
Journalist, @BBCNewsMarathi, based at New Delhi. National Red Ink Awardee (2022). Heart belongs to Raigad, Maharashtra.
Joined October 2020
- Tweets6K
- Following1.1K
- Followers8.2K
- Likes2.9K
बीबीसी मराठीनं म्हात्रोळी गावातून केलेला ग्राऊंड रिपोर्ट नक्की पाहा आणि विचार करा, नेमकं चाललंय काय. आमचा मित्र आणि सहकारी अल्पेश करकरेनं हा रिपोर्ट केलाय. @alpeshreport
youtube.com/watch?v=gx2x0LGn…
अक्षयचं कौतुक माझ्यासाठी अभिमानानं उर भरून येणारंच असतं. काळजाचा तुकडा आहे तो माझ्या. अक्षय एबीपी माझामध्ये ग्राफिक डिझायनर म्हणून काम करतो. एबीपी न्यूज नेटवर्ककडून देण्यात येणारा 'श्रेष्ठ सन्मान' ग्राफिक कॅटेगरीतून अक्षयला मिळाला. अभिनंदन, अक्षय. ❤ @TheAkshayKatkar
आजवर नेमाड्यांवरचा 'मायमावशी'चा विशेषांक वाचलाय. मी त्यांचे इतर अंक वाचलेले नाहीत. पण यंदाच्या दिवाळीच्या अंकाची अनुक्रमणिका पाहता, इंटरेस्टिंग वाटतंय.
सतत-अविरत लिहित राहिलेल्या माणसाच्या 'सर्वोत्तम' शब्दांचा ऐवज. बालगंधर्वांपासून धर्मानंद कोसंबींपर्यंत, बोरकरांपासून पुलंपर्यंत, हेमिंग्वेपासून पर्ल बकपर्यंत... संपूच नये असं. सुंदर. खरंच सर्वोत्तम.
दिल्लीतल्या आमच्या काही मित्र-मैत्रिणींनी एकत्र येत दिवाळी अंक काढलाय. मराठीत दिवाळी अंकाला मोठी परंपरा आहे. देशाच्या राजधानीतून ही परंपरा पुढे नेण्याच्या या सृजनशील आणि प्रयोगशील पावलाला माझ्या सदिच्छा! #यमुनाकाठ
'वनस्पतींना संवेदना असतात, परिणामी त्यांना वेदना होतात, सुख-दु:ख कळतं' असं सिद्ध करणारी व्यक्ती जगदीशचंद्र बोस यांच्या रूपाने भारतीय, आणि 'वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरें' म्हणणारे तुकोबा तर महाराष्ट्रभूमीवरचेच. पण हा भूतकाळ झाला. आता आपण 'विकासाच्या' दिशेनं धावतोय! #Bhimashankar
खांद्यावरचा हात प्रचंड वजनदार जाणवला! ❤️
तळागाळातल्या माणसाच्या पोटापाण्याच्या प्रश्नाचं उत्तर आपल्या आर्थिक धोरणांमध्ये असावं आणि तसंच आपल्या एकूण अभ्यासाचं प्रत्यक्षातील रिफ्लेक्शन असावं, यासाठी धडपडणाऱ्या या 'अस्सल भारतीय' माणसाला दिल्लीत रिपोर्टिंगदरम्यान भेटलो.
#JeanDrèze
गावपण काळजात घेऊन सर्वत्र वावरणाऱ्या भीमा-सरस्वतीच्या काठावर उगवलेल्या माणसाची ही गोष्ट. फक्त माणसं नव्हे, घर-दार, नदी-डोंगर, झाडी-झुडपं, प्राणी-पक्षी अशा सगळ्या धाग्यांनी विणलेली ही खरीखुरी गोष्ट. अरूण जाखडे नावाच्या माणसाची. गाव आठवत राहतो पाना-पानावर. वाचनीय पुस्तक.
तशी सुंदर नर्सरी हीच सर्वाधिक आवडणारी गोष्ट आहे. त्यात तिथे आता ग्रंथालय बनवलंय. बारीकसं आहे. पुस्तकं सुद्धा मोजकीच आहेत. पण ठीक आहे. हळूहळू वाढ होईल. आजूबाजूच्या झाडांसारखी. आणि हे ग्रंथालय बांधलंय सुद्धा सुंदर नर्सरीला साजेसं, देखणं! #NewDelhi
कृत्रिम बुद्धिमत्तेसंदर्भात (AI) गेल्या आठवड्याभरात अँथ्रोपिक आणि इतर कंपन्यांच्या प्रमुख व्यक्तींनी केलेली विधानं, त्यावरून सुरू असलेल्या चर्चा पाहा, ऐका; एआय अपरिहार्य असलं, तरी हे सगळं किती गंभीर वळणावर आहे, लक्षात येईल.
वैभव खरात यांचा आजच्या लोकसत्तेतील लेख महत्त्वाचा आहे. खर्गेंच्या सभेनंतर केलेल्या 'शुद्धीकरण हवना'च्या निमित्तानं आहे.
यार आशिष... भयंकर भयंकर वाईट बातमी. मित्रा, तुझ्यासोबतच्या भेटी आणि चर्चा कायम लक्षात राहतील. आदरांजली मित्रा.
आज सुंदर नर्सरीत #DragonFlyWalk केला. ही सृष्टी केवळ माणसाची नाही, तर इतर जीवांची सुद्धा आहे आणि हे इतर जीव खऱ्या अर्थाने सहअस्तित्व जाणतात, हे पुन्हा एकदा लक्षात आणून देण्यासाठी 'गिव्ह मी ट्रीज'चे इश्तियाक अहमद सर आणि 'सुंदर नर्सरी'चे रोहन यांचे खरंच आभार. #NewDelhi




























