Rohan retweeted
Bisleri ला बदनाम केल्या शिवाय रिलायंन्स च्या Campa Sure ला
packaged water मार्केट मध्ये जागा मिळणार नाही .
#कटूसत्य
Rohan retweeted
महाराष्ट्रातील सध्याचा दुष्काळ १९७२ मधील दुष्काळापेक्षा गंभीर असू शकतो हे आता अनेकजण सांगू लागले आहेत.
आमचे मित्र आणि TISS चे प्राध्यापक आर रामकुमार यांनी EPW मध्ये या विषयावर एक लेख लिहून या विषयाशी संबंधित अनेक बाजू टेबलवर मांडल्या आहेत. त्यावर आधारित हे टिपण.
_________________
महाराष्ट्र राज्यातील ३५८ तालुक्यांपैकी ३०५ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून औपचारिकपणे घोषित करण्यात आले आहेत. राज्यातील पर्जन्यमान सरासरीपेक्षा दोन तृतीयांश सांगितले जाते. ही झाली सरासरी. प्रत्येक ठिकाणचे गांभीर्य भिन्न आहे. उदा २०५ तालुक्यात तर सरासरीच्या अर्धा / किंवा त्यापेक्षा कमी पाऊस झाला आहे.
राज्यातील जलाशयातील पाणीसाठा साठवणूक क्षमतेच्या ६६ टक्के आहे. मराठवाड्यातील जलाशयात तर फक्त ४० टक्के.
भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. आतापासून टँकर्सनी पाणी पुरवणे सुरू झाले आहे. आणि अजून किमान आठ नऊ महिने निघायचे आहेत.
गाजावाजा केल्या गेलेल्या जल जीवन मिशन मधील ८,४७८ योजनांपैकी फक्त ३४४ पूर्ण केल्या गेल्या आहेत.
खरिप पिक हवेतसे आले नाहीच पण रबी पीक देखील हातातून जाणार आहे. .
___________________
लेखातील काही निरीक्षणे खालीलप्रमाणे
१. दुष्काळाचा गंभीर परिणाम शेतकऱ्यांवर होणार हे तर झालेच पण त्यापेक्षा जास्त गंभीर परिणाम शेतमजूर, छोटे शेतकरी, भाडेतत्त्वावर घेऊन शेती करणारे यांच्यावर होणार आहेत. कारण त्यांना शासकीय नुकसान भरपाई मिळणार नाही जी सात बारावर ज्याचे नाव असते त्याला मिळते.
२. तीच गोष्ट कर्जमाफीची. सहकारी सोसायट्या, बँका यांच्याकडून कर्ज घेतलेले असेल अशांना फक्त कर्जमाफी योजनेचा लाभ मिळतो. अनेक जण पुरक म्हणून किंवा औपचारिक संस्थाकडून वेळेवर आणि पुरेसे कर्ज मिळाले नाही म्हणून इतर अनेक स्त्रोतांकडून कर्ज उचल करतात. त्यांना कर्जमाफीच्या योजनेचा लाभ मिळणार नाही. खाजगी सावकारी तर कोणत्याच रेकॉर्डवर नसते.
( मायक्रो फायनान्स कंपन्यांनी आणि त्यांच्या वसुली एजंटनी महाराष्ट्रातील ग्रामीण भागात काय धुमाकूळ घातला आहे याच्या बातम्या प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडियामध्ये येत आहेत. गोष्टी त्यापेक्षा विदारक आहेत. )
३. शासनाचा सारा भर वित्तीय पॅकेजवर आहे असे दिसते. अजून सढळ हस्ते आणि माफक व्याजदराने कर्ज पुरवठा करून प्रश्न सुटणारे नाहीत. ७५ लाख किसान क्रेडिट कार्ड अकाऊंट पैकी ४५ टक्के हप्ते थकलेले आहेत तर बँकांमधील शेतीशी निगडीत अर्धी कर्जे एनपीए झाली आहेत.
४. शेतीमधील अशा प्रकारचे गंभीर अरिष्ट जणुकाही शुद्ध आर्थिक अरिष्ट आहे/ असते असे भासवले जाते. प्रत्यक्षात ते झपाट्याने गंभीर सामाजिक अरिष्ट बनत आहे. बनणार आहे.
उत्पन्न बुडाले/ कमी झाले, त्यातून जगण्यासाठी , विशेषतः आजारपणासाठी, मिळेल तेथून कर्जाची उचल करणे, ती फेडता न आल्यामुळे जमिनी, जनावरे, घरातील किडुक मिडूक सोने, इतर ऐवज विकणे, शहराकडे स्थलांतरण आणि असह्य झाल्यावर आत्महत्या…हे प्रकार वाढत जाणारं आहेत
५. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे केंद्र आणि राज्य शासनाला परिस्थितीचे गांभीर्य पुरेसे आकळलेले नाही. रामकुमार यांच्या अनुमानानुसार जून २०२७ पर्यंत दुष्काळी परिस्थितीला तोंड देण्यासाठी १,६७,००० कोटी रुपये लागू शकतात. त्या तुलनेत सध्यातरी ज्या पॅकेजची घोषणा होत आहे ते फक्त ३०,००० कोटींच्या घरात आहे.
संजीव चांदोरकर (२४ नोव्हेंबर २०२६)
Rohan retweeted
अर्थतज्ज्ञ नीरज हातेकर सरांनी दुष्काळाच्या अनुषंगाने लिहिलंय. आवर्जून, वेळ काढून वाचा.
facebook.com/photo?fbid=1684…
Rohan retweeted
Colombo and now Wellington. Two back to back Tests when Shubman Gill and Gautam Gambhir’s Indian team hasn’t been able to win Tests from positions an Indian win looked the only possible result.
Remember there is no Siraj here so who to blame?
Surprisingly Bumrah bowled just 11 overs today, a day you thought he would win India the Test.
#IndvsNZ
Rohan retweeted
India shook hands, offered New Zealand a draw with 15 overs left. Because they thought it was impossible to win from here.
But what was the harm in at least trying — in fact they stopped fighting at least an hour before the handshake.
Let me tell you the story of a very famous/in famous Test match, the Monkeygate Sydney 2008 Test when India were 7 down with only two overs were left for the Test to finish and Australia captain gave the ball to Michael Clarke @MClarke23 - he got all 3 wickets in that over and India lost.
People won’t like my saying this, but even Sunil Gavaskar (who did hold a bat in his hands) is saying so. Maybe one wicket and India may have picked up the last 4 too.
I won’t even ask if anybody agrees to this or not: because this will be shut down
#IndvsNZ
Rohan retweeted
एका बाईने पाकीस्तानाचे दोन तुकडे केले.
एका बाईने बॅंकाचं राष्ट्रीयकरण केलं.
एका बाईने खलिस्तान चळवळ संपवली .
एका बाईने सारंजामशाहीला सुरूंग लावला.!
स्वर्गीय इंदिराजींना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
आणि एक छातीची मापं सांगणारा पुरूष रोज रडतोय त्याला आजही नेहरु काम करू देत नाहीत
Rohan retweeted
I’m old enough to remember when they called Daniel Craig a downgrade from Pierce Brosnan.
Rohan retweeted
“चालतंय की, एवढं काय त्यात?”
आपण दिवसातून किती वेळा हे वाक्य म्हणतो किंवा ऐकतो?
कायदे आपल्या देशासाठी, आपल्याच लोकांनी बनवले आहेत. ते राबवणारेही आपले लोक आहेत. मग "चालतंय" का? मग आपल्या अपेक्षा इतक्या कमी का?
जेव्हा आपण स्वतःच "चालतंय" म्हणतो, तेव्हा व्यवस्थाही "चालतंय" म्हणूनच चालते. “चालतंय की, एवढं काय त्यात" म्हणत आपण सगळं स्वीकारतो. “चालतंय" ही वृत्ती आपल्याला मागे ठेवते.
नागरिक जागरूक झाले की व्यवस्था सुधारते. जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. तक्रार करा, प्रश्न विचारा, चुकीला चूक म्हणा,उच्च दर्जाचा आग्रह धरा.
दर्जा हा पर्याय नाही, तो आपला हक्क आहे. चला, "चालतंय" ऐवजी "चांगलंच हवं" म्हणूया.
The Economist मधिल “Ashoka " सदरात "चलता है" या वृत्तीवरचा लेख 👇
#TukaramMundhe #Leadership #theeconomist #inspiration
Rohan retweeted
तिला मूर्त रूप देण्याचा जीवापाड प्रयत्न केला होता. पण शेवटी काय झालं..? ज्या नात्यात मी माझं संपूर्ण अस्तित्व, माझा स्वाभिमान, माझा जीव सगळं काही समर्पित केलं होतं, तिथं शेवटी पदरी पडली ती फक्त आणि फक्त फसगत..! काही नाती ही निसर्गासारखी असतात, ऋतूप्रमाणे बदलतात. 👇👇
Rohan retweeted
आई आज बोलली, खूप सहज बोलून गेली. कोणी आवडत असेल, कुठल्याही जातीची असली तरी चालेल, पण लेका, दुसरं लग्न करून घे रे..! तिचं हे सांगणं, तिची ही अगतिकता पाहून मला तिची कणव आली, पण सोबतच स्वतःच्या नशिबाची थट्टाही वाटली. ती बोलली ते अगदी योग्यच आहे, एका आईच्या मायेला धरूनच आहे. 👇👇
Rohan retweeted
On #Nehru ji’s 137th birth anniversary, looking back on his legacy in this month’s #OpenEssay in @Openthemag (the article occupies two tweets or posts or whatever they are now called ):
Rohan retweeted
बीज चुकीचं नसतं,
कदाचित मातीच चुकीची असते..!!!
स्वतःला बदलण्यापेक्षा स्वतःला फुलण्यासाठी योग्य वातावरण शोधा...
एखाद्या पाकिटामध्ये एक बीज अनेक वर्षं पडून राहतं. ना त्याला पाणी मिळत, ना सूर्यप्रकाश, ना मातीचा स्पर्श… ते तिथेच असतं. शांतपणे… निश्चलपणे…
त्याच बीजाला जर जमिनीत पेरलं, त्याला थोडं पाणी दिलं, सूर्यप्रकाश दिला, तर काही दिवसांनी त्यातून एक छोटासा अंकुर बाहेर येतो. तो अंकुर हळूहळू रोपटं बनतो, झाड बनतो आणि एक दिवस त्याच झाडावर सुंदर फुलं उमलतात.
जे बीज पाकिटात असताना उगवलं नाही, ते बीज खराब होतं का?
तर, नाही...
त्याच्यात क्षमता होती. त्याच्यात संपूर्ण झाड बनण्याची ताकद होती. फक्त त्याला वाढण्यासाठी योग्य परिस्थिती मिळाली नव्हती.
आपल्या आयुष्यातील अनेकांची गोष्टसुद्धा अगदी अशीच असते.
काही माणसं आयुष्यात मागे पडलेली नसतात… ती फक्त चुकीच्या वातावरणात अडकलेली असतात.
काही माणसांमध्ये गुणवत्ता नसते असं नाही… त्यांच्या गुणवत्तेला ओळखणारं कुणी नसतं.
काही माणसं कमकुवत नसतात… त्यांना सतत कमकुवत असल्याची जाणीव करून दिलेली असते.
प्रत्येक वेळी स्वतःला बदलण्याची गरज नसते… कधी कधी फक्त आपल्याला फुलण्यासाठी योग्य जागेची गरज असते...
माणसाच्या आयुष्यातील सर्वांत मोठी शोकांतिका कोणती माहीत आहे?
ती म्हणजे दुसऱ्यांनी आपल्याला कमी समजण्यापूर्वी आपण स्वतःलाच कमी समजायला लागतो.
शाळेत एखादं मूल अभ्यासात फारसं हुशार नसतं. त्याला गणित जमत नाही, इंग्रजी जमत नाही, परीक्षेत कमी गुण मिळतात.
त्याची तुलना दुसऱ्या मुलांशी केली जाते.
"बघ, तो किती हुशार आहे!"
"तुझ्या वर्गातले सगळे पुढे गेले, तूच मागे आहेस!"
"तुझं काही होणार नाही!"
हे शब्द ऐकता ऐकता ते मूल स्वतःवर विश्वास ठेवणंच सोडून देतं.
त्या मुलामध्ये बुद्धिमत्ता नव्हती की त्याची बुद्धिमत्ता ओळखण्याची आपली पद्धत चुकीची होती?
कारण प्रत्येक मुलाची शिकण्याची पद्धत वेगळी असते. एखादं मूल पुस्तकातून शिकतं, एखादं प्रयोगातून शिकतं, एखादं चित्रातून शिकतं, तर एखादं प्रत्यक्ष अनुभवातून शिकतं.
आपण मात्र सगळ्यांना एकाच मापाने मोजतो आणि मग जो त्या मापात बसत नाही, त्याला कमी लेखतो.
कदाचित तोच मुलगा उद्या उत्तम चित्रकार बनेल, एखादा उत्कृष्ट व्यावसायिक बनेल, एखादा शास्त्रज्ञ बनेल किंवा हजारो लोकांना रोजगार देणारा उद्योजक बनेल.
पण त्यासाठी त्याला आधी स्वतःवर विश्वास ठेवता आला पाहिजे.
लक्षात ठेवा, माशाची क्षमता झाडावर चढण्यावरून ठरवली, तर मासा आयुष्यभर स्वतःला अपयशीच समजेल...
निसर्गाकडे पाहिलं तर एक सुंदर गोष्ट लक्षात येते.
कमळ चिखलात फुलतं.
गुलाबाला खास काळजी लागते.
कॅक्टस वाळवंटात जगतो.
तर काही वनस्पतींना भरपूर पाणी आणि सावली लागते.
आपण कॅक्टसला कमळासारखं वाढवायचा प्रयत्न केला, तर काय होईल?
कॅक्टस मरेल ना?
याचा अर्थ कॅक्टस वाईट नाही आणि कमळ श्रेष्ठ नाही.
त्यांची वाढण्याची परिस्थिती वेगवेगळी आहे.
मग माणसांच्या बाबतीत आपण हा साधा नियम का विसरतो?
प्रत्येकाची स्वप्नं वेगळी आहेत.
प्रत्येकाची क्षमता वेगळी आहे.
प्रत्येकाची गती वेगळी आहे.
एखादा माणूस वयाच्या पंचविशीत यशस्वी होतो, दुसरा चाळिशीत स्वतःचा व्यवसाय सुरू करतो, तर तिसरा पन्नाशीनंतर आयुष्याची नवी दिशा शोधतो.
पण समाजाला सगळ्यांनी एकाच वयात यशस्वी व्हावं असं वाटतं.
वयाच्या पंचविशीत नोकरी हवी.
तिशीत घर हवं.
चाळिशीत गाडी हवी.
पन्नाशीत मोठं पद हवं.
आणि हे सगळं मिळालं नाही तर आपण मागे पडलो, असं समजलं जातं.
आयुष्य ही काही शर्यत नाही, जिथे प्रत्येकाला एकाच वेळी अंतिम रेषा गाठायची आहे.
कुणाचा वसंतऋतू लवकर येतो, कुणाचा थोडा उशिरा… पण उशिरा फुललेलं फूलसुद्धा तितकंच सुंदर असतं...
आपल्या आयुष्यात दोन प्रकारची माणसं भेटतात.
पहिली माणसं अशी असतात, जी आपल्याला सतत आपली कमतरता दाखवतात.
आणि दुसरी माणसं अशी असतात, जी आपल्यातली क्षमता दाखवतात.
पहिली माणसं म्हणतात,
"तुला हे जमणार नाही."
"तुझ्यात ती गुणवत्ता नाही."
"तू फार मोठी स्वप्नं पाहू नकोस."
तर दुसरी माणसं म्हणतात,
"एकदा प्रयत्न करून बघ."
"चुकलास तरी हरकत नाही."
"मी आहे तुझ्या पाठीशी."
दोन्ही प्रकारच्या माणसांमध्ये फरक काय आहे?
पहिली माणसं आपल्याला आपली मर्यादा दाखवतात.
दुसरी माणसं आपल्याला आपल्या शक्यता दाखवतात.
उदा
एखादी स्त्री लग्नानंतर घर, संसार, मुलं आणि जबाबदाऱ्या सांभाळत असते. तिच्यामध्ये एखादी कला असते. तिला शिवणकाम येतं, चित्रकला येते, स्वयंपाकाची आवड असते किंवा व्यवसाय करण्याची इच्छा असते.























































