कामाचा माणूस निखिल पाटील.
आता निखिल पाटील सर, आमच्या फक्त Objective 2027 च्या मागणीचा पाठपुरावा करा, संपूर्ण महाराष्ट्राला तुमच्याकडून अपेक्षा आहेत.
#objective2027 🔥
📍 मंत्रालयातील १३०० लिपकांसोबत भेट..!!
आज मंत्रालयातील लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या मंत्रालयातील संपस्थळी भेट देऊन त्यांच्या विविध मागण्या आणि अडचणी जाणून घेतल्या.
यामध्ये ‘क्लार्क’ ऐवजी ‘मंत्रालय सहाय्यक’ असे सन्मानजनक पदनाम देणे, तसेच सध्याच्या S-6 वेतनश्रेणीत सुधारणा करून S-10 वेतनश्रेणी लागू करणे,राहत्या शासकीय Quarters च्या समस्या अशा प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.
या मागण्यांबाबत व्यावहारिक आणि सकारात्मक मध्यममार्ग काढता येऊ शकतो. कर्मचाऱ्यांच्या निस्पृह, प्रामाणिक भावना आणि त्यांच्या रास्त मागण्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कानावर घालून हा विषय लवकरात लवकर मार्गी लागावा आणि सर्व कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी निश्चितच पाठपुरावा करणार आहे.
सर्व सन्माननीय कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना समजून घेणे, त्यांच्या अडचणी शासनापर्यंत पोहोचवणे आणि संवादातून मार्ग काढणे, हीच आपली भूमिका आहे.
सर्व कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर सकारात्मक निर्णय मिळेल, अशी आशा व्यक्त करतो.!
@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @GAD_Maharashtra
#DevendraFadnavis #मंत्रालय #महाराष्ट्र #NikhilPatil #Cleark
UPSC अभ्यास करणारे महाराष्ट्राचे सुपुत्र, जळगावचे श्री. भूषण ठाकरे सर यांच्या गेल्या १० वर्षांच्या अथक प्रयत्नांना अखेर यश आले आहे. नुकत्याच पार पडलेल्या 'कौन बनेगा करोडपती' (KBC) च्या १८ व्या पर्वाचे ते पहिले १ कोटी रुपये जिंकणारे स्पर्धक ठरले आहेत. त्यांच्या ७ कोटी रुपयांच्या प्रश्नाचे उत्तरही बरोबर आले होते, परंतु त्यांनी १ कोटी रुपयांवर खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. आज संपूर्ण देश त्यांच्या बुद्धिमत्तेचे कौतुक करत आहे.
आम्हालासुद्धा एक स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी म्हणून याचा सार्थ अभिमान वाटतो की, आमच्यातीलच एका विद्यार्थ्याने आज केबीसी जिंकून महाराष्ट्राचे नाव देशभरात गाजवले आहे. भूषण सर हे खरे यूपीएससीचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत, याची देशाला जाणीव आहे. वस्तुनिष्ठ (Objective) पद्धतीने घेतली जाणारी 'कौन बनेगा करोडपती' ही स्पर्धादेखील बुद्धिमत्तेची कुवत असणाऱ्या लोकांचे प्रतीक मानली जाते. आता खोट्या कोचिंग माफियांना इथेही हेच म्हणायचे आहे का, की 'कौन बनेगा करोडपती' ही वस्तुनिष्ठ (MCQ) पद्धतीने होते म्हणजे ती केवळ घोकंपट्टीचीच परीक्षा आहे? आता तरी जरा सुधारा आणि सत्याची साथ द्या. तसेच, पत्रकार राहुल कुलकर्णी सरांनाही विनंती आहे की, त्यांनी वस्तुनिष्ठ (MCQ) पद्धतीने होणारी केबीसी स्पर्धा जिंकणाऱ्या 'महाराष्ट्राच्या भूषण'ची लवकरात लवकर मुलाखत घ्यावी.
वर्णनात्मक पद्धत म्हणजे नीतिमत्ता हे खोटा आहे ह्या IPS ने सिद्धकेले आहे आणि कोचिंग माफियाची रोजीरोटी चालवावी म्हणून मांडलेले खोटे वक्तव्य आहे. नीतिमत्ता ही व्यक्तीवर अवलंबून असते. १ लाख रुपये प्रतिमहिना पगार असणारा IPS अधिकारी मूळात २ कोटी रुपये आणतो कुठून ? पारदर्शकतेसाठी राज्यसेवा OBJECTIVE पॅटर्ननेच झाली पाहिजे आणि MPSC ही कोचिंग माफियाची गरीबी हटाव योजना नाही, ही विद्यार्थ्यांना निवडण्याची संस्था आहे.
काही लोक तर्क मांडतात की कोणत्याच राज्यात ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न नाही, तर आपल्याच राज्यात का हवा? तर त्यांना हेही सांगू इच्छितो की, कोणत्याच राज्यात मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांचा निकाल लागून मुलाखतीची वाट पाहता पाहता निकाल रद्द होऊन पेपर रिचेकिंगला जात नाहीत.
विचार करा मित्रांनो, २०२५ ला १२७ जागा होत्या तर इतका गोंधळ झाला की पेपर रिचेकिंगला गेले. २०२७ ला ८०० पेक्षा जास्त जागा आहेत. आपण मेहनत करून अभ्यास करू, पण ही रिचेकिंगची भीती जाणार कधी? १२७ जागांच्या पेपर चेकिंगमध्ये इतका गोंधळ झाला, तर ८०० जागांसाठी काय होईल? २०२७ पासून ऑब्जेक्टिव्हशिवाय पर्याय नाही.
२०११ साली आदरणीय आर. आर. पाटील हे महाराष्ट्राचे गृहमंत्री होते, तेव्हा त्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही झाली नव्हती इतकी मोठी म्हणजेच १,८६९ जागांची जाहिरात पीएसआय (PSI) पदासाठी काढली होती. कित्येक वर्षे अभ्यास करणारा वर्ग या मेगा पीएसआय भरतीत पीएसआय झाला आणि आज राज्यात मुंबईपासून गडचिरोलीपर्यंत API आणि PI म्हणून उत्कृष्ट काम करत आहे.
सध्याचे माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबांना सर्व विद्यार्थी वर्गाकडून विनंती आहे की, सध्या महाराष्ट्रातही पीएसआयच्या इतक्याच जागा रिक्त आहेत. त्यामुळे आपणही २०२७ च्या पीएसआय परीक्षेसाठी जास्तीत जास्त जागा पाठवून २०११ सारखी संधी २०२७ च्या परीक्षेत आम्हाला द्यावी.
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा श्री.निखिल पाटील सर!
२००३ ला जेव्हा पेपरफुटी जी होती तेव्हा MPSC विद्यार्थ्यांसमोर खूप अंधार होता आणि त्यावेळी विद्यार्थ्यांची बाजू मांडणारे कोणी ठाम नेतृत्व नव्हते. २०२६ मध्ये ड्रग इन्स्पेक्टर पेपरफुटी समोर आली आणि Descriptive पॅटर्नमधील गैरप्रकार उघड झाले. पैशांची आणि मोठी ताकद असलेले लोक वर्णनात्मक पॅटर्नच्या बाजूने असतानाही, तुम्ही पारदर्शक आणि ९९% विद्यार्थ्यांची मागणी असलेल्या Objective पॅटर्नला खंबीर पाठिंबा दिला.
तुम्ही पाठीशी नसता तर कदाचित २००३ चीच परिस्थिती पुन्हा आली असती आणि विद्यार्थी नैराश्यात गेले असते. आज तुमच्यासारखे प्रामाणिक युवा नेतृत्व आमच्यासोबत आहे, याचा आम्हाला खूप आधार वाटतो.
पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि सत्यासाठी लढायला ईश्वर तुम्हाला आणखी बळ देवो.
Story अशी आहे :
Examiner ला घरी जाण्याची घाई. पेपर लवकर तपासण्याच्या घाईत त्याची पूर्ण पेपरची बेरीज चुकते. आता बेरीज तर चुकीची ठेवता येणार नाही म्हणून काय करायचं हा प्रश्न. म्हणून यावर एक उपाय. काय तर दिलेल्या 2-3 प्रश्नाचे गुण कमी करून बेरीज adjust करा म्हणजे बेरीज बरोबर राहील. ही काय दंतकथा नाही तर सत्यकथा आहे. ती सांगितली आहे एका माजी Examiner ने. होय हेच घोळ आहेत Descriptive Pattern मध्ये. त्यामुळे तर दोषयुक्त Descriptive नकोच.
फक्त आरोप करायचे म्हणून करायचे नाहीत तर आम्ही तथ्यसहित बोलत आहोत. Descriptive च्या लोकांना विनंती आहे आयोगाच्या चुकीच्या धोरणाला सपोर्ट करू नका.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही!#objective2027.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @MahaDGIPR @mpsc_office
हा घ्या पुरावा, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नने झालेले FSO चे पेपर्स ASO ने चेक केले आहेत, अजून तुम्हाला काय हवं आहे? आता तर विनंती आहे, सत्यता स्वीकारा, विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहा, अजूनही वेळ गेलेली नाही. सरकार सुद्धा आमच्या बाजूने आहे.
जो पॅटर्न MPSC संस्थेला झेपत नाही, तो कशाला हवा?
अॅनालिटिकल अॅबिलिटी सुद्धा हीच खरी असते, ज्यामध्ये माणूस हा स्वतःच्या शक्ती आणि कमकुवतपणा स्वीकारतो.
नुस्तं पैसा सर्वस्व नसतो.
#objective2027




















