज्यात मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांचा निकाल लागून मुलाखतीची वाट पाहता पाहता निकाल रद्द होऊन पेपर रिचेकिंगला जात नाहीत. विचार करा मित्रांनो, २०२५ ला १२७ जागा होत्या तर इतका गोंधळ झाला की पेपर रिचेकिंगला गेले. २०२७ ला ८०० पेक्षा जास्त जागा आहेत. आपण मेहनत करून अभ्यास करू, पण ही रिचेकिंगची भीती जाणार कधी? १२७ जागांच्या पेपर चेकिंगमध्ये इतका गोंधळ झाला, तर ८०० जागांसाठी काय होईल? २०२७ पासून ऑब्जेक्टिव्हशिवाय पर्याय नाही.
9
60
1
66
3,182
२०११ साली आदरणीय आर. आर. पाटील हे महाराष्ट्राचे गृहमंत्री होते, तेव्हा त्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही झाली नव्हती इतकी मोठी म्हणजेच १,८६९ जागांची जाहिरात पीएसआय (PSI) पदासाठी काढली होती. कित्येक वर्षे अभ्यास करणारा वर्ग या मेगा पीएसआय भरतीत पीएसआय झाला आणि आज राज्यात मुंबईपासून गडचिरोलीपर्यंत API आणि PI म्हणून उत्कृष्ट काम करत आहे. ​सध्याचे माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबांना सर्व विद्यार्थी वर्गाकडून विनंती आहे की, सध्या महाराष्ट्रातही पीएसआयच्या इतक्याच जागा रिक्त आहेत. त्यामुळे आपणही २०२७ च्या पीएसआय परीक्षेसाठी जास्तीत जास्त जागा पाठवून २०११ सारखी संधी २०२७ च्या परीक्षेत आम्हाला द्यावी.
2
41
73
3,734
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा श्री.निखिल पाटील सर! ​२००३ ला जेव्हा पेपरफुटी जी होती तेव्हा MPSC विद्यार्थ्यांसमोर खूप अंधार होता आणि त्यावेळी विद्यार्थ्यांची बाजू मांडणारे कोणी ठाम नेतृत्व नव्हते. २०२६ मध्ये ड्रग इन्स्पेक्टर पेपरफुटी समोर आली आणि Descriptive पॅटर्नमधील गैरप्रकार उघड झाले. पैशांची आणि मोठी ताकद असलेले लोक वर्णनात्मक पॅटर्नच्या बाजूने असतानाही, तुम्ही पारदर्शक आणि ९९% विद्यार्थ्यांची मागणी असलेल्या Objective पॅटर्नला खंबीर पाठिंबा दिला. ​तुम्ही पाठीशी नसता तर कदाचित २००३ चीच परिस्थिती पुन्हा आली असती आणि विद्यार्थी नैराश्यात गेले असते. आज तुमच्यासारखे प्रामाणिक युवा नेतृत्व आमच्यासोबत आहे, याचा आम्हाला खूप आधार वाटतो. ​पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि सत्यासाठी लढायला ईश्वर तुम्हाला आणखी बळ देवो.
8
38
72
1,239
प्राध्यापकांच्या अंगठ्यांचा गैरवापर करून त्यांच्या नावाने उत्तरपत्रिका तपासल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, तब्बल 19 हजार उत्तरपत्रिकांच्या तपासणीतील अनियमिततेप्रकरणी 48 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे विद्यापीठाच्या परीक्षा आणि उत्तरपत्रिका तपासणी प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी संबंधित असलेल्या उत्तरपत्रिका तपासणी प्रक्रियेत अशा प्रकारच्या अनियमितता घडल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 🔴 1. नेमका घोटाळा काय? या प्रकरणात प्राध्यापकांच्या अंगठ्यांचा वापर करून उत्तरपत्रिका तपासणी झाल्याचा आरोप आहे. प्रत्यक्षात उत्तरपत्रिका तपासण्याचे काम दुसऱ्याच व्यक्तींनी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. परीक्षा व्यवस्थेतील उत्तरपत्रिका तपासणी ही अत्यंत जबाबदारीची प्रक्रिया असते. संबंधित विषयातील नियुक्त परीक्षकांनीच उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन करणे अपेक्षित असते. मात्र, प्राध्यापकांच्या नावाचा आणि अंगठ्याचा वापर करून दुसऱ्या व्यक्तींनी उत्तरपत्रिका तपासल्याचा प्रकार समोर आल्याने संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ⚖️ 3. 48 जणांवर गुन्हा दाखल; प्रकरणाला नवे वळण या प्रकरणातील सर्वात महत्त्वाची नवीन घडामोड म्हणजे 48 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती.त्यामध्ये प्रा. मधुकर साठे, डॉ. संदीप राजाभाऊ धिरडे (प्राचार्य), दादासाहेब कन्हाळे, अंकुश गंगाराम पडाळे आणि प्रा. विशाल अशोकराव चपटे यांचा समावेश असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. यामुळे हे प्रकरण केवळ प्रशासकीय अनियमिततेपुरते मर्यादित न राहता आता फौजदारी तपासाच्या कक्षेत आले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणातील संबंधित व्यक्तींची भूमिका, उत्तरपत्रिका तपासणीची संपूर्ण प्रक्रिया आणि प्राध्यापकांच्या अंगठ्यांचा वापर कसा झाला, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे. 🏛️ 4. विद्यापीठाच्या परीक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह विद्यापीठाच्या परीक्षा प्रक्रियेत उत्तरपत्रिका तपासणीला विशेष महत्त्व असते. विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षेचे मूल्यमापन निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने होणे आवश्यक आहे. अशा प्रक्रियेत अनधिकृत व्यक्तींचा सहभाग असल्याचा आरोप समोर आल्यास पुढील प्रश्न निर्माण होतात. 🔹 उत्तरपत्रिका तपासण्यासाठी अधिकृत परीक्षकांची नियुक्ती कशी झाली? 🔹 प्राध्यापकांच्या अंगठ्यांचा वापर कोणत्या पद्धतीने करण्यात आला? 🔹 प्रत्यक्ष उत्तरपत्रिका तपासणाऱ्या व्यक्ती कोण होत्या? 🔹 19 हजार उत्तरपत्रिकांच्या तपासणीची जबाबदारी कोणाकडे होती? 🔹 या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांच्या निकालावर काही परिणाम झाला आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येणे आवश्यक आहे. या प्रकरणातील सर्व उत्तरपत्रिकांची पुन्हा तपासणी करण्यात यावी का?👇 आपले मत कमेंटमध्ये नोंदवा. 📢 बातमी पूर्ण वाचा.. अशा शैक्षणिक अपडेट साठी महाशिक्षक फॉलो करा.. #UniversityNews #AnswerSheetScam #ExamScam #EducationNews #MaharashtraEducation #UniversityExam #उत्तरपत्रिका #परीक्षाघोटाळा #विद्यापीठ #शिक्षणबातमी #महाशिक्षक @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @MahaDGIPR @mpsc_office
2
36
46
1,880
Story अशी आहे : Examiner ला घरी जाण्याची घाई. पेपर लवकर तपासण्याच्या घाईत त्याची पूर्ण पेपरची बेरीज चुकते. आता बेरीज तर चुकीची ठेवता येणार नाही म्हणून काय करायचं हा प्रश्न. म्हणून यावर एक उपाय. काय तर दिलेल्या 2-3 प्रश्नाचे गुण कमी करून बेरीज adjust करा म्हणजे बेरीज बरोबर राहील. ही काय दंतकथा नाही तर सत्यकथा आहे. ती सांगितली आहे एका माजी Examiner ने. होय हेच घोळ आहेत Descriptive Pattern मध्ये. त्यामुळे तर दोषयुक्त Descriptive नकोच. फक्त आरोप करायचे म्हणून करायचे नाहीत तर आम्ही तथ्यसहित बोलत आहोत. Descriptive च्या लोकांना विनंती आहे आयोगाच्या चुकीच्या धोरणाला सपोर्ट करू नका. सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही!#objective2027. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @MahaDGIPR @mpsc_office
6
52
68
4,917
हे descriptive चे क्लास गेले १३ वर्ष बंद तर नव्हते मग ह्यांच्या यशस्वी विद्यार्थ्यांची नावे सांगता का? नाही सांगता येणार कारण त्यांचे विद्यार्थी पारदर्शक objective पॅटर्न मध्ये कधी यशस्वी होऊच शकत नव्हते,म्हणून तर घोटाळे करायला हा descriptive पॅटर्न आणायचा आहे त्यांना. बरं चला ह्यांचे UPSC मधील यशस्वी विद्यार्थ्यांची नावे सांगा ..... आहे का कोणी ? की फक्त कार्यकर्ता अधिकारी, बिनपगारी आणि फुल अधिकारी आहेत सर्व ?
4
35
66
3,112
हा घ्या पुरावा, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नने झालेले FSO चे पेपर्स ASO ने चेक केले आहेत, अजून तुम्हाला काय हवं आहे? आता तर विनंती आहे, सत्यता स्वीकारा, विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहा, अजूनही वेळ गेलेली नाही. सरकार सुद्धा आमच्या बाजूने आहे. जो पॅटर्न MPSC संस्थेला झेपत नाही, तो कशाला हवा? अ‍ॅनालिटिकल अ‍ॅबिलिटी सुद्धा हीच खरी असते, ज्यामध्ये माणूस हा स्वतःच्या शक्ती आणि कमकुवतपणा स्वीकारतो. नुस्तं पैसा सर्वस्व नसतो. #objective2027
6
59
1
107
7,102
जर टेलिग्रामवर तू डोक्यावर घेतलेला कोचिंग माफिया पोटापाण्यासाठी सुमार दर्जाचे कोर्सेस विकून आपली पोळी भाजून घेत असेल (किंवा चटणी-भाकर खात असेल), तर टेलिग्राम पोलच्या आधारे सरकार विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल का घेऊ शकत नाही?
2
11
28
803
पेड न्यूज स्वीकारणाऱ्या आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नने पत्रकारितेची पदवी घेतलेल्या प्रत्येक पत्रकाराने हे पाहावे. ही आहे महाराष्ट्रातील ९० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी आणि पालकांची मागणी 🙏पैशासाठी आपला जमीर विकू नका.
2
50
1
58
1,782
पेड न्यूज (पैशांच्या बदल्यात छापलेल्या बातम्या) खोट्या असू शकतात, पण संविधानिक पदावर बसलेले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस खोटे बोलतील का? विद्यार्थ्यांची आणि पालकांची एकच मागणी आहे— 'ऑब्जेक्टिव्ह २०२७' (MCQ). फक्त कोचिंग माफियांच्या पालकांची मागणी 'डिस्क्रिप्टिव्ह' (वर्णनात्मक परीक्षा पद्धत) असेल, कारण आमच्या पोराने यूपीएससीच्या काळात दिल्ली गाजवली, आता त्याचा रोजीरोटीचा प्रश्न सोडवा! पण एक लक्षात ठेवा,MPSC ही कोचिंग माफियांची 'गरिबी हटाव' मोहीम नाही, तर हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @MahaDGIPR @mpsc_office @NikhilPatil_MH
6
54
62
1,383
असं कळतंय की कोचिंग माफियाने लाखो रुपये गोळा केले आहेत, वर्तमानपत्रात खोट्या बातम्या छापल्या आहेत. अरे लाजा बाळगा, तुम्ही स्वतःला एथिक्सचे शिक्षक म्हणता! #objective2027 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @MahaDGIPR @mpsc_office
5
31
63
1,595
राज्यसेवा Objective २०२७ पासून झाली तर MPSC मधली सर्व आंदोलन आणि विद्यार्थांचा मनातला अविश्वास पेपरफुटी मुळे झालेला सर्व संपून जाईल. #objective2027 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @MahaDGIPR @mpsc_office
3
46
68
1,392
वैकल्पिक विषय आणि Descriptive पद्धतीमुळे केवळ आणि केवळ कोचिंग क्लासेसच्याच वाढीत तेजी आली आणि गल्लोगल्ली शिक्षक तयार झाले. अशी स्पष्ट सत्यता मांडल्याबद्दल MPSC चे माजी सदस्य आदरणीय श्री. दयानंद मेश्राम सरांचे आभार. सर्व कोचिंग क्लासेसना विनंती आहे की, MPSC परीक्षेचा पॅटर्न हा विद्यार्थ्यांचा विषय आहे. आम्ही आमची मागणी सरकार दरबारी मांडू, पण तुम्ही खाजगी कोचिंगवाल्यांनी यात लक्ष घालू नका. MPSC ही कोचिंग क्लासेसवाल्यांची 'गरिबी हटाव' मोहीम नाही; ती अधिकारी निवडणारी (शिफारस करणारी) संस्था आहे. आणि आम्ही १०० टक्के विद्यार्थी सरकार दरबारी Objective पॅटर्नची मागणी मांडून ती पूर्ण करून आणू. #SayNoToRechecking #objective2027 @CMOMaharashtra @phoenixiasbyNS @MahaDGIPR @mpsc_office @micnewdelhi @NikhilPatil_MH
Sunday Wisdom!"वर्णनात्मक अथवा वस्तुनिष्ठ" यापैैकी एका पद्धतीसाठी लाभार्थी घटकांंचा आग्रह तर दुसऱ्या पद्धतीबद्दलचा त्यांंचा पूूर्वग्रह हा नैसर्गिक व समजण्यायोग्य. सोयीच्या वा लाभदायक परीक्षा पद्धतीसाठी प्रभावी युक्तीवाद व समर्थनार्थ मोहीम हाही व्युहरचनेचा भाग.मात्र हल्ली यावर एकीकडे भावनिक साद तर सोबतच आक्षेपार्ह शेरे, टोकाच्या कडवट प्रतिक्रियां व भ्रामक वृत्तांचा समाज माध्यमांवर सतत ओघ. पेपरफुटी प्रकरणात बचावात्मक पवित्रा घ्यावा लागण्याची वेळ तर उत्तरपत्रिका तपासणीतील त्रुटीं माहिती अधिकारातून उघड झाल्याने फेर मुल्यांकनासाठी दबावात जाण्याची पाळी #MPSC वर आल्यानंंतर स्पर्धा परीक्षांचे पटलावर राज्यात बरेच प्रभाव गट सक्रिय. राजकीय नफातोट्याचा विचार करत लोक प्रतिनीधींचीही यात उडी,यु-ट्युबर्सना या विषयावर उत्पन्न वाढीचा न आवरणारा मोह, "वैकल्पिक विषयांसह वर्णनात्मक परिक्षा पद्धती" तून आलेली आर्थिक तेजी (वैकल्पिक विषय २०२७ पासून वगळण्याचे निर्णयानंतर) कायम ठेवण्यास्तव कोचींग क्लास चालकांचा खटाटोप, "शिक्षक" या स्वतंत्र हितसंबंधीत घटकाचा अनपेक्षित उदय, काही उमेदवारांची या क्षेत्रात पुढारपणासाठी चाललेली धडपड तर श्रेयासाठी अनेेकांतील चढाओढ यामुळे हा विषय अजूनच भरकटण्यास हातभार. परीक्षा योजना व पद्धती,मुल्यांकनाचे निकष, अभ्यासक्रम सुधारणा,मुलाखतीचे स्वरूप व गुणदान योजना इ.च्या संबंधीचे निर्णयाधिकार पूर्णतः व अंतिमतः आयोगाच्या घटनात्मक अधिकार क्षेत्रात मोडत असल्याने गैरवाजवी हस्तक्षेप वा बाह्य दबावाशिवाय व्यवहार्य नि दूरगामी धोरण ठरविण्याची बाब आयोगाचे विवेकावर सोडून परिक्षार्थ्यांनी तयारीवर लक्ष केन्द्रींत करणे उचीत!
6
56
68
2,074